Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

बापजन्म!

म — मन्या ऽ, Sun, 05/10/2020 - 12:17
बापजन्म! काल पाहिला मी एक बाप जन्मताना O.T. बाहेर अस्वस्थ घुटमळताना होणाऱ्या चिमुकल्या जिवासाठी तिळ तिळ तुटताना कोण म्हणतं कि मातृत्वाच्या वेदना फक्त आईलाच होतात बापालाही होतच असतात.. पण त्या त्यालाच व्यक्त करायच्या नसतात लागताच पिलाच्या येण्याची ती चाहुल बापाचे डोळेसुद्धा अश्रुमय होतात पण जगाला खंबीर आहे दाखविण्यासाठी पापणीतच दडतात आई-पिलु सुखरुप आहेत; आता एवढंच ऐकायला त्याचे कान तरसतात आणि डोळ्यांना वेध मात्र त्या जिवाचे लागतात पिलाला कुशीत घेताना त्यालाही त्यांचा नऊ मासांचा तो प्रवास आठवतो कोण रे होत लबाड अस खोट खोट दटावुन भाळावर अलगद ओठ टेकवतौ नंतर मी खंबीर आहे. असं जणु स्वतःलाच बजावत "फोन आलाय" बहाण्यान रुमबाहेर जातो ; अन् पापणीतला तो एक उनाड अश्रु त्याच्या नकळत रुमालाने टिपतो! (Dipti Bhagat)

प्रतिक्रिया द्या
9165 वाचन

💬 प्रतिसाद (14)
ग
गणेशा Sun, 05/10/2020 - 20:12 नवीन
पिलाला कुशीत घेताना त्यालाही त्यांचा नऊ मासांचा तो प्रवास आठवतो कोण रे होत लबाड अस खोट खोट दटावुन भाळावर अलगद ओठ टेकवतौ +1
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Mon, 05/11/2020 - 04:31 नवीन
छान लिहिलंय
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Mon, 05/11/2020 - 04:34 नवीन
आवडली कविता. सं - दी - प
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Mon, 05/11/2020 - 04:45 नवीन
आवडली कविता.
  • Log in or register to post comments
म
मन्या ऽ Mon, 05/11/2020 - 04:46 नवीन
धन्यवाद मंडळी! :)
  • Log in or register to post comments
क
कोंबडा Mon, 05/11/2020 - 06:51 नवीन
दवणीय काव्य
  • Log in or register to post comments
ब
बबु Mon, 05/11/2020 - 09:26 नवीन
एका वास्तवाचे सुन्दर सादरीकरण. आवडले.
  • Log in or register to post comments
म
मन्या ऽ Mon, 05/11/2020 - 17:31 नवीन
कोंबडा, बबु प्रतिसादासाठी धन्यवाद! वाचकांचे आभार! :)
  • Log in or register to post comments
प
प्रिती-राधा (verified= न पडताळणी केलेला) Mon, 05/11/2020 - 20:44 नवीन
सुंदर भाव
  • Log in or register to post comments
ए
एस Mon, 05/11/2020 - 22:17 नवीन
ही कविता वाचली आणि राहवले नाही म्हणून मुद्दाम प्रतिसाद देण्यासाठी लॉगइन केले. माझाही बापजन्म डोळ्यांसमोर तरळून गेला असाच. फारच हृद्य! लिहीत राहा.
  • Log in or register to post comments
म
मन्या ऽ Tue, 05/12/2020 - 22:00 नवीन
@एस, तुम्हाला कविता रिलेट झाली.. बस्स! मला आणखी काय हवं? वाचत रहा.. :) पुन्हा एकदा सर्व वाचकांचे मनपुर्वक आभार!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
म
मनिष Fri, 05/15/2020 - 12:48 नवीन
नंतर मी खंबीर आहे. असं जणु स्वतःलाच बजावत "फोन आलाय" बहाण्यान रुमबाहेर जातो ; अन् पापणीतला तो एक उनाड अश्रु त्याच्या नकळत रुमालाने टिपतो! (Dipti Bhagat)
सुरेख!!!! कविता नक्की कोणाची आहे?
  • Log in or register to post comments
म
मन्या ऽ Fri, 05/15/2020 - 13:37 नवीन
प्रतिसादासाठी धन्यवाद! इथे मन्या ऽ या आयडी ने वावरते. आणि माझ नाव दिप्ती भगत आहे. सदर कविता मीच लिहीलेली आहे.. परत एकदा धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिष
म
मनिष Sat, 05/16/2020 - 10:53 नवीन
सॉरी. मन्या ऽ या आयडीमुळे गोंधळ झाला :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन्या ऽ

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा