Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आत्मनिर्भर

क — कुमार जावडेकर, गुरुवार, 05/14/2020 - 09:02
मार्ग खडतर, लक्ष्य दुर्धर होत गेले आणि अंतर आत्मनिर्भर होत गेले शब्द जितके आत्मनिर्भर होत गेले... अर्थ सारे अस्थिपंजर होत गेले सुख जगू शकलेच नाही त्या ठिकाणी... दुःखसुद्धा फक्त जर्जर होत गेले बांधण्यासाठी नवे सेतू फुकटचे माणसांचे स्वस्त पत्थर होत गेले चालणे नशिबात होते का म्हणू मी... राहण्यासाठी कुठे घर होत गेले? प्रश्न पुसणे बंद केले मी कधीचे मौनही माझे निरुत्तर होत गेले - कुमार जावडेकर

प्रतिक्रिया द्या
4612 वाचन

💬 प्रतिसाद (7)
च
चांदणे संदीप गुरुवार, 05/14/2020 - 10:07 नवीन
पण, आत्मनिर्भर वाचून वेगळ्या अपेक्षेने आलो होतो. ;) सगळे शेर आपापल्या जागी उत्तम! सं - दी - प
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 05/15/2020 - 10:24 नवीन
त्या शब्दामुळे आलो होतो किलोभर प्रतिसाद लिहायला. ;) बाकी रचना छान. लिहित राहा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप
प
प्राची अश्विनी गुरुवार, 05/14/2020 - 10:13 नवीन
सुरेखच!
  • Log in or register to post comments
क
कौस्तुभ भोसले Fri, 05/15/2020 - 09:03 नवीन
आवडली
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Fri, 05/15/2020 - 18:20 नवीन
मान आणि खांदा यामधली गॅप भरणारं एक सुखद कुशन घेऊन तुमचा प्रश्न सोडवता येतो. चपले ऐवजी सॅंडल्स वापरायला लागून जमाना झाला ( त्यात क्रॉक्सनी तर कमालच केलीये !). चप्पल दोन बोटात धरुन, दरवेळी उचलणं हा छळ आहे. गाविशी खुर्चीबाबतीत एकमते. आयुष्यातला प्राईम टाईम जिच्यावर बसायचं आणि ज्या कामातून तुफान मजा आणायची, ती खुर्ची अत्यंत आरामदायी हवी. माझी खुर्ची हाय-बॅक विथ नेक सपोर्ट आहे आणि फ्लेक्सी हँडल्समुळे खुर्चीवर मांडी घालून शांतपणे बसता येतं. मग कामाची मजाच काही और असते!
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Fri, 05/15/2020 - 18:23 नवीन
कंफर्टेबलवर प्रतिसाद पुन्हा दिलायं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
ग
गोंधळी Sat, 05/16/2020 - 07:44 नवीन
अगदी वास्तविक.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा