Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

राम मंदिर शीलान्यास

N
Nitin Palkar
Wed, 08/05/2020 - 07:23
🗣 9 प्रतिसाद
राम जन्मभूमी शिलान्यास एक हजार वर्षांनंतर आज अयोध्येत सबल हिंदू एकतेचे प्रदर्शन होत आहे. एकवीस वर्षांच्या प्रदीर्घ न्यायालयीन लढाई नंतर सम्पूर्णपणे संसदीय मार्गाने, परकीय आक्रमकाने उद्धवस्त केलेल्या मंदिराचे पुनर्निर्माण आज सुरू होत आहे. प्रत्येक हिंदू माणसासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. 'शांतीप्रिय धर्माचे लोक आक्रमकपणे संघटीत होत असताना निद्रिस्त हिंदूंनी जागे होण्याचा हा क्षण आहे. राम मंदिराच्या निर्माणाने कोरोना जाईल का असले प्रश्न विचारून तोंड वाकडे करणाऱ्यांना या देशाची नाळ कधीच समजली नाही. आज देशात जे चैतन्य दिसतंय ते जाणवू शकत नसणाऱ्या अकलेच्या अंधांनी डोळ्यांचा आणि डोक्याचाही इलाज करून घ्यायला हवा. साडेतीनशे वर्षांपूर्वी मोगलांची आक्रमणे आणि ब्रिटिशांचा चंचूप्रवेश सुरु असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे जे औचित्य होते तेच आजच्या या शीलान्यासाचे आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाने 'या भूमीच्या, या धर्माच्या रक्षणासाठी एक सार्वभौम राजा अवतरला आहे' असा संदेश तत्कालीन भारतवर्षात पसरला. गलितगात्र हिंदू समाजात एक चेतना निर्माण झाली. हाच संदेश आजच्या निद्रिस्त हिंदूंनी घेणे गरजेचे आहे. जातीयवाद, प्रांतवाद विसरून प्रत्येक भारतीयाने मी प्रथम एक भारतीय आहे हे स्वतःला आणि इतरांनाही सांगणे आवश्यक आहे. आज दुपारी बारा वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी संपन्न होणारा हा सोहोळा सर्व कुटुंबियांसह दूरदर्शनवर बघावा, अनुभववा. या योगे घरातील पुढच्या पिढीला हिंदुत्वाचे संस्कार देण्याची संधी साधावी. ।।जय श्री राम।।
वर्गीकरण
जनातलं मनांतलं

प्रतिक्रिया द्या
3576 वाचन

💬 प्रतिसाद (9)
म
माझा_डूआइडी Sun, 08/09/2020 - 12:02 नवीन
हाच धागा मागे का राहू द्यावा म्हनून हा प्रतिसाद!
  • Log in or register to post comments
अ
अथांग आकाश Sun, 08/09/2020 - 16:35 नवीन
।।जय श्री राम।।
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Tue, 01/02/2024 - 11:04 नवीन
22 जान ला अयोध्येत मोठा सोहळा होतोय, एक स्वप्न साकार होतेय, सर्वांनी यात सहभागी होऊन हा क्षण साजरा करुयात
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 01/02/2024 - 12:33 नवीन
जय श्रीराम...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
L
llपुण्याचे पेशवेll Tue, 01/02/2024 - 11:24 नवीन
अयोध्या मुक्त झाली. आता काशी, मथुरा, नारायणेश्र्वर, पुण्येश्वर हळू हळू मुक्त होतील. हिंदू जागा होऊन हे सगळे परत मिळवेल अशी खात्री आहे.
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Wed, 01/03/2024 - 12:00 नवीन
अयोध्या मुक्त झाली. आता काशी, मथुरा, नारायणेश्र्वर, पुण्येश्वर हळू हळू मुक्त होतील. हिंदू जागा होऊन हे सगळे परत मिळवेल अशी खात्री आहे.
+१०८
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
अ
अहिरावण Wed, 01/03/2024 - 15:49 नवीन
मिळवेल आणि टिकवेल अशी आशा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
म
मुक्त विहारि Sat, 01/06/2024 - 10:02 नवीन
काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांच्या हाती सत्ता गेली की, परत एकदा, हिंदुंना फाट्यावर....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अहिरावण
व
वेडा बेडूक Tue, 01/02/2024 - 11:27 नवीन
22 जानेवारीचा ऐतिहासिक दिवस: राम मंदिर प्राण प्रतिष्ठा https://misalpav.com/node/51865
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा