Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आत्तापर्यंत काय केलं?

म — मनिष, Mon, 05/25/2020 - 20:00
वेळ मिळालाच आहे अनायसे, तर संपवूया कितीतरी वाचायची राहिलेली पुस्तकं, अर्धवट लिहिलेल्या कविता, काही लेख. असंच खूप काही, मनापासून ठरवलं. धावपळीत रोजच्या, बरंच राहून गेलं. डायरीच्या पानांनी मग हक्काने खडसावलं, आत्तापर्यंत काय केलं? अपूरी स्वप्नं दूरुनच खुणावत राहिली दिवस उलटले, कॅलेंडरची पानं बदलली वसंत सरला, ग्रीष्मधग माथ्यावर आली झाडांची पानं गळून गेली, धुंदावणारी स्वप्नगंधा कोमेजून गेली. निष्पर्ण पळस, रक्तवर्णी जिव्हांनी फुत्कारला, आत्तापर्यंत काय केलं? ज्यांच्या अंगा-खांद्यांवर खेळलो, त्यांनाच खांदा देऊन आलो. सरणावर थोडा, मीही जळून गेलो. पोरकेपण नि पोक्तपण सोबत राहिले. नकळत अशीच कित्येक वर्षं सरली. थोडीफार उरलेली वर्षं आता खिजवतात, आतापर्यंत काय केलं? काय केलं आत्तापर्यंत?
स्पर्धेत लिहिलेली माझी कविता (क्या उखाड़ लिया?) हिंदी शीर्षक बदलून आणि थोडी सुधारून इथे सामविष्ट करतोय.

प्रतिक्रिया द्या
7711 वाचन

💬 प्रतिसाद (10)
च
चांदणे संदीप Tue, 05/26/2020 - 05:51 नवीन
एक 'मग' त्या आवर्तनाच्या हाती द्या. मग आत्तापर्यंत काय केलं? सं - दी - प
  • Log in or register to post comments
म
मनिष Tue, 05/26/2020 - 07:41 नवीन
मान्य!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप
श
श्रीगणेशा Tue, 05/26/2020 - 06:30 नवीन
हे कसं वाटतंय? --> निष्पर्ण पळस, रक्तवर्णी जिव्हांनी फुत्कारला मग आतापर्यंत काय केलं --> निष्पर्ण पळस, रक्तवर्णी जिव्हांनी फुत्कारलं मग आतापर्यंत काय केलं
  • Log in or register to post comments
श
श्रीगणेशा Tue, 05/26/2020 - 06:32 नवीन
आणि --> थोडीफार उरली वर्षं, त्यांनी आता खिजवलं मग आतापर्यंत काय केलं
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 05/26/2020 - 06:51 नवीन
लिहिते राहा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Tue, 05/26/2020 - 07:13 नवीन
मुळ भावना कधी पण श्रेष्ठ.. भले ती ऐकण्यास.. वाचण्यास आडवळण घेत असेल.. प्रत्येक वाचकाची मते वेगळीच असतात.. पण तरी हि क्या उखाड लिया.. म्हणजे आमच्याकडे मराठीत असे म्हणतात.. काय गाजवली तू आता पर्यंत? हे अधिकार भावनेने आहे कुठे तरी.. ज्याला जास्त कळते तो दुसऱ्याला असे बोलतो.. पळस, पाने, वर्षं हि आपल्या पेक्षा अनुभवांनी जास्त ते खडसावतात हे मुळ भावनेत व्यक्त होतेच.. आता पर्यंत काय केलं? हे म्हणजे वरण भात बोलणे झाले.. म्हणजे विचारणारा गप विचारतोय सांग ना काय केले अवांतर : कवी म्हणत असेल अरे लिखू तो क्या लिखू, बोलू तो क्या बोलू... :-)) :-)) मटण लिखा तो वरण चाहिये, वरण लिखा तो तिखापण चाहिये
  • Log in or register to post comments
म
मनिष Tue, 05/26/2020 - 07:41 नवीन
जाना देव...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा
क
कौस्तुभ भोसले Tue, 05/26/2020 - 09:55 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments
म
मनिष Wed, 05/27/2020 - 12:31 नवीन
क्या उखाड लिया विचारण्यात एक रॉनेस आहे जळजळती खंत आहे
नेमकं हेच पोहोचवायचं होतं!!!! __/\__
  • Log in or register to post comments
म
मन्या ऽ Sat, 05/30/2020 - 21:11 नवीन
कवितेचे दोन्ही वर्जन आवडले! पहिला जरा जास्तच!
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा