Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मौनाचे गुपित

च — चलत मुसाफिर, Tue, 04/21/2020 - 15:03
मौनामागे दडुनी असती नाना परिची किती कारणे कुठे व्यग्रता, कुठे खिन्नता वरुन दाखवी 'नको बोलणे' मौनाच्या वाटांचे वळसे वाटसरूला होई चकवा निबिड शांतता चहुबाजूला असह्य होई अबोल थकवा मौन राखते दाट अरण्ये अनेक गुपिते अनेक आख्या वरवर जे दिसते डोळ्यांना खरे भासते असून मिथ्या मौन पाहते सूचक, रोखुन धारदार भेदक डोळ्यांनी एका एका प्रश्नासंगे यक्षाची तलवार परजुनी प्रश्नहि ऐसे महाकठिण ते सापडता सापडे न उत्तर चकव्यामधुनी सुटण्याइतके नशिब कुणाचे की बलवत्तर? कुणास होतो मोह अनावर मौनाशी दो हात करावे मौनाला मौनाने उत्तर नजर भिडवुनी आपण द्यावे करू नये कधि दुस्साहस हे समोर येइल भयाण खाई शरणागतिचा एकच रस्ता मौनासंगे नको लढाई लिहून देता क्षमायाचना मौनाचा पारा ये खाली गायब होतो लगेच चकवा क्षणात दिसते वाट आपुली मौनालाही वाटत असते कुणितरि यावे अन् बोलावे मौनाचे हे गुपित परंतू नसते बहुतेकांना ठावे!!

प्रतिक्रिया द्या
4042 वाचन

💬 प्रतिसाद (10)
च
चांदणे संदीप Tue, 04/21/2020 - 15:23 नवीन
मौनाची बोलकी कविता! (जरा जास्तच बोलली.) ;) सं - दी - प
  • Log in or register to post comments
च
चलत मुसाफिर Tue, 04/21/2020 - 15:27 नवीन
हो, कविता थोडी लांब झाली खरी. प्रतिसादासाठी धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप
प
प्राची अश्विनी Tue, 04/21/2020 - 15:35 नवीन
सुंदर!!
  • Log in or register to post comments
च
चलत मुसाफिर Tue, 04/21/2020 - 15:42 नवीन
प्रतिसादासाठी धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राची अश्विनी
प
प्रचेतस Tue, 04/21/2020 - 15:44 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments
च
चलत मुसाफिर Tue, 04/21/2020 - 15:46 नवीन
प्रतिसादाबद्दल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
व
वीणा३ Tue, 04/21/2020 - 17:42 नवीन
ही कविता  नवरा बायको च्या भांडणाला फिट बसत्ये. मस्त आहे.
  • Log in or register to post comments
च
चलत मुसाफिर Tue, 04/21/2020 - 18:15 नवीन
धन्यवाद :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वीणा३
म
मन्या ऽ गुरुवार, 04/23/2020 - 06:54 नवीन
मस्त!
  • Log in or register to post comments
च
चलत मुसाफिर गुरुवार, 04/23/2020 - 09:05 नवीन
प्रतिसादाबद्दल! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन्या ऽ

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा