Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आठवणी..

प
प्रमोद पानसे
Sat, 08/08/2020 - 16:30
💬 5 प्रतिसाद
उगवत्या आणी मावळत्या सुर्याच्या वेळा वेगवेगळ्या भाव भावनांचे प्रतिनिधित्व करतात हे समजायचं ते वय नव्हतं. सकाळी उत्साहात उठून शाळेच्या गडबडीत असलेला मी जेंव्हा घरासमोरच्या अंगणात आजोबांच्या देवपुजेसाठी फुलं तोडायला जायचो ,झाडांच्या गर्दितुन पुर्वेकडे उगवलेल्या सुर्याची किरणं पाणी तापवायच्या बंबातुन निघालेला धुर कापत अंगणात यायची.त्या किरणांच्या फांद्यांमधुन डोकावणार्या सरळ रेषा अस्ताव्यस्त पसरलेल्या धुराला एका मर्यादेत आखताहेत असं वाटायचं. तो धुराचा आणी किरणांचा खेळ बघत घाईघाईने फुलं गोळा करुन देउन मी घरामागच्या भिंतीवरुन उडी मारत शाळेत जात असे. बारा वाजता शाळा सुटली की जेवण करुन शिकवणी आणी नंतर हुंदडणे हाच एक दिनक्रम असायचा. खेळण्या भटकण्यात दिवस छान जात असे.पण संध्याकाळी मावळतीच्या वेळेस का कुणास ठाउक उगाचच उदास वाटु लागे.वर्हंड्यातुन डोंगरा आड जाताना दिसणारा तांबडा भडक सुर्यगोल , गदगदुन येणारी कातर वेळ, अस्वस्थता सगळंच विचीत्र. आजी ,काका विचारत असंत 'काय होतय ? ' .पण काही सांगायला गेलो तर ओठ थरथरु लागत ,रडु येइल या भितीने मी आवंढा गिळत गप्प रहात असे.तसं कारण त्यांनाही माहित होतं .त्या वयात आईची आठवण येणे हे खुप नॕचरल फिलींग होतं.दिवसभराच्या गडबडीत लक्षात न येणारी ती भावना नेमकी मावळत्या सुर्याची साक्षच का गृहित धरते हे कोडं अजुनही सुटलेलं नाही.बहुतेक म्हणुनच त्यावेळेला कातरवेळ असं नाव असावं . लिहितानाही कातर झालोय

प्रतिक्रिया द्या
2374 वाचन

💬 प्रतिसाद (5)
र
रातराणी Sat, 08/08/2020 - 22:27 नवीन
:(
  • Log in or register to post comments
स
सत्य धर्म Mon, 08/10/2020 - 10:38 नवीन
छान
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Wed, 08/12/2020 - 13:57 नवीन
व्वा, मस्त लिहिलंय ! मी देखील अशी कातरवेळ बालपणी कित्येकदा अनुभवलीय ! या लेखामुळे त्याचा पुनःप्रत्यय आला. कृत्रीम प्रकाशाचा सुळसुळाट तेव्हा झाला नव्हता, परिसरात वृक्ष देखील बरेच असायचे, परतीच्या पक्षांच्या किलबिलाटात अंधुरकी दिशा एक अनामिक भीती निर्माण करायची मनात ! आता शहरात संध्याकाळ कधी झाली तेच कळत नाही. कातरवेळेचा अनुभव क्वचित येतो ! कधी सुर्य उगवतो आणि कधी मावळतो याचे भानच नाही राहिलेले ! लेखन आवडले ! आणखी असे लेखन वाचायला आवडेल !
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु Wed, 08/12/2020 - 18:09 नवीन
भावनिक करणारं लिखाण आहे पण फारच त्रोटक लिहिले आहे. आजी/आजोबा/काका ह्यांचे उल्लेख आले आहेत आणि आईची आठवण येते असा उल्लेख आहे. संदर्भ कसा लावायचा? तुम्हीच स्पष्टीकरण दिले तर उलगडा होईल.
  • Log in or register to post comments
प
प्रमोद पानसे गुरुवार, 08/13/2020 - 11:39 नवीन
कोल्ड्रींक टाकून व्हिस्कीची चव जाते.......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा