Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कोरोना आणि काळीज

च
चिनार
Tue, 04/21/2020 - 10:42
💬 5 प्रतिसाद
तर त्याचं कसंय खंडेराव, आमची नोकरी येते अत्यावश्यक सेवेमध्ये.. त्यामुळे लॉकडाऊन सुरू असतानाही रोज अर्धा दिवस तरी ऑफिस असतंच.. पण दुःख त्याचं नाहीये, तीन साडेतीनला घरी आल्यावर आधी आंघोळ करायची. त्यानंतरच भाकर मिळते गिळायला... दुःख ह्याचंही नाहीये.. कोरोना स्पेशल म्हणून बायकोनी माझे दोन जोडी कपडे वेगळे काढून ठेवलेत. अंघोळ करताना स्वतःच्या हाताने धुवायचे. अन सकाळी इस्तरी करून घालायचे... सकाळीच इस्तरी केलेलं शर्टपॅन्ट दुपारी धुताना काळजात कसं चर्रर्र चर्रर्र होत असतं ते तुम्हाला नाही कळणार खंडेराव!! तुम्हाला नाही कळणार! अजून ऐका खंडेराव, कोरोना गेल्यावर त्याच दोन जोडी कपड्याच्या बदल्यात बोहारणीकडून एक मोठं भगूनं घेण्याचा प्लॅन ठरलाय सासू-सुनेचा.. काळीज तिळ तिळ तुटतंय खंडेराव.. पण सांगायचं कोणाला..! असो..कोरोना जाणार अन बोहारीण परत दाराशी येणार हा आशावाद काय कमी सुखावणारा आहे का! चालायचंच! #लॉकडाऊन ©चिनार जोशी

प्रतिक्रिया द्या
2710 वाचन

💬 प्रतिसाद (5)
न
नीलकांत गुरुवार, 04/23/2020 - 19:44 नवीन
याच परिस्थितीतून जात असल्यामुळे लेखन आवडलं खंडेराव.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 04/24/2020 - 06:33 नवीन
अनुक्रमे डॉक्टर पोलीस आणि नियमित जे कर्मचारी सध्याच्या काळात काम करीत आहेत त्यांची मनस्थितीची कल्पनाच करुन शकत नाही. आपल्या जवाबदारीला तोड नाही, कृपया अधिक काळजी घ्या. काळजीनेच वावरा असे सांगावे वाटते. आम्ही सर्व आपल्यासोबत आहोतच. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
C
Cuty Fri, 04/24/2020 - 07:56 नवीन
नवर्याची नोकरी अत्यावश्यक सेवेत असल्याने अगदी असाच दिनक्रम असतो आमच्याकडे. कधीकधी खूप काळजी वाटते. स्वतःसाठी नाही तरी मुलाबाळांसाठी खूप काळजी घ्यावी लागते.
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Fri, 04/24/2020 - 08:22 नवीन
प्रॉब्लेम काहीही असो, चिनारभाऊंचा लेख आला की विषयाला संबंधित काहीतरी उत्तम अन संयुक्तिक ते पण खुसखुशीत शैलीत वाचायला मिळणारच ही हमी असतेच! जियो, आपण अजून भरपूर लिहावेत ही विनंती अन शुभेच्छा, इस हुनर को और तराशो यार
  • Log in or register to post comments
च
चिनार Sat, 04/25/2020 - 20:21 नवीन
धन्यवाद जेम्स भौ !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा