Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मिसळपाव काव्यलेखन स्पर्धा : २०२०

स
साहित्य संपादक
Sun, 05/03/2020 - 12:21
💬 61 प्रतिसाद

मिसळपाव काव्यलेखन स्पर्धा : २०२०




नमस्कार मंडळी, नुकतीच शासनाने लॉकडाउन आणखी दोन आठवडे वाढवत असल्याची घोषणा केली. म्हणजे आपल्याला आणखी दोन आठवडे घरी थांबायचे आहे. म्हणून मग आपण आणखी एक स्पर्धा आयोजित केली आहे. सोसुनिया लॉकडाउनचे घाव पुरता इस्कटलोय, काय सांगू राव मनी दिसे आता फक्त एकच नाव मिसळपाव मिसळपाव काय म्हणतो, बरोबर ना भाव? प्रत्येकाच्या आतमध्ये एक कवी दडलेला असतो. आणि पुढच्या काही दिवसांत त्याला बाहेर काढायचे आहे. कवितेला विषयाचे कसलेच बंधन नाही. मात्र ही स्पर्धा आहे, तेव्हा आपली कविता इतरांपेक्षा हटके असली पाहिजे याची जरूर काळजी घ्या. कविता लिहिण्यात जो आनंद मिळतो, तो इतर कोणत्याही लिखाणातून मिळत नाही. तेव्हा या आनंदाला मुकू नका..! तर ह्या स्पर्धेचे नियम खालीलप्रमाणे आहेत - १) धागा प्रकाशित झाल्यानंतर स्पर्धा लगेचच सुरू होईल आणि २० मे २०२० रोजी २३.५९ भाप्रवे संपेल. २) स्पर्धकांनी आपली कविता 'साहित्य संपादक' या आयडीला व्यनिने पाठवायची आहे. साहित्य संपादकांना व्यनि पाठवण्यासाठी क्लिक करा. कोणत्याही साहित्य संपादकाला वैयक्तिक व्यनिने किंवा मिसळपावच्या अथवा सासंच्या ईमेल आयडीवर किंवा अन्य कोणत्याही दुसऱ्या मार्गाने कविता पाठवू नये. ३) प्रत्येक व्यक्ती जास्तीत जास्त २ (अक्षरी दोन फक्त) कविता पाठवू शकते. मतदान दोन्ही कवितांना होईल, मात्र जर दोन्ही कवितांची मते विजयी क्रमांकाच्या यादीत आली, तर दोन्हींपैकी ज्या कवितेला जास्त मते मिळालेली असतील, ती एकच कविता विजेती धरली जाईल. ४) ०३ मे २०२० ते २० मे २०२० या काळात दर चोवीस तासांतून एकदा साहित्य संपादक आयडी आलेल्या कविता स्वतःच्या नावाने प्रकाशित करेल. मूळ कवीचे नाव जाहीर होणार नाही. ('कविता बघून मत देण्याऐवजी आयडी बघून मत देतात' हा आक्षेप घेतला जाऊ नये, म्हणून हे करण्यात आले आहे.). स्पर्धा संपल्यावर कवींची ओळख जाहीर करायचीच आहे. ५) मूळ कवीने आपली ओळख जाहीर करू नये अशी अपेक्षा आहे. कवितेच्या धाग्यावर, मिपावरच्या सार्वजनिक जागेत (अन्य धाग्यांवर किंवा खरडफळ्यावर), मिपाच्या फेसबुक पानावर किंवा ट्विटर अकाउंटवर आपली ओळख कवी म्हणून जाहीर केल्यास ती कविता रद्दबातल ठरवून स्पर्धेतून बाद केली जाईल. ६) साहित्य संपादक कविता प्रकाशित करताना मुळाबरहुकूम (म्हणजे जशी आली तशी) करतील. मुद्रितशोधन किंवा अन्य कोणतेही संपादकीय संस्कार केले जाणार नाहीत. स्पर्धेमधल्या कवितेमध्ये व्याकरणाचे नियम, शुद्धलेखन, मुद्रितशोधन वगैरेची जबाबदारी संपूर्णपणे स्पर्धकाची असेल. ७) एकोळी, दोनोळी किंवा चारोळी पाठवू नये. तसेच दीर्घ कविताही स्पर्धेसाठी स्वीकारल्या जाणार नाहीत. याबाबत काही अपवाद असतील तर त्याचा संपूर्ण निर्णय साहित्य संपादक घेतील. ८) तसेच, कवितेत कोणतीही चित्रे, दृक्-श्राव्य दुवे, फॉरमॅटिंग वगैरे असल्यास ते वगळून कविता प्रकाशित केली जाईल. ९) जातिधर्माला दुखावणारे, राजकीय किंवा सामाजिक द्वेष पसरवणारे, वा अश्लील लेखन आल्यास कविता स्पर्धेसाठी न घ्यायचा निर्णय संपादकीय अधिकारात घेतला जाईल. प्रवेशिका नाकारायचा अधिकार साहित्य संपादक राखून ठेवत आहेत. स्पर्धा संपल्यावर कवी नियमबाह्य कविता स्वतःच्या जबाबदारीवर प्रकाशित करू शकतात. १०) कवितेला आपण देऊ इच्छित असणारे नाव व्यनिच्या विषयामध्ये लिहिलेले असावे. ११) कुठेही पूर्वप्रकाशित कविता स्वीकारली जाणार नाही. १२) कविता आधारित असल्यास, कवितेच्या शेवटी तसा स्पष्ट उल्लेख करावा. कविता प्रकाशित झाल्यावर लगेच मतदान सुरू होईल आणि दि. २३ मे २०२०, २३.५९ भाप्रवेपर्यंत करता येईल. मतदान पद्धत : सदस्यांनी प्रतिसादात +१ असे लिहिलेले एक मत धरले जाईल. +१०, +१११, +७८६, +१००^१०० हे सर्व १ मत धरले जाईल. सदस्यांनी मतदानाबरोबरंच अभिप्रायाचे दोन शब्दही जरूर लिहावेत, ही विनंती. याचा कवीला जरूर लाभ मिळेल. निकाल दिनांक २५ मे २०२० रोजी घोषित केला जाईल. विजेत्यांना मिसळपाव दिवाळी अंक २०१९ची छापील प्रत बक्षीस म्हणून देण्यात येईल (विजेता भारतामध्ये असल्यास). भारताबाहेरील विजेत्यांची प्रत त्यांच्या जवळच्या व्यक्तीला देता येईल. लेखन करण्याविषयी / व्यनिविषयी / स्पर्धेविषयी कोणतीही शंका अथवा अडचण असल्यास प्रतिसादांमध्ये विचारू शकता. एक मार्गदर्शिका - कविता मराठीमध्ये असावी. एखादे हिंदी-इंग्लिश वाक्य कवितेची गरज म्हणून चालेल, पण कविता मराठीत हवी. प्रमाण मराठी, झाडीबोली, वऱ्हाडी, खान्देशी, सातारी, पुणेरी, आगरी, मालवणी... कोणतीही पण मराठीत हवी..


प्रतिक्रिया द्या
43828 वाचन

💬 प्रतिसाद (61)
ग
गुल्लू दादा Sun, 05/24/2020 - 08:20 नवीन
सर्व सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद
च
चांदणे संदीप Sun, 05/24/2020 - 09:38 नवीन
आत्ताच पुन्हा एकदा आवडलेल्या कविता आणि नवे प्रतिसाद वाचून आलो. सहज पाहिलं तर एक गोष्ट लक्षात आली की, स्पर्धेत एकूण साठच्या वर कविता आलेल्या. एका कवीने (किंवा तसे स्वतःला समजणार्‍याने) दोन कविता दिल्या असे जरी मानले तरी एकाही कवितेवर सर्वच्या सर्व स्पर्धकांनी गुणदान अथवा प्रतिसाद दिला नाही असेच दिसते. अगदी वीस किंवा त्यापेक्षा आधिक प्रतिसादांचा टप्पा ओलांडणार्‍या कविता केवळ दोन आहेत. कविता कशीही असो, चांगली अथवा वाईट, लिहिणारेच प्रतिसाद देत नसतील तर निव्वळ वाचणार्‍यांकडून काय अपेक्षा ठेवायच्या? सं - दी - प
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Sun, 05/24/2020 - 09:46 नवीन
सहमत आहे! कवीच कवितेला प्रतिसाद देत नसतील, तर कविता विभागाला 'दुर्लक्षित' म्हणण्याला काय अर्थ आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप
ग
गणेशा Sun, 05/24/2020 - 09:50 नवीन
मी ही आज सकाळी पुन्हा सगळ्या कविता वाचून काढल्या... कवितेला मी दिलेला प्रतिसाद वाचून पुन्हा छान वाटले.. 'कळ' कवितेला दिलेला प्रतिसाद मला उगाच हसवून गेला.. ती त्या दिवशी वाचली नसती तर तो प्रतिसाद नसता माझा... बाकी प्रतिसादाचे चालायचेच... ज्याचे त्याचे.. सोडून द्यायचे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप
स
स्वच्छंद Sun, 05/24/2020 - 14:54 नवीन
बरोबर आहे आपलं. बरी वाईट कशी का असेना प्रतिक्रिया देणे महत्त्वाचे. माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर वेळेअभावी बऱ्याच कविता वाचल्या नाहीत पण आता वाचून प्रतिक्रिया नक्की देईन. किमान चांगल्या प्रतिक्रिया तरी देईनच. निकाल काहीही लागू दे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप
प
प्रिती-राधा (verified= न पडताळणी केलेला) Sun, 05/24/2020 - 11:18 नवीन
सर्व कविता आज पुन्हा वाचल्या, मस्त आहेत. सर्व कवितेंना रिप्लाय द्यायला जमले नाही. माझी कविता द्यावी म्हंटले होते, पण नाही जमले ते हि
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Sun, 05/24/2020 - 12:57 नवीन
सर्वच कविता वाचल्या . आवडल्या त्यावर प्रतिसाद पण दिले.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Sun, 05/24/2020 - 13:23 नवीन
एकूण स्पर्धक किमान तीस ते चाळीस असतील, आणि सरासरी प्रती कविता प्रतिसाद दहापेक्षा कमी. म्हणजे वीस ते तीस जणांनी इतर कवितांवर प्रतिसाद सुद्धा दिले नाहीत. आवडली - आवडली नाही किंवा मग प्रतिसाद देण्या एवढी सुद्धा बरी नाही.
  • Log in or register to post comments
स
स्वच्छंद Sun, 05/24/2020 - 14:56 नवीन
मला वाटतं आवडलेल्या कवितांची यादी प्रत्येकाने टाकूयात निकाल लागण्यापूर्वी. अर्थात निकालावर याचा परिणाम होणार नसेल तर. आणि तसं ही निकाल लागल्यात जमा आहे तेंव्हा काय हरकत आहे?
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Sun, 05/24/2020 - 17:12 नवीन
मलाही असेच वाटलेले. मी माझी यादी देतो थोड्याच वेळात! सं - दी - प
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वच्छंद
ग
गणेशा Sun, 05/24/2020 - 17:22 नवीन
आयडिया चांगली आहे.. मजेने लिहितोय - पण माझ्या कवितेला तिकडे हि कमी रिप्लाय आलेले.. अगदी वरच्या आजूबाजूच्या कवितेला +1 वर +1 आणि आम्ही मोकळे.. मग येथे हि पुन्हा कपाळ मोक्ष ठरलेला.. देवा रे वाचव मला..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वच्छंद
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा