Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

[शशक] प्रोजेक्ट डेमो

S
SaurabhD
Wed, 05/06/2020 - 18:30
💬 3 प्रतिसाद
तुम्हाला तर माहितीच आहे ... कथा पूर्णपणे काल्पनिकच आहे. वस्तुस्थितीशी ह्याचा अजिबात काहीही संबंध नाही ... आणि देव करो, आणि कधीच काही संबंध येऊ पण नये ... बाकी तुम्ही सगळे सूज्ञ आहातच ... –--------------------------------------------- "सर, एकदा बघून घ्या, प्लीज" "तुम्हाला कितीवेळा सांगितलं, आपण अशा डिझाईनवर काम करणं खूप पूर्वी सोडलं आहे. ह्या प्रकारचं डिझाईन तितकंसं परिणामकारक होत नाही. एकदा झालं आहे ना बघून आपलं !" "हो सर. तुम्ही सोडलं असेल, पण मी नाही ! गेली अठरा वर्षे ह्या डिझाईनवर काम करतो आहे मी ..." "हे बघा डॉक्टर, तुम्ही तुमचा आणि माझा, दोघांचाही वेळ वाया घालवत आहात." "ठीक आहे, तुमचा नाही ना विश्वास ! एक दिवस दाखवून देईन मी तुम्हाला माझं डिझाईन काय करू शकतं ते !" --- वृत्तनिवेदिका : "गेले ५ महिने चाललेल्या जागतिक महामारीमध्ये ३२लाख लोकांना ह्याची बाधा झाली असून २.५लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच कित्येक देशांची अर्थव्यवस्था डबघाईच्या मार्गावर आहे."

प्रतिक्रिया द्या
1874 वाचन

💬 प्रतिसाद (3)
ज
जव्हेरगंज Wed, 05/06/2020 - 19:20 नवीन
चांगली कल्पना! पूर्वाधात डिझाईनची दाहकता जरा जास्त हवी होती!!
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा Sat, 05/09/2020 - 09:07 नवीन
जबरदस्त भयावह
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 05/09/2020 - 14:20 नवीन
उत्तम कथा आहे, लिहिते राहा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा