Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

माझा कोविड अनुभव

अ
अश्विनी मेमाणे
Tue, 07/21/2020 - 11:13
💬 65 प्रतिसाद
गुरुवार २ जुलै ला नवरा दुपार नंतर डोके दुखिची तक्रार करायला लागला. या वर्क फ्रॉम होम पासून त्याच्या मीटिंग्सचे प्रमाण एकंदरीच वाढले आहे. तो बऱ्याच वेळेस पूर्ण पूर्ण दिवस कॉलवर असतो. मला वाटल कदाचित या कॉल्समुळे त्रास होत असावा. क्रोसिन घेतल्यावर वाटेल ठीक. संध्याकाळी पण त्रास जाणवत होता त्याला अणि ताप बघितला तर ९९ च्या वर होता. अस वाटल की स्ट्रेस मुळे होतय मागच्या महिन्यामधे पण एकदा झाल होत. शुक्रवारी दिवसभर ताप चढत उतरत होता. प्रत्येक ४ तासाला परसटॉमल घेत होता. शेवटी संध्याकाळी एक लोकल डॉक्टरकड़े गेलो. आम्ही या एरियामधे एक वर्षा आधीच शिफ्ट झालोय. फॅमिली डॉक्टर अस काही अजुन झाल न्हवत. या लोकल डॉक्टर कड़े ३-४ वेळा जाण झाल होत. त्यांनी एंटीबायोटिक्स लिहून दिल आणि इंजेक्शन पण दिले. घरी आल्यावर घाम येऊन ताप उतरला आणि त्याला फ्रेश पण वाटायला लागल. शनिवारी सकाळी तो ठीक होता. नेहमी प्रमाणे त्याने व्यायाम पण केला. त्याला अजिबात थकवा न्हवता. राहिलेला दिवस त्याने असाच झोपुन होता. ताप चढत उतरत होता. गुरुवारी जसा ताप(९९) यायला लागला तस त्याने स्वता:ला आमच्या पासून वेगळ केले होते. फक्त जेवण्यापुरत तो खाली येत होता. आमच रो हाउस आहे अणि आमची बेडरूम वरच्या मजल्यावर आहे. डॉक्टर म्हणाले होते की जर ताप नाही उतरला तर आपण डेंगू मलेरिया टेस्ट करू. त्याला तापा शिवाय अजुन काही लक्षणे नव्हती. आम्हाला वाटत होत नार्मल फ्लू आहे. रविवारी सकाळी त्याला ९९ ताप होता आणि मलाही. मग मात्र आम्हाला शंका आली. माझ्या नवऱ्याला अजुन तापा शिवाय काहीही नव्हत. मग मात्र डॉक्टर म्हणाले की आपण टेस्ट करू. आमच्या घरी जावेच १० महिन्याच बाळ आहे अणि सासुबाई ज्यांना दम्याचा त्रास आहे म्हणून आम्हाला कोणतीच रिस्क नको होती अणि आम्ही लगेच टेस्ट करायला गेलो. आमच्या या डॉक्टर ची सह्याद्रि हॉस्पिटल ला ओळख होती त्यांनी कॉल करून सगळ अरेंज केले होते. दुपारी १२ च्या आसपास सैम्पल घेतला गेला आणि इथून आमची परीक्षा सुरु झाली. रविवारी सकाळी माझ्या नवऱ्याने ब्लड सैंपल पण दिला होता डेंगू अणि बाकि टेस्टसाठी. संध्याकाळ पर्यन्त ब्लड रिपोर्ट आले ते सगळे नार्मल होते. मला जास्त समजत नाही पण टेस्ट असते ज्याने समजत की काही इन्फेक्शन आहे का ते(CRP टेस्ट बहुदा. येथील डॉक्टर जास्त सांगू शकतील). हे पण नॉर्मल होता. आमच्या डॉक्टरच्या मताप्रमाणे ही टेस्ट नेगेटिव आहे तर covid ची टेस्ट पण नेगेटिव येण्याचे चान्सेस ४०-५०% आहेत. आमचे रिपोर्ट संध्याकाळ पर्यन्त येणार होते पण नाही आले. हे सगळे अपडेट आम्हाला आमचे डॉक्टरच सांगत होते. सोमवारी आम्ही आमच्या बेडरूम मधेच काम करायला सुरवात केली. दोघेही नार्मल होतो. तो एंटीबायोटिक्स घेत होता अणि मी फक्त परसटोमोल. ताप येत जात होता. थकवा वैगरे काही न्हवता. आम्ही घरच्यांपासून पूर्ण isolate होतो अणि दुपारी डॉक्टरचा कॉल आला की तुमचा इन्शुरन्स आहे का? या एका वाक्यात सगळ होता. आम्ही दोघेही Covid 19 पॉजिटिव होतो. आमच्या आरोग्य सेतु ऐप वर पण पॉजिटिवची नोंद झाली होती. डॉक्टरांच्या मताप्रमाणे आम्ही लगेच एडमिट व्हायला पाहिजे अणि ते आमच्यासाठी बेड अरेंज करायला तयार होते. आमची लक्षणे अजुन स्ट्रांग नव्हती आणि म्हणुन बेड occupie करायची तर अजिबात इच्छा नव्हती. दोनच दिवासपूर्वी PMC ने सौम्य लक्षणे असणाऱ्यांसाठी होम क्वारंटाइनच्या गाइडलाइन्स दिल्या होत्या. सायली राजाध्यक्ष यांची होम क्वारंटाइनची फेसबुक पोस्ट वाचलेली होती अणि त्यांनी त्याना अनुभव प्रत्येक दिवसानुसार खुप छान सांगितलेले आहे म्हणून मग कुठेतरी वाटत होता की नको एडमिट व्हायला. या दरम्यान आमच्या डॉक्टरच मत अस होता की लक्षणे वाढू शकतात तुम्ही एडमिट व्हा. याधीचा सहयाद्रिचा अनुभव खुप चांगला नाहीये. म्हणून मग घरचे सगळेच दीनानाथला जायला सांगू लागले. आम्हाला माहित होता की बेड नाही मिळणार तिकडे. तरी आम्ही तिकडे गेलो अणि सांगितला की पॉजिटिव आहोत. त्यानी फीवर ओपीडी तयार केली आहे. तिकडे सगळे पैरामीटर चेक केले अणि सांगितला की बेड नाहीये पण तुम्ही होम क्वारंटाइनच कंसलटेशन घेऊ शकता. आम्ही थोड़ा विचार करून अणि घरी बोलुन हा ऑप्शन घ्यायच ठरवल. तिकडे दोघांचे २००० घेऊन त्यांनी कंसलटेशन केले अणि घरी असतना कशी काळजी घायची याची सगळी माहिती दिली. या दरम्यान आमचा दोघांचा ताप पूर्ण उतरलेला होता अणि बाकि काही लक्षणे नव्हती. त्यांच्याच फार्मेसी मधे एक किट आहे ज्यामधे, सर्जिकल मास्क, डिसइंफेक्टर, गार्बेज बैग्स, थर्मामीटर अणि ऑक्सीमिटेर आहे. याची किंमत ३००० आहे. इथल्या डॉक्टरांनी आम्हाला झिंक,HCQ,परसटोमोल असे मेडिसिन दिले. त्यांनी आम्हाला वेगळया रूम मधे रहा हे पण सजेस्ट केले. आम्ही या गोष्टीला नाही म्हणालो. आम्हाला सोबत राहण्याची जास्त गरज होती अस आम्हाला वाटल. तरी माझ्या नवऱ्याने एक्स्ट्रा गादी जमिनीवर टाकली अणि मी बेड वापरत होते. मंगळवारी (७ जुलै) आम्ही सुट्टी घेतली. पूर्ण दिवस झोपुनच होतो. प्रत्येक २ तासाला आम्ही टेम्प्रेचर अणि ऑक्सीजन लेवल चेक होतो. ऑक्सीजन लेवल की ९५ च्या वर असणे खुप गरजेचे होते. कधी कधी रात्री जाग आल्यावर पण आम्ही हे चेक करायचो.दिवसातून एकदा थोड़ा रूम मधेच ३ मि पेक्षा जास्त वॉक नंतर पण चेक करायचो. ऑक्सीजन साचुरेशन हे वॉक नंतर पण ९५ च्या वर असत. आम्ही गरम पानी रूम मधेच करून पीत होतो. वाफ घेत होतो. इंडक्शन आम्ही वर मागवाला होता. घरचे सगळे फक्त खालचा मजला वापरत होते. आम्ही ताट रूम च्या बाहेर ठेवायचो अणि निघून गेले की मग जेवण आत घ्यायचो. पहिला पूर्ण आठवडा आम्हाला सगळ जेवण हे विचित्र लागत होते. कधी खुप खारट कधी अजिबात चव नव्हती. जेवणाची इच्छा नसायची. आम्ही पाणी भरपूर प्यायचो. दिवसातून २ वेळा काढा करून पीत होतो. १ काढा जो आयुर्वेदिक डॉक्टरने बनवाला आहे आणि दूसरा ज्या मधे गुलवेल, हळद, आल, दालचीनी,मीरे, लवंग, तूळस अणि थोड़ा गुळ असा पानी अर्ध होई पर्यंत गरम करून पीत होतो. बुधवार नंतर मला कफ आणि खोकला सुरु झाला. पण अगदीच थोड्या प्रमाणात. १-२ तासामधे एखादी उबळ येत असे. यासाठी आम्ही दीनानाथ मधे डॉक्टरांना कॉल करूँ विचारणा केली होती अणि त्यांनी फक्त ऑक्सीजन साचुरेशन वर लक्ष ठेवायला सांगितले. कॉल करण्याचे अजुन एक कारण होते की आम्हाला बघायचे होते की किती वेळामधे आम्हाला रिस्पांस मिळत आहे. या मधे PMC कडून वरचेवर कॉल येत होते अणि तब्बेतीची चौकशी केली जात होती. एकदा त्याचे लोक येऊन पार्किंग मधे फवारणी करून गेले. दुसऱ्या आठवड्यात खुपच बरे वाटत होते. पहिल्या आठवड्यात नवऱ्याला एकदाच थोडा(99) ताप आला होता. आम्ही रोज सकाळी पूर्ण रूम सानिटाइझ करत होते. योगा करायला पण सुरवात केली. वाशरूम यूज़ नंतर पण सगळे नॉब पण स्प्रै करत होते. जेवढे लांब रहता येईल एकमेकांन पासून तेवढा प्रयन्त करत होतो. या सगळ्या मधे मानसिक उतार चढाव पहिल्या ४-५ दिवसात खुप झाले. आपल्यामुळे बाळाला आईला त्रास होईल याची भीति वाटत होती. या सगळ्यामधे आम्ही पूर्ण वेळ काम केला. सुट्टी घेऊन आम्ही पूर्ण वेळ फक्त या बद्दल वचत होतो म्हणून एका दिवसाच्या सुट्टी नंतर आम्ही काम करायचे ठरवले. ऑफिसमधे कल्पना असल्यामुळे आमचे काम थोडे कमीच होते. दुसऱ्या आठवड्यात बऱ्यापैकी ठीक वाटत होते. आता हा तिसरा आठवडा आहे. आमच आइसोलेशन संपले आहे. आम्ही अजुनपण घरात मास्क वापरतो आहे. आता आरोग्य सेतु ऐप वर पण स्टेटस चेंज झाले आहे. आम्ही बरीच काळजी घेत होतो. मास्क वापरत होतो. प्रत्येक ठिकाणी पैसे दिला घेतल्यावर सानिटाइझ करत होतो. बाहेर कुठेही गरजेशिवाय गेलो नाही. माहीत नाही कुठून आम्ही इन्फेक्ट झालो. पण आम्ही दुसरे कुणालाही इन्फेक्ट नाही केला. जसा ताप यायला सुरवात झाली तस आइसोलेट झालो. इन्फेक्ट होण्याआधी मी सकाळी संध्याकाळी ३० मिन वॉक करत होते. माझा नवरा वॉक शिवाय बाकि व्यायाम अजुन करायचा. जमेल तस गरम पानी प्यायचो. कधी कधी हळद दूध पण घेत होतो. लॉकडाउनचे सुरवातीचे काही दिवस सोडता आम्ही खुप चांगला आहार घेतला. तेलकट बेकरी पूर्ण बंद होते. पावभाजी पण चपाती सोबत खात होतो. सगळी फळे प्लेट भरून रोज एकदा खात होतो. शेवटी मी एवढच म्हणेल आहे की घाबरू नका. शांत रहा. आम्हाला जास्त त्रास नाही झाला. पण आता पूर्ण काळजी घ्यायची ठरवल आहे. आधी किराणा अणि भाजीसाठी बाहेर जात होतो आता तेहि ऑनलाइन बघणार आहे. हा माझा पहिलाच लेख आहे. काही चूका असतील तर समजून घ्या.

प्रतिक्रिया द्या
36945 वाचन

💬 प्रतिसाद (65)
स
स्वच्छंद Wed, 07/22/2020 - 21:24 नवीन
आजच्या घडीला याची गरज होती. अनावश्यक भिती होती मनात, पण लेख वाचून थोडीफार कमी झाली असे म्हणायला हरकत नाही.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान गुरुवार, 07/23/2020 - 19:29 नवीन
संजय क्षीरसागर,
श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला तरच टेस्ट करा > असा सोपा ट्रेंड हल्ली चालू आहे आणि तो योग्य आहे.
या विधानाशी सहमत आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान गुरुवार, 07/23/2020 - 20:10 नवीन
अश्विनी मेमाणे, तुम्ही दोघे आजारातनं बाहेर पाडल्याबद्दल अभिनंदन व शुभेच्छा. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
र
रातराणी Fri, 07/24/2020 - 07:38 नवीन
भीतीदायक आहे अनुभव. इतके दिवस स्वतःला एका खोलीत कोंडून घ्यायची कल्पना करूनही कसेतरी झाले. तुम्ही या सगळ्यातुन संयमाने बाहेर आलात त्याबद्दल तुमचं कौतुक वाटतंय.
  • Log in or register to post comments
ह
हणमंतअण्णा शंक… Fri, 07/24/2020 - 11:04 नवीन
या काळात ताप आला की पहिलं कोविड डोक्यात यायला पाहिजे. तुम्हाला डेन्ग्यु मलेरिया वगैरे सांगून गंडवलं. लक्षणांचे प्रमाण खूप ठिकाणी असं दिलं आहे - Fever (83-99 percent लोकांना जाणवतो). Cough (59-82 percent). Fatigue (44-70 percent). Anorexia: loss of appetite (40-84 percent). Shortness of breath (31-40 percent). Sputum production (28-33 percent). Muscle aches (11-35 percent). सह्याद्री आणि दीनानाथ ह्या भिकार** हॉस्पीटल्स मध्ये गेला नाहीत हे तुमचे भाग्य.
पावभाजी पण चपाती सोबत खात होतो.
हा हा हा!! तुम्ही एरव्ही आठवड्यातून कितीवेळा पावभाजी खाता???
  • Log in or register to post comments
अ
अश्विनी मेमाणे Sat, 07/25/2020 - 17:06 नवीन
ताप आल्यावर कोविताप आल्यावर कोविड डोक्यात आलाच होता म्हणून तर माझ्या नवऱ्याने जसा ताप आला तस वेगळ करुण घेतला स्वता:ला. हे मी वर लिहल आहे. आणि बाकि काही क्लासिक कोविडची लक्षण न्हवती म्हणून मग वाटत होता नसेल ही. आणि त्याला मागच्या महिन्यात पण ताप आला होता तेव्हा कोविड न्हवता. म्हणून मग प्रत्येक वेळी ताप म्हणजे कोविड असतो अस नाही. पण दोन्ही वेळेस आम्ही विलगीकरण केलच आणि राहिला पावभाजी तर लॉकडाउन पासून आठवड्यातून एकदा तर होतिये
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर
म
मार्गी Sat, 07/25/2020 - 13:50 नवीन
जबरदस्त! हे सविस्तर लिहिल्याबद्दल धन्यवाद!
  • Log in or register to post comments
म
माहितगार Sun, 07/26/2020 - 16:23 नवीन
रोगांसाथींचा मुकाबला करण्यासाठी सर्वसाधारणपणे Test. Treat. Track (३T) हे सार्वजनिक आरोग्य यंत्रणेचे धोरण असते. त्यामुळे संसर्ग ग्रस्त व्यक्तींच्या संपर्कातील व्यक्तींना Track करून टेस्ट करणे आणि टेस्ट पॉझीटीव्ह आल्यास लक्षणे दृगोच्चर होण्या आधीच रुग्णाचे आरोग्य व्यवस्थापनाची दक्षता घेणे हा एक महत्वपूर्ण भाग असतो. उपरोक्त धागा लेखिकेच्या घरातील सदस्यांपैकी विशेषतः एक सदस्या अस्थमाप्रवण असताना लक्षण येईपर्यंत टेस्ट न करण्याचा डॉक्टरांनी खरेच सल्ला दिला का हे जरासे अचंबित करणारे आहे. दोन शक्यता असू शकतात कुटूंबातील दोनेक व्यक्तिंना संसर्ग असल्यास इतरांना तसा तो आहे असे समजून आवश्य्क प्रतिबंधक उपाययोजना सुचवून मोकळे होणे -आणि खासगी टेस्टींगचा अनावश्यक आर्थिक बोजा टाळणे, दुसरे वर डॉ. सुबोध खरेंनी शंका व्यक्त केली तसे ऑक्झीमीटर च्या वापरावर भर देणे, तिसरी एक शक्यता टेस्टींग पद्धतीतच गलथानपणा अथवा संभाव्य त्रुटीमुळे संसर्ग न झालेल्या व्यक्तीस टेस्टींगला जाऊन संसर्ग न झाला म्हणजे मिळवले अशी परिस्थीती मुळे टेस्टींग न सुचवणे अशा प्रकारच्या शक्यता असू शकतात. पण तरीही सल्ला अंशतः प्रस्थापित Test. Treat. Track (३T) हे सार्वजनिक आरोग्य यंत्रणेचे धोरण बाह्य ठरत असण्याची शक्यता असावी. अर्थात प्रत्यक्षात दिलेला सल्ला , आणि समजून घेणे व त्याबद्दल पुर्नवाच्यता यातही अंशतः अंतर असू शकावे.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 07/27/2020 - 08:11 नवीन
आमच्या सौ. आईला पण हा आजार झाला होता. जवळ्पास १५-२० दिवस तिने पण खूप त्रास सहन केला होता. इंग्रजी मध्ये एक म्हण आहे की.... common sense is not so common .... तसेच ह्या आजाराबद्दल एक समजले की, covid-19 is the most unpredictable disease .... अर्थात, हे मत माझ्या तुटपुंज्या माहितीवर आधारित असल्याने, मला ह्या विषयावर जास्त वाद घालायची इच्छा नाही.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Mon, 07/27/2020 - 16:58 नवीन
वादा वादातून सत्याची माहिती होते अशा अर्थाचे संस्कृत सुभाषित आहे
covid-19 is the most unpredictable disease ....
१) कोणती बाह्य ल़क्षणे कुणात दृगोच्चर होतील किंवा बाह्य लक्षणे दिसून येणारच नाहीत या अर्थाने वाक्य बरोबर आहे. २) कुणाला होईल या अर्थाने पुर्णतः बरोबर नाही, संसर्गजन्य आजारांचे होण्याची अनिश्चिती रस्त्यावरील अपघाताच्या अनिश्चिती सारखी असते, आपण स्वतः वाहन चालवण्याच्या सर्व दक्षता घेतो तशाच पद्धतीने स्वतःबाबतीत सर्व दक्षता घ्यावयास हव्यात आणि सर्वांनाही तसेच सांगून सर्वजण आदर्श वागले तर अपघात होण्याची शक्यता त्या प्रमाणात कमी होते. ३) झाल्या नंतर किती यशस्वीपणे बरा होईल ते मात्र अनेक उपजत शारीरीक क्षमता, शारीरीक स्वास्थ्याची काळजी किती घेतलेली आहे, सुयोग्य औषधोपचारांची सुप्रशिक्षीत अनुभवी डॉक्टरांकडून वेळेत ऊपलब्धता यावर अवलंबून असावे किंवा कसे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
म
मुक्त विहारि Mon, 07/27/2020 - 19:53 नवीन
करोना बाबत कुणालाच काहीही ठाम पणे सांगता येत नाही....कावीळ, विषमज्वर, हिवताप ह्या अशा आजाराबाबत ठोस लक्षणे असल्याने, आजार ओळखणे आणि औषधोपचार करणे सोपे जाते.पण करोना बाबत ठाम अशी कुठलीच लक्षणे नाहीत. (सध्या तरी डोंबिवली सारख्या जागतीक केंद्रात, हा रोग पचवून फिरत असलेल्या व्यक्ती पण कमी नसतीलही... आमच्या सौ.ने ३ दिवसात ह्या रोगावर मात केली तर आमच्या पिताश्रींनी हा रोग व्यवस्थित पचवला..... सौ. आईला करोना झाल्यामुळे वडीलांची आणि बायकोची, दोघांची पण टेस्ट घेतली.वडीलांची टेस्ट नकारार्थी आली तर बायकोची होकारार्थी... बायकोने ३ दिवसांनी परत टेस्ट केली तर ती नकारार्थी आली.... डोंबिवली फिव्हरच्या बाबतीत पण असेच घडले होते.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
R
Rajesh188 Mon, 07/27/2020 - 17:47 नवीन
हे सरकारी निर्देश च आहेत असे वाटते. कारण मुंबई,ठाणे मध्ये सुद्धा घरात covid19 positive निघाला तरी बाकी फॅमिली member madhye lakshan नसतील तर टेस्ट करू नका असाच सल्ला दिला जातो. पण विलागीकरान चा सल्ला मात्र दिला जातो. लक्षण च नसतील तर उपचार काय करणार. फक्त संसर्ग वाढू नये म्हणून विलग होणे हे योग्य वाटत.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Mon, 07/27/2020 - 18:15 नवीन
आकडेवारी कमी दाखवणे आणि सरकारी यंत्रणेवरील ताण कमी ठेवणे यासाठी खायचे आणि दाखवायचे दात मंत्रालय+ सचिवालय मिळून करू शकते. कारण आजार वाढण्यात जनतेची चूक होत असली तरी जनता कबूल करत नाही आणि अपयशाचे खापर राजकारणी आणि अधिकार्‍यांवर येण्याची शक्यता असते त्यासाठी आकडेवारी कमी ठेवण्यासाठी केलेला जुगाड असू शकेल पण टेस्टींग्स कमी करणे शास्त्रीय आणि वैद्यकीय दृष्ट्या योग्य मार्ग नसावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188
म
माहितगार Tue, 07/28/2020 - 16:30 नवीन
....आणि विषाणु पेशीत शिरल्यावर लक्षणं दिसायला लागतील........
वरील एका प्रतिसादातील वाक्यांश वैद्यकीय दृष्ट्या कितपत नेमका आणि बरोबर आहे हे वैद्यकीय जाणकारांकडून समजून मिळू शकेल ?
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस गुरुवार, 07/30/2020 - 08:24 नवीन
लेखिकेचा अनुभव रोचक आणि माहितीपूर्ण पण तरीही.. ह्या धाग्यावर मिपाचे दोन धुरंदर आयडी फालतू वितंडवाद घालत असल्याचे बघून मनोरंजन झाले.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा