" भातभाजी भोपळी "
Primary tabs
" भातभाजी भोपळी "
साहित्य:
मक्याचे दाणे, मटार , तांबड्या ढोबळी मिरची चे काप , कांदा, लसूण, हळद , धने जिरे पूड , सुकी तांबडी मिरची , तमाल[पत्र, थोडी हळद , पांढरे व्हिनेगर ,
( पाहिजे असल्यास चीज..)
- तेलावर कांदा परतून त्यात लसूण , सुकी मिरची, तमाल[पत्र , धने जिरे पूड आणि हळद घालावी
- कांदा शिजल्यावर मक्यचे दाणे वगैरे घालून चांगले परतावे ( मंद आचेवर) शेवटी शेवटी थोडे व्हिनेगर किंवा लिंबाचाच रस आणि मीठ , चिमूट भर साखर घालावी
हे मिश्रण कोमट होऊ द्यावे
- वरील भाजीतील तांबड्या मिर्चांचे तुकडे काढून , ते तेलात बुडवावे आणि त्या तेलात कोरडी लसूण घालावी
- तेलावर आधी केलेला भात थोडा परतून त्यात वरील भाजी घालावी
( आज आधीच भात होता म्हणून नाहीतर या भाजीबरोबर भात शिजवताहि येईल )
- भोळ्या मिरच्या कापून त्यातला बाजूने हे वरील "मिरची तेल" फासावे आणि त्यात वरील "भातभाजी" भरावी
- २२० अंशावर ओव्हन ठेवून वरील मिरच्या चांगल्या भाजून घाव्या ... ढेवती थोड्यवेल ग्रिल वर ठेवावेम्हणजे मिरची ची "झाकणे" खरपूस होतील
- वाढताना, खाली थोडासा पुदिना होता तो चिरून , परतून त्यात राहिलेला पांढरा भात घातला... तो आहे
![DQXJ3632[1]](https://live.staticflickr.com/65535/49816195658_deda987b45.jpg)
![BJSU4975[1]](https://live.staticflickr.com/65535/49817038727_be312a57e4.jpg)
![NPTI9771[1]](https://live.staticflickr.com/65535/49817040682_eaa8bb2def.jpg)
![CCHJ9385[1]](https://live.staticflickr.com/65535/49816731791_ef81d0bc6c.jpg)
![QRYM7602[1]](https://live.staticflickr.com/65535/49816202913_9e25e661ae.jpg)
![CXJX0757[1]](https://live.staticflickr.com/65535/49817086717_42f20026f7.jpg)
अरे वा मस्तच!!