Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

खिडकीबाहेरचं जग!

म
मन्या ऽ
Fri, 07/17/2020 - 14:15
खिडकीबाहेरचं जग! ती आपले पाणीदार डोळे किलकिले करुन खिडकीबाहेरच जग बघण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होती. शाळा-ऑफिसात जाणार्यांची गडबड,रस्त्यावरची वर्दळ, फेरीवाले हे सारं तिला एकदातरी जगता यावं. असं वाटे; पण बाहेरच्या दुनियेत मात्र तीच अस्तित्व नव्हतं.. ती आजही नेहमीप्रमाणे किरणची वाट बघत होती. खरं तिला किरणच्या सहवासात स्वतःचा जीव नकोसा होई. किरणचं तिला नको असताना उगाच जवळ घेणं, बोलतं करायचा प्रयत्न करणं.हे सारं तिला अजिबात आवडत नसे.तरी ती सहन करी.फक्त झोक्यावर बसण्यासाठी. किरण तिला झोक्यात बसवुन अखंड बडबड करे त्यावेळीही तिचं लक्ष मात्र खिडकीबाहेरच असे. आत्ताही किरण तिला उचलुन घेणार ईतक्यात आईचा आवाज येतो."बाहुलीसोबत नंतर खेळआधी हातपाय धुवून जेवायला ये बरं." -Dipti Bhagat 4thSeptember,2019

प्रतिक्रिया द्या
1439 वाचन

💬 प्रतिसाद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा