Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पूर्वसंचित आणि कर्मसिद्धांत : भारतीय मानसिकतेतला फंडामेंटल घोळ !

स
संजय क्षीरसागर
Tue, 07/07/2020 - 20:40
💬 167 प्रतिसाद
पूर्वसंचित आणि कर्मसिद्धांत या दोन्ही एकमेकात गुंफलेल्या, फंडामेंटली चुकीच्या मानसिक धारणा आहेत. कर्मसिद्धांत मानणं म्हणजे आलेल्या आपत्तीचं वस्तुनिष्ठ विश्लेषण करुन योग्य निर्णय घेण्याऐवजी, ते आपल्या पूर्वसंचिताचं फळ समजून गप्प बसणं, किंवा (आता इलाजच नाही म्हटल्यावर), दुसर्‍याला माफ करणं, किंवा प्रसंग निस्तरण्याशिवाय पर्यायच नसेल तर, अत्यंत पडेल मनोवृत्तीनं, जमेल तसा प्रसंग रेटणं ! शिवाय ही थिअरी मानणार्‍याला, पूर्वसंचितात आपली नक्की किती लफडी आहेत याचा पत्ता नसतो, त्यामुळे आला बिकट प्रसंग की लाव थिअरी असं करत; तो स्वतःचा सारासार विचार कायमचा गमावून बसतो. त्रासदायक आठवणींपासुन सुटका कशी करुन घ्यावी? या लेखावरचे प्रतिसाद, जनमानसात ही भावना किती डीप गेलीये ते दर्शवतात. त्यामुळे, पूर्वसंचित आणि कर्मसिद्धांत या दोन्ही धारणांच निस्सरण झाल्याखेरिज, आलेल्या आपत्तीचं वस्तुनिष्ठ विश्लेषण करुन योग्य निर्णय घेता येणार नाही. यास्तव ही पोस्ट. _____________________________________ या धरणा अनेक ग्रंथात आणि अनेक अध्यात्मिक दिग्गजांनी दिमाखात मांडल्या आहेत, त्या ग्रंथांच्या किंवा दिग्गजांच्या अवमानाचा कोणताही हेतू नाही. तस्मात, सदस्यांनी त्यांच्या श्रद्धा वगैरे मधे न आणता फक्त विषयाला धरुन प्रतिसाद दिल्यास विधायक चर्चा होईल. तर्कशास्त्रानुसार : An Asserter Has to Prove His Claim थोडक्यात `पूर्वसंचित किंवा कर्मसिद्धांत आहे' असा दावा करणार्‍यांनी तो सिद्ध करायचा आहे. _______________________________ या सिद्धांतांप्रमाणे व्यक्ती आता जे काय भोगते आहे ते त्याच्या पूर्वकर्माचं फळ आहे : मना त्वांची रे पूर्वसंचित केले । तया सारखे भोगणे प्राप्त झाले ॥ १. हा सिद्धांत मांडणार्‍यांचा मानसशास्त्राचा अभ्यास फारसा नव्हता. स्मृती ही केवळ त्या व्यक्तीच्या मेंदूत असते आणि अस्तित्वात इतरत्र तो डेटा साठवण्याची कोणतीही सोय नाही याची त्यांना कल्पना नव्हती. २. शिवाय मृत्यूत, देहासमेत मेंदूही विघटीत होऊन, एका व्यक्तीची संपूर्ण जीवन कहाणी तिथेच संपते. त्यामुळे मेंदूतली स्मृती पुढे सरकायची कोणतीही शक्यताच उरत नाही, इतकी उघड गोष्ट संतांच्या लक्षात आली नाही. ३. कर्मफलाच्या अंमलबजावणीला प्रत्येक व्यक्तीचा अनेक जन्मांचा डेटा स्टोअर करुन तो प्रत्येक व्यक्तीचं ‘कर्मफल रिअल टाईम बेसिसवर’, मॅनेज करु शकेल अशी प्रणाली अस्तित्वात हवी. अर्थात, संतमंडळींच्या वेळी अशा काही सिस्टम्सच नसल्यामुळे त्यांना आपल्या कल्पनेतला फोलपणा लक्षात आला नाही. ४. शिवाय डेटा नीती-अनीती किंवा पाप-पुण्याच्या कल्पनांवर सॉर्ट करण्यासाठी लिहावा लागणारा अल्गरिदम कुणाही देवाच्या देवाला सुद्धा, लिहिता येणं अशक्य आहे. कारण त्या कल्पनाच मुळात मानवी आहेत. समाज व्यवस्थेसाठी त्या उपयोगी असल्या तरी अस्तित्वात असा कोणताही मॉरल कोड नाही. ५. मुळात अस्तित्वात वेळ नाही त्यामुळे पूर्वसंचित ही कल्पना जे कालविभाजन गृहित धरते ते निराधार आणि कपोलकल्पित आहे. व्यक्तीच्या दृष्टीनं काल ही उपयोगीता आहे पण ती प्रक्रिया मापनासाठी माणसानं शोधलेली कल्पना आहे. अस्तित्वात फक्त एकच काळ कायम चालू आहे, तो म्हणजे वर्तमान काळ ! अशाप्रकारे पूर्वसंचित आणि कर्मसिद्धांत या बोगस कल्पना आहेत. ______________________________ तस्मात, आपण कुणाचा गैरफायदा न घेणं आणि कुणाला आपला गैरफायदा न घेऊ देणं इतक्या साध्या तत्वानी व्यक्ती मुक्त, स्वच्छंद आणि अपराध शून्य जीवन जगू शकते. कोणतंही पूर्वसंचित नाही आणि अत्यंत पारदर्शक वागणुकीमुळे कोणताही कर्मविपाक नाही; ही खरी आणि वास्तविक मुक्त चित्तदशा आहे. ह्या धाग्यावर पुरेशी चर्चा झाली असून आता केवळ व्यक्तिगत टीका चालू असल्याने हा धागा वाचनमात्र करत आहोत. --मिपा व्यवस्थापन.

प्रतिक्रिया द्या
69669 वाचन

💬 प्रतिसाद (167)
ग
गामा पैलवान Tue, 07/07/2020 - 22:13 नवीन
संजय क्षीरसागर, गैरफायदा म्हणजे काय? एखादं उदाहरण मिळेल काय? आ.न., -गा.पै.
क
कोहंसोहं१० Tue, 07/07/2020 - 23:03 नवीन
शिवाय मृत्यूत, देहासमेत मेंदूही विघटीत होऊन, एका व्यक्तीची संपूर्ण जीवन कहाणी तिथेच संपते. त्यामुळे मेंदूतली स्मृती पुढे सरकायची कोणतीही शक्यताच उरत नाही >>>>>>>>> अरे असे कसे? तुमचा मेमरी स्ट्रिंगचा अभूतपूर्व सिद्धांत (:D) तर सांगतो की अशी चूक होऊ शकते आणि आता तुम्ही म्हणताय शक्यताच उरत नाही. कमाल आहे :D तुमच्याच शब्दात सांगायचे झाले तर: "नॉर्मली माणूस गेल्यावर देहासमेत त्याचा मेंदूपण फुल्ली फॉरमॅट होतो > थोडक्यात सर्व स्मृती, कौशल्य, विव्दत्ता.... सर्व शून्य होते. या प्रोसेसमधे काही वेळा चुकून, स्मृतीच्या काही स्ट्रिंग्ज फॉरमॅट न होता अंतराळात रिलीज होतात. अशा स्ट्रींग्ज नवजात अभ्रकाच्या मेंदूत डायरेक्ट कॉपी / पेस्ट होतात > त्याला तो डेटा सक्रीय झाला की मृत व्यक्तीच्या जीवनपटाचा काही भाग दिसायला लागतो > आणि आपण म्हणतो पुनर्जन्म झाला ! अशाप्रकारे पुनर्जन्म वगैरे काही नसून, ती डिस्क फॉरमॅटींगमधे नकळत झालेली चूक आहे"
स
संजय क्षीरसागर Wed, 07/08/2020 - 12:05 नवीन
धन्यवाद !
अशाप्रकारे पुनर्जन्म वगैरे काही नसून, ती डिस्क फॉरमॅटींगमधे नकळत झालेली चूक आहे"
हा मुद्दा या लेखाच्याच कंटिन्यूटीमधे येणार्‍या पुढच्या लेखात क्लिअर होईल किंवा चर्चा त्या दिशेनं गेली तर इथेच सिद्ध होईल.
↩ प्रतिसाद: कोहंसोहं१०
क
कोहंसोहं१० Wed, 07/08/2020 - 16:22 नवीन
बर्‍याच वर्षांनी पहिला सुसंबद्ध प्रतिसाद ! धन्यवाद ! >>>>>>>> माझा प्रतिसाद आपलीच दोन परस्परविरोधी विधाने दाखवून देण्यासाठी होता. त्याला सुसंबद्ध म्हणून आपण आपल्या विधानातील विरोधीपणा बऱ्याच वर्षांनी (बहुतेक पहिल्यांदाच) मान्य केल्याबद्दल आपले धन्यवाद आणि अभिनंदन.
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
अ
अर्धवटराव Wed, 07/08/2020 - 16:43 नवीन
पूर्वी 'काळ अस्तित्वात नाहि' असा दावा असायचा... आता 'वर्तमान काळ आहे' इतपत प्रगती झाली आहे ;)
↩ प्रतिसाद: कोहंसोहं१०
स
सोत्रि Wed, 07/08/2020 - 02:47 नवीन
स्मृती ही केवळ त्या व्यक्तीच्या मेंदूत असते आणि अस्तित्वात इतरत्र तो डेटा साठवण्याची कोणतीही सोय नाही
ह्याला जो काही शास्त्रिय आधार आहे तो इथे द्या. अमेरिकन / ब्रिटीश मानसशास्त्रिय जर्नल्समधल्या लेखांचे आधार दिल्यास उत्तम. मानसशास्त्रिय ग्रंथांचे किंवा पुस्तकांचे रेफरंसेसही चालतील. खासकरून मेमेरी ह्या विषयाला वाहिलेले.
त्यामुळे मेंदूतली स्मृती पुढे सरकायची कोणतीही शक्यताच उरत नाही
ह्याला जो काही शास्त्रिय आधार आहे तो इथे द्या. मानसशास्त्रिय ग्रंथांचे किंवा पुस्तकांचे रेफरंसेसही चालतील.
व्यक्तीचं ‘कर्मफल रिअल टाईम बेसिसवर’, मॅनेज करु शकेल अशी प्रणाली अस्तित्वात हवी.
जिनोम, असो. :) अशी प्रणाली अस्तित्वात नाही ह्याला जो काही शास्त्रिय आधार आहे तो इथे द्या. मानसशास्त्रिय ग्रंथांचे किंवा पुस्तकांचे रेफरंसेसही चालतील. #३ आणि ४ यांचा पूर्वसंचित आणि कर्मसिद्धांत ह्याच्याशी काही संबंध नाही, सबब, ते अवांतर होऊ शकते. - (शास्त्रिय बैठक असलेला साधक) सोकाजी
स
सोत्रि Wed, 07/08/2020 - 04:33 नवीन
कृपया # ४ आणि ५ असं वाचा - (माणूस) सोकाजी
↩ प्रतिसाद: सोत्रि
श
शा वि कु Wed, 07/08/2020 - 04:53 नवीन
5 एखाद्या वेळेस ठीक. 4 कसे अवांतर ? कोणत्याही कॉज इफेक्ट नात्यामध्ये नियम (अल्गोरीथम) असतातच ना ? कर्मविपाक सिद्धांत पण कॉज इफेकट् आहे असेच सांगतो ना ?(? चुभुद्याघ्या)
↩ प्रतिसाद: सोत्रि
स
सोत्रि Wed, 07/08/2020 - 05:51 नवीन
#४ हा कर्मविपाक सिद्धांतवर काहीही भाष्य नसून करता नीती - अनीती पाप-पुण्य ह्या संकल्पनांवर साधारण टिप्पणी आहे. त्यामुळे ते अवांतर आहे. कर्मविपाक सिद्धांत त्या संकल्पनांवर आधारित नाही. 'जे पेराल ते उगवेल' हा साधा निसर्गनियम आहे जे कर्मविपाकाचं सार आहे. (साधकांसाठी, शब्दजंजाळात अडकलेल्यांसाठी नाही! :) ) - (मुमुक्षू) सोकाजी
↩ प्रतिसाद: शा वि कु
स
संजय क्षीरसागर Wed, 07/08/2020 - 12:00 नवीन
तुम्ही लेख न वाचताच, भारंभार प्रतिसाद देतायं ! शेवट वाचा :
तस्मात, आपण कुणाचा गैरफायदा न घेणं आणि कुणाला आपला गैरफायदा न घेऊ देणं इतक्या साध्या तत्वानी व्यक्ती मुक्त, स्वच्छंद आणि अपराध शून्य जीवन जगू शकते. कोणतंही पूर्वसंचित नाही आणि अत्यंत पारदर्शक वागणुकीमुळे कोणताही कर्मविपाक नाही; ही खरी आणि वास्तविक मुक्त चित्तदशा आहे.
↩ प्रतिसाद: सोत्रि
स
संजय क्षीरसागर Wed, 07/08/2020 - 11:56 नवीन
१.
स्मृती ही केवळ त्या व्यक्तीच्या मेंदूत असते आणि अस्तित्वात इतरत्र तो डेटा साठवण्याची कोणतीही सोय नाही ह्याला जो काही शास्त्रिय आधार आहे तो इथे द्या. अमेरिकन / ब्रिटीश मानसशास्त्रिय जर्नल्समधल्या लेखांचे आधार दिल्यास उत्तम. मानसशास्त्रिय ग्रंथांचे किंवा पुस्तकांचे रेफरंसेसही चालतील. खासकरून मेमेरी ह्या विषयाला वाहिलेले.
माझी विधानं ही उघड आणि निर्विवाद वस्तुस्थिती असतात त्यामुळे त्यांना कोणत्याही एक्सटर्नल लिंकची गरज नाही. उलट, मानसशास्त्राज्ञांनी अभ्यास केला तर ही विधानं रिसर्च पेपर्समधे येतील अशी परिस्थिती आहे. मी इथल्या सर्व सदस्यांना आवाहन करतो की `स्मृती ही केवळ त्या व्यक्तीच्या मेंदूत असते आणि अस्तित्वात इतरत्र तो डेटा साठवण्याची कोणतीही सोय नाही' याचा प्रतिवाद करु शकणारा जगातल्या कोणत्याही संशोधनाचा दाखला त्यांनी दाखवावा. ते असंभव आहे. २.
त्यामुळे मेंदूतली स्मृती पुढे सरकायची कोणतीही शक्यताच उरत नाही ह्याला जो काही शास्त्रिय आधार आहे तो इथे द्या. मानसशास्त्रिय ग्रंथांचे किंवा पुस्तकांचे रेफरंसेसही चालतील.
मृत्यूनंतर देहासमेत मेंदूही पुन्हा पंचतत्वात मिसळतो ही उघड गोष्ट आहे. तस्मात, वर १ मधलं उत्तर इथे ही लागू आहे. ३.
व्यक्तीचं ‘कर्मफल रिअल टाईम बेसिसवर’, मॅनेज करु शकेल अशी प्रणाली अस्तित्वात हवी. अशी प्रणाली अस्तित्वात नाही ह्याला जो काही शास्त्रिय आधार आहे तो इथे द्या. मानसशास्त्रिय ग्रंथांचे किंवा पुस्तकांचे रेफरंसेसही चालतील.
इतकी उघड गोष्ट लक्षात यायला संगणकाचं प्राथमिक ज्ञान पुरेसं आहे. जिपीएसवर साधं उजवीकडे का डावीकडे वळायचं या निर्णयासाठी लोकेशन आणि डेस्टीनेशन रिअल टाईम बेसिसवर मॉनिटर करायला लागतं. कर्मसिद्धांत ही त्याचीच कित्येक पटीनं पुढची पायरी आहे. ३.
#३ आणि ४ यांचा पूर्वसंचित आणि कर्मसिद्धांत ह्याच्याशी काही संबंध नाही, सबब, ते अवांतर होऊ शकते.
फंडाच लक्षात न आल्यानं हे वाक्य आलं आहे. पाप-पुण्य हाच कर्मविपाक आहे आणि गतकालातल्या कर्माचं पुढे फलित याला कर्मसिद्धांत म्हणतात.
↩ प्रतिसाद: सोत्रि
अ
अर्धवटराव Wed, 07/08/2020 - 03:00 नवीन
असो.
R
Rajesh188 Wed, 07/08/2020 - 06:37 नवीन
नेहमी सारखं च तत्ज्ञान त्यांच्या पुरतेच सत्य असलेले . आणि वरवर विचारावर आधारित. विचाराची खोली वाढवावी अशी सूचना.
प
प्रसाद गोडबोले Wed, 07/08/2020 - 08:26 नवीन
मला संक्षी आणि यनावाला ह्यांच्यातील जुगलबंदी पहायची आहे , कोणी तरी यनावालांना बोलवा रे मिपावर परत =))))
प
प्रसाद गोडबोले Wed, 07/08/2020 - 08:51 नवीन
तुमच्याशी कोणत्याही प्रकारची चर्चा करणे व्यर्थ आहे हे कळुन चुकलं आहे पण तरीही फार मजा येतेय म्हणुन चला प्रतिसाद प्रतिसाद खेळु आता खालील चित्र नीट पहा : ह्या चित्रात आपल्याला कोणता प्राणी दिसत आहे ते सांगा Image removed. दिसले का काही ? का नाही दिसलं ? दिसले असेल तर हार्दिक अभिनंदन ! नसेल दिसले तर ह्यात कोणत्याही प्राण्याची आकृती नाहीच असा हेका धरणार काय ? तात्पर्य इतकेच आहे आपल्याला जे काही ज्ञान होत असते ते ज्ञानेंदियांच्या मार्फत मिळणार्‍या अनुभावांवरुन होत असते आणि आपला मेंदु ती माहीती प्रोसेस करत असतो. पण ज्ञानेंद्रियांना मर्यादा आहेत, त्यामार्फत मिळणार्‍या माहीतीला मर्यादा आहेत आणि ती प्रोसेस करणार्‍या ब्रेनलाही मर्यादा आहेत. त्यामुळे जे तुम्हाला कळत नाही , जे तुमच्या आकलनक्षमतेच्या परे आहे, ते सारेच फंडामेंटल घोळ आहे असे मानणे हे अत्यंत बालीषपणाचे लक्षण आहे किंव्वा वाळवंटी धर्मांच्या मानसिकतेचे ! हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापिहितं मुखम् । तत्त्वं पूषन्नापावृणु सत्यधर्माय दृष्टये ॥१५॥ पण असो. चित्रात कोणत्याही प्राण्याची आकृती दिसल्यास जरुर कळवा =))))
अ
अभ्या.. Wed, 07/08/2020 - 09:10 नवीन
मला हरण दिसले
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रसाद गोडबोले Wed, 07/08/2020 - 10:23 नवीन
अभ्याशेठ, काय म्हणता ! कसे आहात ? आणि हरीण नाहीये बे , जिराफ आहे =))))
↩ प्रतिसाद: अभ्या..
अ
अभ्या.. Wed, 07/08/2020 - 10:46 नवीन
जिराफ म्हणजे उंच मानेचे जरा मोठे हरण च असते.
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
अ
अर्धवटराव Wed, 07/08/2020 - 14:55 नवीन
च्यायला... मला कौठलाच प्राणी दिसला नाहि :( पानं खाऊन पळाला कि काय ?? :)
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रसाद गोडबोले Wed, 07/08/2020 - 19:55 नवीन
तुम्हाला निराकार संप्रदायाच्या गुरुमंत्राचा जप करण्याची नितांत आवश्यकता आहे . हा घ्या तो मंत्र : || जितं मया जितं मया सर्वज्ञोsहम जितं मया || दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ह्याचालीत नामस्मरण करा , तुम्हाला निर्विकाराची " अंतिम" नशा चढल्याशिवाय रहाणार नाही. एकदा का ती साधना सिध्दीस गेली की तुम्ही मला कुठलाच प्राणी दिसला नाही असे न म्हणता ह्यात कुठला प्राणी नाहीयेच असे ठाम पणे बोलु शकाल . =))))
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
अ
अर्धवटराव Wed, 07/08/2020 - 21:08 नवीन
माझ्या मेमरी स्ट्रींग्स निराकारत विलीन झाल्या तर केव्हढ्याला पडेल ति साधना :D
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
क
कानडाऊ योगेशु Wed, 07/08/2020 - 20:45 नवीन
गांजा हाणा.पूर्ण प्राणिसंग्रहालय दिसेल. (ह.घ्या)
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
उ
उन्मेष दिक्षीत Wed, 07/08/2020 - 21:17 नवीन
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु
अ
अभ्या.. गुरुवार, 07/09/2020 - 03:50 नवीन
पूर्ण प्राणिसंग्रहालय दिसेल. म्हणूनच तशा अवस्थेला झू मे असे म्हणतात.
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु
अ
अर्धवटराव गुरुवार, 07/09/2020 - 04:31 नवीन
याला म्हणतात कलाकारी :)
↩ प्रतिसाद: अभ्या..
स
संजय क्षीरसागर गुरुवार, 07/09/2020 - 05:18 नवीन
जबरदस्त ! एका प्रतिसादात सगळ्या जालीय कारकिर्दीला `जालसमाधी' प्राप्त झाली.
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु
प
प्रसाद गोडबोले गुरुवार, 07/09/2020 - 11:48 नवीन
तुम्हाला काही दिसलं की नाही हा जास्त महत्वाचा प्रश्न आहे. "आपण एकटेच सर्वज्ञ नाही , आपल्या आकलन क्षमतेच्या पलीकडेही खुप मोठ्ठे जग आहे , त्यामुळे आपण आपली मते मांडावीत ,पण विनाकारण इतरांचे श्रध्दाभंजन करु नये" इतकी समज तुम्हाला येईल तेव्हा आमच्या कारकर्दीला जालसमाधी प्राप्त होईल !!
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
अ
अर्धवटराव गुरुवार, 07/09/2020 - 05:22 नवीन
'निराकारीय' नशेपेक्षा गांजा निश्चितच चांगला असेल ;)
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु
स
संजय क्षीरसागर गुरुवार, 07/09/2020 - 05:41 नवीन
मग मारा आणि लिहा इथे अनुभव.
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
अ
अर्धवटराव गुरुवार, 07/09/2020 - 06:07 नवीन
पहिले इथे आणि बर्‍याच इतर धाग्यांवर बर्‍याच लोकांच्या चुकीच्या धारणांच्या निराकारी नशा उतरायची वाट बघतोय. अन्यथा माझी नशा कशी कळेल?
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर गुरुवार, 07/09/2020 - 06:15 नवीन
म्हणजे निराकारची नशा तुमच्या कोणत्याही नशेपेक्षा वरचढ आहे !
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
अ
अर्धवटराव गुरुवार, 07/09/2020 - 06:33 नवीन
त्याशिवाय का इतकं ज्ञानामृत अवतरेल ? पण कसं आहे ना.. एखादी नशा चढली कि दुसर्‍या नशेशी कंपेअर करायचं भान तरे कुथे असणार?
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
अ
अर्धवटराव गुरुवार, 07/09/2020 - 06:33 नवीन
त्याशिवाय का इतकं 'ज्ञानामृत' अवतरेल ? पण कसं आहे ना.. एखादी नशा चढली कि दुसर्‍या नशेशी कंपेअर करायचं भान तरे कुथे असणार?
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
श
शा वि कु Wed, 07/08/2020 - 15:38 नवीन
:प
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
र
रानरेडा Wed, 07/08/2020 - 17:50 नवीन
रिंग घातलेले काहीतरी भलतेच दिसत आहे ......
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
क
कोहंसोहं१० Wed, 07/08/2020 - 18:09 नवीन
मला तर यात मासा/मधमाशी (जसे पाहाल त्यावर अवलंबून), जिराफ, लग्नाच्या वरातीतला सजवलेला घोडा, बदकाचे पिल्लू एवढे प्राणी दिसले
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
ज
ज्ञानोबाचे पैजार Wed, 07/08/2020 - 10:08 नवीन
स्मृती ही केवळ त्या व्यक्तीच्या मेंदूत असते आणि अस्तित्वात इतरत्र तो डेटा साठवण्याची कोणतीही सोय नाही याची त्यांना कल्पना नव्हती.
ही अपूर्ण माहीती आहे. स्मृती ह्या फक्त मनुष्या पुरत्या किंवा सजिवांपुरत्या मर्यादीत नसून त्या सार्वत्रिक आहेत. मी तर त्या पुढे जाउन असे म्हणेन की हे सारे विश्व हा केवळ स्मृतींचाच खेळ आहे. ज्या क्षणी या विश्र्वात अस्तित्वात असलेला पदार्थ आपल्या सर्व स्मृती विसरुन जाईल किंवा इतर स्मॄती अस्तित्वात ठेवत मूळ स्मृती पर्यंत पोचू शकेल, त्या क्षणी तो त्याच्या मूळ स्वरुपात परत जाईल किंवा मूळ स्वरुप जाणायला लागेल. (इश्र्वर, ब्रम्ह, किंवा बीग बँग च्या आधिची आवस्था इत्यादी इत्यादी) उदा सुर्यमाला ही सुर्यापासून बनली आहे हे आपण मानतो. पण तरी सुध्दा या पृथ्वी वरची एकही वस्तु सुर्यासारखी तप्त व स्वयंप्रकाशी नाही. जी झाडे पृथ्वीवर उगवतात तीच झाडे सुर्यावर किंवा चंद्रावर उगवू शकत नाहित. कारण सुर्याच्या पासून अलग झाल्यावर पृथ्वीने आपल्या स्मृतींमधे ही काही बदल केले व या नव्याने अस्तित्वात आलेल्या स्वतंत्र स्मृती कोशातून इथे वातावरण तयार झाले पाणी आले झाडे आली. म्हणूनच मंगळावर किंवा गुरुवर आपल्याला पॄथ्वीसारखी जीवससृष्टी सापडत नाही. म्हणजे तिथे काहीच अस्तित्वात नाही असे आपण ठाम पणे म्हणू शकत नाही. हाच सिध्दांत जरासा पुढे नेला तर असे म्हणता येईल की या जगात सजिव आणि निर्जिव हा भेदभाव करता येणार नाही. फक्त इतकेच म्हणता येईल की जो पदार्थ या जगात अस्तित्वात आला आहे तो त्याचे स्वरुप बदलणारच. काही लवकर बदलतील तर काही थोडेसे उशीरा इतकेच. माणसाचे शरीर ७०-८० वर्षांनी त्याचे मुळ रुप बदलते तर दगड काही कोटी वर्षांनी बदलतील. हेच दगड काही कोटी वर्षांपूर्वी लाव्हा रसाच्या रुपाने अस्तित्वात होते ना? जरा वेगळ्या शब्दात असेही म्हणता येईल की कार्बनडाय ऑक्साईड मधे पण कार्बन आणि ऑक्सिजन असतो आणि कार्बन मोनॉक्साईड मधे पण. तरीही या दोन्ही मुलद्रव्यांच्या स्मृती वेगवेगळ्या असल्याने ती मुलद्रव्ये आपल्याला भिन्न भासतात. असे नसते तर कोळशा पासून सहज हिरा बनवता आला असता. याचाच अर्थ प्रत्येक पदार्थ आपल्या आपल्या स्मृती मधे रममाण झालेला असतो. पण एक ना एक दिवस त्याच्या स्मृतींमधे बदल होतोच. कोळसाही त्याचे रुप बदलतो आणि हिराही. पण मग त्यांचे होते काय? त्या आधि आपण अजून एक वेगळा सिध्दांत पाहू "कोणतीही उर्जा कधीही उत्पंन्न होत नाही आणि कधीही नष्ट होत नाही. फक्त त्या उर्जेचे स्थित्यंतर होत असते." उदा उष्णता मिळाली की पाण्याची वाफ बनते, त्या वाफेच्या बलाचा उपयोग करुन रेल्वेचे इन्जीन धावू लागते. गुरुत्वाकर्षणाचा उपयोग करुन वहात्या पाण्यापासुन वीज बनवता येते इत्यादी. या जगात अस्तित्वात असलेला प्रत्येक पदार्थ कोणत्याना कोणत्या उर्जेचे प्रतिक आहे. त्यामुळे हाच सिध्दांत जर थोडासा पुढे नेला तर असे म्हणता येईल की या जगात कोणताही पदार्थ उत्पन्न होत नाही आणि नष्ट होत नाही. फक्त त्याचे स्थित्यंतर होत जाते. उदा मनुष्य मेला की त्याच्या शरीराची (मेंदु सकट) माती होते. म्हणजे काय तर शरीर एका रुपातुन दुसर्‍या रुपात जाते. (मी इथे आत्मा हा शब्द वापरलेला नाही. त्या बद्दल नंतर कधीतरी बोलू) मग त्या मेंदुत असलेल्या स्मृती सुध्दा मातीतच मिसळल्या जातात. पण नष्ट होत नाहित असे म्हणायला हरकत नाही. अर्थात हा सगळा तर्काधारीत खेळ आहे हे मला मान्य आहे. पण मुळ विधानही तर्कावरच आधारीत असल्याने ते खोडून काढायला तर्काचाच आधार घ्यावा लागेल. पैजारबुवा,
श
शा वि कु Wed, 07/08/2020 - 10:38 नवीन
दगड, पृथ्वी यांच्या स्मृती म्हणजे काय नीट समजले नाही. कारण स्मृती केवळ स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव असणाऱ्या आणि मुख्यम्हणजे आजूबाजूच्या गोष्टी संवेदनांमार्फत गोळा करणाऱ्या गोष्टींनाच असू शकते,असे वाटते. पृथ्वी किंवा दगड यांमध्ये असे असेल असे वाटत नाही.
की या जगात सजिव आणि निर्जिव हा भेदभाव करता येणार नाही. फक्त इतकेच म्हणता येईल की जो पदार्थ या जगात अस्तित्वात आला आहे तो त्याचे स्वरुप बदलणारच.
हा भेदभाव करता येणार नाही ? हा फरक कसा वाटतो बघा- सजीव हा स्वतःच्या कोणत्यानकोणत्या स्थितीमध्ये स्वतःहून बदल करू शकतो, जो निर्जीव करू शकत नाही. आणि आपण नाही म्हणले तरी काही फायदा नायच. हा फरक आपल्याला करावाच लागतो. दगड फोडणे आणि डोके फोडणे यात फरक का आहे मग ? जर दगडाला आणि जिवंत/सजीव गोष्टीला स्मृती असतात, तर ह्या दोन्ही गोष्टी एकसारख्या का मानू नयेत ?
उदा मनुष्य मेला की त्याच्या शरीराची (मेंदु सकट) माती होते. म्हणजे काय तर शरीर एका रुपातुन दुसर्‍या रुपात जाते. (मी इथे आत्मा हा शब्द वापरलेला नाही. त्या बद्दल नंतर कधीतरी बोलू) मग त्या मेंदुत असलेल्या स्मृती सुध्दा मातीतच मिसळल्या जातात. पण नष्ट होत नाहित असे म्हणायला हरकत नाही.
स्मृती ह्या केवळ एखाद्या पदार्थावर अवलंबून नसतात. अनेक पदार्थांच्या गुंतागुंतीच्या जाळ्यामुळे स्मृती ही संकल्पना आहे. जिवंत असताना देखील ह्या पदार्थांच्या जाळ्याला धक्का लागला तरी स्मृती गमाव्या लागतात. त्या पदार्थांची माती झाल्यावर यात स्मृती राहील म्हणजे हार्ड डिस्क जाळून त्याची राख अजून सुद्धा स्टार वॉर्स:एम्पायर स्ट्राईक्स बॅक 1080p ची प्रिंट धरून आहे असे म्हणल्यासारखे होईल :)
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
ज
ज्ञानोबाचे पैजार Wed, 07/08/2020 - 11:21 नवीन
कारण स्मृती केवळ स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव असणाऱ्या आणि मुख्यम्हणजे आजूबाजूच्या गोष्टी संवेदनांमार्फत गोळा करणाऱ्या गोष्टींनाच असू शकते,असे वाटते.
स्मृती म्हणजे काय तर माहिती. उदा सजिवांच्या डीएन ए मधे काही महिती साठवलेली असते जी पिढ्यान पिढ्या जपायचा प्रयत्न केला जातो. पण वर तुम्ही कदाचित मानवी भावनांवर बोलताय आणि माझे म्हणणे असे आहे की स्मृती ह्या मानवी भावनांएवढ्या संकुचित नाहीत. तर त्यांचा थेट संबध त्या पदार्थाच्या अस्तित्वाशी आहे. म्हणुनच कार्बन डाय ऑक्साईड आणि कार्बन मोनॉक्साईड चे उदाहरण घेतले होते. थोड्या वेगळ्या शब्दात सांगायचे तर प्रत्येक पदार्थ अशी माहिती साठवून त्या माहितीत रममाण झालेला असतो. ती माहिती काही काळ जपुन ठेवतो व त्यात नव्या माहितीची भर घालायचा प्रयत्न करत असतो. काही पदार्थांच्या बाबतीत ही प्रक्रीया तुलनात्मक दृष्ट्या वेगाने होते तर काहिंच्या बाबतीत ती सवकाश होते इतकेच. तुम्ही ज्याला संवेदना म्हणताय त्या बद्द्ल बोलायचे झाले तर आपले शरीर पंच महाभुतांपासून बनलेले असते मग त्यात संवेदना येतात कुठून? त्या कुठेतरी अस्तित्वात असल्या शिवाय का प्रगट होतात? वनस्पतींना सुध्दा संवेदना नसतात असे काही वर्षांपूर्वी मानले जायचे आता मात्र हे गृहितक बदलले आहे. ज्या पंचमहाभुतांपासून माझे शरीर बनलेले आहे त्याच पंचमहाभुतांपासून दगड, पृथ्वी इत्यादी बनले असतील तर मला स्मृती आहेत / संवेदना आहेत आणि त्यांना मात्र नाहीत असे म्हणणे जरा धाडसाचेच किंवा स्वार्थीपणाचे ठरेल. पैजारबुवा,
↩ प्रतिसाद: शा वि कु
श
शा वि कु Wed, 07/08/2020 - 12:17 नवीन
मलाही स्मृती माहिती या आंगानेच अभिप्रेत होतं. पदार्थावर वा वस्तूवर साठवलेली माहिती, या अर्थाने तुमचं म्हणणं पटतंय. डीएनए सुद्धा स्वतःच्या स्ट्रक्चर पलीकडे माहिती साठवू शकतच नाही. तो तो पदार्थ आपापल्या स्ट्रक्चरमधून माहिती साठवतो हीच जर केवळ स्मृती आहे, तर सजीवांची स्मृती यापेक्षा वेगळी खासच आहे.
तुम्ही ज्याला संवेदना म्हणताय त्या बद्द्ल बोलायचे झाले तर आपले शरीर पंच महाभुतांपासून बनलेले असते मग त्यात संवेदना येतात कुठून? त्या कुठेतरी अस्तित्वात असल्या शिवाय का प्रगट होतात?
खूप छान आणि मोठा प्रश्न आहे. मला उत्तर माहित नाही हेवेसांनल.
ज्या पंचमहाभुतांपासून माझे शरीर बनलेले आहे त्याच पंचमहाभुतांपासून दगड, पृथ्वी इत्यादी बनले असतील तर मला स्मृती आहेत / संवेदना आहेत आणि त्यांना मात्र नाहीत असे म्हणणे जरा धाडसाचेच किंवा स्वार्थीपणाचे ठरेल.
हम्म. नाही वाटत. पंचमहाभूतांच्या एका विशिष्ठ रचनेमुळे मला "मीपण" प्राप्त झाले आहे. हि रचना मोडकळीस आल्यावर मला ही काही संवेदना/स्मृती उरणार नाहीत. आत्तापर्यंत आलेल्या सगळ्या संवेदना या विशिष्ठ रचनेमुळेच. या रचनेच्या आधी संवेदना मला आठवत नाहीत. ही रचना मोडल्यावर संवेदना सम्पतात, असे निरीक्षण आहे. त्यामुळे ह्या रचनेच्या पुढे/मागे काही आहे असे वाटत नाही. _ _/\_ _
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
स
सोत्रि Wed, 07/08/2020 - 15:23 नवीन
पंचमहाभूतांच्या एका विशिष्ठ रचनेमुळे मला "मीपण" प्राप्त झाले आहे. हि रचना मोडकळीस आल्यावर मला ही काही संवेदना/स्मृती उरणार नाहीत.
हे जे मीपण म्हणता आहात हे स्थूल शरीर / देह असं गृहीत धरतो. त्यानुसार पुढे जाऊयात... मनुष्यदेहाचे स्थूल आणि सूक्ष्म असे दोन भेद असतात. अन्नमय कोश हा स्थूल देह. प्राणमय कोश, मनोमय कोश, ज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश ह्यांचा मिळून होतो सूक्ष्मदेह. क्वांटम (अतीसूक्ष्म) पातळीवर हे दोन्ही देह भेद उर्जाच (एनर्जी) असतात. त्याहीपुढे सूक्ष्मदेहात असणार्‍या संवेदना, भावना, आठवणी, संचित कर्म ह्यादेखील तरंगरूपात विहरणारी उर्जाच असते. मृत्युच्या वेळी स्थूल देहाचा क्षय होतो आणि सूक्ष्मदेह वातावरणात विलीन होतो. म्हणजे तरंगरूपात विहरणारी उर्जा वातावरणात मुक्त होते. संवेदना, भावना, आठवणी, संचित कर्म ह्यांच्या प्रभावामुळे (bondage) जी उर्जा मुक्त झाली होती ती उर्जेचा स्त्रोत बनून नविन जन्मणार्‍या अर्भकामधे प्रवाहित होते आणि उर्जाप्रवाह सुरु राहतो. पण त्याबरोबर संवेदना, भावना, आठवणी, संचित कर्म हेही प्रवाही होते. त्यामुळे जन्म, मृत्यु, पुनर्जन्म असं काही नसून उर्जा जीवनप्रवाही होऊन अक्षय्य असते. - (जीवनप्रवाही उर्जा असलेला ) सोकाजी
↩ प्रतिसाद: शा वि कु
स
संजय क्षीरसागर Wed, 07/08/2020 - 15:30 नवीन
संवेदना, भावना, आठवणी, संचित कर्म ह्यांच्या प्रभावामुळे (bondage) जी उर्जा मुक्त झाली होती ती उर्जेचा स्त्रोत बनून नविन जन्मणार्‍या अर्भकामधे प्रवाहित होते आणि उर्जाप्रवाह सुरु राहतो. पण त्याबरोबर संवेदना, भावना, आठवणी, संचित कर्म हेही प्रवाही होते
तुमच्या नित्यकर्माची स्मृती ही जीवनप्रवाही उर्जा वगैरे नसून, निव्वळ डेटाबेस असतो. अन्यथा काहीही आठवणं असंभव आहे.
↩ प्रतिसाद: सोत्रि
अ
अर्धवटराव Wed, 07/08/2020 - 16:19 नवीन
पण तुम्ही म्हणताय तसं, मानवी कर्मांची 'स्मृती हि डिजीटल डोमेन सारखी बाइट्स मधे साठवलेली गोष्ट नसुन ति प्रभावाच्या रुपाने साठवली असते... व तो प्रभावच कॅरी फॉर्वर्ड होतो. बर्‍याच लोकांचा असा गैरसमज असतो कि मेंदु एखाद्या मेमरी चीप प्रमाणे स्मृती साठवतो. संगणकीय मेमरी रीड-राईट आणि मेंदुची मेमरी रीड-राईट पूर्णपणे भिन्न असते. जाऊ द्या. आपण आपलं कर्म करावं हे उत्त्तम :)
↩ प्रतिसाद: सोत्रि
स
संजय क्षीरसागर गुरुवार, 07/09/2020 - 09:19 नवीन
मानवी कर्मांची 'स्मृती हि डिजीटल डोमेनसारखी बाइट्स मधे साठवलेली गोष्ट नसुन ति प्रभावाच्या रुपाने साठवली असते... व तो प्रभावच कॅरी फॉर्वर्ड होतो ?
वाचा : It seems that our memory is located not in one particular place in the brain, but is instead a brain-wide process in which several different areas of the brain act in conjunction with one another (sometimes referred to as distributed processing). For example, the simple act of riding a bike is actively and seamlessly reconstructed by the brain from many different areas: the memory of how to operate the bike comes from one area, the memory of how to get from here to the end of the block comes from another, the memory of biking safety rules from another, and that nervous feeling when a car veers dangerously close comes from still another. Each element of a memory (sights, sounds, words, emotions) is encoded in the same part of the brain that originally created that fragment (visual cortex, motor cortex, language area, etc), and recall of a memory effectively reactivates the neural patterns generated during the original encoding. Thus, a better image might be that of a complex web, in which the threads symbolize the various elements of a memory, that join at nodes or intersection points to form a whole rounded memory of a person, object or event. This kind of distributed memory ensures that even if part of the brain is damaged, some parts of an experience may still remain
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
अ
अर्धवटराव गुरुवार, 07/09/2020 - 14:04 नवीन
स्मृती हि डिजीटल डोमेन सारखी बाइट्स मधे साठवलेली गोष्ट नसुन ति प्रभावाच्या रुपाने साठवली असते... It seems that our memory is located not in one particular place in the brain, but is instead a brain-wide process in which several different areas of the brain... म्हणजे काय, तर संगणकीय मेमरी ज्याप्रमाणे बिट बाय बिट इका ऑर्डर मधे वाचता येते त्याप्रमाणे मेंदुचहं काम नसतं.
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर गुरुवार, 07/09/2020 - 17:09 नवीन
> It seems that our memory is located not in one particular place in the brain, but is instead a brain-wide process in which several different areas of the brain act in conjunction with one another (sometimes referred to as distributed processing). मेमरी मेंदूच्या वेगवेगळ्या भागात स्टोअर केली जाते आणि हे वेगवेगळे भाग समन्वयानी काम करतात, (याला डिस्ट्रीब्युटेड प्रोसेसिंग म्हणता येईल) असा याचा मराठीत अर्थ आहे. पुढे सायकल चालवण्याचं उदाहरण आहे ते वाचा.
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
अ
अर्धवटराव गुरुवार, 07/09/2020 - 17:46 नवीन
सुदैवाने मला कॉम्प्युटर मेमरी read-write कसं काम करते याचं उत्तम ज्ञान आहे. आणि ति शारेरीक मेमरी मॅनेजमेण्टपेक्षा पूर्णपणे भिन्न आहे हे मला व्यवस्थीत कळतं. संगणकीय डिस्ट्रिब्युटेड प्रोएसेसींग बाबतीत देखील तेच. इथे केवळ उदाहरण द्यायचं झालं म्हणुन मेंदुच्या क्रियेला संगणकीय शब्द वापरले आहेत. याचा अर्थ मेंदु संगणकाप्रमाणे मेमरी मेनेज करतो असा कोणि घेत असेल तर तो फार बालीशपणा झाला. तसं बघितलं तर शरीराची प्रत्येक पेशी एखाद्या कारखान्याप्रमाणे काम करते. मटेरियल आत घेतलं जातं, प्रोसेस केलं जातं, बाहेर फेकलं जातं. याचा अर्थ जर जमशेदजी टाटा म्हणजे पेशीशास्त्र तज्ञ झाला असा घेतला तर ते मूर्खपणाचं ठरेल. अतिसुलभिकरण वापरुन विषयाची / संभाषणाची केवळ सुरुवात करता येते. त्यालाच अंतीम सत्य मानुन अभ्यास थांबवला तर बुद्धीची/ज्ञानाची वाढ थांबते. संगणकीय मेमरी मॅनेजमेण्ट आणि मेंदुच्या स्मृती प्रक्रिया पूर्णतया भिन्न आहेत. रासायनीक कारखाने आणि पेशी शास्त्राचा काहिही संबंध नाहि. एखादा फोटो हार्डडिस्कवर साठवणे, लॅपटोपवर बघणे आणि एखाद्या कविने काव्य रचना करणे आणि स्टेजवर सादर करणे यात जमीन अस्मानचं अंतर आहे. असो.
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर गुरुवार, 07/09/2020 - 19:44 नवीन
स्मृती हि डिजीटल डोमेन सारखी बाइट्स मधे साठवलेली गोष्ट नसुन ति प्रभावाच्या रुपाने साठवली असते.
हा तुमचा दावा फोल ठरला आहे. मेंदू संगणकापेक्षा अ‍ॅडवान्स्ड प्रणाली आहे हे सर्वज्ञात आहे. त्यात तुम्ही काही विशेष सांगितलेलं नाही.
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
अ
अर्धवटराव गुरुवार, 07/09/2020 - 21:22 नवीन
तसंही तुम्हाला नवीन काहि समजुन घ्यायची शक्यता नाहि. स्मृती हि न्युरोन कनेक्शन्स च्या एका विशिष्ट रितीने तयार झालेल्या प्रभावाच्या रुपाने मॅनेज होते.. पण हे कळायला सर्वप्रथम अतिसुलभतेचा मोह टाळता यायला हवा, रूपक आणि सत्यातला फरक कळायला हवा, मेंदु हि संगणकापेक्शा केवळ अ‍ॅडव्हान्स नसुन अत्यंत भिन्न प्रणाली आहे, हे कळायला हवं... अर्थात, त्यासाठी सर्वप्रथम संगणकशास्त्र आणि मेंदुशास्त्र यापैकी किमान एकाची विकिपिडीयापलिकडे काहि माहिती असायला हवी... असो.
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर गुरुवार, 07/09/2020 - 22:11 नवीन
स्मृती मेंदूशिवाय कुठेही स्टोअर होत नाही ! ती रेकॉर्ड कशी होते > रिट्रीव कशी होते याचा काहीही प्रश्न नाही
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा