Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आत्म दीपो भव

K — Kaustubh bhamare, गुरुवार, 05/07/2020 - 22:00
बुद्ध,,,,, काय दिले तू मानवजातीला?,,,, शांती,,, ती तर केव्हाच कैद झाली आहे रक्तपिपासू,साम्राज्यवादी,शोषित भांडवलशाहीच्या महत्वकांक्षेत,,,, संयम,,, नजर टाकून पहा कुचकरून टाकलेल्या कळ्यांकडे अहंकारी पुरुषी वासनेने संयमाच्या कधीच चिंधड्या उडविल्या,,,, हास्य,,, पहा बर तुला सापडते का? भुकेने तडफडणाऱ्या निरागस बालकांच्या चेहेऱ्याआड,,, सत्य,,, असत्यतेचा नंगानाच चालणाऱ्या स्वार्थी बाजारात सत्य,,,,सत्य केव्हाच कवडीमोल ठरले,,, ज्ञान,,, मदमस्त सत्ता आणि मोह,लोभित मक्तेदार उपभोगत आहे ज्ञानाला बनवून आपली दासी,,, अहिंसा,,, खोट्या अहंमसाठी एकमेकांच्या नरडीचे घोट घेणे हेच वर्तमानात हिंसेचे तत्वज्ञान होऊ पाहतेय,,, शील,,, चोरी,व्याभिचार, अनैतिकता,व्यसन,खोडारडेपणाचे अधिष्ठान चढवून समाज कधीच झोपी गेला,, सत्व,,, प्राण्यापासून माणसापर्यंत नेणारे मनुष्यतत्व आज विकार ग्रस्त होऊन आपले सत्व विसरले,, बुद्धा,,, का दिलेस मानवजातीला हे मुक्तीचे मूल्य?,,, घेऊन प्रश्नांचा भडिमार असत गडद अंधाऱ्या रात्री मी नैराश्याच्या गर्तेतेत जाऊन बसतो,,, नजर जाते माझी शितल चंद्रमाकडे,,, बुद्ध पौर्णिमेचा तो चंद्रप्रकाश हळू हळू उतरतो माझ्या हृदयात,,, सर्वांगात पसरते प्रज्ञेचे अधिराज्य त्यातून निनादतो फक्त एकच आवाज,,, आत्म दीपो भव,,, - कौस्तुभ

प्रतिक्रिया द्या
2058 वाचन

💬 प्रतिसाद (4)
K
Kaustubh bhamare गुरुवार, 05/07/2020 - 22:08 नवीन
अस्तू
  • Log in or register to post comments
म
मन्या ऽ Fri, 05/08/2020 - 04:16 नवीन
वाह!
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Fri, 05/08/2020 - 05:41 नवीन
फारच विस्तृत झाल्यानं, शेवटच्या ओळी परिणाम साधत नाहीत
  • Log in or register to post comments
क
कौस्तुभ भोसले Fri, 05/08/2020 - 06:32 नवीन
वाह
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा