अविनाश कुलकर्णी.. भावपुर्ण श्रद्धांजली.
आत्ताच fb वर ऑर्कुट मित्राने सांगितले की आमचे चिरतरुण मित्र, आपले लाडके मिपाकर, अविनाश काका यांचे 30 तारखेला निधन झाले..
देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो.. भावपुर्ण श्रद्धांजली..
अविनाश काका आणि आमची खरी भेट ऑर्कुट वर झाली. नंतर कित्येक संध्याकाळ आम्ही म्हात्रे ब्रिज वरील multi spice मध्ये भेटायचो.. किती गप्पा.. किती चांगले सल्ले पण दिले त्यांनी मला.. घराबद्दल.. लग्नाबद्दल.. किती गोष्टी.. त्यांच्या कारखाण्यांचे दिवस सांगायचे ते बऱ्याचदा.. फॉरेन ला असलेल्या मुली बद्दल पण मस्त बोलायचे..
नंतर हॉटेल विश्व् ला आम्ही मी आणि ते चहा आणि टोस्ट खायला भेटायचो.. एकदा काकी पण आल्या होत्या.. आता डोळ्यासमोरून जात नाहीयेत.
मिपावर पण मज्जा आली त्यांच्या मुळे..
अलीकडे संपर्क कमी झाला होता, नेमके करोनाच्या आधी त्यांना मी फोन केला होता, आणि काका भेटूयात पुन्हा असे ठरवले होते.. पुन्हा तसेच दिलखुलास बोलणे झाले, पण शेवटची भेट मात्र शेवटी राहिलीच..
नेमके, आत्ताच मी त्यांची कविता कुठल्याश्या कवितेवर दिली होती..
'कारण लग्न करून तू सासरी गेली आहे.. 'ती त्यांची खरी कविता होती, कारण त्यांच्या बोलण्यातून मी कारखान्याचे, घाईचे वर्णन ऐकलेले होते..
आणखीन आता बोलू शकत नाही.. वाईट वाटले .
देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो..
http://misalpav.com/user/2594
💬 प्रतिसाद
(60)
ख
खेडूत
गुरुवार, 08/06/2020 - 14:54
नवीन
हरि ओम!
त्यांच्या आत्म्यास सदगती लाभो.
- Log in or register to post comments
न
नेत्रेश
गुरुवार, 08/06/2020 - 19:40
नवीन
अ.कु. गेले यावर विश्वासच बसत नाही
- Log in or register to post comments
ब
बिपीन सुरेश सांगळे
Fri, 08/07/2020 - 07:50
नवीन
भावपूर्ण श्रद्धांजली
माणूस कळायच्या आधीच निघून जातो ...
- Log in or register to post comments
च
चांदणे संदीप
Fri, 08/07/2020 - 10:37
नवीन
कोणी काहीही बोलले/लिहिले तरी त्यांच लेखन चालूच असायचं ते पाहून विशेष वाटायचं.
अकुकाकांना श्रध्दांजली.
सं - दी - प
- Log in or register to post comments
ज
जेडी
Sun, 08/09/2020 - 19:46
नवीन
भावपूर्ण श्रद्धांजली
- Log in or register to post comments
अ
अथांग आकाश
Mon, 08/10/2020 - 05:02
नवीन
अकुकाकांना भावपुर्ण श्रध्दांजली _/\_
- Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी
Sun, 08/16/2020 - 12:39
नवीन
अरेरे, वाईट झालं.
श्रद्धंजली!!
- Log in or register to post comments
च
चलत मुसाफिर
Sun, 08/30/2020 - 16:01
नवीन
अकुंच्या मूळ लेखाइतकेच मिपाकरांचे त्यावरील प्रतिसाद वाचनीय असायचे. मी प्रतिसादांच्या संख्येवर लक्ष ठेवुन असे. किमान 25-30 प्रतिसाद झाले की मगच लेख वाचायला घ्यायचा. एका अर्थाने वाचकाभिमुख लेखक! महत्त्वाचे म्हणजे प्रतिसादकर्त्यांनी कितीही टांग खेचली तरी कुलकर्णी यांच्याकडून कधिही गैर शब्द आला नाही. माझी प्रत्यक्ष ओळख नव्हती पण त्यांचे मिपावरील व्यक्तिमत्त्व हे अतिशय सरळमार्गी व आनंदी असे होते.
- Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा
Fri, 10/01/2021 - 14:39
नवीन
वर्ष होऊन गेले !
अकुजींना भावपुर्ण स्मरणांजली !
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Fri, 10/01/2021 - 18:53
नवीन
अकुना भावपुर्ण स्मरणांजली !
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2