Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पंचमदाच्या गाण्यांवरून घेतलेली चित्रपटांची नावे

च
चलत मुसाफिर
Mon, 04/13/2020 - 06:20
🗣 3 प्रतिसाद
करोना लॉकडाऊनमुळे मिपाकरांजवळ चिकार मोकळा वेळ असणार असे गृहीत धरून ही किंचितचर्चा सुरू करत आहे. प्रतिसादांतून ती पुढे न्यावी ही विनंती. ******* पंचम (आर डी बर्मन)चे समकालीन असलेले लक्ष्मीकांत- प्यारेलाल, कल्याणजी-आनंदजी, राजेश रोशन, बप्पी लाहिरी हे (मोजकी काही गाणी वगळता) बरेचसे विस्मृतीत गेलेले आहेत. इतकेच काय, नंतरच्या जमान्यातील आनंद- मिलिंद, नदीम- श्रवण, आदेश श्रीवास्तव यांच्याशीही नव्या पिढीचे फार नाते जुळताना दिसत नाही (जतिन ललित आणि ए आर रहमान हे काहीसे अपवाद). पंचमची असंख्य गाणी मात्र आजही आवडीने ऐकली जातात. आजच्या पिढीलाही ती कालबाह्य वाटत नाहीत. अर्थात पंचमने एकेकाळी (विशेषतः 80च्या दशकात) आनेक सुमार चित्रपटांतून रोहयोवर मजुरी केल्यासारखे घाऊक संगीत दिले होते. उचलाउचलीही त्याने अनेकदा केलेली आहे. त्यामुळे सगळी गाणी दर्जेदार आहेतच असे नाही. पण त्याची सदाबहार गाणी अजूनही निःसंशय लोकप्रिय आहेत. ******* तर हे असे काही चित्रपट, ज्यांची नावे पंचमच्या लोकप्रिय गाण्यांवरून घेतलेली आहेत.: दिल ने जिसे अपना कहा (सलमान खान) दम मारो दम (अभिषेक बच्चन) बचना ऐ हसीनो (रणबीर कपूर. हेच गाणे या चित्रपटासाठी रीमिक्सही करण्यात आले होते.) चुरा लिया है तुमने (इशा देओल) जब तक है जान (शाहरुख खान) ये जवानी है दिवानी (रणबीर कपूर) दीवाना मुझसा नही (आमिर खान) आ देखे जरा (नील नितिन मुकेश) जाने तू या जाने ना (जेनेलिया डिसूझा) एक मै और एक तू (या नावाचे दोन चित्रपट निघालेले आहेत) खुल्लम खुल्ला प्यार करेंगे (गोविंदा) नाम गुम जाएगा (दिया मिर्झा. हा चित्रपटआपले नाव सार्थ करत पार विस्मृतीत गेला आहे) फिर वोही रात (राजेश खन्ना. दिग्दर्शक- डॕनी) क्या यही प्यार है (आफताब शिवदासानी) लाल रंग (रणदीप हुडा) लो मै आ गया (हा महेश कोठारेने आपल्याच 'दे दणादण'वरून काढलेला हिंदी सिनेमा.)
वर्गीकरण
चित्रपट
संगीत

प्रतिक्रिया द्या
2128 वाचन

💬 प्रतिसाद (3)
च
चलत मुसाफिर Mon, 04/13/2020 - 06:32 नवीन
एक लडकी को देखा तो ऐसा लगा (सोनम कपूर). हा यादीत जोडायचा राहून गेला.
  • Log in or register to post comments
ह
हुप्प्या Tue, 04/14/2020 - 18:24 नवीन
लाल रंग हे कुठले गाणे? प्रेमनगर मधील? ते तर एस डी बर्मनचे आहे ना?
  • Log in or register to post comments
च
चलत मुसाफिर Tue, 04/14/2020 - 18:29 नवीन
हो, चूक झाली. ते गाणं पंचमदाचं नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा