Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

हसता हसता जगणे शिका, हसण्याची सवय बनवा.

क
कबिर
Sat, 04/04/2020 - 13:51
💬 6 प्रतिसाद
चेहऱ्यावरील हास्य सर्व तणावाना दूर करते. हसरा चेहरा सर्वाना आकर्षित करतो. अनोळखी व्यक्तीबरोबर हास्याद्वारे मैत्रीचे तार जुळतात. चेहऱ्यावरील हास्य दुसर्यांना आनंद देतेच पण स्वतःला एक आंतरिक प्रसन्नतेचा अनुभव देते. तन मनाला ऊर्जा प्रदान करते. जी व्यक्ती हसत हसत प्रत्येक समस्येवर मार्ग काढते ती व्यक्ती जीवनात सफलता प्राप्त करतात. हास्य एक व्यायामासारखे आहे, त्यामुळे चेहऱ्यावरील चमक वाढते. लहान बाळ जन्मतःच रडतो. चार पाच हप्त्याने स्मितहास्य करतो. चार पाच महिन्यांनी हसायला लागतो. लहान बाळाचे हास्य निरागस असते. खरे प्रेमयुक्त हास्याचा अभ्यास केल्यास संपूर्ण जीवनात साकारात्मक बदल दिसतात. हसत केलेला संवाद विश्वास व सदिच्छा निर्माण करतात. खोटे हास्य, नकली हास्य आचरणावर काहीच परिणाम करत नाही. जी वस्तू दिल्याने, वाटल्याने कमी होत नाही. तर हाय व्यक्त करण्यात कंजुषी का करायची. क्षणभरचे हास्य मनुष्याला दुःखापासून कोसो दूर घेउन जाते. जे हसू शकतात तेच सौंदर्य पाहू शकतात व त्यांचे डोळे कधीही वृद्ध होत नाहीत.

प्रतिक्रिया द्या
2680 वाचन

💬 प्रतिसाद (6)
श
शाम भागवत Mon, 04/06/2020 - 07:35 नवीन
खरे प्रेमयुक्त हास्याचा अभ्यास केल्यास
हे फारसं कळलं नाही. पण चांगला विषय निवडलाय. पण जसजसा राग व द्वेष कमी होतो, परिचयातील कोणतीही व्यक्ति टाळाविशी वाटत नाही, तेव्हा हाय हॅलो करताना, कोणतीच अपेक्षा नसलेले प्रेमयुक्त हास्य चेहऱ्यावर आपोआप येते व तो माणूस दृष्टीआड झाल्यावरही ते हास्य आपल्या चेहऱ्यावर काही क्षण रेंगाळते. अंत:करण स्वच्छ होत जाणं हेच यामागचे कारण असते. असो.
  • Log in or register to post comments
क
कबिर Sun, 04/12/2020 - 06:42 नवीन
कोणतीच अपेक्षा नसलेले प्रेमयुक्त हास्य चेहऱ्यावर आपोआप येते व तो माणूस दृष्टीआड झाल्यावरही ते हास्य आपल्या चेहऱ्यावर काही क्षण रेंगाळते. खुपच छान अवलोकन.
  • Log in or register to post comments
ग
गोंधळी Sun, 04/12/2020 - 08:17 नवीन
खोटे हास्य, नकली हास्य आचरणावर काहीच परिणाम करत नाही. समजल नाही.
  • Log in or register to post comments
क
कबिर गुरुवार, 04/16/2020 - 09:46 नवीन
३५० वाचक द्यन्यवाद
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Sat, 04/18/2020 - 09:54 नवीन
अभिनंदन ! आता ४१० झालेत. मी ४११ वा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कबिर
स
सतिश गावडे Sat, 04/18/2020 - 10:25 नवीन
अभिनंदन ! आता ४१३ झालेत. मी ४१४ वा !
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा