Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

तुकोबांचे निवडक अभंग

प
प्रसाद गोडबोले
Fri, 06/12/2020 - 15:53
💬 97 प्रतिसाद
|| पांडुरंग पांडुरंग || तुकोबा ग्रेट म्हणजे ग्रेट होते राव ! तुकोबांचे अभंग इतके साध्या सोप्प्या भाषेत मनातलं बोलुन जातात कि आपल्याला अजुन जास्त भारी बोलताच येत नाही. आणि हे इतके सोप्पे असल्याने ते कधीही कुठेही आठवतात ! ह्या इंटरनेटने अन गुगल ने शोधाशोध करायची अफलातुन सोय करुन दिली असल्याने अभंगातील एखादा चरण किंव्वा धृवपद जरी आठवत असेल तरी अख्खा अभंग शोधता येतो . नाहीतर हार्ड कॉपी उघडुन पहाण्यचा योगच आला नसता ! संपुर्ण तुकाराम गाथा विकिसोर्स वर ज्याने उपलब्ध करुन दिलीये त्याचे आभार मानावेत तितके थोडे आहेत ! संपुर्ण श्रीतुकाराम गाथा : https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE_%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A5%E0%A4%BE आता जसे आठवत जातील तसे अभंग खालील प्रतिसादात लिहुन ठेवता येतील ! ---- आपल्याला थोडाजरी नीरक्षीरविवेक असेल ना कि मग ते वाईटातुनही चांगलं सापडत जातं आपोआप. मिपावरील काही प्रतिसाद पाहताना संत तुकाराम चित्रपटात (म्हणजे आपल्या विष्णुपंत पागनीसबुवांच्या सात्विक चित्रपटात हं), वापरलेला अभंग अचानक मनात डोकवुन गेला - अहं म्हणे ब्रह्म | नेणे भक्तीचे ते वर्म | तुका म्हणे क्षण | नको तयाचे दर्शन || मग थोडीशी शोधाशोध केल्यावर संपुर्ण अभंग सापडला , अन त्यासारखाच अजुन एक अभंगही सापडला ! 2114 विठ्ठल मुक्तीदाता । नव्हे मरो हें बोलता ॥1॥ मज न साहावें कानीं । विष उत्तर लागे मनीं ॥ध्रु.॥ हरीकथेतें धीकारी । शत्रु माझा तो वैरी ॥2॥ सुना काळतोंडा । जो या देवा ह्मणे धोंडा॥3॥ अहं ह्मणे ब्रह्म । नेणे भक्तीचें तें वर्म ॥4॥ तुका ह्मणे क्षण। नको तयाचें दर्शन ॥5॥ 2117 वाचे विठ्ठल नाहीं । तो चि प्रेतरूप पाहीं ॥1॥ धिग त्याचें ज्यालेपण । भार न साहे मेदिनी ॥ध्रु.॥ न बैसे कीर्तनीं । गुण नाइके जो कानीं ॥2॥ जातां कांटाळे देउळा । तो चि सुना मुखकाळा ॥3॥ हरिभक्तिविण । त्याचें जळो शाहाणपण ॥4॥ तुका ह्मणे तेणें । वंशा आणियेलें उणें ॥5॥ अवांतर : १. विकिसोर्स वरील गाथेत अनेक प्रिंटिंग मिस्टेक्स आहेत विशेष करुन जोडाक्षरे बहुतांश ठिकाणी गंडली आहेत , पण आपल्याला त्याने काय फरक पडतो , आपल्याला अर्थाशी घेणेदेणे आहे ! २. इथे कोणालाही काहीही पटवुन द्यायचे नाहीये की समजाऊन सांगायचे नाहीये. अभंग स्वतःच्याच रेफरन्स साठी काढुन ठेवलेले आहेत ! हे सारं स्वान्तःसुखाय आहे :) || पांडुरंग पांडुरंग||

प्रतिक्रिया द्या
132819 वाचन

💬 प्रतिसाद (97)
ग
गॉडजिला Tue, 08/17/2021 - 19:13 नवीन
तुमचा श्रध्दांची मस्करी करण्यासाठी खोटे नाटे लिहिलेले आहे हे त्यांनी कबुल करुनही तुम्ही त्या लेखनात चांगले तेच शोधता
मी श्रध्दांची मस्करी करण्यासाठी खोटे नाटे लिहिलेले नाही. मी फक्त खोटेनाटे श्रध्देने लिहुन कोणीही श्रध्दावान लोक त्याचे बळी ठरु शकतात इतकेच प्रतिपादीत केले आहे.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Wed, 08/18/2021 - 03:55 नवीन
तुम्ही प्रामाणिक आहात हे मागेच बोललो आहे. तुम्ही पोलीसासारखे काम करत आहात हेही बोललोय.
मी श्रध्दांची मस्करी करण्यासाठी खोटे नाटे लिहिलेले नाही.
त्यामुळे सहमत आहे.
मी फक्त खोटेनाटे श्रध्देने लिहुन कोणीही श्रध्दावान लोक त्याचे बळी ठरु शकतात इतकेच प्रतिपादीत केले आहे
हे पोलीसांचे कामच आहे. एखादा माणूस चांगला आहे याची खात्री पटेपर्यंत त्याला चोर समजायचे असते, ही पोलीसांची पध्दत असते. तेही बरोबर आहे. पण प्रामाणिक पोलीस एखादा माणूस चांगला आहे हे कळल्यावर त्या माणसाप्रतीचे वर्तन आमूलाग्र बदलतो. असो. जास्ती लिहीत नाही. कारण मलाच विषय वाढवण्यात रस नाही. माझी श्रध्दा कुणी दुखवू शकेल, असे आता मलाच वाटत नाही. _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॉडजिला
ग
गॉडजिला Wed, 08/18/2021 - 04:39 नवीन
असे स्वतापुरते मर्यादीत रहाय्चे प्रतिसाद कुचकामी नसले तरी उपयोगी देखिल नाहीत. असो, मराठीत सांगायचे तर मला कोणाचीच श्रध्दा बदलवायची नाहीये... मि फक्त भामट्यांच्या कार्यपध्दतीवर प्रकाश टाकला आहे. एखाद्याची श्रध्दा समुळ भेदणे हा डाव्या हातचा मळ आहे, म्हणुनच मी ते लिलया पुन्हा पुन्हा केलेही असते. पण त्यातुन साध्य काय ? श्रध्दा नाहीसी झाल्याने एखादा सुखि होइल का ? या प्रश्नाचे उत्तर माझ्याजवळ नाही म्हणुन ओशो सारख्यांचा तो उद्योग मी निरुद्योगासमान मानतो. इथे मि फक्त भामट्यांच्या कार्यपध्दतीवर प्रकाश टाकला आहे.
प्रामाणिक पोलीस एखादा माणूस चांगला आहे हे कळल्यावर त्या माणसाप्रतीचे वर्तन आमूलाग्र बदलतो. असो.
प्रमाणिक पोलीस मी नाही. मी तर प्रवृत्तिने पोलीसही नाही. मी एक भामटा आहे. माझे सर्वात जास्त वापरलेले गेलेले कौशल्य कोणते तर भामटेगीरी. अन्यथा माझे रोजगाराचे वांदे झाले असते... भामटेगीरी केलि नाही तेंव्हा मी बेरोजगारी अनुभवली आहेच. मग म्हटल आता हेच करायचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत
श
शाम भागवत Wed, 08/18/2021 - 04:52 नवीन
मी तुमच्या मूळ प्रवृत्ती बद्दल बोललो. बाकी तुम्ही कसे आहात, काय करता त्याबाबत पास.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॉडजिला
प
प्रसाद गोडबोले Wed, 08/18/2021 - 06:01 नवीन
शाम जी, कदाचित तुम्हाला ह्या गॉडजिला ने चालवलेल्या प्रकाराबद्दल , म्हणजे खोटे बोलणे , थापा मारणे , पोलिसगिरी वगैरे वगैरे वितंडवादामागील संदर्भ माहीत नसावा म्हणुन इथे देऊन ठेवतो : माझ्या एका लेखात मी म्हणालो होतो की : भारतातील हिंदु समाजा मध्ये ढोबळमानाने दोन गट आहेत , एक ज्यांना २५०० -३००० वर्षांचा दैदिप्यमान इतिहास आहे, ज्यात साहित्य आहे संगीत आहे कला आहे तत्वज्ञान आहे उपनिषदे आहेत आनंद आहे ८०० १००० वर्षांचा अस्तित्वाचा संघर्ष आहे आणि त्या संघर्षात टिकुन उरलेले तावुन सुलाखुन निघालेले साहित्य आहे ! आणि दुसरा गट आहे की ज्यांच्यासाठी इतिहास म्हणजे केवळ शोषणाचा इतिहास आहे. अन नजिकचा २०० वर्षाचा इतिहास आहे ज्यात पाश्चिमात्य तत्वज्ञानाशी ओळख झालेली आहे अन नवीन निहिलिस्टिक विचारधारा पुन्हा उमगायला लागली आहे ! आता पहिल्या गटाला दुसर्‍याच्या आनंदाच्या व्याख्या कळणार नाहीत अन दुसर्‍याला पहिल्याचा कळणार नाहीत ! न कळो बापडे, आपण आधीच म्हणालो तसे - आनंद ही फार व्यक्तीसापेक्ष संकल्पना आहे ! आणि नंतर माझ्या जे लक्षात आलं की गॉडजिला हे गट क्रमांक २ मधील आहेत ते मी त्यांच्या निदर्शानास आणुन दिले. त्याचा त्यांनी राग धरलाय, तेव्हा पासुन माझ्या प्रत्येक लिखाणावर जाऊन असंबध्द प्रतिसाद देत असतात ! असो. आपल्याला काय फरक पडतो! बाकी गट क्रमांक २ मध्ये असण्यात वाईट काय , त्याने इतका राग का यावा हे मला अजुन तरी कळलेले नाही. असो. सत्य आह्मां मनीं । नव्हों गाबाळाचे धनी ॥1॥ ऐसें जाणा रे सकळ । भरा शुद्ध टांका मळ ॥ध्रु.॥ देतों तीक्ष्ण उत्तरें । पुढें व्हावयासी बरें ॥2॥ तुका ह्मणे बरें घडे । देशोदेशीं चाले कोडें॥3॥
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत
B
Bhakti Wed, 08/18/2021 - 06:58 नवीन
आनंद ही फार व्यक्तीसापेक्ष संकल्पना आहे ! बरोबर माऊली एवढं लक्षात ठेवलं की माणूस माणसात येतो आणि समाज म्हणून एवढे कळायलाच पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
ग
गॉडजिला Wed, 08/18/2021 - 07:13 नवीन
आनंद ही फार व्यक्तीसापेक्ष संकल्पना आहे
आजिबात नाही. आनंद ही पुर्णपणे समान अवस्था असते... मार्ग व्यक्तीसापेक्ष असु शकतात...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Bhakti
B
Bhakti Wed, 08/18/2021 - 08:38 नवीन
हा हा ३ इडियटमधला रांचो आठवला :) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॉडजिला
स
सोत्रि Wed, 09/08/2021 - 08:41 नवीन
आनंद ही पुर्णपणे समान अवस्था असते... मार्ग व्यक्तीसापेक्ष असु शकतात...
सहमत! - (मुमुक्षू) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॉडजिला
ग
गॉडजिला Wed, 08/18/2021 - 06:58 नवीन
आपल्याला न दिलेल्या प्रतिसादांवरही आपण वरील गैर्समज मनात धरुन अधुन मधुन परफेक्ट दोन, २ असे रिप्लाय मला दिले आहेत. मी तर आपल्याशी काय बोलणे झाले हे विसरुन गेल्याने पुन्हा पुन्हा २ म्हण्जे काय आपला प्रतिसाद समजला नाही जरा विस्तारुन लिहता का असे विनवले आहे, त्यांमुळे विनाकारण असंब्ध्दता जि आपण विवीध ठिकाणी घुसडलीत याला मी न्हवे तुमची कोती मानसिकता कारणीभुत आहे याची नोंद घ्यावी. बाकी तुम्हाला हवा तो गैर्समज बाळगायला तुम्ही मुक्त आहात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
श
शाम भागवत Wed, 08/18/2021 - 06:58 नवीन
मी तुम्हा दोघांचे सर्व संवाद शांतपणे वाचलेले आहेत. पण कोणाचे विचार बदलायचे हे माझे उद्दिष्ट नसल्याने किंवा जो कोणी मार्ग अनुसरत आहे त्याला एखादा पर्याय सुचवायचा माझा कोणताही प्रयत्न नसतो. मी फक्त माझ्या अनुभवातून जे शिकत आहे ते मांडण्यासारखे असल्यास व कोणालात॑री उपयोग होईल असे वाटल्यास मांडतो. थोडक्यात, माझा संतावर विश्वास आहे. निहिलिस्टिक वगैरे विचार तुकारामांच्या किंवा ज्ञानेश्वरांवरांच्या विचारावर मात करतील असे मला वाटत नाही. त्यामुळे माझा पास. मला वाचनाचे अनोनात वेड. त्यातून अध्यात्मिक वाचनाची पण गोडी लागली. पण १९९४ साली मला सत्गुरूंनी अध्यात्मिक वाचनाची बंदी केली व नामस्मरणावर भर द्यायला सांगितला. त्यानंतर आजतागायत मी अध्यात्मिक काहीही वाचत नाही. वाचनाने माहितीचा साठा वाढतो हे आता अनुभवाने कळले आहे. तर ज्ञान आतच असते त्यामुळे बाहेरून काहीही मिळवायचे नसते व मिळतही नाही हेही चांगलेच कळले आहे. हे आतील ज्ञान नामस्मरणाने खुले होते असा अनुभव असल्याने ती वाटचाल चालू ठेवली आहे. अपवाद फक्त २००७-२००८ मधला दीड वर्षांचा कालावधी. ज्या कालावधीत मी जिवनविद्या तत्वज्ञानाचा अभ्यास करायला सांगितला म्हणून केला. त्याबाबतचा उल्लेख मी अप्रिय आठवणींपासून सुटका मधे केला होता. त्यावेळेस लिहावेसे वाटत होते म्हणून लिहिले. पण शुभचिंतना ऐवजी समोर पहा किंवा गांजा ओठा वगैरे पर्याय पुढे यायला लागल्यावर टंकाळा यायला लागला. खरे तर दुसर्‍या भागात, आपल्या स्मृतीवरील मी व माझे याचे ओझे कमी झाले की विचार कसे सुसंगत होतात हे लिहिणार होतो. इतकेच नव्हे तर आपले विचार किती आमुलाग्र बदलात हे माझ्याच अनुभवावरून तिसर्‍या भागात लिहिणार होतो. पण थांबायचे ठरवले. असो. प्रतिसाद धाग्याशी संबंधीत असावा व तो माझ्या अनुभवाशी प्रत्यक्ष वागण्याशीही संबंधीत असावा म्हणून तुकोबांचा एक अभंग देऊन माझा सहभाग थांबावायचा विचार आहे. वाचन थांबवूनही मला माझी प्रगती होत आहे असे वाटते याचे कारण मला वाटते तुकोबांचा हा खालील अभंग आहे. न कळे ते कळो येईल उगले | नामे या विठ्ठले एकाचिया || न दिसे ते दिसो येईल उगले | नामे या विठ्ठले एकाचिया || न बोलो ते बोलो येईल उगले | नामे या विठ्ठले एकाचिया || न भेटे ते भेटो येईल आपण | करिता चिंतन विठोबाचे || अलभ्य तो लाभ होईल अपार | नाम निरंतर म्हणता वाचे || तुका म्हणे आसक्त जीव सर्वभावे | तरतील नावे विठोबाच्या || 🙏
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
ग
गॉडजिला Wed, 08/18/2021 - 07:05 नवीन
माझा संतावर विश्वास आहे. निहिलिस्टिक वगैरे विचार तुकारामांच्या किंवा ज्ञानेश्वरांवरांच्या विचारावर मात करतील असे मला वाटत नाही. त्यामुळे माझा पास
जेब्ब्बात भागवत जी... पण यावर भामटे मात करत आलेत व राहतील. आपण शक्य तेव्हडे भामटे ओळखायचे व त्यांच्या बोलबच्चन पासुन इतरांच्या मनात विष कालवायच्या प्रवृत्तीपासुन स्वताला वाचवायचे इतकेच काय ते आपल्या हातात आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत
श
शाम भागवत Wed, 09/08/2021 - 07:25 नवीन
साधना करत राहिले ना आणि आपल्या यशाचे श्रेय त्या भगवंताला देत राहिले ना की ते आपोआप होते. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॉडजिला
श
शाम भागवत Wed, 09/08/2021 - 07:21 नवीन
न कळे ते कळो येईल उगले | नामे या विठ्ठले एकाचिया || न दिसे ते दिसो येईल उगले | नामे या विठ्ठले एकाचिया || न बोलो ते बोलो येईल उगले | नामे या विठ्ठले एकाचिया || न भेटे ते भेटो येईल आपण | करिता चिंतन विठोबाचे || अलभ्य तो लाभ होईल अपार | नाम निरंतर म्हणता वाचे || तुका म्हणे आसक्त जीव सर्वभावे | तरतील नावे विठोबाच्या ||
यावर बाबा बेलसरेंनी सुंदर निरूपण येथे केले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत
प
प्रसाद गोडबोले Fri, 09/10/2021 - 07:15 नवीन
यावर बाबा बेलसरेंनी सुंदर निरूपण येथे केले आहे.
नक्की ऐकतो. बेलसरे सरांचा खुप मोठ्ठा फॅन आहे मी ! त्यांची संवाद शैली अफलातुन आहे ! इतक्या सोप्प्या भाषेत सांगणारे अजुन कोणीच मला माहीत नाही , एक गोंदवलेकर महाराज आहेत पण बेलसरे सर आणि गोंदवलेकर महाराज्यांच्यात अद्वैत झालेले दिसते , बेलसरे सरांच्या मुखातुन खुद्द महाराजच बोलत आहेत असे वाटते ! ह्यांना प्रत्यक्ष भेटायचा योग यायला पाहिजे होता ! आजच आलोय सातार्‍यात, आता गोंदवल्याला एकदा जाऊन हे महाराजांना सांगुन येतो !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत
श
शाम भागवत Fri, 09/10/2021 - 11:50 नवीन
🙏 पण मंदीरं बंद असतील ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
B
Bhakti Wed, 08/18/2021 - 05:35 नवीन
शांती घ्या गोजिरा शांती घ्या. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॉडजिला
ग
गॉडजिला Wed, 08/18/2021 - 07:02 नवीन
आमचे बंधु मार्कस मात्र आमचेबाबत विनाकाराण आकस जाहिर करत फिरत असतात, नक्कि ते का चिडतात ते त्यांना समजले तरी माझ्यासाठी आनंदाचा दिनु असेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Bhakti
प
प्रसाद गोडबोले Wed, 08/18/2021 - 07:34 नवीन
कसला आलाय आकस =)))) तुमचा एकही प्रतिसाद उपयोगाचा नाहीये . तुम्ही तुम्हाला आवडलेला एकही तुकोबांचा अभंग दिलेला नाहीये . केवळ खोटे बोलणे , थापा मारणे , पोलीसगीरी , भामटेगिरी वगैरे असंबध्द बरळत आहात . तुम्ही म्हणजे अगदीच गट क्रमांक २ मधील असल्याचे सारखे सारखे दाखवुन देता बुवा ! बाकी आपण धाग्याचे वर्गीकरण पाहिले तर ते " काथ्याकुट" असे नसुन "लेख" / "जनातलं मनातलं" असे आहे. त्यामुळे तुम्ही तुकोबांचे तुमचे आवडते अभंग , त्यातुन तुम्हाला उमगलेला अर्थ दिलात तर आनंद होईल , बाकी सगळे असंबध्द प्रतिसाद "पोलिसगिरी अन भामटेगिरी " वगैरे वगैरे वितंडवाद प्रतिसाद कचरा काहीही उपयोगाचा नाही. सदर प्रतिसाद हटावले जावेत अशी मी संपादकांना विनंतीही केलेली आहे, पण बहुतेक ते सध्या सुट्टीवर असावेत तस्मात ह्या कोपर्‍यात लावलेल्या ज्ञाबोबा तुकोबांच्या फोटोवर जळमटे जमली आहेत ! योग्यवेळी निरथक २ नंबरी प्रतिसादांचा कचरा हटवला जाईल असा माझा ठाम विश्वास आहे ! नाही गेला तरी हरकत नाही , तुका म्हणे उगी रहावे | जे जे होईल ते ते पहावे || =)))) _____________/\____________
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॉडजिला
ग
गॉडजिला Wed, 08/18/2021 - 07:41 नवीन
=)))) हे बघुन आनंद वाटला आपले ख्या ख्या ख्या फार मिस करत होतो प्रतिसादात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
ग
गॉडजिला Wed, 08/18/2021 - 07:38 नवीन
तसे आमचे बंधु मार्कस भौ फार सैरभैर झाल्यासारखे लिखीत होत आहेत असे वाटते त्यांनी बहुतेक माझा डेमो फार वैयक्तीक घेतलेला दिस्तो. खरे तर त्यांना प्रतिसादही दिलेला न्हवता, भामट्यांना भामटे म्हटल्याने त्यांना नेमके कुठे त्रास झाला समजले तर औषध तरी काय द्यावे याचा विचार करता आला असता पण सध्या ते त्यांची जखम दाखवायच्या मनस्थितीतही दिसत नाहीत.. ते लवकर शांत होवो व मला त्यांच्या जखमेवर मलम लावुन त्यांची वेदनामुक्ती करायचे सदभाग्य लाभो हीच कालीमातेच्या चरणी माझी प्रार्थना आहे... त्यांना यत्र तत्र सर्वत्र प्रतिसादात (जे त्यांना दुरुनही दिलेले नाहीत) तिथे मिच दिसत आहे हे भाग्य म्हणावे की दुर्दैव की त्यांचा केमिकल लोच्या हे कोडे ते बरे झाल्याखेरीज सुटेल असे मला आता वाटत नाही. मार्कस माय ब्रदर from another mother गेट वेल सुन भाउ. काळजी भासु लागली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॉडजिला
ग
गॉडजिला Wed, 08/18/2021 - 07:52 नवीन
सदर प्रतिसाद हटावले जावेत अशी मी संपादकांना विनंतीही केलेली आहे, पण बहुतेक ते सध्या सुट्टीवर असावेत तस्मात ह्या कोपर्‍यात लावलेल्या ज्ञाबोबा तुकोबांच्या फोटोवर जळमटे जमली आहेत ! योग्यवेळी निरथक २ नंबरी प्रतिसादांचा कचरा हटवला जाईल असा माझा ठाम विश्वास आहे !
मला शक्य असतं तर माझ्या हाताने हे पुण्यकर्म केले असते... तुर्तास माझे प्रतिसाद हटवण्यास अनुमोद्न आहे अशी निसंधिग्द खात्री बाळगावी. आमचे बंधुंच्या आनंदासाठी अधिकारी व्यक्तीनी त्यांची विनंती तत्काळ अमलात आणावी... फक्त आम्हाल २ म्हनायचा उद्योग आपण केलाच आहे त्याच्या वरताण परत २-१ करुन आम्हाला पुन्हा १ च्या जवळ न्यायचा जो जावइ बाणा आपण दाखवलात तो ऐतिहासीक आहे हे नक्कि. पण गड्या आम्हाला पर्फेक्ट दोन मधेच राहुद्या ही विनंती वर केली होतीच ती विसरला असाल तर पुन्हा एकदा ती विनंती हात जोडुन हा सेवक आपल्याला करतो आहे_/\_
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Wed, 08/18/2021 - 08:25 नवीन
मार्कस ऑरेलियसजी मी या ध्याग्यावर चुकलोच तुम्हाला समजूनच घेतलं नाही मी. माझ्या सारखा करंटा मीच हेचं काय अंतिम सत्य बाकि सर्व झूठ... दादा मी स्वतःला भामटा बनवल्याने तूझ्या मनाला इतक्या यातना होतील याची मला जराशीही कल्पना न्हवती रे, आपण माझ्यावर इतके प्रेम करता की मी स्वतःला भामटा बनवल्यांने तुम्हाला असह्य त्रास होहून माझे प्रतिसाद तूम्ही संपादकाकडून उडवून लावायला गेलात ? तुमचे निर्मळ मन, निर्व्याज प्रेम बघून माझे अंतकरण गलबलून गेले आहे. तुकोबा आपण वाचले आहात आसे न्हवे तर अनुभवत आहात असेच आता राहून राहून म्हणावेसे वाटते.... चल बस कर पागले अब रुलायेगा क्या ? (झालं गेलं विसरून जाऊ एक नवी सुरुवात करु असे वाचावे) मेरे सारे प्रतिसाद इस धागेसे तत्काल उडा दिये जाय अशी माझी मनापासून हातजोडून विनंती आहे... माझ्या बंधूंच्या दुख्खास मी कारणीभूत झालो, आता मी तीर्थयात्रा करेन तेंव्हाच या पापातून मुक्त होईन अशी प्रतिज्ञा मी समस्त मिपाकरांच्यासाक्षीने करत आहे...
  • Log in or register to post comments
B
Bhakti Wed, 08/18/2021 - 09:05 नवीन
हा हा इथे चतुर आठवला. (माझेपण प्रतिसाद उडवा हो :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॉडजिला
र
राघव Wed, 08/18/2021 - 10:16 नवीन
बापरे.. काय ती चर्चा. :-) पण त्यानिमित्तानं आणिक काही खटांसि खट असे तुकोबांचे अभंग वाचायला मिळालेत! असो. जगात भामटे असणारच आणि त्याला माझ्यासारखे सामान्यजन बळीही पडणारच. अहो साक्षात ठाकुरांनाही ते चुकलेले नाही, त्यात माझ्यासारख्यांची काय हो कथा! पण एके ठिकाणी ठाकुरच स्वतः सांगतात, "ब्रह्म अजून उष्टे झालेले नाही". म्हणजे कुणालाही त्याचे शब्दांत वर्णनच करता आलेले नाही. ते अक्षरशः अवर्णनीय आहे! आता कुणी भामटा या तत्वाबद्दल काही बोलायला जाईल सुद्धा, तर काय बोलेल? जे काही त्याबद्दल थोरामोठ्यांनी लिहिलंय/सांगीतलंय तेच ना? मग त्यानं विशेष अपाय होत नाही. अपाय तेव्हा होईल जेव्हा तो विरुद्ध मत व्यक्त करेल आणि तेदेखील पटण्यायोग्य असेल. दोन्ही बाजू बरोबर वाटून गोंधळ उडून, बुद्धीभेद होईल/होऊ शकेल. अशावेळेस आपण विश्वास कुणावर ठेवायचा हा प्रश्न येतो. विश्वास डळमळला की भक्तीमार्गात पुढे जाणेच अशक्य. इथं बुद्धीभेद करणार्‍याचा दोष कमी असून बुद्धीभेद करून घेणार्‍याचा दोष जास्त आहे! असो. बाकी, कसोटीचा प्रसंग आल्यावर आपला विश्वास किती दृढ आहे ते आपले आपल्याला जाणवतेच. त्यामुळे ज्याने त्याने आपापली पायरी ओळखावी आणि वृत्ती अंतर्मुख ठेवून आपल्यातले दोष बाजूला करण्यास वेळ द्यावा हे ईष्ट. इत्यलम्
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Sat, 08/21/2021 - 07:38 नवीन
आपले संत नक्की संत कसे झाले, ने नक्की काय वाचन करत होते ह्या विषयी फार म्हणजे फार कमी माहीती उपलब्ध्द आहे. तरी समर्थांनी दासबोधात लिस्ट देऊन ठेवली आहे संदर्भ ग्रंथांची पण बाकी अन्य संत काय वाचत होते ह्या विषयी काहीच माहीती नाही . (कदाचित आपला अभ्यास कमी आहे.) आज एक तुकोबांचा अभंग सापडला अन त्यावरुन असे वाटले की तुकोबांनी अमृतानुभव वाचला असावा . ( अर्थात हा एक अंदाज आहे , कोणतेही लेखन न वाचता समान अनुभव येणे हे अध्यात्माचा क्षेत्रात काही विशेष बाब नाही !) तुकाराम गाथा - ५८१ गोडीपणें जैसा गुळ । तैसा देव जाला सकळ ॥१॥ आतां भजों कवणे परी । देव सबाह्य अंतरीं ॥ध्रु.॥ उदका वेगळा । नव्हे तरंग निराळा ॥२॥ हेम अळंकारा नामीं । तुका म्हणे तैसे आम्ही ॥३॥ अमृतानुभव : गोडी आणि गुळु । कापुरु आणि परिमळु । निवडूं जातां पांगुळु । निवाडु होये ॥ १-२३ ॥ नाना कापुरु आणि परिमळु । कापुरचि केवळु । गोडी आणि गुळु । गुळुचि जेवीं ॥ २-६३ ॥ जळ तरंगीं दोहीं । जळावांचूनि नाहीं । म्हणौनि आन कांहीं । नाहीं ना नोहे ॥ ७-२३७ ॥ नाग मुदी कंकण । त्रिलिंगीं भेदली खूण । घेतां तरी सुवर्ण । घेईजे कीं ॥ ९-१२ ॥ म्हणोनि भजतां भजावें । मा न भजतां कय नव्हे ? । ऐसें नाहीं स्वभावें । श्रीशिवुचि असे ॥ ९-४९ ॥ || पांडुरंग पांडुरंग ||
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Sat, 08/21/2021 - 16:55 नवीन
असे वाटले की तुकोबांनी अमृतानुभव वाचला असावा
अमृतानुभव सुरेखच आहे. आपलं फेवरीट आहे.
कोणतेही लेखन न वाचता समान अनुभव येणे हे अध्यात्माचा क्षेत्रात काही विशेष बाब नाही
+१ नक्कीच. मला स्वतःला संत संत का बनतात याचे विशेश कुतुहल आहे कारण समान जीवनपध्दत विचारधारा राखूनही प्रत्येकजण संत बनत नाही... अर्थात अध्यात्मात त्याचे उत्तर पूर्वसुकृत असे आहेच पण त्याचा कसलाही पडताळा घेणे शक्य होत नाही त्यामूळे प्रश्न अनुभवाच्या कसोटीवर अनुत्तरीत राहतो आणि श्रध्दा कसोटीची मागणी करत नाही. म्हणून प्रश्नच निर्माण होत नाही त्यामुळं कुतुहल अजून जिवंत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रसाद गोडबोले Mon, 09/06/2021 - 12:39 नवीन
भुंकती तीं द्यावीं भुंकों । आपण त्यांचें नये शिकों ॥१॥ भाविकांनीं दुर्जनाचें । मानूं नये कांहीं साचें ॥ध्रु.॥ होइल तैसें बळ । फजीत करावे ते खळ ॥२॥ तुका म्हणे त्यांचें । पाप नाहीं ताडणाचें ॥३॥
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Tue, 09/07/2021 - 04:42 नवीन
हीच मानसिकता राखली म्हणूनच आज शांततावादी डोक्यावर बसले :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
र
राघव Wed, 09/08/2021 - 06:53 नवीन
हे सांगण्याचे तुकोबारायांचे काय कारण असावे? दुसर्‍या एका अभंगात ".. नाठाळाचे माथी हाणू काठी" असेही ते म्हणतात. मग हे परस्पर विरोधी मत त्यांनी का बरे मांडले असेल? :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॉडजिला
ग
गॉडजिला Fri, 09/10/2021 - 11:52 नवीन
ऐसें कैसे झाले भोंदू। कर्म करुनि म्हणती साधू | अंगा लावुनि राख। डोळे झाकुनि करिती पाप। दावी वैराग्याची कळा। भोगी विषयांचा सोहळा। तुका म्हणे सांगो किती। जळो तयांची संगती।
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Wed, 09/22/2021 - 17:52 नवीन
मन करा रे प्रसन्न । सर्व सिद्धीचें कारण । मोक्ष अथवा बंधन । सुख समाधान इच्छा ते ॥१॥ मनें प्रतिमा स्थापिली । मनें मना पूजा केली । मनें इच्छा पुरविली । मन माउली सकळांची ॥ध्रु.॥ मन गुरू आणि शिष्य । करी आपुलें चि दास्य । प्रसन्न आपआपणास । गति अथवा अधोगति ॥२॥ साधक वाचक पंडित । श्रोते वक्ते ऐका मात । नाहीं नाहीं आनुदैवत । तुका म्हणे दुसरें ॥३॥
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Mon, 01/24/2022 - 19:40 नवीन
मेरे रामको नाम जो लेवे बारोंबार । त्याके पाऊं मेरे तनकी पैजार ॥ध्रु.॥ हांसत खेलत चालत बाट । खाणा खाते सोते खाट ॥1॥ जातनसुं मुजे कछु नहिं प्यार । असते की नही हेंदु धेड चंभार ॥2॥ ज्याका चित लगा मेरे रामको नाव । कहे तुका मेरा चित लगा त्याके पाव ॥3॥
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Sun, 02/16/2025 - 04:38 नवीन
काय वृंदावन मोहियेलें गुळें । काय जिरें काळें उपचारिलें ॥1॥ तैसी अधमाची जाती च अधम । उपदेश श्रम करावा तो ॥ध्रु.॥ न कळे विंचवासी कुरवाळीलें अंग । आपले ते रंग दावीतसे ॥2॥ तुका ह्मणे नये पाकासी दगड । शूकरासी गोड जैसी विष्ठा ॥3॥
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 02/16/2025 - 17:17 नवीन
हे आवडले... काही "होयबा" प्रतिसाद वाचले की हे पटते....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
च
चौथा कोनाडा Sun, 02/16/2025 - 09:10 नवीन
होऊनि संन्यासी भगवीं लुगडीं । वासना न सोडी विषयांची ॥1॥ निंदिती कदान्न इिच्छती देवान्न । पाहाताती मान आदराचा ॥2॥ तुका ह्मणे ऐसें दांभिक भजन । तया जनादऩन भेटे केवीं ॥3॥ -
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Fri, 02/21/2025 - 10:07 नवीन
देहभाव आह्मी राहिलों ठेवूनि । निवांत चरणीं विठोबाच्या ॥1॥ आमुच्या हिताचा जाणोनि उपाव । तो चि पुढें देव करीतसे ॥ध्रु.॥ ह्मणउनी नाहीं सुख दुःख मनीं । ऐकिलिया कानीं वचनाचें ॥2॥ जालों मी निःसंग निवांत एकला । भार त्या विठ्ठला घालूनियां ॥3॥ तुका ह्मणे जालों जयाचे अंकित । तो चि माझें हित सर्व जाणे ॥4॥
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Fri, 02/21/2025 - 10:39 नवीन
राम ह्मणतां राम चि होइजे । पदीं बैसोन पदवी घेइजे ॥1॥ ऐसें सुख वचनीं आहे । विश्वासें अनुभव पाहें ॥ध्रु.॥ रामरसाचिया चवी । आन रस रुचती केवीं ॥2॥ तुका ह्मणे चाखोनि सांगें । मज अनुभव आहे अंगें ॥3॥
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Fri, 02/21/2025 - 14:37 नवीन
जाला अंगें देव जो आपण । तयासी हे जन अवघे देव ॥१॥ येरांनीं सांगावी रेमट काहाणी । चित्ता रंजवणी करावया ॥ध्रु.॥ धाला आणिकांची नेणे तहान भूक । सुखें पाहें सुख आपुलिया ॥२॥ तुका म्हणे येथे पाहिजे अनुभव । शब्दाचे गौरव कामा नये ॥३॥
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 02/22/2025 - 09:21 नवीन
सहमत आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रसाद गोडबोले Sun, 02/23/2025 - 18:02 नवीन
वेदविहित तुह्मी आइका हो कर्में । बोलतों तीं वर्में संतांपुढे ॥1॥ चारी वर्ण जाले एकाचिये अंगीं । पापपुण्य भागीं विभागिलें ॥ध्रु.॥ प्रथम पाउलीं पावविला पंथ । आदि मध्य अंत भेद नाहीं ॥2॥ आंबे बोरी वड बाभुळा चंदन । गुणागुणें भिन्न अग्नि एक ॥3॥ तुका ह्मणे मन उन्मन जों होय । तोंवरि हे सोय विधि पाळीं ॥4॥
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 02/24/2025 - 02:48 नवीन
विशेषतः चारी वर्ण जाले एकाचिये अंगीं । आणि आंबे बोरी वड बाभुळा चंदन । गुणागुणें भिन्न अग्नि एक ॥3॥ ------
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Mon, 02/24/2025 - 14:08 नवीन
याति शूद्र वैश केला वेवसाव । आधी तो हा देव कुळपूज्य ॥१॥ नये बोलों परि पाळिलें वचन । केलियाचा प्रश्न तुह्मीं संतीं ॥ध्रु.॥ संवसारें जालों अतिदुःखें दुखी । मायबाप सेखीं कर्मलिया ॥२॥ दुष्काळें आटिलें द्रव्यें नेला मान । स्त्री एकी अन्न अन्न करितां मेली ॥३॥ लज्जा वाटे जीवा त्रासलों या दुःखें । वेवसाय देख तुटी येतां ॥४॥ देवाचें देऊळ होतें तें भंगलें । चित्तासी जें आलें करावेंसें ॥५॥ आरंभीं कीर्तन करीं एकादशी । नव्हतें अभ्यासीं चित्त आधीं ॥६॥ कांहीं पाठ केलीं संतांचीं उत्तरें। विश्वासें आदरें करोनियां ॥७॥ गाती पुढें त्यांचें धरावें धृपद । भावें चित्त शुद्ध करोनियां ॥८॥ संताचें सेविलें तीर्थ पायवणी । लाज नाहीं मनीं येऊं दिली ॥९॥ ठाकला तो कांहीं केला परउपकार । केलें हें शरीर कष्टवूनी ॥१०॥ वचन मानिलें नाहीं सुहृदांची । समूळ प्रपंचें वीट आला ॥११॥ सत्यअसत्यासी मन केलें ग्वाही । मानियेलें नाहीं बहुमतां ॥१२॥ मानियेला स्वप्नीं गुरूचा उपदेश । धरिला विश्वास दृढ नामी ॥१३॥ यावरि या जाली कवित्वाची स्फूर्ति । पाय धरिले चित्तीं विठोबाचे ॥१४॥ निषेधाचा कांहीं पडिला आघात । तेणें मध्यें चित्त दुखविलें ॥१५॥ बुडविल्या वह्या बैसलों धरणें । केलें नारायणें समाधान ॥१६॥ विस्तारीं सांगतां बहुत प्रकार । होईल उशीर आतां पुरे ॥१७॥ आतां आहे तैसा दिसतो विचार । पुढील प्रकार देव जाणे ॥१८॥ भक्ता नारायण नुपेक्षी सर्वथा । कृपावंत ऐसा कळों आलें ॥१९॥ तुका म्हणे माझें सर्व भांडवल । बोलविले बोल पांडुरंगें ॥२०॥
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Tue, 02/25/2025 - 19:29 नवीन
अवांतर : जनाबाईंचा एक अभंग वेदांतीं हें बोलिले । सिद्धांतीं हें नेमियेले ॥१॥ लागा लागा भक्तिवाटा । धरा हेंचि नेमनिष्‍ठा ॥२॥ वेदबाह्य तें कर्म । सांडीं, न करीं अधर्म ॥३॥ तोचि एक होय ज्ञानी । देवनिष्‍ठ म्हणे जनी ॥४॥
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Sat, 03/01/2025 - 07:23 नवीन
जन देव तरी पाया चि पडावे | त्याचिया स्वभावे चाड नाही ||१|| अग्नीचे सौजन्य शीतनिवारण | पालवी बांधोनि नेता नये ||२|| तुका म्हणे विंचु सर्प नारायण | वंदावे दुरोन शिवो नये ||३|| https://www.youtube.com/shorts/_XNegCENn2o राम !
  • Log in or register to post comments
N
nutanm Sat, 03/01/2025 - 21:52 नवीन
हेचि दान देगा देवा, तुझा विसर न वहावा८| तुझा विसर नवहावा याजसाठी केला अटटाहास शेवटचा दिस गोङ वहावा || माझा खूप आवडता व बरयापैकी कळलेला एकमेव अभनग, लाडकया तुकोबारायानचा. आपलयाला खूप जमिनीवर ठेवणारे सनत्सरेषठ.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले गुरुवार, 07/31/2025 - 15:00 नवीन
नाम दुसी त्याचें नको दर्शन । विष तें वचन वाटे मज ॥1॥ अमंगळ वाणी नाइकवे कानीं । निंदेची पोहोणी उठे तेथें॥ध्रु.॥ काय लभ्य त्याचिये वचनीं । कोणत्या पुराणीं दिली ग्वाही ॥2॥ काय आड लावूं त्याचिया तोंडासी । आतां या जिभेसी काय करूं ॥3॥ तुका ह्मणे संत न मनिती त्यांस । घेऊं पाहे ग्रास यमदूत ॥4॥
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा