Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

(दिवस तुझे हे फुगायचे)

ग — गणेशा, Tue, 06/09/2020 - 20:07
ह्या विडंबनाची खरी मजा, हे गाणे ऐकताना चालीत म्हणण्यातच. कुमार1 यांच्या धाग्यावर गाणी शोधताना हे गाणे ऐकले आणि त्याचे हे विडंबन शब्द झाले मोती -2 वर लिहिले.. तेच येथे पुन्हा देतो... Youtube - दिवस तुझे हे फुलायचे Gaana- दिवस तुझे हे फुलायचे ---------------------------- दिवस तुझे हे फुगायचे, चाटुनपुसून खावायचे दिवस तुझे हे फुगायचे, चाटुनपुसून खावायचे गाडीत चरत जाणे वाटेत जिलेबी खाणे गाडीत चरत जाणे वाटेत जिलेबी खाणे वड्यात मन हे गुंतायचे वड्यात मन हे गुंतायचे चाटुनपुसून खावायचे, चाटुनपुसून खावायचे मोजावी देहाची जाडी वाटावी मनाची थोडी मोजावी देहाची जाडी वाटावी मनाची थोडी श्वासात दम हे लागायचे श्वासात दम हे लागायचे श्वासात दम हे लागायचे चाटुनपुसून खावायचे, चाटुनपुसून खावायचे थरारे लोखंडी दार सोसेना अंगाचा भार थरारे लोखंडी दार सोसेना अंगाचा भार डोळ्यांनी जखमी करायचे डोळ्यांनी जखमी करायचे डोळ्यांनी जखमी करायचे चाटुनपुसून खावायचे, चाटुनपुसून खावायचे तुझ्या त्या फोटोच्यापाशी थांब तू यडे जराशी तुझ्या त्या फोटोच्यापाशी थांब तू यडे जराशी पापण्या मिटून बसायचे पापण्या मिटून बसायचे चाटुनपुसून खावायचे दिवस तुझे हे फुगायचे, चाटुनपुसून खावायचे दिवस तुझे हे फुगायचे, चाटुनपुसून खावायचे -- शब्दमेघ ( 9 June 2020, 10:56 pm)

प्रतिक्रिया द्या
6574 वाचन

💬 प्रतिसाद (11)
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 06/10/2020 - 11:56 नवीन
:) लिहिते राहा. म्हणून पाहिलं भारी म्हणता आलं. धन्यवाद. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Wed, 06/10/2020 - 14:01 नवीन
एक नंबर =))
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Wed, 06/10/2020 - 14:26 नवीन
बेक्कार! =))
मोजावी देहाची जाडी वाटावी मनाची थोडी
हे वाचून मनाची थोडी वाटल्या गेली आहे. ;) सं - दी - प
  • Log in or register to post comments
म
मन्या ऽ Wed, 06/10/2020 - 15:00 नवीन
हे वाचून मनाची थोडी वाटल्या गेली आहे. ;) >>> अगदी अगदी! :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप
र
रातराणी गुरुवार, 06/11/2020 - 07:50 नवीन
:) :) :)
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार गुरुवार, 06/11/2020 - 08:46 नवीन
इडंबन आवडले पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी गुरुवार, 06/11/2020 - 09:21 नवीन
:)
  • Log in or register to post comments
क
कौस्तुभ भोसले Wed, 06/17/2020 - 12:43 नवीन
मस्त एकदम
  • Log in or register to post comments
व
वीणा३ Wed, 06/17/2020 - 22:37 नवीन
हाहा, मजेदार विडंबन :D. आत्ताच कटलेट, छोले-पुरी, गुलाबजाम, कोशिंबीर, चटणी, पुलाव, टोमॅटो सार खाऊन झाला, आईस्क्रीम राहिलंय, खाऊन येते, मग "वाटावी मनाची थोडी" वर विचार करेन ;)
  • Log in or register to post comments
ग
गणेशा गुरुवार, 06/25/2020 - 09:47 नवीन
:-)) :-)) :-)) आणि सर्वांचे आभार..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वीणा३
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 06/25/2020 - 10:01 नवीन
तुझ्या त्या फोटोच्यापाशी थांब तू यडे जराशी
Image removed.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा