बॉयकॉट चायना विथ वॉलेट, नॉट द बुलेट !
सोनम वांगचुक यांनी एबिपी माझाला दिलेली ही मुलाखत सर्व भारतीयांना विचार करायला लावणारी आहे.
त्यांचे सर्व मुद्दे निर्विवाद आणि पटण्याजोगे आहेत.
विषेशतः 'बॉयकॉट चायना विथ वॉलेट, नॉट द बुलेट' हे अभियान भारत सरकारच्या मर्जीवर अवलंबून नसून, भारतीयांच्या सहभागावर आणि त्यांच्या दृष्टीकोन बदलावर अवलंबून आहे.
शिवाय हे अभियान भारतीयांच्याच नव्हे तर प्रचंड दडपशाहीखाली भरडल्या जाणार्या चिनी नागरिकांच्या आणि जागतिक पर्यावरणाच्या दृष्टीनं हिताचं आहे.
या अभियानामुळे सर्व जगाचं अर्थकारण बदलू शकेल आणि विकासाच्या संधीचं विकेंद्रिकरण होईल.
या अभियानासाठी करोना ही जगाला लाभलेली उत्तम संधी आहे असं सोनम यांचं म्हणणं आहे.
त्यानिमित्तानं हा विषय इथे मांडला आहे.
हीच गोष्ट दिवाळीमधील लाइट आणि डेकोरेशन च्या सामनाबाबत. इतक्या लांबून चीन वरून सामान येते आणि आपण इथल्या इथे त्याला affordable पर्याय तयार करू शकत नसूयावर कोल्हापूरजवळ एका गृहोद्योगाने अशा लाईटच्या माळा तयार केल्याचे पेपरात वाचलेले आठवत आहे. त्याचे पुढे काय झाले माहिती नाही..प्रॉब्लेम उद्योग धंद्या साठी नसलेल्या पोषक वातावरणाचा आहे. सुधारणा तिथे केल्या पाहिजेत.सहमत..!!मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Sooni Sooni... :- Cheeni Kum