Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

उप्पीट मात्र बरे झाले

म — मनस्विता, Tue, 05/19/2020 - 14:45
प्रेरणा: https://www.misalpav.com/node/46836 रवा होता खमंग भाजला तरीही उप्पीट मात्र बरे झाले फोडणीत मोहरी तडतडली तरीही उप्पीट मात्र बरे झाले उडीद डाळ त्यातच परतली तरीही उप्पीट मात्र बरे झाले आधणातल्या रव्याला दणकून वाफ आणली तरीही उप्पीट मात्र बरे झाले डिशमधल्या उप्पीटावर खोबरे-कोथिंबीर सजली तरीही उप्पीट मात्र बरे झाले मीठ, साखर, लिंबू सगळी भट्टी पर्फेक्ट जमली तरीही उप्पीट मात्र बरे झाले काय, कॉफी करू का? अर्थातच कर तरीही उप्पीट मात्र बरे झाले बाकी स्वयंपाकात आहे निपुण, स्तुती करणार कशी उप्पीट मात्र...

प्रतिक्रिया द्या
4344 वाचन

💬 प्रतिसाद (8)
P
Prajakta२१ Tue, 05/19/2020 - 18:15 नवीन
छान
  • Log in or register to post comments
म
मन्या ऽ Tue, 05/19/2020 - 18:43 नवीन
ना घातला फोडणीत कढीपत्ता अन् हळद ना घातला कांदा ना शेंगदाणे उप्पीट मात्र बरे झाले! ;)
  • Log in or register to post comments
प
प्रिती-राधा (verified= न पडताळणी केलेला) Tue, 05/19/2020 - 19:46 नवीन
छान
  • Log in or register to post comments
न
नावातकायआहे Tue, 05/19/2020 - 20:48 नवीन
सं. क्षी. च्या रसग्रहणाच्या प्रतिक्षेत...
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Mon, 05/25/2020 - 20:33 नवीन
लाईफ लाँग स्पॉन्सर केली तरीही मी होते म्हणून झाले फिया, ट्रिपा, आजारपणं, सारीसारी उपसून झाली तरीही मी होते म्हणून झाले पार्लरं झाली, पैठण्या झाल्या, कपाटं संपली.... तरीही मी होते म्हणून झाले तीन बेडरुम, विथ टेरेस, सगळी ऐश करुन झाली तरीही मी होते म्हणून झाले अ‍ॅब्सची मेंबरशिप घेऊ का ? अर्थात घ्यायची तरीही मी होते म्हणून झाले किचन मॉड्युलर, वॉशिंग ऑटो, चेहेरा नेमका खुलणार कधी मी होते म्हणून ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नावातकायआहे
क
कादंबरी... Wed, 05/20/2020 - 21:13 नवीन
पोहे मात्र सुरेख झाले उपीट मात्र बरे झाले डोसे मात्र सुरेख झाले वडे मात्र बरे झाले पाककृती विभागात फिरल्यासारखं वाटलं :-)
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप गुरुवार, 05/21/2020 - 03:59 नवीन
या तिन्हींमध्ये, पोहेच सुरेख झाले. पुलेशु! सं - दी - प
  • Log in or register to post comments
म
मनस्विता Sat, 05/23/2020 - 17:04 नवीन
सर्व प्रतिसाददात्यांचे अनेक आभार.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा