Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

नुसत्या वाफेने करोनाचे विषाणू मरतात?

क
किसन शिंदे
गुरुवार, 07/23/2020 - 11:25
💬 112 प्रतिसाद
गेल्या महिन्यात फेसबूकवर पोस्ट वाचली होती. गरम पाणी पिऊन अन्ननलिकेतला वायरस तुम्ही माराल, पण श्वसननलिकेतला वायरस मारायचा असेल तर वाफ घेणे किती गरजेचे आहे. त्यासाठी मग पॅरानेझल सायनस काय, लाॅकिंग मेकॅनिझम काय अशा शब्दांची पेरणी त्या पोस्टमध्ये केली होती. दिवसातून किती वेळा बाहेर बोंबलत हिंडताय, त्यावर किती वेळा आणि कोणत्या तापमानाची वाफ घेतली म्हणजे तुम्हाला करोना होणार नाही आणि झाला तरी त्याचे विषाणू फुप्पुसात जाण्याआधीच मरून जातील वैगेरे थोर(?) ज्ञानामृत लोकांना वाटण्याचे काम त्या लेखकांना करायचे होते बहुधा. हीच पोस्ट काही दिवसांनी व्हाॅट्सअपवरही तुफान वायरल झाली होती. मला स्वतःला नातेवाईकांच्या, सोसायटीच्या, मित्रांच्या अशा किमान दहा ग्रुपवर ही पोस्ट फाॅरवर्ड म्हणून आली होती. व्हाॅट्सअपवरच्या सगळ्याच गोष्टी खऱ्या असतात आणि त्यावर विश्वास ठेवायचा असतो अशी एकुणात आपल्या भारतीय लोकांची मानसिकता झालीये गेल्या काही वर्षात. व्हाॅट्सअपवरचे मॅसेजेस, मग ते नासाच्या तुटणाऱ्या ग्रहांचे असोत, युनेस्कोने जाहीर केलेल्या राष्ट्रगीताचे असोत, वा पाच तोंड असलेल्या शेषनागाच्या दर्शनाचे असोत, आपली लोक त्यावर शंभर टक्के विश्वास ठेवून, डोळे झाकून आणखी शंभर लोकांना पुढे ढकलून देणार. अगदी त्याच मानसिकतेतून आपल्या लोकांनी वाफ घेण्याच्या गोष्टीची शहानिशा न करता, बहुतेकांनी अडगळीत पडलेले स्टीमर शोधून काढले. काहींनी लगोलग मेडिकल गाठून नवे विकत आणले, आणखी काहींनी अॅमेझाॅनवर चांगल्या प्रतीचे स्टीमर आॅर्डर केले आणि औषधांचा डोस घेतो त्याप्रमाणे सकाळ-दुपार-संध्याकाळ वाफ घ्यायला सुरूवात केली. केवळ उत्सुकतेपोटी, नाकाच्या पाठी हे अशा प्रकारचे पॅरानेझल सायनस असते का? त्याचे लाॅकिंग मेकॅनिझम म्हणजे नेमके काय? आणि त्यातून खरंच विषाणू थेट फुप्पूसात जावू शकतात हे मी गुगलबाबाला विचारून पाह्यले, पण शेवटी गुगलबाबा म्हणजे कुणी डाॅक्टर नव्हे असं स्वतःची समजूत घालून तो नाद सोडला आणि गपगुमान दुसऱ्या दिवशी मेडिकलमधून साधे स्टीमर विकत घरी आणले. या मॅसेजच्या वायरलनंतर काही दिवसांनी कूपर हाॅस्पीटलच्या दोन डाॅक्टरांमधला संवाद म्हणून एक आॅडीओ क्लिप व्हाॅट्सअप युनिवर्सिटीवर पसरू लागली. इतके दिवस दुर्लक्षित केलेली ती क्लिप आज सकाळी प्रत्यक्ष एेकली आणि आपला बेंबट्या झाला आहे याची शंभर टक्के खात्री पटली. त्या एकंदर संवादात त्यातल्या कथित डाॅक्टर भोसलेंच्या तोंडून निघालेला प्रत्येक शब्द हा त्या मॅसेजमधलाच होता. अगदी समोर मॅसेज ठेवून वाचत असल्यासारखा, फक्त अविर्भाव मात्र विश्वातले मोठे गुपीत सांगितल्यासारखा होता. खरेच डाॅक्टर होते कि व्हाॅट्सअॅप युनिवर्सिटीतल्या फाॅरवर्ड्समधून शिकलेले स्वयंघोषित डाॅक्टर होते, ते त्यांचे त्यांनाच ठाऊक. आधी वायरल झालेल्या मॅसेजप्रमाणेच, क्लिपमधल्या संभाषणातली ती व्यक्तीही लोकांपर्यंत अर्धवट आणि चुकीची माहिती पोहचवत होती. एकुणातच आधीच्या मॅसेजमुळे आणि या आॅडीओ क्लिपमुळे, लोकांच्या घाबरलेल्या मानसिकतेला अशा सगळ्या खोट्या गोष्टींतून खतपाणी घालून वेगाने गैरसमज पसरवण्याचे काम आपोआप झालेय यात काही शंकाच नाही. डाॅ. संग्राम पाटील यांचा या संदर्भातला युट्यूबवर व्हिडिओ आहे. त्या क्लिपमधल्या तीन महत्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी स्पष्टीकरण दिलेले आहे. त्यातला आवर्जून लक्षात घेण्याजोगा असा दुसरा मुद्दा म्हणजे, ४०° ते ६०° तापमानातली वाफ घेण्यामुळे करोनाचे विषाणू मरत नाहीत, तर त्यामुळे आपलाच चेहरा भाजण्याची शक्यता जास्त होते. करोनाचा विषाणू ७०° किंवा त्यावरील तापमानात जिवंत राहू शकत नाही आणि त्याखालील तापमानाची वाफ घेतली तर त्यामुळे आपल्याला भाजण्याचे चान्सेस जास्त या गोष्टीला अधोरेखित करणे महत्वाचे. करोनाचा विषाणू सुरूवातीचे तीन-चार दिवस घशात/पॅरानेझल सायनसमध्ये राहतो आणि तिथून मग फुप्पूसात शिरतो वैगेरे आॅल बुलशीट !! ट्रेकिंग करताना सर्वात पुढे वाटाड्या चालत असतो आणि त्याच्या मागोमाग इतर लोक चालत असतात. ठरलेल्या ठिकाणी पोचण्यासाठी, ज्या दिशेेने वाटाड्या वाटेने चालत राहील, त्याच्या पाठोपाठ जात रहायचे एवढेच लोकांना ठाऊक असते. पुढे मग तो वाटाड्या चुकीच्या वाटेने चालत राहीला, तरी डोक्याने सारासार विचार करणे थांबवून लोक चुकलेल्या वाटेवरून चालतच राहतात, प्रश्न न करता !! वाट चुकल्याचे जेव्हा कळते, तेव्हा शारीरिक त्रास तर होतोच पण त्यापेक्षा जास्त मानसिक त्रास होतो. फेसबूक, व्हाॅट्सअॅपसारखी समाजमाध्यमे ही त्या वाट चुकवलेल्या वाटाड्यासारखी झालीयेत सध्या. जनता सारासार विचार न करता, चुकीच्या गोष्टींमागे डोळे बंद करून पळते आहे निव्वळ !! सध्याच्या कठीण काळात, शारीरिक स्वास्थ्य व्यवस्थित ठेवण्यासोबतच अशा सगळ्या सरसकट येणाऱ्या मॅसेजेसकडे डोळस नजरेने बघणेही तितकेच महत्वाचे ठरणार आहे. - किसन शिंदे

प्रतिक्रिया द्या
54144 वाचन

💬 प्रतिसाद (112)
व
वीणा३ Tue, 07/28/2020 - 17:46 नवीन
एखाद्या आधीच उपलब्ध असलेल्या सरकारी वैद्यकीय वेबसाईट वर प्रत्येक औषधाचे बरोबर दर टाकणं आणि त्याची माहिती लोकांपर्यंत पोचवणं अशक्य नाहीये. आणि एखाद रुग्णालय जास्त दर आकारत असेल तर, लोकांनाच बिल पाठवायला एखादा ईमेल / फॅक्स नंबर दिला तरी लगेच भरपूर माहिती गोळा होऊ शकेल. अगदी एखाद्या माहिती असलेल्या सामान्य माणसाने अशी लिस्ट करून जगप्रसिद्ध वॉट्सअँप युनिव्हर्सिटी मध्ये टाकली तरी भरपूर लोकांपर्यंत जाईल. किमान लोक रुग्णालयात भरपूर प्रश्न तरी विचारायला लागतील.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 07/29/2020 - 15:16 नवीन
प्रत्येक औषधाचे बरोबर दर टाकणं औषधांचे जास्तीत जास्त विक्री मूल्य हे त्यावर लिहिलेलेच असते. मुळात त्याची जेंव्हा कमतरता भासते तेंव्हा काळा बाजार होतो आणि हे करणारे लोक डॉक्टर नसून केमिस्ट असतात. कारण रुग्णालये रुग्णांच्या नातेवाईकांना सांगतात कि हे औषध आमच्याकडे उपलब्ध नाही तुम्ही बाहेरून घेऊन या. मग रुग्ण इकडे तिकडे केमिस्ट कडे चकरा मारतो तेंव्हा कोणी तरी त्याला औषध कुठे मिळू शकेल हे सांगतो. Rs-60000-for-a-rs-5500-vial-how-remdesivir-black-market-thrives-as-covid-cases-rise https://theprint.in/health/rs-60000-for-a-rs-5500-vial-how-remdesivir-black-market-thrives-as-covid-cases-rise/468695/ रुग्णालये आपल्या औषधालयात सर्वात महाग असलेला ब्रँड ठेवतात ( जो बहुतेक वेळेस बहुराष्ट्रीय कंपनीचा असतो) कारण साधारण केमिस्टला १५ ते २० % अधिकृत कमिशन असते खालील दुवा पहा यात एकच औषध रुपये १९९ पासून ते रु १०५७ किमतीला आहे. https://sastimedicine.com/salt-alternatives/15218-2877194/Piperacillin-4000mg-2B-Tazobactam-500mg-Price-Dosage-Side-Effects-and-Generic-Alternatives-its-cost येथे रुग्णालयाने २०० रुप्याचे औषध ठेवले तर त्यांना ४० रुपये फायदा होतो त्यापेक्षा १०५७ रुप्याचे औषध असले तर २१० रुपये नक्त फायदा होतो. आणि हे अधिकृत रित्या असते. हे औषध कोणत्या कंपनीचे आणायचे हे व्यवस्थापन आणि खरेदी विभाग ठरवत असतो ज्यात उपचार करणाऱ्या डॉक्टरांचा सहभाग "नसतो." औषध "चांगल्या कंपनीचे" आहे एवढेच ते पाहू शकतात. या परिस्थितीत ना रुग्ण ना उपचार करणारा डॉक्टर काही करू शकतो या सारख्या बाबींमुळे रुग्णालयातील उपचार महाग होत जातात. मग ते कॉर्पोरेट असो किंवा खाजगी याला नेमका उपाय काय आहे हे डॉक्टरांच्या परिषदात बराच उहापोह झाला आहे( कारण महाग उपचाराना बहुतेक वेळेस डॉक्टरांनाच जबाबदार धरले जाते). परंतु त्याचे नक्की उत्तर सापडलेले नाही.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Wed, 07/29/2020 - 16:22 नवीन
डॉक्टर खरे ह्यांच्या मताशी सहमत आहे. महाग उपचार ह्याला फक्त डॉक्टर जबाबदार नाही बाकी अनेक लोक त्या मध्ये सहभागी आहेत. मोठमोठ्या औषध कंपन्या ज्या जास्त कमिशन देवून बाकी चांगल्या स्वस्त औषध निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना आर्थिक नुकसान पोचवतात आणि त्यांना काम करणे अवघड करतात ह्या विषयी स्पष्ट नियम सरकार नी करावा .की इतकेच कमिशन देता येईल. दुसरे काळा बाजार करणारे जे साठा करून ठेवतात. आणि थोडा फार डॉक्टर चा सहभाग असतो. आता सरकार नी जेनेटिक औषध विकण्या साठी सुविधा निर्माण केल्या आहेत. त्या च नुसार सरकार नी काही औषध दुकाने चालू करावीत.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 07/30/2020 - 06:29 नवीन
स्पष्ट नियम सरकार नी करावा .की इतकेच कमिशन देता येईल. सरकारने स्पष्ट नियम केलेले आहेत. DPCO किंवा औषध किंमत नियंत्रण कायदा आहे. पण त्यात सर्व औषधे येत नाहीत. नवीन औषध त्या सूचित टाकण्यास वेळ लागतो आणि आपले औषध या सूचित टाकण्यासाठी भरपूर कालापव्यय कसा होईल हे कंपन्या नेहमीच पाहत असतात अर्थात सरकारी अधिकारी यात भरपूर मलिदा घेतातच. त्यातून उत्तम औषधे DPCO किंवा औषध किंमत नियंत्रण कायद्यात आली कि कंपन्या त्याचा प्रचार आणि प्रसार थांबवतात. ती औषधे केमिस्ट कडे "उपलब्ध" होत नाहीत. उपलब्ध असली तरी आपले जास्त किमतीचे उत्पादन लिहावे म्हणून डॉक्टरांना आमिषे दाखवली जातात. आणि एवढा सगळं झाल्यावर सुद्धा एखादे औषध स्वस्त आहे म्हणजे ते फालतू आहे असा आपल्या जनतेचा गैरसमज करून दिला गेला आहे. भाई साहब , सस्ती चीज और याचंही चीज मी फरक होता है हे याचेच द्योतक आहे. रुग्ण सुद्धा सर्रास डॉक्टरांना सांगतात डॉक्टर जरा चांगलं महागाचं औषध लिहून द्या कोणत्याही सरकारी कामात भ्रष्टाचार झाला नाही असे होतच नाही अशी परिस्थिती झाली आहे.
  • Log in or register to post comments
ड
डॅनी ओशन गुरुवार, 07/30/2020 - 09:05 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
प
प्रचेतस Wed, 08/05/2020 - 06:33 नवीन
मिपाचे दोन सुशिक्षित सदस्य येथे एकमेकांची लायकी काढत असल्याचे बघून मनोरंजन होतेय, संपादकही कुठे गायब झाले काही कळेना.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 08/05/2020 - 06:48 नवीन
करोना वाफेने मरतो की नै ते नै सांगता येणार, पण दोन सन्माननीय सदस्यांच्या प्रतिसादांमधे तो जर आला तर नक्की मरेल असे वाटते. :) (हलकेच घ्या) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर गुरुवार, 08/06/2020 - 08:53 नवीन
पण पंचांच्या दुर्लक्षीकरणाचा फायदा घेऊन पैलवानांनी स्वतःच रिंगणात येऊन, पुन्हा नवा डाव टाकला आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
M
mrcoolguynice Wed, 08/05/2020 - 10:59 नवीन
धाग्याचे तात्पर्य : नुसत्या वाफ घेण्याने, मानवी शरीरातील कोरोना व्हायरस मरत नाही. कारण, जर नुसत्या वाफेने कोरोना व्हायरस मेला असता, तर, कोरोनामुळे देशाला लॉकडाऊन मध्ये टाकणाऱ्या मोदींजींना, महामुर्ख म्हटले गेले असते.
  • Log in or register to post comments
म
माहितगार गुरुवार, 08/06/2020 - 08:36 नवीन
धाग्याचे तात्पर्य : नुसत्या वाफ घेण्याने, मानवी शरीरातील कोरोना व्हायरस मरत नाही.
पूर्णतः सहमत
शेपुट: डोळे आणि त्वचेला ईजा न होऊ देता वाफ घेणे, जल नेती, कोमट पाण्याने स्नान ईत्यादी मानवी शरीरास पुरक सहाय्यकारी ठरू शकते. संदर्भ: १) BMC seven hills hospital Corona claim on steam therapy) २) जलनेती बद्दल दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या संशोधन संपून अहवालाची वाट पहा संदर्भ डॉ. धनंजय केळकरांचे व्याख्यान ३) Turning up the heat on COVID-19: heat as a therapeutic intervention
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mrcoolguynice
स
सुबोध खरे गुरुवार, 08/06/2020 - 06:04 नवीन
लॉक डाऊन करणाऱ्या इतर देशात श्री मोदी नसताना तिथे का लॉक डाऊन केला आहे? कि श्री मोदी हे जगाचे नेते आहेत? आपल्याला नक्की काय म्हणायचे आहे?
  • Log in or register to post comments
आ
आंद्रे वडापाव गुरुवार, 08/13/2020 - 09:25 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा