Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पन्नाशीचा टप्पा

म — मनोज, Mon, 06/08/2020 - 07:20
आता आता दादा होते कसे मग काका झाले तरुणाच्या यादी मध्ये बघा किती मागे गेले दिसते आहे टक्कल पांढर्‍या झाल्या मिश्या हळू हळू मोठ्या होती कश्या प्रौढत्वाच्या रेषा शत्रूवर येऊ नये तो प्रसंग येतो असा तिशीची बाई म्हणते काका जागा आहे बसा पटापट हातातून आयुष्य जात पळून पन्नाशीचा टप्पा आला मागं पहावं वळून काय काय राहिलंय केली पाहिजे यादी काय माहित कधी धरावी लागेल गादी तू लक्ष नाही द्यायचे कुरबुर केली कुणी ऐकत बसावं मस्त आवडती गाणी जुनी कारणाशिवाय एक टाकून द्यावी रजा पोरा सोबत आपल्या खूप करावी मजा खर आहे घरासाठी तर झिझल पाहिजे एकदा सरीत पण चिंब भिजलं पाहिजे राहिलं असेल बघ ते डोंगरावर जाणं जुने छंद आठवून शिक चित्र किंवा गाणं प्रेमाला वय नसतं दे बायकोला गजरा व्हायचं रसिक कधी चुकवून त्या नजरा भरून घेतल आहे आता थोडं फार वाट मदतीचा हात थोडा ज्यांना दु:ख आहे दाट बाहेर बाहेर झालं तू आत पहा वाकून उलगडून बघ ते जे ठेवलस झाकून

प्रतिक्रिया द्या
7649 वाचन

💬 प्रतिसाद (17)
स
सस्नेह Mon, 06/08/2020 - 08:24 नवीन
आवडली कविता !
बाहेर बाहेर झालं तू आत पहा वाकून उलगडून बघ ते जे ठेवलस झाकून
...हे खासच !
  • Log in or register to post comments
व
विटेकर Mon, 06/08/2020 - 08:26 नवीन
कविता आवडली !
  • Log in or register to post comments
म
मूकवाचक Mon, 06/08/2020 - 11:21 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर
च
चौथा कोनाडा Mon, 06/08/2020 - 09:00 नवीन
मस्त, आवडली कविता !
प्रेमाला वय नसतं दे बायकोला गजरा व्हायचं रसिक कधी चुकवून त्या नजरा
आजकाल रोमॅन्टिसिझम फक्त गजर्‍यावर कुठं भागतं ? हॉटेलींग, गिफ्टस वै बराच खर्च करावा लागतो ! :-)
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 06/08/2020 - 09:11 नवीन
लै भारी ! चांगलं लिहिलंय. साठीची गझल आठवली. ''शत्रूवर येऊ नये तो प्रसंग येतो असा तिशीची बाई म्हणते काका जागा आहे बसा'' बाकी वयाचं काय वाटत नै हो, पण जेव्हा सुंदर महिला माझ्या सारख्या देखण्या तरुणाला 'काका' म्हणतात तेव्हा वाईट वाटतं. मी पण 'काकू' म्हणून हिशेब पूर्ण करून टाकतो. ;) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Mon, 06/08/2020 - 09:22 नवीन
समोरचीचा काकु म्हटल्याने आपले फ्रस्ट्रेशनच दिसते. त्यापेक्षा "अग छकुले? किती गोड मुलगी आहे ती? कोणाची आहे बाळ माझी?" असे बोलत बोलत एखादा गालगुच्चा घेउन टाकायचा हाकानाका पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
च
चौथा कोनाडा Mon, 06/08/2020 - 09:25 नवीन
गालगुच्चा घेउन टाकायचा
हा .... हा ..... हा .... हा ..... हा .... हा ..... हा .... हा .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 06/08/2020 - 09:34 नवीन
बाप रे....! गालगुच्चा आणि काकुचा.... नाय, नो, नेव्हर. शाब्बास...घाला तुम्ही आम्हाला जेलात. :( -दिलीप बिरुटे (सभ्य मिपाकर )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
प
प्रशांत Mon, 06/08/2020 - 09:35 नवीन
गुपचुप यांच्या वाड्याजवळील स्नॅक सेंटरवरचा किस्सा सांगा हो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 06/08/2020 - 09:42 नवीन
आता आता दादा होते कसे मग काका झाले तरुणाच्या यादी मध्ये बघा किती मागे गेले
प्रशांतसेठ, वल्ली आणि मी गुपचुप वाड्याजवळी स्नॅक्स सेंटरला गेलो होतो. उपवासाच्या मिसळ आम्ही मागितल्या होत्या. मस्तय तेथील मिसळ. आमच्या गप्पा चालूच होत्या की तिथे एक तरुणींचा घोळका आला त्यातल्या थोड्या पोक्त बाईने वल्लीला काका थोडं तिकडे सरका म्हटल्याचे आठवले. प्रशांतसेठ आणि मी हसुन हसुन जमीनीवर लोळायचे बाकी होतो. =)) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रशांत
प
प्रसाद गोडबोले Mon, 06/08/2020 - 10:57 नवीन
ओ काका =))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
स
सतिश गावडे Mon, 06/08/2020 - 16:44 नवीन
चित्रपट पाहण्यासारखा आहे. शेवट तर अगदी अनपेक्षित असा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
ग
गणेशा Mon, 06/08/2020 - 10:59 नवीन
:-)) :-)):-))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
च
चांदणे संदीप Mon, 06/08/2020 - 11:15 नवीन
हा..हा... मस्त वाटेल म्हणायला. ओ वल्लीकाका! ;) सं - दी - प
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ग
गणेशा Mon, 06/08/2020 - 10:59 नवीन
अप्रतिम...
  • Log in or register to post comments
म
मनोज Tue, 06/09/2020 - 12:47 नवीन
सर्व काकांचे मनःपूर्वक धन्यवाद !!
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Wed, 06/10/2020 - 07:57 नवीन
हा हा हा मस्त!
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा