Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

राहून गेले..

म — मन्या ऽ, Mon, 05/25/2020 - 08:44
राहून गेले.. तुझ्यासवे अवखळ बालपणीचे ते क्षण पुन्हा एकदा वेचायचे होते ते क्षण वेचणे राहून गेले तुझे जीवनगीत ऐकत तुझ्या कुशीत रातभर जागायचे होते ते जागणे आता राहून गेले तु शिकवलेस मज चालावयास तुला आधारासाठी हात देणे राहून गेले तुझ्याकडुन अजुन जगरहाटीचे नियम शिकायचे होते पण ते नियम शिकणे राहून गेले तुझ्यासोबत अजुन थोडे जगायचे होते मनसोक्त बोलायचे होते चांदण्यात नहायचे होते तुझ्या कुशीत झोपायचे होते तुझ्याकडे हट्ट करायचे होते तुझ्या कुशीत एकदा रडायचे होते पण पण ते सारे काही राहून गेले तुझ्या आठवणींत आजी,मी आज पुन्हा एकदा हरवुन गेले तु प्रेमाने मज सारेकाही दिलेस तु मात्र एक संधीही न देता निघुन गेलीस तुझ्यासोबतचे ते गोड क्षण जगायचेत पुन्हा एकदा पण तेही तुझ्यासारखेच अनंतात विरुन गेले.. -दिप्ती भगत (२९जुलै,२०१९)

प्रतिक्रिया द्या
3738 वाचन

💬 प्रतिसाद (4)
ग
गणेशा Mon, 05/25/2020 - 11:15 नवीन
निशब्द...
  • Log in or register to post comments
म
मनिष Mon, 05/25/2020 - 20:47 नवीन
सुरेख!!!!!!!!
  • Log in or register to post comments
क
कौस्तुभ भोसले Tue, 05/26/2020 - 09:56 नवीन
सुंदर
  • Log in or register to post comments
म
मन्या ऽ Sat, 05/30/2020 - 21:04 नवीन
गणेशदा, मनीष, कौस्तुभ खूप खूप धन्यवाद! वाचकांचे आभार!
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा