Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग १ - स्वरूपबोध: प्रकरण १ - 'स्व' चे मूळ स्वरूप

म
मूकवाचक
Tue, 06/09/2020 - 15:25
💬 61 प्रतिसाद
'द सेल्फ' किंवा स्व-स्वरूप ही संकल्पना भगवान रमण महर्षींच्या बोलण्यात वारंवार येत असे. पावसच्या स्वामी स्वरूपानंदांच्या लेखनातही 'स्वामी म्हणे लाभे अवीट आनंद, लागलासे छंद स्वरूपाचा' या सारखे उल्लेख ठिकठिकाणी आहेत. रमण महर्षींनी उल्लेख केलेल्या स्वरूपाच्या बाबतीत पुढील गोष्टी लक्षात घेण्याजोग्या आहेतः 'स्वरूपाचा' अर्थ आपले व्यक्तिमत्व असा नसून ती संकल्पना एका निर्वैयक्तिक आणि सर्वसमावेशक अशा विशुद्ध चैतन्याच्या अखंड अनुभूतीकडे इशारा करते. अहंकार, अस्मिता इत्यादिंच्या परिघात इंद्रियांच्या संयोगाने आलेल्या अनुभवांमुळे जन्माला आलेला, तसेच संस्कारांनी आणि वासनांनी बद्ध असलेला व्यक्तिमत्वदर्शक 'मी' आणि स्व-स्वरूप यात गल्लत होता कामा नये. खरे स्व-स्वरूप निरंतर अस्तित्वात असल्याने ते अनुभवता येणे सहज शक्य आहे. मात्र तसे घडताना दिसत नाही. या बाबतीत महर्षी असे प्रतिपादन करत असत की मुळात अमर्याद असलेल्या चैतन्याभोवती काल्पनिक मर्यादा निर्माण करून बंधनात जखडलेली स्थिती अनुभवण्याची मनाची जन्मोजन्मी जोपासली गेलेली प्रवृत्ती नष्ट झाल्याखेरीज खर्‍या 'स्व' विषयीची सजग जाणीव होणे संभवत नाही. एकसंध आणि निरंतर अशा स्वरूपाच्या सजग जाणीवेसच आत्मसाक्षात्कार म्हणता येईल. सच्चिदानंद, देव, ज्ञान, ह्रदय, तुरिय/ तुर्यातीत, 'आत्मन' तसेच 'सहज स्थिती' अशा अनेकविध संकल्पनांचा उल्लेख रमण महर्षी स्व-स्वरूपाचे किंवा आत्मसाक्षात्कारी स्थितीचे समानार्थी किंवा पर्यायवाचक शब्द या स्वरूपात करत असत. रमण महर्षींचा देव सगुण साकार स्वरूपात नसून या जगाचे रहाटगाडगे चालवणारी एक निराकार शक्ती असे त्याचे स्वरूप आहे. हा देव विश्वाची उत्पत्ती करणारा नसून दृश्य जगाशी त्या शक्तीचा स्वरूप संबंध आहे. ईश्वराच्या अमर्याद चैतन्याच्या एका यःकिंचीत अंशाचे मूळ शक्तीपासून कधीच विभक्त न होणारे प्रकट स्वरूपच आपल्याला ब्रह्मांडाच्या स्वरूपात अनुभवता येते असा या स्वरूप संबंधाचा अर्थ होतो. ब्रह्मांडाच्या अस्तित्वाचा किंवा नास्तित्वाचा मूळ ईश्वरी शक्तीवर काहीच परिणाम होत नाही, तसेच व्यक्त स्वरूपातल्या ब्रह्मांडातल्या कार्यकलापांच्या कर्तृत्वाचा आरोपही ईश्वरावर करता येत नाही. प्रश्नः (या जगातली) वास्तविकता (सत्य) नेमकी काय आहे? रमण महर्षी: सत्य (किंवा वास्तविकता) हे निरंतर सत्यच असले पाहिजे. नाम आणि रूपाने बनलेल्या जगताबद्दल तसे म्हणता येत नाही. ज्या आधारशक्तीच्या बळावर नामरूपात्मक जगत अस्तित्वात येते ती खरी चिरंतन वास्तविकता आहे. ती स्वभावानेच बंधनरहित आणि अनंत आहे. स्वतः सत्यस्वरूप असूनही ही वास्तविकताच आभासी मृगजळासारख्या वस्तुमात्रांचा आधारवड बनून राहते. शाश्वत सत्यस्वरूप जे काही आहे आणि जसे काही आहे ते नेहेमी तसेच राहते. त्याचे वर्णन करू पाहता वाचा खुंटते. अस्तित्व किंवा नास्तित्व या सारख्या संकल्पनांच्या पलीकडची ती चिरंतन आणि स्वयंसिद्ध स्थिती आहे. जेव्हा भौतिक वस्तुंविषयीच्या भ्रामक ज्ञानाचा अज्ञानासमवेत पूर्णपणे निरास होतो, तेव्हा विशुद्ध चैतन्यस्वरूप असलेली वास्तविकता आपोआप प्रकट होते. हेच खरे स्व-स्वरूप आहे किंवा आत्मज्ञान आहे. या ब्रह्मस्वरूपात स्वसंवेद्य अशी शुद्ध जाणीव प्रकर्षाने असते, तसेच अज्ञानाचा लेशमात्रही तिथे शिल्लक नसतो. बाह्य जगताची जाणीव असलेली स्थिती (उदा. जागृती) तसेच जाणीव नसलेली स्थिती (उदा. निद्रा) या दोन्हींना व्यापून उरणारी, तसेच पाप, ताप आणि दैन्यापासून मुक्त असलेली स्वयंप्रकाशी अशी विदेही स्थिती हे तुमचे खरे निजस्वरूप आहे. ही स्थिती अंतर्बाह्य मौनानेच अभिव्यक्त होते. सगळे ज्ञानीजन असा निर्वाळा देतात की कुठल्याही स्थळ, काळ आणि परिस्थितीत अबाधित राहणारी अशी ही अंतिम ज्ञानावस्था आहे. विशुद्ध ज्ञान हेच वैराग्य आहे, तेच खरेखुरे सोवळे आहे आणि तेच ईश्वरी साक्षात्कारही आहे. ज्यात क्षणभराचेही आत्मविस्मरण संभवत नाही असे ज्ञान हेच अमरत्व आहे, त्यातच सर्वज्ञता आहे. कैवल्य ज्ञान हेच खरे तर साधकासाठी सारसर्वस्व आहे. प्रश्नः आत्मस्वरूप जर स्वयंप्रकाशी, नित्य, स्वयंसिद्ध आणि स्वसंवेद्य असेल तर आत्ता या क्षणी मला त्याची जाणीव का होत नाही? रमण महर्षी: द्वैत वास्तविक पाहता अस्तित्वातच नाही, मात्र तुम्ही आत्ता ज्याला ज्ञान समजता आहात ते अहंभावातून निपजलेले आहे. असे ज्ञान हे साहजिकच स्थळ काळ आणि परिस्थिती सापेक्ष असते. सापेक्ष ज्ञानासाठी दृष्य वस्तु आणि द्रष्टा दोन्ही अनिवार्य आहेत, मात्र स्वसंवेद्यता ही परिपूर्ण स्थिती असल्याने तिला दृष्य वस्तु आणि द्रष्टा अशा द्वैताची गरज नसते. स्मरण ही अशीच एक सापेक्ष गोष्ट आहे, जिथे स्मरणात ठेवायची वस्तु आणि स्मरण करणारा दोहोंची अनिवार्यता आहे. जिथे द्वैतच अस्तित्वात नाही, तिथे कोण कोणाचे स्मरण करेल? तुमचे खरे स्वरूप हे शाश्वत आणि चिरंतन आहे. प्रत्येकालाच आपल्या मूळ स्वरूपाची ओळख करून घ्यायची आहे. मात्र मला हे व्यवस्थित समजावून सांगा, की 'पहावे आपणासी आपण' अशी प्रचिती मिळवण्यासाठी तुम्हाला नेमकी कुठल्या स्वरूपात मदत अपेक्षीत आहे? साधकांना एखादी नाविन्यपूर्ण घटना घडावी अशा प्रकारे आत्मसाक्षात्कार अपेक्षित असतो. असा भ्रामक समज करून घेण्यात मुळातच आंतरिक विसंगती आहे, कारण आत्मस्वरूप चिरंतन आणि अखंड असल्याने त्यात कुठलेच परिवर्तन संभवत नाही. साधकांना दिव्य प्रकाश, नाद वगैरे अनुभवांची लालसा असते. आत्मस्वरूप तसे कसे असू शकेल? ते प्रकाश आणि अंधार या सारख्या द्वैताच्या पल्याड असते. (प्रचिती घेता आली तरी) आत्मस्वरूपाची व्याख्या करता येणे शक्य होत नाही. ते जसे असते तसेच सत्य सनातन असते. 'मी आहे', अहंस्फुरणाची ही उपाधीरहित विशुद्ध जाणीवच आत्मस्वरूपाची त्यातल्या त्यात चांगली व्याख्या आहे असे म्हणावे लागेल. श्रुतिवचनांमधे आत्म्याचे वर्णन अंगुष्ठमात्रा एवढा, केशाग्रासारखा, विजेच्या ठिणगीसारखा, अमर्याद, सूक्ष्माहूनही सूक्ष्म असे नानाविध प्रकारे केलेले दिसते. वास्तविक पाहता हा सगळा पूर्णपणे निराधार असा कल्पनाविलास आहे. (व्यावहारिक दृष्ट्या) आपण ज्याला ज्ञान आणि अज्ञान असे म्हणतो, त्या पेक्षा वेगळे असे हे आत्मस्वरूपाचे ज्ञान आहे. (व्यावहारिक दृष्ट्या) आपण ज्याला तथ्यपूर्ण आणि तथ्यहीन म्हणतो, त्या दोन्हीपेक्षा वेगळे असे हे शाश्वत सत्य आहे. त्याची व्याख्या करायची तरी कशी? हे सत्य जाणता येत नाही, ते जाणण्यासाठी स्वतःच सत्यस्वरूप होउन जावे लागते!

प्रतिक्रिया द्या
21791 वाचन

💬 प्रतिसाद (61)
स
संगणकनंद Mon, 06/15/2020 - 09:19 नवीन
दरवेळी नांव सार्थक ठरतंय !
माझं नाव तुम्हाला खुपच आवडलेलं दिसतंय. असो.
आता शेपूट न घालता, तुम्ही फक्त तुमचं पुनर्जन्माविषयीचं आकलन स्वतंत्र धागा काढून लिहा अनफॉरमॅटेड मेमरी स्ट्रींग्जचा दावा मी तिथे सिद्ध करीन.
झाली ना पुन्हा एकदा बोलती बंद. दावा तुम्ही केलाय म्हटलंय त्याचे पुरावे द्यायची जबाबदारी तुमची नाही का? "तुम्ही फक्त तुमचं पुनर्जन्माविषयीचं आकलन स्वतंत्र धागा काढून लिहा" ही पळवाट कशाला काढताय? मी कसला दावा केलाच नाही तर मी माझे आकलन कशाला लिहू? जो दावा करतो त्याने पुरावा द्यायचा असतो असा शहाण्यांचा नियम आहे? तुमच्यात नसतो का असा नियम? आणि दावा सिद्ध करायला तुम्ही शास्त्रज्ञ आहात की प्रयोगशाळेत काही प्रयोग केलेत की एखादं उपकरणं बनवलंत ज्यातून या त्या तुमच्या स्मृती स्ट्रीन्ग्ज अंतराळात निसटताना दिसतात, नवजात अर्भकाच्या मेंदूत शिरताना दिसतात? तुम्ही सिद्ध करणं नको, कुठल्या शास्त्रज्ञाने शोधून काढलं, कोणत्या प्रयोगशाळेत शोधलं, स्मृती स्ट्रीन्ग्ज अंतराळात निसटताना दिसतात, नवजात अर्भकाच्या मेंदूत शिरताना दिसतात हे कोणत्या उपकरणातून पाहीलं, त्या उपकरणाचं नाव, ते कुठे विकत मिळतं, तुम्ही ते कोणत्या प्रयोगशाळेत पाहीलं या सार्‍या प्रश्नांची उत्तरे हवीत. तुमची नेहमीसारखी बाष्कळ फेकाफेकी नको. वरील प्रश्नांची उत्तरे द्या, ती दिलीत की तुमचा दावा आपोआप सिद्ध होईल. घेताय का आव्हान या प्रश्नांची उत्तरे देण्याचं? फक्त याच प्रश्नांची उत्तरे बरं का? इतर काहिही लिहीलंत तर तुमच्याकडे उत्तर नाही हे (पुन्हा एकदा) सिद्ध होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Mon, 06/15/2020 - 11:06 नवीन
जरा विचार करुन लिहा ! पुनर्जन्म हा इथल्या सभासदांचा दावा आहे, माझा नाही ४/५ दिवसांनी फक्त पिंका टाकण्यासाठी इथे येत असलेल्यांना ते लक्षात येणार नाही. तस्मात, पुनर्जन्माची थिअरी > ` सर्वांसाठी, सर्व-काल आणि वारंवार ' या वस्तुनिष्ठ परिमाणंवर तुम्हाला सिद्ध करावी लागणार आहे, मला नाही. मेमरी स्ट्रींग्ज हा दावा पुनर्जन्म या बोगस थिअरीचं वस्तुनिष्ठ निराकारण आहे. _________________________________________________ पिंका टाकण्यापलिकडे तुम्हाला स्मृती > रिट्रावल > प्रोसेसिंग याबाबतीत काही समज असेल तर पूर्वजन्मीच्या स्मृती, या जन्मी कशा पुनर्ज्जिवित होतात ? हे तुम्हाला स्वतंत्र धागा काढून मांडावं लागेल तस्मात, तुमचं पुनर्जन्माविषयीचं आकलन स्वतंत्र धागा काढून लिहा आणि त्याबाबतीत काहीच ज्ञान नसेल तर पुन्हा पुन्हा नांव सार्थ करु नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संगणकनंद
स
संगणकनंद Mon, 06/15/2020 - 12:37 नवीन
त्याचू वैलपान : त्याचू म्हणजे लॉजिकशून्यता !
तुमची बोलती बंद झाल्याने तुम्ही पुन्हा पुन्हा माझ्या "आयडी" नावावर घसरत आहे. "आयडी" नावावर घसरणे हे मुद्द्याविषयी लिहायला काहीच नसल्याने होत आहे. हा "आयडी" केवळ टाईमपास म्हणून घेतला आहे हे ही तुमच्या मेंदूत घुसत नाही. तुम्ही मात्र फार मोठा मुद्दा हाती लागल्यासारखे त्या "आयडी" नावावर घसरत आहात. हे काही ज्ञानी माणसाचं लक्षण नव्हे =))
तस्मात, पुनर्जन्माची थिअरी > ` सर्वांसाठी, सर्व-काल आणि वारंवार ' या वस्तुनिष्ठ परिमाणंवर तुम्हाला सिद्ध करावी लागणार आहे, मला नाही.
जो दावा मी केलाच नाही तो मला सिद्ध करायला सांगत आहात. आणि जो दावा तुम्ही केला आहे त्याचे पुरावे देण्याचे नाव नाही. इथे शेपूट घालत आहात. अजब न्याय आहे हा.
मेमरी स्ट्रींग्ज हा दावा पुनर्जन्म या बोगस थिअरीचं वस्तुनिष्ठ निराकारण आहे.
"तुमचं" वस्तुनिष्ठ निराकारण नकोय. वैज्ञानिक पुरावे द्या. मुळात एक अशास्त्रिय दावा स्वतः करत आहात, त्याचे पुरावे मागितलं की शेपूट घालत आहात. आणि वरुन लोकांना म्हणत आहात "जी गोष्ट सर्वांसाठी, सर्व-काल आणि वारंवार सत्य आहे त्याला पुरावा म्हणतात." हे म्हणजे आपलं ठेवायचं झाकून आणि इतरांचं ठेवायचं वाकून. सांगा, मेमरी स्ट्रींग्जचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने, किती साली, कोणत्या प्रयोगशाळेत लावला? त्याने मेमरी स्ट्रींग्ज कोणत्या उपकरणाने पाहील्या? "तुमचं" वस्तुनिष्ठ निराकारण नकोय. या प्रश्नांची उत्तरे द्या.जर तुमचा दावा वैज्ञानिक सत्य आहे तर. पळवाटा कशाला शोधताय? दुसरे पुनर्जन्मावर लिहीतील न लिहीतिल, तुमचा दावा वैज्ञानिक सत्य आहे ना, मग द्या ना पुरावे. तुमचं कसं आहे माहिती आहे का, शेंबूड माझ्या नाकाला आणि मी हसतोय जगाला. स्वतः एक अशास्त्रिय विधान करुन सिद्ध करत येत नसल्याने पळवाटा शोधताय, आणि दुसर्‍यांना वैज्ञानिक सत्य काय आहे याच्या बाता शिकवत आहात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Mon, 06/15/2020 - 12:53 नवीन
करुन वर बोलती बंद ? मानवी मेंदू हा बायो-कंप्युटर आहे हे मी न्यूयॉर्क टाइम्सची लिंक देऊन ऑलरेडी सिद्ध केलंय वाचलीत का ती चर्चा ? तुमचं वाचन ही नाही आणि प्रतिसादही नांवासारखे, त्यामुळे तुम्हाला काय चर्चा झाल्या आणि मुद्दा काय हे समजणं अवघड. मेंदू हा बायो-कंप्युटर आहे हे सिद्ध झाल्यावर मेमरी स्ट्रींग्ज हा डेटा आहे हे सिद्ध होतं ________________________________________________ असो, तुम्हाला कंप्युटरची कार्यप्रणाली माहिती आहे का ? असल्यास ती स्वतंत्र धागा काढून लिहा कारण या धाग्यावर हे अवांतर आहे (अर्थात, त्याचू म्हटल्यावर तेही समजणं कठीण !) तुम्ही एकदा तुमचं कंप्युटरचं ज्ञान दर्शवलं की फक्त एका प्रतिसादात मी मेमरी स्ट्रींग्जचा सिद्धांत प्रूव करीन ! आलं लक्षात ? आता परत नांव सार्थ करु नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संगणकनंद
स
संगणकनंद Mon, 06/15/2020 - 13:01 नवीन
फक्त तुम्ही जो अशास्त्रीय दावा केला आहे, त्याच्या अनुषंगाने पुढील प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेतः मेमरी स्ट्रींग्जचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने, किती साली, कोणत्या प्रयोगशाळेत लावला? त्याने मेमरी स्ट्रींग्ज कोणत्या उपकरणाने पाहील्या?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Mon, 06/15/2020 - 13:27 नवीन
पुन्हा वाचा : मानवी मेंदू हा बायो-कंप्युटर आहे हे मी न्यूयॉर्क टाइम्सची लिंक देऊन ऑलरेडी सिद्ध केलंय वाचलीत का ती चर्चा ? तुमचं वाचन ही नाही आणि प्रतिसादही नांवासारखे, त्यामुळे तुम्हाला काय चर्चा झाल्या आणि मुद्दा काय हे समजणं अवघड. मेंदू हा बायो-कंप्युटर आहे हे सिद्ध झाल्यावर मेमरी स्ट्रींग्ज हा डेटा आहे हे सिद्ध होतं ________________________________ अर्थात, व्यत्त्यास वगैरे तुमहाला कितपत समजेल ही शंका आहे, तरी एकदा कंप्युटर एस्टॅब्लीश झाला की डेटा रिट्रिवल अँड प्रोसेसिंग हे व्यत्त्यासानं सिद्ध होतं. पण तुम्ही त्या भानगडीत पडू नका. ते बरच वरच्या लेवलला आहे. ____________________ तुम्ही फक्त एक काम करा.... तुम्हाला कंप्युटरची कार्यप्रणाली माहिती आहे का ? असल्यास ती स्वतंत्र धागा काढून लिहा कारण या धाग्यावर हे अवांतर आहे (अर्थात, त्याचू म्हटल्यावर तेही समजणं कठीण !) तुम्ही एकदा तुमचं कंप्युटरचं ज्ञान दर्शवलं की फक्त एका प्रतिसादात मी मेमरी स्ट्रींग्जचा सिद्धांत प्रूव करीन ! आलं लक्षात ? आता परत नांव सार्थ करु नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संगणकनंद
स
संगणकनंद Mon, 06/15/2020 - 13:55 नवीन
मी कोणतीही चर्चा वाचलेली नाही आणि मला कुठली लिन्क माहिती नाही. आणि तुमचा मुद्दा जर लिन्क देऊन सिद्ध होतो तर इतरांचे मुद्दे पुस्तकांची पाने देऊन का सिद्ध होऊ नयेत. तुमची लिन्क काय आभाळातून पडली आहे का? आणि सीएकडून कॉम्युटर कसा चालतो हे शिकण्याईतकी वाईट वेळ माझ्यावर आली नाही. >> मानवी मेंदू हा बायो-कंप्युटर आहे हे मी न्यूयॉर्क टाइम्सची लिंक देऊन ऑलरेडी सिद्ध केलंय मुळात याने तुमचा दावा शास्त्रीय आहे हे नाही सिद्ध होत नाही. तुमचा दावा अतिशय भंपक आहे. वैज्ञानिक सत्य असतं तर चार प्रश्नांची उत्तरं देऊन टाकली असती तुम्ही. पण मुळातच भंपक दावा केल्याने आता चूक मान्य करायला अहंकार आडवा येतोय. त्यामुळे तोंड लपवायला पळवाटा शोधाव्या लागत आहेत तुम्हाला.
मेमरी स्ट्रींग्जचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने, किती साली, कोणत्या प्रयोगशाळेत लावला? त्याने मेमरी स्ट्रींग्ज कोणत्या उपकरणाने पाहील्या?
या प्रश्नांची स्पष्ट उत्तरे असतील तर द्या, नाही तर तुम्ही केलेले अशास्त्रीय विधान मागे घ्या. आहे का हिंमत बोला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Mon, 06/15/2020 - 14:17 नवीन
> मी कोणतीही चर्चा वाचलेली नाही आणि मला कुठली लिन्क माहिती नाही. तेच तर मी पहिल्यापासनं सांगतोयं. न तुमचं इथल्या पोस्टसचं काही वाचन, न प्रतिसादांना काही अर्थ ! ३/४ दिवसांनी येऊन काहीही संदर्भ माहिती नसतांना पिंका टाकायच्या ! > तुमची लिन्क काय आभाळातून पडली आहे का? हे तर तुमचं वाचन ! न्यूयॉर्क टाइम्सनी कंप्युटरची कार्यप्रणाली आणि मानवी मेंदू यातलं साधर्म्य सोदाहरण, एकेक मुद्दा घेऊन स्पष्ट केलं आहे. > इतरांचे मुद्दे पुस्तकांची पाने देऊन का सिद्ध होऊ नयेत ! ही तर तुमची वैचारिक झेप ! मेलेला माणूस जीवंत झाला हे छापिल पानं इथे डकवून सिद्ध झालं म्हणणं, आणि न्यूयॉर्क टाइम्सनी कंप्युटरची कार्यप्रणाली आणि मानवी मेंदू यातलं साधर्म्य सोदाहरण, एकेक मुद्दा घेऊन स्पष्ट करणं यातला फरक तुम्हाला लक्षात येत नाही ! ____________________________ एकूणात तुम्हाला कंप्युटरचंही ज्ञान दिसत नाही आणि तुम्ही इथे झालेल्या चर्चाही वाचलेल्या नाहीत. तस्मात, तुम्हाला एकही प्रतिसाद देण्यात अर्थ नाही. तरीही तुम्हाला हौस असेल तर तुमचं काँप्युटरचं ज्ञान इथे स्वतंत्र धागा काढून लिहा आणि मी माझी थिअरी त्याच धाग्यावर, तुमच्याच विधानांनी (ती बरोबर असतील तर) सिद्ध करतो. इथून पुढे तुम्ही या धाग्यावर काहीही त्याचूसारखं लिहू नका !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संगणकनंद
स
संगणकनंद Mon, 06/15/2020 - 14:32 नवीन
आणि तुम्ही जो दावा केला आहे, त्यासंदर्भात या प्रश्नांची उत्तरे द्या:
मेमरी स्ट्रींग्जचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने, किती साली, कोणत्या प्रयोगशाळेत लावला? त्याने मेमरी स्ट्रींग्ज कोणत्या उपकरणाने पाहील्या?
उत्तरे द्या किंवा या प्रश्नांची उत्तरे नसतील तर तुम्ही एक भंपक थाप मारली हे मान्य करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
अ
अर्धवटराव Sun, 06/14/2020 - 19:30 नवीन
इथे कावळ्याच्या शापाने गायी मरायला लागल्या आहेत, त्यांच्या श्राद्धानिमीत्त बिरबलाची खिचडी रांधुन तयार आहे, आणि पंगतीला सोबत म्हणुन शेखचिल्ली मनातल्या मांड्यांवर यथेच्च ताव मारतोय... आणि तुम्ही गडबडा लोळत हसताय ? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोहंसोहं१०
अ
अनरँडम Sun, 06/14/2020 - 18:32 नवीन
मागे मी रमणरावांना भामटेच म्हटले असते. पण आता सगळं जगच कसं छ्चोर-विनोदी वाटू लागल्याने मला पॅनसायकिजम सत्य असल्याचे वाटते. म्हणजे काय सगळेच सचेतन आहे. आता मी मूकवाचक यांचे लेख वाचून थोडाफार रमणरावांची विचारशॄंखला समजून घेतो.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा