Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

विडंबन ( चायनाच्या वूहानमध्ये...)

म — मायमराठी, Tue, 04/21/2020 - 17:27
चाल -( निंबोणीच्या झाडामागे चंद्र...) चायनाच्या वूहानमध्ये, कोण शिंकला गं बाई कोरोनाच्या व्हायरसला, झोप का गं येत नाही।।धृ ।। किंवा (असा कोरोना कळेना, कसा जन्मला गं बाई) लोकं झोपले घरात, रस्त्यावर रोगराई दिवसभर फेसबुक, कसली गं नाही घाई लॉकडाऊन आशेचा, दारू मुळी मिळत नाही।।१।। कामवाली बाई नसता, भांडी घासणे कपाळी जरा चुना घेण्यासाठी, याचकाची आली पाळी काठी राखते समता, समजून गुरेगाई ।।२।। जगातल्या व्यवहारांची, होत आहे रोज माती स्पर्श कसे पसरत गेले, गात विध्वंसाची गाणी टेस्ट पॉझिटिव्ह येता, हातावर येई शाई।।३।। किंवा (विमानांतूनी उतरता) आरोग्यपथकं फिरती, माज त्यांना शिक्षा देई घेऊनी दगड हाती, राजरोस घाली डोई नर्सलाही लाज आणी, यांची वेळ कधी येई?।।४।। रोगी रोजच खोकती, तरी दुकानात जाई मास्क नसती म्हणूनी, रुमाल हा बांधून घेई ताज्या भाजीला बघता, जीभेवर चव येई ।।।५।। कारखाने बंद होता, हवा मिळे श्वासासाठी मुक्तपणे प्राणी फिरती, तोडूनी पाशांच्या गाठी पक्षी मोकळे उडती, गीत नवे त्यांच्या ओठी ।।६।। कामगारांचे हे लोंढे, कष्टणाऱ्या मुंग्यांपरी हातावरचे हे पोट, सुरू करी पायी वारी मीठ त्यांच्या घामातले, अळणीच गं माघारी।।७।। टीकटॉक वापरुनी, चायनाला शिव्या देती इटलीची काशी झाली, सांगे चौकात बसूनी यूएस्एचा स्कोअर बघूनी,अक्कलही येत नाही।।८।। तंबाखू नसे नवीन, खाकारेही नेहमीचे गुटखा खैनी जमवोनी, अप्रूप नसे डागांचे आतले गं हे विषाणू, थुंकूनीच संपवायचे ।।९।। या रोगाच्या साथीने, आपली झाली चाचणी इथून आणि तिथून, सगळे दिव्य लक्षणी हाव हीच महामारी, मानवाची गं करणी ।।१०।। - अभिजीत

प्रतिक्रिया द्या
3701 वाचन

💬 प्रतिसाद (6)
व
वीणा३ Tue, 04/21/2020 - 17:38 नवीन
:D , चांगलं झालाय विडंबन !!!
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Wed, 04/22/2020 - 08:41 नवीन
भारी ! लै मज्जा आली चालीत म्हणताना !
कारखाने बंद होता, हवा मिळे श्वासासाठी मुक्तपणे प्राणी फिरती, तोडूनी पाशांच्या गाठी पक्षी मोकळे उडती, गीत नवे त्यांच्या ओठी ।।६।।
व्वा, किती रमणिय चित्र !
  • Log in or register to post comments
म
मन्या ऽ Sat, 04/25/2020 - 10:03 नवीन
छान जमलंय!
  • Log in or register to post comments
ग
गुल्लू दादा Sun, 05/03/2020 - 15:42 नवीन
आवडली...
  • Log in or register to post comments
P
Prajakta२१ Sun, 05/03/2020 - 19:24 नवीन
छान कविता
  • Log in or register to post comments
N
Nupur Padekar Wed, 05/06/2020 - 20:55 नवीन
खुप सुन्दर..
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा