Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

(धागा धागा.....)

अ — अनन्त्_यात्री, Fri, 06/12/2020 - 17:31
धागा धागा पिंजत बसुया प्रतिसादांची चळत रचूया अक्षांशाचे अयनांशांशी बादरायणी सूत जुळवूया धागा विषया फोडुनी फाटे भरकटवुनी तो मजा बघूया अध्यात्माच्या मागावरती शब्दछलाचे तंतू टाकूया वस्त्र विणूया भरडे तरिही महावस्त्र त्यालाच म्हणूया पडलो तोंडावरती तरीही "जितं मया"चा घोष करूया धागा धागा पिंजत बसुया... (नंब्र विनंती: धागाभरकटतज्ञांनी कृ.ह.घे.) (प्रेर्ना: कवी पी. सावळाराम यांचे गीत " धागा धागा अखंड विणूया)

प्रतिक्रिया द्या
4570 वाचन

💬 प्रतिसाद (6)
ग
गणेशा Fri, 06/12/2020 - 17:46 नवीन
धागा धागा पिंजत बसुया.
:-)) :-))
  • Log in or register to post comments
व
वीणा३ Fri, 06/12/2020 - 17:58 नवीन
:)) :)) :)) :)) :)) :)) :)) :))
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Sat, 06/13/2020 - 05:07 नवीन
झकास एकदम झकास पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Sat, 06/13/2020 - 08:54 नवीन
धागा धागा अखंड काढू या भक्तीभोळ्यांचे कंपू करुया । चमत्कारांचे अंधश्रद्धांचे, बाळबोध बालामृत पिऊया अधांतरी फेकंफाक करोनी डोळे मिटूनी नाम घेऊ या । भक्तीरसाच्या उकळीवरती उगीच मोठी नांवे तळूया वस्त्रहरण होऊ दे कितीही भंपकपणाला ज्ञान म्हणूया । झाली जगभर हेटाई तरी प्रसाद म्हणूनी भक्षण करुया । धागा धागा अखंड काढू या भक्तीभोळ्यांचे कंपू करुया ।
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री Sun, 06/14/2020 - 05:57 नवीन
देणार्‍या सर्वांना धन्यवाद.
  • Log in or register to post comments
म
मन्या ऽ Sun, 06/21/2020 - 07:07 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा