पाककृती

घरात असलेलया गोष्टींपासून खायला बनवा

Primary tabs

घरात असलेलया गोष्टींपासून खायला बनवा हि परिस्थिती सध्या असल्यामुळे आम्लेट आणि नूडल्स या तर नेहमीच्याच गोष्टी ... आज जरा "इधर का माल उधार करावा " म्हणले
"बेक्ड नुडल आम्लेट !"
साहित्य:
घरात असतील त्या भाज्या आणि काही मांसाहारी खिमा असेल तर
( मी गाजर, पातीचा कांदा आणि पर्वाची झुकिनी वापरली आणि मास म्हणून नुकत्याच केलेली ग्योझे चे तुकडे करवून परतवून घेतले, यात झिंगे / पातीचा कांदा हे सारण होते )
- आपल्या आवडीच्या झटपट नुडल वापराव्यात ..
( मी आज कोरियन पद्धतीच्या सी फूड चवीच्या नुडल वापरल्या.. कोरियन पदार्थ हे साधारण चांगले तिखट असतात आणि त्यांची तांबड्यामिरची ची पूड चांगली झणझणीत असते )

कृती:
- नूडल्स करून घयव्यात , त्यात वरील परतलेल्या भाज्या खिमा वैगरे घालावे .. आचेवरून उतरून कोमट होऊ दयावे
-अंड्यात थोडे सोय सॉस घालून फेटून त्याची पोळी बनवावी , थोडी जाड असावी म्हणजे उलटायला सोपी जाईल
- पोळी एकाबाजूने होत आली कि त्यावर वरील नूडल्स घालाव्यात व आचेवरून काढावे
- हे अर्धे झालेले आम्लेट चे "जुगाड" ओव्हन मधील ग्रील खाली नुडल थोड्या तांबूस होई पर्यंत भाजून घ्यावे ( ओव्हन नसल्यास पसरट भांड्यात मध्ये पण भाजू शकता )
परतलेले "गोझ्याचे तुकडे
IMG_7512[1]
नुडल ची खिचडी.. सर्वात शेवटी कोरियन मसाला घातला आहे त्यात काळसर दिसती आहे ती केल्प हि वनस्पती
IMG_7516[1]
" अर्ध चमलेट आ "
IMG_7528[1]
नुडल आणि अंडे यांचे अधमुरे "ओपन सँडविच "
IMG_7518[1]
IMG_7529[1]
IMG_7530[1]
खालील प्लेटकृतीत जी बाजूला भुरभुरलेले दिसते आहे ती कोरडी जपानी तिखट आणि तीळ यांची खुमासदार चटणी "शीचीमी "
IMG_7531[1]

चौकस२१२

नाही बेबी स्पिनॅच आहेत