Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मैत्री असावी...

म — मन्या ऽ, Tue, 05/12/2020 - 20:43
मैत्री असावी... मैत्री मैत्री असावी खळखळत्या वाहत्या झऱ्यासारखी रातराणीच्या सुगंधासारखी आसमंतात दरवळणारी मैत्री मैत्री असावी उनाड वाऱ्यासारखी केसाची बट अलगद झुलवणारी मनसोक्त हसणारी हसविणारी संकटसमयी धावुन येणारी मैत्री मैत्री असावी पावसाच्या पहिल्या सरीसारखी सुखाच्या सरींनी चिंब भिजवणारी मैत्री मैत्री असावी पहाटेच्या समीरासारखी गारवा देणारी मैत्री मैत्री असावी उगवतीसारखी नवा आशेचा किरण होऊन आयुष्य तेजोमय कराणारी! - Dipti Bhagat

प्रतिक्रिया द्या
2946 वाचन

💬 प्रतिसाद (5)
प
प्रिती-राधा (verified= न पडताळणी केलेला) Tue, 05/12/2020 - 20:52 नवीन
सुंदर कविता, सुरेख लिहिता आहात. मैत्री मैत्री असावी पावसाच्या पहिल्या सरीसारखी सुखाच्या सरींनी चिंब भिजवणारी हे खासच. मैत्री असावी शब्दा सारखी चेहरा नसताना, अर्थ जाणणारी|| मैत्री असावी कविते सारखी शब्द असताना भावना जपणारी|| ~ प्रिती-राधा
  • Log in or register to post comments
म
मन्या ऽ Wed, 05/13/2020 - 21:25 नवीन
आवडली! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रिती-राधा
ग
गणेशा Tue, 05/12/2020 - 20:55 नवीन
मैत्री मैत्री असावी उनाड वाऱ्यासारखी केसाची बट अलगद झुलवणारी मनसोक्त हसणारी हसविणारी संकटसमयी धावुन येणारी निव्वळ अप्रतिम.. लिहीत रहा.. वाचत आहे..
  • Log in or register to post comments
क
कौस्तुभ भोसले Wed, 05/13/2020 - 03:59 नवीन
छान
  • Log in or register to post comments
म
मन्या ऽ Wed, 05/13/2020 - 21:27 नवीन
प्रिती-राधा, गणेशदा, कौस्तुभ मनापासुन धन्यवाद! वाचकांचे आभार!
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा