Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

खूप झालं देवा आता....

V — Vivekraje, Tue, 04/28/2020 - 16:57
खूप झालं देवा आता, काहीतरी चमत्कार कर.. नाहीच जमलं काही तर, तुझं अस्तित्व अमान्य कर.. किड्या मुंग्यांसारखी देवा, माणसं मरत आहेत.. तुला कसं कळणार म्हणा, तुझी तर देवळच बंद आहेत.. माहितीय का देवा तुला, अख्ख जग इथं थांबलय.. सगळे जिवंत आहोत, कारण फक्त मरण पुढं लांबलय.. धावणारी माणसं सगळी, आज घरातच कोंडलीत.. मंदिरही सुनी तुझी, सगळी फुलं सुकी पडलीत.. शेवटी म्हटलं देवा, कुठूनतरी ये पुन्हा गाभाऱ्यात तुझ्या.. तेवढ्यात आला चमत्कारिक आवाज हळूच कानात माझ्या.. चक्क देवच कुठूनतरी , जणू माझ्याशीच बोलत होता.. शब्द त्याचे होते की, स्वप्नात भास मला होत होता.. देव म्हटला... बेटा..... खरंच थांबलय की रे सगळं.. फक्त तुला जे दिसतंय त्यापेक्षा मला दिसतंय वेगळं.. माझ्या मंदिरातील गर्दी आज मंदिरात नाही.. पण खरा भक्त मला फक्त मंदिरात शोधत नाही.. जग थांबलय सारं, अस तुला का वाटतंय.. बघ माणसासाठी, आज माणसाचंच मन आटतय.. घासातला घास आज , माणूस माणसात वाटतोय.. खरं सांगू तुला मला , आज खरा नेवैद्य भेटतोय.. निवांत पणे माणूस आज , एकच विचार करतोय.. कमाई तर खूप झाली, आज मी कशासाठी जगतोय.. बघ ना सगळी जात पात गेली , अन माणसं एक झाली.. शरीराने दुरावली पण मनाने जवळ आली.. आज खरतर माणसातला देवच शोधला माणसाने.. आणि जे मला जमलं नाही ते करून दाखवलं या आजाराने... ते खरंय देवा, पण माणसं भुकेने मरतील आता.. चुली तर कधीच विझल्यात, सरण रचली जातील आता.. एक वचन देतो बेटा.. भुकेने कुणी मरणार नाही.. धान्य नसलं घरात , तरी उपासमार होणार नाही.. थोडं कठीण वाटतंय , पण अशक्य नक्कीच नाही.. कारण तुझ्या दानाची किंमत, कमी ठरणार नाही.. या आजाराने माणसाला एक नक्की शिकवलं.. सगळ्या ऐहिक सुखाला एका कोपऱ्यात जाऊन बसवलं.. सगळं खरंय देवा , पण आता बघवत नाही रे.. तुझ्या सृष्टीची नासाडी, तुझ्याच समोर होईल रे.. घाबरू नकोस बेटा, फक्त माणसं म्हणजे सृष्टी नाही.. आणि माझ्या सृष्टीची नासाडी ही कला माझ्यात नाही.. कळ सोस थोडी, सगळं सुरळीत होईल.. फक्त आताची माणुसकी, जन्मभर लक्षात राहील.. जमलं तुला तर , थोडे कष्ट करून बघ.. कुणासाठी जमलं तर , काहीतरी करून बघ.. एकदाच मिळालीय संधी मला गाभाऱ्याबाहेर बघण्याची.. त्यांच्याकडून शिकून घे कला दुसऱ्या साठी जगण्याची.. देवळात नसलो तरी आज रस्त्यावर तुला अडवणारा , वर्दीत मीच आहे ... आणि दवाखान्यात उपचार करणारा , पण मीच आहे.. आजार काय रे....आला तसा निघून जाईल... पण आजची माणुसकी ही जन्मभर लक्षात राहील...

प्रतिक्रिया द्या
6472 वाचन

💬 प्रतिसाद (13)
V
Vivekraje Tue, 04/28/2020 - 17:01 नवीन
मिपा वर माझं आज पहिलीच कविता आहे , खरंतर मिपा मुळेच मला लेखनाची गोडी लागली. मिपा वरील साहित्याचा किमान चार पाच वर्षांपासून आस्वाद घेत आहे. मिपावरील माझ्या पहिल्या प्रयत्नाला मिपाकर नक्कीच सांभाळून घेतील...
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Tue, 04/28/2020 - 17:12 नवीन
छान लिहिलंय, येत राहा, लिहीत राहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Vivekraje
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 04/29/2020 - 17:52 नवीन
लिहित राहा. आवडली कविता. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
P
Prajakta२१ Tue, 04/28/2020 - 17:46 नवीन
+१
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 04/28/2020 - 17:59 नवीन
सुरेख...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Mere Dil Ka Tumse Hai Kehna ( Cover) | Armaan | Shankar Ehsaan Loy & Chitra
  • Log in or register to post comments
स
सौ मृदुला धनंज… Wed, 04/29/2020 - 17:32 नवीन
खूपच छान.
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Wed, 04/29/2020 - 19:38 नवीन
भारी जमलीये!!
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप गुरुवार, 04/30/2020 - 04:24 नवीन
ही कविता मला दोन दोन व्हाट्सॲपवरून दोन जणांकडून आलेली आहे. त्यात कविचे नाव नाही. कविता ठीकच. सं - दी - प
  • Log in or register to post comments
ब
बाजीगर गुरुवार, 04/30/2020 - 05:55 नवीन
आवडली, छान लिहीलीय.
  • Log in or register to post comments
श
शा वि कु गुरुवार, 04/30/2020 - 09:11 नवीन
कविता छान जमलीये.
  • Log in or register to post comments
V
Vivekraje Sat, 05/02/2020 - 11:25 नवीन
सर्वा॑ना खुप खुप धन्यवाद...
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 05/02/2020 - 15:12 नवीन
पांडू मोड ऑन छाण विवेचण! पांडू मोड ऑफ ----------////-------- आत्मा प्रकटन:- लिखते रहो, आते रहो!
  • Log in or register to post comments
ग
गुल्लू दादा Sun, 05/03/2020 - 15:24 नवीन
खूप आवडली...
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा