Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कोरोना

S — Sneha Kalekar Ghorpade, Tue, 05/19/2020 - 12:38
कसा काय देवराया, हा कहर झाला कोरोनाचा न भूतो न भविष्यती,असा खेळ पाहिला आयुष्याचा किड्यामुंग्यांसारखी माणसं मरू लागली जिकडेतिकडे यातून लवकर सुटका कर देवा, एवढ़े कळकळीचे साकडे कधी नव्हे ती आता,सर्वांना नाती कळू लागली आयुष्यभराची देवा, अद्दल घडवलीस चांगली माझ्यासारखं कुणीच नाही, असं "माणूस" मिरवीत होता फुकटच्या "हुशारया" आणि नुसता "गुर्मीत" होता आणलंस थोडं शुद्धीत,फिरवलीस तुझी काठी व्याकूळ झाला माणूस, आपल्याच माणसांसाठी चांगलाच धडा शिकवलास, आम्हाला असंच हवं होतं "मी"पणाच्या अहंकारात,विसरून गेलो नातंगोतं कोरोनाच्या या लढाईतून देवा, तूच आम्हाला तारून नेऊ शकतोस पूरे कर देवा आता, किती लेकरांचा अंत बघतोस झाली आमची चूक, मी सगळ्यांच्या वतीने मान्य करते थांबव तुझा खेळ आता, मी तुझ्या पाया पडते स्नेहा कालेकर - घोरपडे

प्रतिक्रिया द्या
1285 वाचन

💬 प्रतिसाद (1)
ज
जव्हेरगंज Tue, 05/19/2020 - 13:32 नवीन
कविता छान!! कोरोना विषयी एवढे लिहीलं गेलंय की आता नको वाटतेय वाचायला.. काहीतरी वेगळं लिहा! आम्ही आहोतच वाचायला!!
Image removed.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा