पाककृती

तरबूज / खरबूज ज्यूस musk melon juice

Primary tabs

लागणारा वेळ:
३० मिनिटे

लागणारे जिन्नस:
टरबूजे , लिम्बु, संतरे गर
साखर
मीठ
चाट मसाला
आले किसुन
पाणी

क्रमवार पाककृती:
3 टरबूजे घेतली , musk melon
वरुन छोटीशी स्लाइस कापून घेतली.
आतील बिया काढून टाकल्या.
चमच्याने सगळा गर काढून घेतला. अर्धा लिम्बु पिळला.
एक संतरेही ढकलुन दिले.
मिक्सरमध्ये गर , साखर , मीठ, आल्याचा किस, अर्धा चमचा चाट मसाला घालून फिरवले, अगदी किंचित पाणी घातले.

टरबूजाच्या कवटीतच ज्यूस ओतुन घेतला.
चियर्स

T

Tj

श्वेता२४

शेवटचे दोन फोटो छान आहेत. पण एकाच ओळीत ठेवण्यापेक्षा वर खाली ठेवले असते तर जास्त स्पष्ट दिसले असते.

हुप्प्या

टरबूज म्हणजे कलिंगड आणि खरबूज म्हणजे तुमच्या फोटोत दिसणारे शेंदरी गर असणारे फळ.