Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मसाया - Messiah

क
कपिलमुनी
Mon, 05/11/2020 - 10:34
💬 13 प्रतिसाद
जगभरातील धर्म पाहिले तर त्यात एक सामायिक बाब दिसून येते, ती म्हणजे प्रत्येक धर्मात असणारे अवतार, प्रेषित, देवदूत किंवा संदेशवाहक ! हे अवतार , प्रेषित यांनी लोककल्याणासाठी जन्म घेतला आणि धर्माचा प्रसार केला असे त्यांचे अनुयायी मानतात. अजुन एक कॉमन गोष्ट की हे अवतर, प्रेषित यांनी चमत्कार केलेत आणि ते पुन्हा जन्म घेतील यावर त्यांच्या अनुयायांचा ठाम विश्वास असतो. आजच्या युगात जर कोणीएक मनुष्य पुढे आला आणि अविश्वसनीय कामे केली, लोकांनी त्याला मसीहा मानायला सुरुवात केली तर काय ? या कथासूत्राभोवती "मसाया" ही मालिका फिरते. सिरियामधील दमास्कस मधे इसिस हल्ला करणार असते, सगळे शरणार्थी पळून जात असताना एक प्रीस्ट सारखा गृहस्थ उभा असतो, लोकांना धीर देत असतो , हे संकट जाणार अशी आशा करत असतो आणि त्याच वेळी वाळूचे वादळ येते आणि लोक हल्ल्यातून वाचतात.या घटनेमुळे लोक याला "मसाया" ( मसिहा!) मानू लागतात आणि त्याचे फोलॉअर्सची संख्या वाढू लागते सर्वांना तो शांतता आणि प्रेमाचा संदेश देतो आणि त्यांना घेउन थेट इस्राईलच्या सीमेवर जातो ! याने राजकीय पेचप्रसंग तयार होतो आणि मसाया ला अटक होते, इस्रायली सैन्यातील सैनिक अवीराम (टोमेर सिस्ली) याच्याकडून चौकशी केली आहे. संदेष्ट्याला त्याच्या चौकशी करताना मसाया अविरामला त्याच्या भूतकाळाबद्दल सांगतो याचा परिणाम म्हणून, अविराम त्यांच्या मुलाखतीची टेप हटवितो. त्याच रात्री एवढी सुरक्षा, सीसीटीव्ही असताना मसाया रहस्यमय रीत्या गायब होतो आणि एका पवित्र ठिकाणि प्रकट होतो , तिथे उपस्थित असलेल्या सर्व लोकांसमोर अशा घटना घड्तात कि त्यांचा मसाया हा अवतार आहे यावर विश्वास बसतो, कित्येक जणांनी हे सर्व मोबाइल , कॅमेरा मध्ये रेकोर्ड केल्याने मसाया जगभर प्रसिद्ध होतो. CIA ची टीम या प्रकरणी इस्राईल पोलिसांना मदत करत असताना अचानक मसाया अमेरिकेत एका वादळात प्रकट होउन एका ख्रिश्चन फॅमिलिची मदत करतो. CIA ला खात्री असते कि यामागे काही षडयंत्र आहे, आणि CIA मसाया चा भूतकाळ खणू लगते आणि दिवसेंदिवस अमेरिकेत मसायाची लोकप्रियता वाढत जाते. ,CIA च्या हाती काय लागते ? पुढे काय होते हे सीरीज मध्ये पाहणे रन्जक असेल. मसाया धार्मिक आणि नास्तिक दोन्ही विचारधांरासाठी प्रश्न निर्माण करतो? जर प्रेषित आला तर आपण तयार आहोत का ? नास्तिक असाल तर मग समोर घडणार्‍या घटनेची तर्क संगती कशी लागेल ? एखादा नवीन धर्मतत्वे घेउन कोणी आले तर आपण त्यांना स्विकारु शकतो का ? ही मालिका तुम्ही नेटफ्लिक्स वर पाहू शकता , १० भागांच्या मालिकेचा पहिला सीझन उपलब्ध आहे. जगभरातून या मालिकेला धार्मिक विरोध आणि टीका झेलावी लागली त्यामुळे याच्या दुसर्‍या सीझनचे भवितव्य अजून निश्चित नाही.

प्रतिक्रिया द्या
7632 वाचन

💬 प्रतिसाद (13)
स
संन्यस्त खड्ग Mon, 05/11/2020 - 18:19 नवीन
एका निराळा विशयावरील मालिकेचि ओळख करुन दिल्याबद्दल आभार मुनिवर .... नक्किच पाहिली जाइल
  • Log in or register to post comments
झ
झपाटलेला फिलॉसॉफर Mon, 05/11/2020 - 18:22 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Mon, 05/11/2020 - 18:53 नवीन
पहिले एक दोन भाग बघितले होते. तितकीपण काही खास वाटली नव्हती.
  • Log in or register to post comments
M
mrcoolguynice Mon, 05/11/2020 - 20:59 नवीन
Any Messiah coming forward ? For Covid vaccine ? Or Messiah waiting now, for modern science to invent vaccine? So afterwards Messiah can say, "Arrey isaka upaay to hamaare, Vedo me sadiyo pahale se likha hua hai... "
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Tue, 05/12/2020 - 06:21 नवीन
अजूनही लोकांना अशा कल्पनांमध्ये रस वाटतो याचा अर्थ आस्तिकता वाढतेय असा घ्यायचा का ?
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Tue, 05/12/2020 - 16:58 नवीन
काही काही वेळा थोडा रेंगाळल्यासारखे वाटते पण अख्खी सिरीज मस्तय, बघताना आपण सगळे कधी या बाजूला तर कधी त्या बाजूला झुकत असतो, शेवटचा सीन मस्त केलाय
  • Log in or register to post comments
म
माझीही शॅम्पेन Wed, 05/13/2020 - 09:22 नवीन
मुनीवर तुम्ही सांगताय म्हणून एक दोन एपिसोड पहिले जातील , ह्या निमित्ताने लेखन सन्यास संपवला हे हि नसे थोडके :)
  • Log in or register to post comments
म
मोहनराव Wed, 05/13/2020 - 09:27 नवीन
वॉचींग लिस्ट मधे टाकले आहे. धन्यवाद!
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Wed, 05/13/2020 - 10:13 नवीन
नेटफ्लिक्स परवडत नसल्याने बहुतांशी सिरीयल पाहिल्या जात नाहीत, मात्र कधी घेतलं तर जरूर बघेन.
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Wed, 05/13/2020 - 16:37 नवीन
मालिका बघण्यासाठी पैसे मोजावे लागतात ? भारतात ? कसे शक्य आहे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Wed, 05/13/2020 - 17:14 नवीन
:) टोरेंटचा मार्ग आहेच पण आताशा स्ट्रिमिंगची इतकी सवय झालीय की डाउनलोड करून ते हार्डडिस्कमध्ये टाकून ती हार्ड डिस्क टीव्हीला जोडून बघण्याइतकाही उत्साह राहात नाही. शिवाय काही काही फॉर्मेट टीव्हीवर चालत नाहीत ते लॅपटॉप/मोबाईलवर बघायला नकोसे वाटते. शिवाय आधीच प्राईम, हॉटस्टार सबस्क्राइब केले असल्याने आहे तेच पुरेसे होते :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
ध
धर्मराजमुटके गुरुवार, 05/14/2020 - 17:47 नवीन
आपण इथे लिहिल्यामुळे उत्सुकतेपोटी ही मालिका पाहिली. शक्यतो मी वेब सिरिज पाहायच्या टाळतो कारण त्यात खुपच हिंसाचार, अश्लील दृष्ये आणि अभद्र भाषेचा उपयोग केलेला असतो. मात्र ही मालिका त्याला अपवाद ठरली. एक चांगली सुचवणी केल्याबद्द्ल आपले आभार. अशाच प्रकारच्या मालिका कोणी बघीतल्या असतील तर इथे नक्कीच त्याबद्द्ल लिहा !
  • Log in or register to post comments
M
mrcoolguynice Sun, 05/17/2020 - 09:09 नवीन
"PataalLok" Review plz.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा