Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कशास मग ते मोठे व्हावे?

म — मनोज, गुरुवार, 06/11/2020 - 07:31
आव नको की ठाव नको जड टोपण नाव नको सरड्या सारखे असुदे जीवन कुंपणापर्यंतही धाव नको उगीच तुम्ही मोठे व्हा मोठे होणे जपत रहा पडला का कुठे डाग नीट ते शोधून पहा पाषाणातून देव नको टाकीचे मग घाव नको चार चौघात फिरताना मिळणारा तो भाव नको मंदिराचा कळस मोठा देवा सारखा मान खरा नको अलिप्त मोठेपणा मी पायरीचा दगड बरा नको रेशमी वस्त्र भरजरी समारंभात घालायला असुदे मी रूमाल सुती जखमेवरती बांधायला का अथांग सागर व्हावे खारटपणाचे दोष घ्यावे होऊन मी इवलासा झरा तहानलेल्यास घोट द्यावे कशास मग ते मोठे व्हावे? आतून आतून रिक्त रहावे भले वाटते छोटे व्हावे गरजे साठी धावूनी यावे

प्रतिक्रिया द्या
6913 वाचन

💬 प्रतिसाद (18)
र
रातराणी गुरुवार, 06/11/2020 - 07:37 नवीन
सुरेख!!
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप गुरुवार, 06/11/2020 - 08:14 नवीन
मस्त लिहिलेय. आवडले. सं - दी - प
  • Log in or register to post comments
म
मूकवाचक गुरुवार, 06/11/2020 - 09:26 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप
ज
ज्ञानोबाचे पैजार गुरुवार, 06/11/2020 - 08:27 नवीन
जबरदस्त द्वैअर्थी कविता, जितके सोज्वळ शब्द आहेत तेवढीच चावटही आहे. (अर्थात कोणता अर्थ घेउन वेंजॉय करायची हे वाचकाच्या दृष्टीकोनावर अवलंबुन आहे) जिओ लैच आवडल्या गेली आहे. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस गुरुवार, 06/11/2020 - 08:47 नवीन
=)) अगदी अगदी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
प
प्रसाद गोडबोले गुरुवार, 06/11/2020 - 13:32 नवीन
कविता सुंदर आहेच शंकाच नाही का अथांग सागर व्हावे खारटपणाचे दोष घ्यावे होऊन मी इवलासा झरा तहानलेल्यास घोट द्यावे >>> =))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
म
मनोज Sat, 06/13/2020 - 08:58 नवीन
आपल्या प्रतिक्रिये मुळे आणखी लिखाण करण्यास प्रेरणा मिळेल. धन्यवाद !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 06/11/2020 - 09:13 नवीन
आवडली कविता. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देर्देकर गुरुवार, 06/11/2020 - 09:22 नवीन
मस्त आवड्ली.
  • Log in or register to post comments
ग
गोंधळी गुरुवार, 06/11/2020 - 11:49 नवीन
+१
  • Log in or register to post comments
स
सस्नेह गुरुवार, 06/11/2020 - 12:43 नवीन
छान कविता !
  • Log in or register to post comments
ब
बबु गुरुवार, 06/11/2020 - 14:27 नवीन
जिव्हाळा जपणारी लव्हाळी कविता... मस्तच.
  • Log in or register to post comments
स
सत्यजित... गुरुवार, 06/11/2020 - 19:45 नवीन
छान! लिहीत रहा.
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया Fri, 06/12/2020 - 03:43 नवीन
आवडली कविता.
  • Log in or register to post comments
व
वीणा३ Fri, 06/12/2020 - 17:31 नवीन
सुंदर अर्थपूर्ण कविता !!!
  • Log in or register to post comments
म
मनोज Sat, 06/13/2020 - 08:59 नवीन
सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद
  • Log in or register to post comments
न
नावातकायआहे Sat, 06/13/2020 - 11:39 नवीन
आवडली कविता! लिहित रहा!
  • Log in or register to post comments
र
रुपी Sat, 06/13/2020 - 18:13 नवीन
सुरेख!
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा