Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

संन्यास

च — चलत मुसाफिर, Fri, 04/03/2020 - 06:48
दिन मावळला, छाया दाटे क्लांत मनाला भीती वाटे दिवसभराचे रोकड संचित कमावले, की कधीच नव्हते? भवताली गर्दी ओसरते स्तब्ध एकटे पंखे, पलिते फडफड कोरी मेजावरली काय कुणा ती सांगु पाहते..? होते काही रेशिमधागे आले कुठुनी मागे मागे हातावरती विसावलेले होते का, की कधीच नव्हते..? सोबत होती तुझी सावली खट्याळ, मोहक, श्यामसावळी अखेरचा अंधार पसरता असेल का, की साथ सोडते? प्रवास आता मुक्कामाचा शोधायाचा मार्ग स्वतःचा सामानाचे ओझे टाळुन घेतो सोबत हास्य तुझे ते परतीचा रथ तयार आहे काळ सारथी वळुनी पाहे मिटू लागते किवाड, खिडकी पैलतिरी घर वाट पाहते..

प्रतिक्रिया द्या
4158 वाचन

💬 प्रतिसाद (9)
च
चांदणे संदीप Fri, 04/03/2020 - 07:09 नवीन
सुंदर रचना. अतिशय आवडली. सं - दी - प
  • Log in or register to post comments
च
चलत मुसाफिर Fri, 04/03/2020 - 09:25 नवीन
प्रोत्साहनासाठी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप
स
सतिश गावडे Fri, 04/03/2020 - 09:32 नवीन
कवितेचा आशय नाही आवडला, उदासिनता आहे आशयात. मात्र रचना म्हणून खुपच सुंदर आहे कविता.
  • Log in or register to post comments
च
चलत मुसाफिर Fri, 04/03/2020 - 10:20 नवीन
'हा' मुक्काम हलवून पैलतीरी जावे लागणार अशी एक अपरिहार्य जाणीव निवेदकास झालेली असल्यामुळे औदासीन्य ओघाने आलेच. रचना तुम्हाला आवडली हे वाचून आनंद झाला. वास्तविक माझी मराठी शब्दसंपदा तशी मर्यादितच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
र
राघव Tue, 04/07/2020 - 08:30 नवीन
आवडेश! पण पैलतीरी जायचंय यात औदासिन्य असायलाच हवं असं काही नाही! :-) या रचनेवरून एक मागे लिहिलेली द्विपदी आठवली.. खळाळत्या नदीतीरी सांज घेते ठाव, पैलतीरी उभा माझ्या विठ्ठलाचा गाव!
  • Log in or register to post comments
च
चलत मुसाफिर Tue, 04/07/2020 - 09:52 नवीन
तुमच्या ओळी आवडल्या. पैलतीराकडेच आपला प्रवास आहे याची जाणीव प्रत्येकाने बाळगावी. पण तो प्रवास करताना जगन्नियंत्याने ऐलतीरावर निर्माण कैलेले सृष्टीचे व मायेचे अदभुत सौंदर्य दृष्टीआड करू नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव
स
सतिश गावडे Tue, 04/07/2020 - 10:42 नवीन
सध्या जगन्नियंता रजेवर आहे. त्यामुळे मानवाला ऐलतीरावरील आपली लढाई आपणच लढावी लागत आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चलत मुसाफिर
च
चलत मुसाफिर Tue, 04/07/2020 - 11:56 नवीन
जगन्नियंता रजेवर वगैरे नाही, कार्यालयी हजर आहे आणि जगगाडा हाकत आहे. आपणच आपल्या चुकीने तोल सुटून खाली पडायचा व चाकाखाली येण्याचा धोका निर्माण झाला आहे इतकेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
च
चलत मुसाफिर Sat, 04/18/2020 - 16:39 नवीन
या कवितेतील निवडक ओळींना माझा मावसभाऊ कपिल रानडे यांने चाल लावली व त्याचे मित्र श्रीकांत जोशी यांच्या आवाजात ती ध्वनिमुद्रित केली. तसेच कपिलने स्वतः चित्रित केलेला समर्पक व्हिडिओही त्याला जोडला. हा व्हिडिओ यूट्यूबवर पहाता येईल. दुवा येणेप्रमाणे https://youtu.be/KFGnUMWnCgk
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा