Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अहिराणी बोली भाषा ( आत्ताच्या आंदोलनाचा काहिही सबंध जोडू नये) हि मराठी (च) बोली भाषा आहे.

प
पाषाणभेद
Tue, 11/18/2008 - 12:38
🗣 61 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
24885 वाचन

💬 प्रतिसाद (61)
आ
आर्या१२३ Fri, 10/10/2014 - 11:49 नवीन
मी उनु!! दिनमा मी एखाद दुसरी चक्कर टाकी जास! :)
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Fri, 10/10/2014 - 20:28 नवीन
म्या एक आहिराणी भासामधार गानं लिखेल शे. त्यानामधारल्या काही शब्दनी माले आडचण शे. ते बराबर हाय का नही कोन सांगी? कोनले ते गानं पाठवू म्हंजे माले कळी बराबर शे का चुकेल शे.
  • Log in or register to post comments
इ
इरसाल Sat, 10/11/2014 - 08:06 नवीन
द्या माले.
  • Log in or register to post comments
आ
आर्या१२३ Sat, 10/11/2014 - 10:01 नवीन
आरे हाउ पाभे कव्हयना कोकली राह्यना व्हता! इरसालभौ, त्याले नेमबन्द मदत करजो! :)
  • Log in or register to post comments
आ
आर्या१२३ Sat, 10/11/2014 - 10:08 नवीन
हाई ल्या काही अहिराणी शब्देसना अर्थ...तठे मायबोलीवर टाकेल व्हत मीच! आन हाउ मन्हा खान्देशी ब्लॉगः www.khandeshkanya.blogspot.in वडगण- जेवताना ताटातली आमटी/ वरण एकीकडे वाहु नये म्हणुन पुर्वी ताटाखाली लाकडी चौकोनी वडगण लावत असत. बोघन- पातेल झब- नरसाळ गोण्ट- गोणपाट अस्तुरी- बायको आन्डेर- मुलगी आन्डोर- मुलगा धडला/ धल्ला- म्हातारा धडली/ धल्ली- म्हातारी व्हउ- सून फुई- आत्या देवपळ्हः देवकपाशी उखल्ला- उकीरडा कान्जील- विहीर कबाडी- भन्गारवाला याही/ याहीण- व्याही/ विहीण जवाई- जावई आठे- इथे इबाक- इकडे तिबाक- तिकडे तठे- तिथे बठ्ठाजण- सगळेजण उना- आला जोयजे- पाहिजे जुवान- तरणाताठा परनाले- लग्नाला जाणे कव्हळमव्हळ- कधी मधी माती ग्या का?- मातला का? हाड्या- कावळा. पितृपक्षाला 'हाडपक्ष' म्हणुनच म्हणत असावेत. वडान्ग- कुम्पण दान्गडो- दन्गा घरोटा/ घट्या- जाते चावळने- उगीच काहीतरी बोलणे. उदा. "काय चावळी राह्यनात रामभाऊ! आम्ही दखेल शे ना ते खेत! " येरोनेरले- एकमेकान्ना बाट्टोड- वात्रट उप्पाद- कटकट कुटाणा- त्रास/ कटकट बोखल- कोनाडा वाळन्यानी पन्गत- नवरदेवकडच्या लोकान्नी लग्नानन्तर आपल्या गावाला देण्याच जेवण महावस्त्र- नवरीचा शालु तेलनचिड्ली- नवरीच्या बस्त्यातली एक प्र्कारची साडी. पोटझाकण- नवरदेव/ नवरीचा बस्ता होतो तेव्हाच नवरदेव, नवरीच्या आईला, फुईला लग्नासाठी साड्या घेण्यात येतात. त्याचा खर्च हुन्ड्याच्या पैशातुनच होतो. मान्डवाची साडी- ही पण नवरीची साडीच. एकन्दरीत नवरीच्या बस्त्यात, हळदीची साडी, महावस्त्र, तेलन चिडली, मान्डवाची साडी या ४ साड्या येतातच. बेळमाथनी- लग्न जवळ आल्यावर नवरदेवच्या/ नवरीच्या घरी 'कळस भरल्यासारख, एका कोपर्‍यात मातीचा माठ आणि त्यावर मातीचच छोट भान्ड अस पाण्याने भरुन त्याला हळद माखलेला दोरा बान्धतात. त्याची आधी पुजा करुन मगच हळद फोडणे वै. कार्यक्र्म होतात. भानशी- चुलीच्या बाजुलाच त्याच आकाराची आतुन कनेक्टेड असते ती. चुलीतले एक लाकुड तिरपे करुन ठेवले की जाळ तिकडे पोचतो. फक्त शिजायला/ भाजी उकळायला ठेवायची असेल तर भानशीवर ठेवतात. (इकडे तिला 'चुल-उल'. 'वैल' म्हणतात) सतेल- गोल बुडाचे पातेले सान्डशी- स्वयम्पाकघरात वापरायची पकड गडन्गनेर- केळवण
  • Log in or register to post comments
प
पैसा Sun, 10/12/2014 - 19:12 नवीन
छान वाटलं. काही शब्द हिंदी/गुजरातीला जवळचे. काही गावातल्या जुन्या मराठीचे. असे वाटले. भानशी वरून भानशेरू आठवलं. अगदी घाणेरड्या कपड्याला भानशेरू म्हटलेलं ऐकलं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आर्या१२३
इ
इरसाल Sat, 10/11/2014 - 10:42 नवीन
नम्बर शे वं आर्यातै !
  • Log in or register to post comments
म
माहितगार Sat, 10/11/2014 - 13:49 नवीन
विकिची वकिली: * सूची:अहिराणी बोलीभाषेतील शब्दार्थ (सध्या रिकामी आहे, अहिराणी भाषकांची वाट पहात आहे !) * अहिराणी विकिपीडिया (सध्या जवळपास रिकामे आहे, अहिराणी भाषकांची वाट पहात आहे !)
  • Log in or register to post comments
च
चैदजा Sun, 10/12/2014 - 15:51 नवीन
माझ्या बायकोला थोडीफार येते, तिचा मामा कळवणचा आहे. या भाषेत म्हणी खूप दमदार आहेत, लग्न झाल्यावर बर्‍याच ऐकल्या आहेत. माझ्या सासू़कडे अश्या म्हणींचा बराच साठा आहे. उ. दा. जने तिले कळे, फुकटी गोंडा घोळे. मना मामा गावले गया, घरमां कुळीद पेरी गया. (कुळीद ढेकुण, बहुतेक कुळीद हा शब्द असावा, बायकोला नक्की आठवत नाही.)
  • Log in or register to post comments
आ
आयुर्हित Sun, 10/12/2014 - 17:39 नवीन
"मना मामा गावले गया, घरमां कुळीद पेरी गया" हा एक कूट प्रश्न आहे, ज्याचे उत्तर ढेकुण आहे. पण कुळीद म्हणजे ढेकुण नव्हे तर कुळीद (horse gram) हे एक दिवद्ल कडधान्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चैदजा
आ
आर्या१२३ Mon, 10/13/2014 - 06:40 नवीन
अहिराणी म्हणी जोयजे का तुम्हले? मग हाई ल्या... १)घरना पोरं उघडा, नी याहीणले नेसाडा लुगडा २)चार आनानी कोंबडी, नी बारा आनाना मसाला ३)दळे तिले कळे, नी फुकटी गोंडा घोळे ४)खिंसात नही आणा, नी माले बाजीराव म्हणा ५)नवल्यानी घीदी गाय, नी धाई धाई दुध काढले जाय ६)खिशात नही कवडी, नी वणी बाजार भवडी. ७)जीव म्हणे आखो आखो, नी पोट म्हणे नको नको ८)चार आनानी पेवाणी, नी बारा आनानी दखाडानि ९)येडी न मत, नी घुबड न चाळा. १०)आई बाई नि दिधी भर,नी उठ व शीजी नवरा कर ११)निधी न भंडारा, नी गावभर डोम्बारा १२)तुले माले सांगाले भगतीन आनी घुमाले १३)काम् नही काय करु, लुगड फ़ाडी दान्डे करु १४)सोनारणी पीटी पीटी, नी लोहार नि एकच बठी १५)खान तशी खापरी,नी माय तशी छोकरी १६)माले ना तुले, घाल कुत्राले १७)उच्चा झाडवर बुच्चा बसणा, असा राज कधी ना उन १८)तोच गुल, नी तीच काडी १९)चिडी खोपामा, नी जीव धोकामा २०)कागद न भाऊ, नी बाहेर नको जाऊ २१)रीस नी माय, भिक मांगी खाय २२)धल्ला (म्हातारा) नवरा कया, कुळले आसरा झाया २३)घरन थोड, नी याहीन घोड २४)जवाईन पोर, हरामखोर २५)साक्खा भाऊ, पक्का वैरी २६)सासू तशी सून, नी उम्बारना गुण २७) गाव नी खावा लाथ, पण परगाव ना खाऊ नाही भात २८)आसू न पासु, मारी गायी सासू २९)ज्यांना घर पत्थर नि मावठी, त्यांनीच पेओ गावठी ३०)दिनभर आथ तथ, दिन मावळणा जाऊ कथं ३१)आग मारे ते खोबारण तेल, नी फसफस करे ते गोड तेल ३२)खावाले काळ, नी भूईले भार ३३)घरमा फुटेल बोयका, नि मांगस दोन-दोन बायका ३४)नाईकभाऊले वाडा भ्याये, नि घरनी बाई बाहेर पये ३५)महारनं आख्खं गाव, नि त्याने नही कोठे ठाव ३६)उठरे तीन डाव, तोच धंदा ३७)गावमा ऊना पोया (पोळा) ,नि महारले आनन झया ३८) बाईना फुले बाईले, नि शाबासी मन्हा याहीले ३९)रायरंग रातभर राजा, नि सकायमा ऊठी पानी कोनी पाजा ४०)दुसरी वणी घरमा, पयली गयी घोरम ४१)दिल्येल शिदोरी, आणि सांगेल आक्कल पुरत नही ४२)उन उरी, ते चुल्हाप मुतारी ४३)धल्ला (म्हातारा) नवरा सदीमे निजे, जुवान बायको रातभर खिजे ४४)आग लाऊ, तमासा पाहू ४५)आसू ना पासु, मारी गई सासू ४६)कवळ मवळ, आडई तव्हळ ४७)उक्खळ म्हान डोक घाल, आते फुटो का रहावो ४८)हाड्याले (कावळा) झाये उडाले, नी फाटीले (झाडाची फांदी) झाये मुडाले ४९)उस गोड झाया, ते ते मुईसंमत खाऊ नही ५०)आईबाई नडणी, कानबाई घडणी ५१)आचर पाचार, धल्लानी पाचर ५२)घोडा इकी डांगर खाऊ नही ५३)करमम्हान पड कोड, हसिबोली गोड करी ल्हेओ ५४)आड टीड कारे नि कंबर मुडे, खापरे बसे तिने नाव कागद चढे ५५)अन्नाडूना बारवर घडी घडी जान पडस ५६)आगमाहीन निघीसन, फुफाटामा पडण ५७)देव त्याले खेव ५८)ऐकणारणी एक बात, नही ऐकणारण सुपड साफ ५८)आमुनी कमाई, जामूम्हान गमाई ५९)अधोडी खाये, त्याले मधुरा व्हये ६०)कधी ना मधी, गई हुबी नदी ६१)हाथ मूडी त्यान्हा गळात पडी ६२)काये ना बये, चालनी धुये ६३)वाटे ते बोट चाटे ६४)पेरई तसे उगई ६५)मना माल आणि मन्हाच हाल ६६)कोपरा देखी थुको, नि जागा देखी मुतो ६७)आपलाच दात नि आपलाच व्हट (ओठ) ६८)निमण कीड, निमलेच गोड लागस ६९)अम्हनाच दांड, नि अम्हनीच कुर्हाड ७०)कीतलभी कय तरी, कोयडांच हाथ निघस ७१)कोन्ही सोनानी सरी बांधी ते आपून दोरी घाली मरू नई ७२)खावाले काळ, नि भूईले भार ७३)कुडी देखी, पुडी वाढो ७४)करकडे ते सरकडे ७५)करा का वरा, फुटकी गोंडा धरा सौ: आन्तरजाल
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा