Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

थांब ना

अ
अनुस्वार
Sun, 05/24/2020 - 13:09
थांब ना जरा... अरे आज शेवटचं भेटतो म्हटलास ना? मग निदान आता घाई तरी नको करूस. संबंध शरीराला भूल दिल्यासारखं होतंय मला. माझ्यातल्या जीवंतपणाला जीवनाचं रुप तुझ्या सोबत मिळालं. सातशे... तब्बल सातशे कोटी लोकसंख्या आहे जगाची. तरी मग तुलाच कशी‌ रे माझ्या मनाची किल्ली गवसली? तू असलास की विस्मरणात गेलेले सगळे आनंदाचे क्षण मनात पुन्हा पिंगा घालू लागत. तुझ्या खांद्यावर रडत रडत दु:ख हलकं करायचे त्याचंही मला सुखच लागायचं. माझा श्वास आज मला सोडून जातोय तर हृदयाची तडफड होणार नाही का रे..? आणि माझं सगळं त्राण आजच का संपलंय? की माझी ताकतही तुच होतास? उजाड माळरानावर नंदनवन बहरावं तसं तू माझ्या आयुष्याला प्रफुल्लित करून टाकलं. सुखाच्या दोन-चार कळ्या सांभाळणारी मी असा सुखांचा पुष्पगुच्छ सांभाळताना जरा वेंधळणारच की. आयुष्यातल्या सगळ्या अडीअडचणी आहे तशाच आहेत किंबहुना त्यात काहींची भरच पडलीये. तुझ्यात मात्र एक अलौकिक बेफिकीरी भरलेली होती. तुझ्या संगतीने मी ही या अडचणी बाजूला सारून आयुष्य जगायला शिकले होते. आता तू जातोय तर या अडचणी मला पुन्हा वाकुल्या दाखवत आहेत. तू दरडाव ना त्यांना. सांग त्यांना, की तू मला सोडून नाही जात आहेस. म्हटलं तर हाडामांसाचा गोळा तू.. अगदी सगळ्यां सारखाच. मग हे असं इतरांच्या हृदयात शिरायचं गुपित कुठे शिकलास? मलाही शिकव ना ते गुपित. मलाही रहायचंय तुझ्या हृदयात, तुझ्या मनात. चिरंजीव. चिरंतन. हा विरह कसा सहन‌ करु मी? पालवीशिवाय झाड कितीसा तग धरेल? माझ्या डोळ्यांना माझ्यापेक्षा तुझं रूप जास्त ओळखीचं वाटतं. त्यांनी आता कुणाला पाहावं? का? तुला जायचंच होतं तर का लळा लागु दिलास मला तुझा? नको ना जाऊस.. फक्त प्रेम नाही रे करत मी..‌ माझा जीव तुझ्यात आहे... माझा जीव माझ्याजवळच ठेव‌ ना.

प्रतिक्रिया द्या
1176 वाचन

💬 प्रतिसाद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा