Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

बट्ट्याबोळ-१

क
कपिलमुनी
Sun, 07/12/2020 - 15:19
💬 56 प्रतिसाद
लॉकडाऊनचा बट्ट्याबोळ जगभरात लॉकडाऊन हा वाढणाऱ्या पेशंटच्या संख्येच्या तयारीसाठी वापरला जात असताना आपल्या देशात मात्र हाच एकमेव रामबाण उपाय म्हणून वापरला गेला. कोणतेही प्लॅनिंग ना करता जाहीर केलेला लॉकडाऊन 1,2,3 असा मनमानेल तसा वाढवत नेला. त्यादरम्यान गरीब लोकांना अन्न पुरवण्याची , आपापल्या घरी पोचवण्याची कोणतीही सप्लाय चेन तयार केली नाही, 8 वाजता यायचा , राणा भीमदेवी थाटात घोषणा करायच्या आणि लोकांना त्यांच्या नशीबावर सोडून द्यायचे, बाकी कोणाचाही विरोध मोडायला मीडिया आणि सोशल आर्मी तयार असतेच. या काळात एकविसाव्या शतकात कित्येकांनी शेकडो किलोमीटर मुलाबाळांसहीत प्रवास केला , कित्येकांच्या नोकऱ्या गेल्या, धंदे बुडाले, कर्जबाजारी झाले , कित्येक जण प्रवासात मेले , आत्महत्या केल्या. जेव्हा सरकारला याचा फटका बसला, इन्कम बंद झाले तेव्हा त्यांना कळले अनलोक प्रक्रिया सुरू करायला हवी, मग तेच मीडिया आणि सोशल ट्रोल्स अनलोक कसे गरजेचे आहे हे सांगू लागले, पहिल्या दिवशी कोरोना होता तसाच आतापण आहे, मग एवढ्या प्रदीर्घ 90 दिवसाच्या लॉकडाऊनचे आणि त्यांच्या परिणामांची जबाबदारी कोणाची ? लॉकडाऊनपूर्वी जसा कोरोना होता तसाच आताही आहे, लॉकडाऊन मध्ये ना त्याचा कर्व्ह फ्लॅट झालाय ना इतर काही तयारी झाली आहे. सगळ्या गाईडलाईन्स केंद्र सरकार ठरवणार , सगळया किट्स (चायना इम्पोर्ट ) कंपल्सरी केंद्राकडून घ्यायच्या . त्याचा सप्लाय केंद्र करेल तसाच होईल. झेपेना झालाय तेव्हा केंद्र सरकारने अनलोक करून राज्यांवर जबाबदारी ढकलून दिली आहे. राज्य सरकार मध्येही सगळा शिमगाच आहे, वरतून आलेला दट्ट्या साहेब कारकूनावर टाकतो तसा त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थावर टाकला आहे. मग प्रत्येक नगरपालिका , पंचायत एवढेच काय को ऑप सोसायटी सुद्धा मन मानेल ते नियम करून बेबंदपणे वागत आहेत. सर्वसामान्य मात्र बाहेर पडले तर कोरोनाची भीती आणि घरात बसले तर उपाशी मरायची अवस्था अशा कात्रीत आहेत. परीक्षांचा बट्ट्याबोळ जेव्हा कोरोना साथ प्राथमिक स्टेज मध्ये होती , गावोगावी संसर्ग नव्हता , देशातला आकडा काहीशे मध्ये होता, तेव्हा परीक्षा घेणे धोकादायक आहे म्हणून लॉक डाऊन मध्ये परीक्षा घेतली नाही, आता मात्र सामूहिक संसर्गजन्य स्थितीत असताना केंद्र आणि बाहुले राज्यपाल परीक्षेचा आग्रह धरत आहेत. कित्येक शाळा , कॉलेज कोविड सेंटर किंवा क्वारंटाइन सेंटर मध्ये परावर्तित केले आहेत, किती पालक आपल्या मुलांना अशा ठिकाणी परीक्षा द्यायला पाठवतील ? याबद्दल राज्य निर्णय घेतेय तर राज्यपाल खोडा घालत आहेत आणि केंद्र अळीमिळी गुपचीळी धरून आहे. अभ्यास करावा की नोकरी शोधावी असा प्रश्न पडला आहे, सध्याचे केंद्रातले शिक्षण मंत्री मात्र बहुधा झोपा काढत आहेत.

प्रतिक्रिया द्या
34851 वाचन

💬 प्रतिसाद (56)
क
कपिलमुनी Tue, 07/14/2020 - 10:51 नवीन
गोट्यांना पंख लागले ! स्वतःवर शेकले कि प्रतिसादंना पंख लावले जातात .
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 07/14/2020 - 10:59 नवीन
धाग्यातील मुद्द्यांशी सहमत आहे. आपण काही मिपाकर सुरुवातीपासून लॉकडाऊनच्या घोषणेबद्दल आणि त्याच्या नियोजनाबद्दल टीका करीत आलो पण काही लोकांनी व्यक्तीगत होऊन टीका केल्या. आज काळाने त्याची उत्तरे दिली आहेत, मिळत आहेत. लॉकडाऊनमुळे देशाचं प्रचंड नुकसान झालं. आर्थिक हानी जिवीत हानी हा मोठा आकडा आहे, ती कधीच न भरणारी हानी आहे. मला परिक्षेबद्दल पुन्हा बोललं पाहिजे. पहिल्या पत्रामधे युजीसीने विद्यापीठाने ठरवावे की परिक्षा कशा घ्यायच्या त्याचं वेळापत्रक करुन नियोजन करुन घ्यावे असे म्हटले होते. तेव्हा संसर्ग असा गावागावात पोचला नव्हता त्यावेळी असे वाटले की आपल्याला परिक्षा घेता येतील. नंतर संसर्ग वाढत गेला अजूनही वाढत आहे, त्यावर महाराष्ट्र सरकारने युजीसीला पत्र लिहून प्रथम-द्वीतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना मागील सत्र परिक्षांचे निकाल पाहुन पुढील वर्षांसाठी सरासरी गुणांआधारे त्यांना प्रमोट करावे,याला मात्र युजीसीने हरकत घेतली नव्हती मात्र अंतीम वर्षाच्या परिक्षा या घेतल्याच पाहिजे असा आग्रह आता युजीसीने धरला आहे. भाजपचे पुढारी रात्रंदिवस त्या राजपालांचे उंबरे झीजवत असतात त्यामुळे हे सर्व नाटक झालं आहे, खरं तर सध्याची परिस्थिती ही परिक्षा घेण्याजोगी नाही. आताही पुन्हा महाराष्ट्र सरकारने केंद्रसरकारला पत्र लिहून परिक्षा घेऊ नका अशी विनंती केली आहे, तर भाजपाचे पुढारी युजीसीने परिक्षा घ्या म्हटलंय तर परिक्षा घ्या असा हट्ट करीत आहे. युजीसीनेही जी राज्य परिक्षा घेणार नाही त्यांच्यावर आम्ही कार्यवाही करु असे म्हटले आहे. सर्व राजकीय घोळ आणि विद्यार्थी शिक्षक यांच्या जीवाशी खेळणे आहे. मी सध्या जिथे शिकवतो त्या महाविद्यालयाचं वसतीगृह कोरंटाइन सेंटर केलं आहे. उपचारासाठी जिल्ह्याला नेण्यापूर्वी तालुक्यातील कोरंटाइन रुग्ण वसतीगृहात आणून ठेवतात. आता १२ वीचा निकाल लागल्यावर प्रवेश घ्यायला विद्यार्थी येतील. आम्हालाही जावे लागेल एकूण परिस्थिती कठीण आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
G
Gk Tue, 07/14/2020 - 18:42 नवीन
करोना डॉकटरसाठी लिलाव बोली लागत आहेत एक महिन्यांपूर्वी पगार 65000 च्या जाहिराती होत्या, मग गेल्या आठवड्यात 75000 च्या जाहिराती आल्या, आता 1 लाखाची जाहिरात
  • Log in or register to post comments
G
Gk Tue, 07/14/2020 - 19:00 नवीन
1. मोठी सरकारी हॉस्पिटल व खाजगी हॉस्पिटल कोविड हॉस्पिटल म्हणून जाहीर केली आहेत, तिथे कोविड चे उपचार होतात. सामान्य सेंटर मध्येही किमान 200 - 300 बेड असतात , 100 आय सी यु त व 100 - 200 वॊर्ड मध्ये , त्यासाठी सरकारी दवाखान्यात इतर वोर्ड सध्या बंद आहेत व फक्त कोविड पाहिले जाते, मोठ्या खाजगी हॉस्पिटलनि मंगल कार्यालये , बेंकवेट हॉल वगैरे घेतले आहेत. 2. जनरल वोर्डातही ऑक्सिजन असतो, आयसीयूत इतर उपकरणे व्हेंटि वगैरे असतात, ऑक्सिजनची डिमांड प्रचंड आहे, म्हणून बाहेर राक्षसी आकाराचे सिलेंडर बसवले जातात. Image removed. 3. प्रत्येक लोकेशन ला 2-4 डॉकटर , 5-10 नर्सेस , 4- 5 आया , वोर्ड बॉय वगैरे असतात, शिवाय फोन वरून कन्सल्टंट उपलब्ध असतात, लॅब , एक्स रे वगैरे उपलबंध असतात, जनरल वोर्डात केवळ टेस्ट पॉझिटिव्ह पण त्रास नाही , पासून ते थोडेफार धापणारे , पण ऑक्सिजन लावून बरे आहेत , अशी मोठी रेंज असते, यापेक्षा गंभीर रुग्ण आयसीयु त जातात 4. सर्व स्टाफ ppe घालतात , यात शूज कव्हर , गाऊन , ग्लोज , दोन मास्क , केप, गॉगल किंवा फेस शिल्ड असते, ते घालणे व काढणे यासाठी दोन स्वतंत्र कक्ष असतात व शेजारीच गरम पाण्याचे शॉवर सोय असते, ड्युटीला आले की सर्व घालणे , अंगात टी शर्ट व बर्म्युडा असेल तर ते घालणे सोयीचे जाते, ppe घालणे याला donning म्हणतात , एकदा ते चढवले की काहीही खाता पिता येत नाही, टॉयलेट वगैरे नाही, फक्त ड्युटी. ड्युटी झाली की ppe काढणे ह्याला doffing म्हणतात,आधी हातावर सॅनिटायझर लावायचे, काढताना एकेक वस्तू उलटी गुंडाळत काढायची म्हणजे तिचा बाह्यभाग व आपले अंग , कपडे कुठे एकमेकाला लागणार नाही , अशी खबरदारी घेऊन करावे लागते. एका मोठ्या यलो पॉलिथिन पिशवीत ते घालून पिशवीला गाठ घालून ती डिसपोज करायला द्यायची , मग लगेच गरम पाण्याने शॉवर घ्यावी लागते 5. रुगणाच्या नातेवाईकास आत यायची परवानगी नसते, मोबाईल वरून किंवा बाहेरील काउंटर च्या माध्यमातून संपर्क केला जातो. 6. साधारण 8 दिवसाने पुन्हा घशाचा स्वेब तपासतात, निगेटिव्ह असेल किंवा पॉझिटिव्ह असूनही त्रास नसेल तर पुढच्या उपचाराचा सल्ला प्रिस्क्रिप्शन लिहून डिस्चार्ज देतात, हे निर्णय कन्सल्टंट घेतात, उपचारानंतरही घरी 7 ते 21 दिवस आयसोलेशन चा सल्ला देतात Image removed.
  • Log in or register to post comments
व
वीणा३ Tue, 07/14/2020 - 22:13 नवीन
मागे अमित शाहंचं एक इंटरव्यू बघितला २-३ आठवड्यांपूर्वी. त्यात त्यांनी बऱ्यापैकी माहिती दिलीये काय काय काम केलं लोकांना घरी जायला म्हणून. त्यामुळे अजिबात काहीच केलं नाही असं म्हणवत नाहीत, पण अजून बरंच काही करू शकले असते कदाचित.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Wed, 07/15/2020 - 15:18 नवीन
* मी /(तुम्ही) / (आपण).. .. .. डॅश डॅश असतो तर कोविड-१९ संक्रमण कसे हाताळले असते ? या धाग्यावर आपल्या उत्तरांची नम्र प्रतिक्षा आहे.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा