Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

शशक- माकडांपासून सुटका!!

C
Cuty
Sun, 04/05/2020 - 15:26
💬 25 प्रतिसाद
मी काॅलेजला गेले त्यावर्षीची गोष्ट. काय झाले काय माहीत पण अचानकच गावात माकडांची संख्या खूप वाढली. जिकडेतिकडे माकडेच दिसू लागली. गावातल्या चौकात, वडाच्या पारावर, ईमारतींच्या गच्चीवर, चक्क देवळात आणि रस्त्यांवरही माकडे मुक्तपणे संचारू लागली. गावातील लोक आणि दुकानदारही त्यांच्या माकडचाळ्यांनी त्रस्त झाले. संध्याकाळी अंगणात माझी लहान भावंडे खेळत, अन या माकडांच्या टोळ्या घराभोवती हुंदडत. कधीकधी माकडे त्यांना वाकुल्या दाखवत, डोक्यावर टपली मारत, गालगुच्चा घेत. माझ्या मैत्रिणींच्या घरीदेखील हीच परिस्थिती. एकदा काॅलेजला जात असताना गर्दीत माझी ओढणी कुणीतरी मागून खस्सकन ओढली. बघते तो एक माकड पटकन पळून गेले. माझ्या मैत्रिणीही खूप घाबरल्या. एकीने सांगितले, अशीच एकदा माकडाने तिची वेणी ओढली होती. आम्ही वर्गात बसलो असताना व-हांड्यात माकडे दात विचकत सदैव फिरायची. शिक्षकही वैतागले. शेवटी घरच्यांनी तोडगा काढला! एक दिवस गावाहून मामा, एक बर्यापैकी दिसणारे अन असणारे माकड घेऊन आला. घरच्यांनी त्याच्याबरोबर माझे लग्न लावून पाठवून दिले. आता दहा वर्षे झाली, आमच्या घराजवळ माकडे अजिबात फिरकत नाहीत !!

प्रतिक्रिया द्या
8428 वाचन

💬 प्रतिसाद (25)
प
प्रमोद देर्देकर Sun, 04/05/2020 - 17:04 नवीन
कमाल आहे ! तुमच्या घरच्यांनी तुमचं लग्न माकडा बरोबर कसे काय बरं लावून दिले ?
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sun, 04/05/2020 - 17:37 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देर्देकर
ध
धर्मराजमुटके Sun, 04/05/2020 - 17:42 नवीन
अहो शेवटी किती झालं तरी माणूस म्हणजे सुधारीत आवृत्ती असलेलं माकडचं की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देर्देकर
ध
धर्मराजमुटके Sun, 04/05/2020 - 17:11 नवीन
मस्त लिहिलयं ! कथा आवडली.
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Sun, 04/05/2020 - 19:02 नवीन
जबरदस्त!! कथा मस्त जमलीये... !!
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 04/05/2020 - 19:16 नवीन
एक बर्यापैकी दिसणारे अन असणारे माकड घेऊन आला. गोरिला ? :)))

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Tere Mere Beech Mein... :- Ek Duuje Ke Liye
  • Log in or register to post comments
न
नावातकायआहे Mon, 04/06/2020 - 09:08 नवीन
गोरिला!!! :=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
C
Cuty Sun, 04/05/2020 - 19:56 नवीन
प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे आभार ! अहो कथेमध्ये ही सर्व बिनशेपटीची आणि पोरींना त्रास देणारी टगी माकडं आहेत !
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Mon, 04/06/2020 - 12:19 नवीन
अहो कथेमध्ये ही सर्व बिनशेपटीची आणि पोरींना त्रास देणारी टगी माकडं आहेत
हो का ? मगा या पोरीने एका माकडाशी लग्न केले की.. म्हणजे ही एका माकड आणि माकडिणीच्या लग्नाची गोष्ट आहे तर.. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Cuty
C
Cuty Mon, 04/06/2020 - 13:03 नवीन
काय आहे, जेव्हा मुलगी मोठी होते, काॅलेजला जाते तेव्हा तिच्यामागे अशा माकडांचा त्रास लागतो. घरचेही वैतागतात अन यावर सुटका करून घेण्यासाठी परगावातील असे एखादे माकड शोधतात ज्याने त्या गावात केलेल्या माकडचाळ्यांचा यांना पत्ताच नसतो. त्या माकडाबरोबर एकदा मुलीचे लग्न लागले कि, ईतर माकडांपासून आपोआप सुटका होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
र
राजेंद्र मेहेंदळे Mon, 04/06/2020 - 13:44 नवीन
मुलगी मोठी झाली की माकडे मागे लागतात आणि त्यापासुन सुटका मिळवायला तिचे लग्न केले जाते? म्हणजे कायद्याचा धाक वगैरे नाहीच म्हणायचा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Cuty
C
Cuty Mon, 04/06/2020 - 13:55 नवीन
विनोदी कथा आहे. वाचकांनी कृपया विनोदबुध्दीनेच वाचावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेंद्र मेहेंदळे
म
मराठी कथालेखक Mon, 04/06/2020 - 13:49 नवीन
माकडाशी लग्न करते म्हणजे ती मुलगी पण माकडिणच.. आणि हे माकडाला आणणारे "मामा" म्हणजे पण पुर्वाश्रमीचे माकडच ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Cuty
स
सतिश गावडे Tue, 04/07/2020 - 15:33 नवीन
घरचेही वैतागतात अन यावर सुटका करून घेण्यासाठी परगावातील असे एखादे माकड शोधतात ज्याने त्या गावात केलेल्या माकडचाळ्यांचा यांना पत्ताच नसतो
हे बहुतांश वेळा तेव्हाच होते जेव्हा माकडीणीचाही त्या माकडचाळ्यांमध्ये सहभाग असतो. माकडीणीचा सहभाग नसेल तर माकडीणीच्या कुटुंबाकडून कायदेशीर कारवाईचा वापर केला जातो. आणि माकडीणीचे कुटुंब प्रभावी नसेल तर कायदेशीर कारवाई करण्यास यंत्रणा टाळाटाळ करते आणि मग एखादी दुर्दैवी घटना घडते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Cuty
म
मदनबाण Tue, 04/07/2020 - 16:27 नवीन
घरचेही वैतागतात अन यावर सुटका करून घेण्यासाठी परगावातील असे एखादे माकड शोधतात ज्याने त्या गावात केलेल्या माकडचाळ्यांचा यांना पत्ताच नसतो खरं तर मला हे वाक्य नीट समजलेले नाही ! म्हणजे... १] परगावातील माकडा ने त्याच्या गावात त्याने केलेले चाळे इकडच्या माकडीणीच्या घरच्यांना ठावुक नसतात ? २] परगावतील माकडाला इकडच्या गावाकडील माकडांचे [ इथे माकडीण इकडच्या माकडांना फक्त वाकुल्याच दाखवते असे गृहित धरले आहे. ] प्रताप माहित नसल्याने त्याची निवड केली ? ३] परगावाच्या माकडाची शुद्ध फसवणुक झालेली आहे ? [ इथे माकडीण देखील इकडच्या माकड चाळ्यांत सहभागी आहे असे गृहित धरले आहे. ] ४] परगावाच्या माकडाने देखील चाळे केलेत हे कशावरुन समजुन येते ? [ हे पहिल्या प्रश्नाशीच निगडीत आहे. ] वरील सर्व प्रश्नां पेक्षा सर्वात महत्वाचा प्रश्न :- माकडीणीला माकडीण म्हंटलेले चालते / सहन होते का ? :))) जाता जाता :- सध्या गोरिला काय करतो ? नाही लॉक डाउन आहे म्हणुन विचारले ! :)))

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Bumbro... :- Mission Kashmir
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
भ
भीमराव Mon, 04/06/2020 - 07:19 नवीन
छान
  • Log in or register to post comments
ब
बिपीन सुरेश सांगळे Tue, 04/07/2020 - 06:08 नवीन
मस्त कथा मस्त रूपक मस्त विनोदी
  • Log in or register to post comments
C
Cuty Tue, 04/07/2020 - 12:09 नवीन
सर्व वाचकांचे पुन्हा आभार!
  • Log in or register to post comments
च
चलत मुसाफिर Tue, 04/07/2020 - 12:16 नवीन
माकडांचे टोळी माकड दबंग माकडची गुंड माकडांचे वगैरे (टाळचिपळ्यांसह) गाण्याचा मोह होत आहे.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Tue, 04/07/2020 - 16:08 नवीन
क्युटी, तुमची मर्कटकथा आवडली. लायसन नामे एक मर्कटप्रतिसारक कृष्णमणिमाला बाजारी मिळते. वापरून पाहायला हवी होती. कथेची खुमारी वाढली असती (वै.म.). आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
C
Cuty Wed, 04/08/2020 - 05:21 नवीन
धन्यवाद चलत मुसाफिर, धन्यवाद गामा पैलवान. शेवटी मुलीच्या घरच्यांनीही तिच्या गळ्यात मंगळसूत्रच (लायसन नामे कृष्णमणिमाला)घातले आहे.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान गुरुवार, 04/09/2020 - 15:50 नवीन
ते तर आहेच. नाईलाजको क्या इलाज ....! मी म्हणंत होतो की नुसतंच लायसन लटकावायचं. माकड गळ्यात बांधून न घेता. वाटल्यास एक दीर्घव्यासी रक्तबिम्बिकासुद्धा भालप्रदेशी चिकटवून द्यायची. -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Cuty
ख
खेडूत गुरुवार, 04/09/2020 - 18:41 नवीन
कथा म्हणून आवडली... फक्त शशक का नाव दिलं कळलं नाही :) पूर्वी शंभरच शब्द असत..हल्ली एकूण सगळंच वाढलं आहे! - खेड्यातील माकड
  • Log in or register to post comments
D
dhananjay.khadilkar Tue, 04/14/2020 - 15:24 नवीन
उत्तम कथा
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Wed, 04/15/2020 - 05:26 नवीन
माकड माकडीण माकड माकडीण कशात काय टोटल लागेना, हे लिहायच्या अगोदर जव्हेगंज ह्यांची 'माकडीचा माळ' वाचली असती तर बरे झाले असते.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा