अंधेरी, सेनस्केस आणि ट्रेन
💬 प्रतिसाद
(32)
प
पाषाणभेद
Mon, 08/24/2020 - 07:07
नवीन
शेअर च्या गोष्टीला शेअर करू का?….अन शेअर केली तर माझा शेअर किती अन तुमचा शेअर किती?….असं शेअर शेअर खेळलं तर किती ठिकाणी हे शेअर शेअर होईल?….शेअर करू का नको?….नकोच करायला….उगाचच काही कॉपीराईटचा लोचा झाला तर….नको अडकायला….अन अडकलो तर बाहेर पडायचे कसे….करतोच शेअर….एका शेअरने काय होणार?….अनेकदा शेअरचा लेख शेअर केला पाहीजे….अन अनेकांनीही!….
स्क्रीप्ट कोणती होती हो या शेअरची? अन पन्नास टक्क्यांनी तुटणारा अन शंभर पॉईंटने खालीवर होतांना सर्कीट लागले नव्हते काय?
गोष्ट छान आहे. त्याची तगमग रंगवलेली आहे. असेच होते थोड्याफार फरकाने.
पण प्रॉफीट दिसत असला तरी शेवटी एकूण बेरीज ही तोट्याचीच होत असते.
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Wed, 08/26/2020 - 08:09
नवीन
फ्युचर्स आणि ऑप्शन्समधील शेअर्सना अपर/लोअर सर्किट नसते. सप्टेंबर २०१८ मध्ये दिवाण हाऊसिंग फायनान्स एका दिवसात ४५% ने आपटला होता. मार्च २०२० मध्ये येस बँक पण असाच जोरदार आपटला होता.
शेअरमार्केटमध्ये अयशस्वी होणार्यांचे प्रमाण बरेच जास्त असते हे नक्कीच पण १००% लोकांना तोटा होतो असे अजिबात नाही.
इथल्याच काही लोकांच्या प्रतापामुळे हल्ली मिपावर फार क्वचित येतो- अगदी वर्षातून एखाद्या वेळेला. पण ही चर्चा माझ्या आवडीच्या विषयावर असल्याने या चर्चेपुरता येणार आहे.
- Log in or register to post comments
ल
लेखनवाला
Mon, 08/24/2020 - 07:22
नवीन
पी सी ज्वेलर्स (pc jeweller)............ थोडं वास्तव.............. थोडं कल्पना
- Log in or register to post comments
च
चौकस२१२
Mon, 08/24/2020 - 11:06
नवीन
शेअर पहिला विकून नतर खरेदी करता येतो
भारतीय बाजारात अश्या शॉर्ट सेलिंग ला परवानगी आहे का?
ती तशी नसते म्हणून शेर वर बेतलेले "सिंगल शेअर फुचर्स" जास्त प्रसिद्ध आहेत हे ऐकले आहे ( फ़ुटूर्स मार्केट मध्ये लॉन्ग किंवा शॉर्ट करणे सोप्पे असते आणि परवानगी हि असते )
नक्की काय परिस्थिती आहे ?
असे तर नाही ना कि
जरी सेबी अश्या शॉर्ट सेलिंग ला परवानगी देत नसले तरी ब्रोकर आपली स्वतःच्या जोखमी वर फक्त दे ट्रेडिंग सत्ताही परवानगी देतो शॉर्ट सेलिंग ला?
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
Mon, 08/24/2020 - 18:36
नवीन
शॉर्ट selling चालते भारतात पण.
- Log in or register to post comments
च
चौकस२१२
Tue, 08/25/2020 - 00:49
नवीन
बरं पण कसे? जरा सविस्तारत सांगाल का
अधिकृत रित्या कि अनधिकृत रित्या , ब्रोकर चाय स्वतःच्या जोखमीवर ( तुमचयकडून अनामत रक्कम घेऊन) आणि ते सुधाच फक्त डे ट्रेडिंग साठी ? कारण डिलिव्हरी बेसिस वॉर तर कसे शक्य आहे ?
का तुम्ही म्हणताय ते मी वरील म्हणल्याप्रमाणे सिंगल शेर फुचर वापरून?
उदाहरण देतो
अमेरिकेत शेर चे शॉर्र्टिंग करायला ( इंट्राडे आणि लांब पल्य्याचे सुद्धा ) अधिकृत परवानगी आहे , त्यामुळे कदाचित तिथे शेर वॉर बेतलेली फुचर्स फारशी वापरली जात नाहीत ( इंडेक्स फुचर्स, कमोडिटी फुचर्स आणि करन्सी फुचर्स प्रसिद्ध आहेत )
या उलट भारतात शॉर्ट सेलिंग ( शेर चे) अधिकृत रित्या परवानगी नसल्याने त्यावरील फुचर्स प्रसिद्ध जास्त आहेत असं दिसते
धड कोणी माहिती देत नाही
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Wed, 08/26/2020 - 08:33
नवीन
ही काय भानगड आहे? लॉट साईझ १ असलेले फ्युचर्स? निदान भारतात तरी हा प्रकार नसतो.
बाकी फ्युचर्सपेक्षा ऑप्शन्समध्येच ट्रेड करावे हे वैयक्तिक मत. आपला व्ह्यू थोडा तरी चुकला तर फ्युचर्समध्ये लगेच लॉस सुरू होतो पण ऑप्शनमध्ये शॉर्ट पोझिशन असेल आणि बर्यापैकी लांबचे ऑप्शन ठोकले असतील तर तेवढी ब्रिथिंग स्पेस मिळते. तसेच शॉर्ट/लाँग पोझिशनमध्ये लॉस झाला तरी शेअरची मूव्ह आपल्या व्ह्यूविरूध्द झाली तरी डेल्टामुळे सगळा लॉस होत नाही तर डेल्टा गुणिले १०० % इतकाच लॉस होतो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे योग्य माहिती आणि त्यातले बारकावे माहित नसतील तर फ्युचर्स आणि ऑप्शनच्या भानगडीत न पडलेले बरे. डेरिव्हेटिव्हमध्ये अंधाधुंद ट्रेडिंग केल्यास अशा ट्रेडरला लिटरली रस्त्यावर आणायची ताकद या इन्स्ट्रुमेन्टमध्ये असते.
- Log in or register to post comments
च
चौकस२१२
Wed, 08/26/2020 - 11:31
नवीन
"सिंगल शेअर फुचर्स"
नावात सिंगल असाल तरी याचा लॉट साईझ १ शेअर नसतो साधारण १०० शेअर्स असतो आणि याला सिंगल स्टॉक फुचुर्स हे नाव ठेवले ते केवळ इंडेक्स फुचर्स पासून वेगळे दिसावेत म्हणून ( माझा अंदाज)
https://docs.onechicago.com/display/PD/No+Dividend+Risk+Security+Futures या वर हे आहेत
परंतु ते एवढे प्रसिद्ध नाही झालेले दिसत,
- Log in or register to post comments
ल
लेखनवाला
Tue, 08/25/2020 - 11:33
नवीन
फक्त डे ट्रेडिंग साठी शॉर्ट selling चालते
- Log in or register to post comments
च
चौकस२१२
Tue, 08/25/2020 - 12:40
नवीन
- अधिकृत रित्या सेबी ची परवानगी आहे का? कि ब्रोकर स्वतःचं जीववर तुम्हाला करू देतो?
- किती मार्जिन लागते? समजा १० लाखाचे शॉर्ट सेल्लिंग असेल तर आपले मार्जिन किती असावे लागते ब्रोकर पाशी ? उलट्यापद्धतीने मोजायचे तर लिव्हरेज किती मिळते?
- दुपारी किती वाजत चाय आधी सर्व शॉर्ट बंद कराव्या लागतात ?
- वरील मुद्दे लक्षात घेता मग यापेक्षा फ्चुर्स शॉर्ट केलेली बरी नाही का? त्यात धोका तेवढाच असतो शिवाय फुचर्स शॉर्ट अनेक दिवस उघडे ठेवता येते !
( कोणी माहितगार ब्रोकर असेल त्याला मार्जिन , एनआरआय ना काय परवानगी आहे वैगरे नीट माहिती असलेला असल्यास मला जरूर व्यनि पाठवावा )
- Log in or register to post comments
श
शाम भागवत
Tue, 08/25/2020 - 13:02
नवीन
सगळं ब्रोकरच्या जिवावर चालते.
मार्जिन मनीवर पाचपट शेअर विकत घेता येतात. तेही बोकरच्या जिवावर.
ब्रोकरने पैसे किंवा शेअर कोणाला उधार द्यायचे हा ब्रोकरचा वैयक्तिक प्रश्न असतो. त्याला सेबी हरकत घेत नाही. शेअर वापरायला देण्याचा व्यवहार अधिकृत रित्या करता येतो.
मात्र बाजाराची सेटलमेंट पूर्ण करायची जबाबदारी ब्रोकरची असते. ती त्याने निभावली म्हणजे झाले.
- Log in or register to post comments
श
शाम भागवत
Tue, 08/25/2020 - 13:06
नवीन
मार्जीनवरचे व्यवहार २:४५ पर्यंत पूर्ण करावे लागतात. अन्यथा ते त्यावेळच्या बाजारभावानुसार स्वेकर ऑफ होतात. तसेच त्या अगोदर हे व्यवहार प्रत्यक्ष डिलिव्हरी मधे बदलता येतात. अर्थात त्यासाठी आपल्या डिमॅट खात्यात शेअर व बँकेत पैसे असावे लागतात.
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Wed, 08/26/2020 - 08:55
नवीन
ते ब्रोकरवर अवलंबून असते. ३ ते ३.२० दरम्यान स्केअर ऑफ करणारे ब्रोकर्स पण बघितले आहेत.
- Log in or register to post comments
श
शाम भागवत
Tue, 08/25/2020 - 13:08
नवीन
प्रत्येक शेअर प्रमाणे जोखीम वेगवेगळी असू शकते व त्यामुळे जोखीमेनुसार मार्जिन बदलू शकते.
- Log in or register to post comments
श
शाम भागवत
Tue, 08/25/2020 - 13:09
नवीन
मी मला असलेली माहिती दिली आहे. मी तज्ञ नाही.
- Log in or register to post comments
ल
लेखनवाला
Tue, 08/25/2020 - 16:30
नवीन
https://zerodha.com/margin-calculator/SPAN/
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Wed, 08/26/2020 - 09:02
नवीन
जूनपासून सेबीने कव्हर्ड ऑप्शन स्ट्रॅटेजीसाठी मार्जिन खूप कमी केले आहे. त्याचा व्यवस्थित वापर केला आणि फार हाव धरायला गेले नाही तर आठवड्याला सव्वा ते दीड टक्कापर्यंत रिटर्न काढता येऊ शकतात. यातील अधोरेखित भाग सगळ्यात महत्वाचा. फार हाव धरायला गेले आणि एखादा ट्रेड उलटला तर तो दहा ट्रेडमध्ये झालेला प्रॉफिट खाऊ शकतो.
- Log in or register to post comments
च
चौकस२१२
Wed, 08/26/2020 - 11:13
नवीन
कव्हर्ड ऑप्शन स्ट्रॅटेजी
एक प्रसिद्ध म्हण आहे ती म्हणजे
ऑप्शन विकणारा ( कवर्ड असेल तरी ) दर महिन्याला एखाद्या राजासारखी मेजवानी करेल पण जेव्हा त्याला जुलाब होतील तेव्हा ते एखाद्य सम्राटा सारखे असतील !
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Wed, 08/26/2020 - 13:24
नवीन
अशा म्हणी भरपूर आहेत आणि बर्याचदा ऑप्शन हा प्रकार नक्की कसा काम करतो याची पुरेशी माहित नसल्याने आलेल्या आहेत. ऑप्शनच्या शॉर्ट पोझिशनमध्ये चुकीचा ट्रेड केला तर जुलाबच काय अतिसार सुध्दा होईल इतका डेंजरस प्रकार आहे तो. आणि त्याची पुरेशी माहिती करून न घेता असाच ट्रेड घेतला तर त्यात मार खाणारच. ऑप्शन म्हणजे इलेक्ट्रीसिटीसारखे आहेत. योग्य वापर केल्यास त्याचा उपयोग भरपूर पण चुकीचा वापर केल्यास जोरदार शॉक लागणे ठरलेले.
बाकी वॉरन बफेने डेरिव्हेटिव्हला 'वेपन ऑफ वेल्थ डिस्ट्रक्शन' असे म्हटले आहे ही खरी गोष्ट आहे. पण त्यांनी नक्की कोणत्या संदर्भात असे म्हटले आहे याची कल्पना नाही. कारण स्वतः वॉरन बफेने डेरिव्हेटिव्हमध्ये ट्रेडिंग केले आहे. बहुदा पुरेशी माहिती न घेता अंधाधुंदपणे ऑप्शनमध्ये ट्रेड करणार्यांना उद्देशून हे विधान असावे असे वाटते.
- Log in or register to post comments
च
चौकस२१२
Wed, 08/26/2020 - 00:45
नवीन
- लेखनवाला , धन्यवाद, आपण दिलेला झिरोधा चे वेबपेज फुचुर्स आणि ऑपशन्स साठी आहे , परंतु प्रत्यक्ष शेअर शॉर्ट करण्यासाठी ( शाम म्हणतात त्याप्रमाणे ब्रोकर च्या अखत्यारीत ) इंट्राडे काय मार्जिन लागते ते कसे कळते?
- शामजी धन्यवाद.. म्हणजे सगळा मामला ब्रोकर च्या अंतर्गत धोरणावर अवलंबून असं दिसतंय! अधिकृत रित्या प्रत्यक्ष शेअर शॉर्ट करत येतो का आणि ते सुद्धा एका दिवसापेक्षा जास्त हे अजून कोडंच आहे . नसावं करता येत बहुतेक
दुसरे असे कि माझा मार्जिन चा जो प्रश्न होता तो % या दृष्टीने होता शेअर ची किंमत किती का असेना आणि जरी त्याच्या रोजच्या वोलॅटिलिटी ( चढ उताराचा दर) ती % वारी कमी जास्त होत असेल पण साधारण किती % असते ते शोधतोय .
मला इतर देशातील अश्या आर्थिक उलाढाली बद्दल बऱ्यापकी माहिती आहे पण भारतातील असे प्रोडक्त्त कसे काम करतात हे काही धड नीट आणि स्पष्ट समजत नाही
उदाहरणार्थ, जगात साधारण जे शेअर वर बेतलेले ऑप्शन असतात ते जर "एक्सरसाईस " केले तर त्याचे प्रत्यक्ष शेअर मध्ये रूपांतर करता येते आणि या मूलभूत पद्धती मुले अनेक इतर गोष्टीत करता येतात आणि त्यात मार्जिन चा फायदा असतो ( शेअर मालकी + त्यावरील ऑप्शन विकणे = कवर्ड कॉल विकणे )
परंतु भारतात शेअर वरील ऑप्शन हे कॅश सेटल असतात त्यामुळे वरील कवर्ड कॉल विकणे हे केले तरी त्यात क्रॉस मार्जिन फायदा होत नाही
असो
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Wed, 08/26/2020 - 08:15
नवीन
नाही हल्ली बर्याचशा शेअरवरील ऑप्शन फिजिकल सेटलमेंटमध्ये आणले आहेत. त्यामुळे बहुसंख्य ब्रोकर्स एक्सपायरीच्या आदल्या दिवशी इन द मनी ऑप्शन पोझिशन बंद करतात. मला वाटते २०२० च्या शेवटपर्यंत सगळ्याच शेअरच्या ऑप्शनमध्ये फिजिकल सेटलमेंट आणण्यात येणार आहे. मी स्वतः शेअरवरील ऑप्शन ट्रेड करत नाही. त्यापेक्षा मला निफ्टी जास्त आवडतो. बँकनिफ्टी पण चांगला आहे पण बँकनिफ्टीच्या कँडलला लांब शेंड्या असतात म्हणून बँकनिफ्टीची तशी भितीच वाटते. निफ्टी-बँकनिफ्टीमध्ये फिजिकल सेटलमेंटचा प्रश्नच नाही.
- Log in or register to post comments
च
चौकस२१२
Wed, 08/26/2020 - 00:48
नवीन
लेखनवाला ...क्षमा मी झेरोदह चे वेबपेज नीट बघितले नाही... त्यात शेअर संबंधी पण माहिती आहे
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Wed, 08/26/2020 - 08:50
नवीन
लेख आवडला. एकेकाळी मी पण इन्ट्राडे करायचो. पण त्यासाठी ५ किंवा १५ मिनिटांची टाईमफ्रेम वापरावी लागते आणि त्या टाईमफ्रेमवर नॉईज खूप असतो. अनेकदा आपला स्टॉप लॉस खायलाच शेअरची मूव्ह होते आणि मग शेअर आपल्या दिशेने जातो. तसेच सगळे निर्णय खूप पटापट घ्यावे लागतात. ऑफिसमध्ये सतत चार्टकडे लक्ष कसे ठेवणार? आणि समोर चार्ट नसेल तर नक्की काय चालू आहे याची धाकधूक सतत मनात त्यामुळे ऑफिसमधील कामात पण लक्ष लागायचे नाही. त्यामुळे इन्ट्राडे हा माझ्या चहाचा कप नाही हे समजले. ट्रेडिंगमध्ये आपल्याला नक्की काय सूट होते ते बघून ते इन्स्ट्रुमेन्ट आणि तो सेट-अप ट्रेड करावा. दुसरा कोणीतरी काहीतरी करायला जात आहे म्हणून लगेच त्या गोष्टीमागे धावू नये. आपल्याला काय सूट होते हे सगळ्यात महत्वाचे. त्यात आता निफ्टी ऑप्शन सेलिंगवर स्थिरावलो आहे. मार्च-एप्रिलमध्ये मार्केट प्रचंड व्ह्लोआटाईल होते तेव्हा ट्रेड करायचे धाडस झाले नाही पण त्यानंतर नियमित प्रॉफिट होत आहे ते महत्वाचे :) मला टाईम व्हॅल्यु खायला आवडते.
या सगळ्यात व्यवस्थित माहिती मिळविणे महत्वाचे असते. मी अवधूत साठे ट्रेडिंग अॅकॅडेमीचा जिओ क्लास केला त्यानंतर माहिती बरीच वाढली. परिपूर्ण नक्कीच म्हणता येणार नाही- तशी परिपूर्ण माहिती कोणत्याच ट्रेडरकडे नसते. पण पूर्वीपेक्षा बरीच जास्त भर माहितीत पडली आहे हे नक्की. आता तर वाटते की पूर्वीचे ट्रेडिंग म्हणजे काही माहित नसताना हवेत केलेला गोळीबार होता. आता तसे नाही.
- Log in or register to post comments
श
शाम भागवत
Wed, 08/26/2020 - 10:50
नवीन
यावर एक लेखच येऊ द्या की मग.
अगोदरच व नंतरच ट्रेडिंग.
सगळ्यांनाच बरच काही शिकायला मिळेल.
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Wed, 08/26/2020 - 13:41
नवीन
आता मिपावर लेख वगैरे लिहिण्याच्या बराच पलीकडे गेलो आहे. आणि मी कितीही लिहिले तरी त्याला मर्यादा असतील. त्यापेक्षा मी ज्यांच्याकडे शिकलो त्या अवधूत साठेंच्या https://www.youtube.com/channel/UCaiV1-PUXDu2Nmx8iOZkofQ या युट्यूब चॅनेलवर ते उद्या म्हणजे गुरूवारी २७ ऑगस्टला एक्सपायरीच्या दिवशी संध्याकाळी साडेपाचला लाईव्ह येतील तेच बघा असे सुचवतो. यापूर्वी केलेली १२ लाईव्ह सेशन्स त्याच चॅनेलवर आहेत. ते पण उपयोगी आहेत का बघा ही विनंती. *
आणखी माहिती हवी असेल मिपाकरांपैकी कोणीही माझ्या ईमेलवर gkhare2@gmail.com संपर्क करा ही विनंती. व्य.नि नको. ही चर्चा थंडावल्यानंतर मिपावर कधी येईन ते माहित नाही.
*: यातून एका अर्थी अवधूत साठेंच्या ट्रेडिंग अॅकॅडेमीची जाहिरात होत असेलही. पण त्याबद्दल मला काहीही मिळणार नाही हे स्पष्ट केलेले बरे. एकूणच ते मला खूप जेन्युईन वाटले आणि त्यांच्या क्लासचा मला खूप फायदा झाला आहे. मी अगदी हाच रिव्ह्यू मागच्या वर्षी त्यांच्या फेसबुक आणि गुगल मॅप्सवर लिहिला आहे. तोच फायदा मिपाकरांना होत असेल तर चांगलेच वाटेल.
- Log in or register to post comments
श
शाम भागवत
Wed, 08/26/2020 - 14:36
नवीन
धन्यवाद.
_/\_
- Log in or register to post comments
च
चौकस२१२
Wed, 08/26/2020 - 11:05
नवीन
त्यात आता निफ्टी ऑप्शन सेलिंगवर स्थिरावलो आहे
- आपण फक्त कॉल किंवा पुट सेल करता ( नेकेड ) कि ऑप्शन + ऑप्शन असा स्प्रेड विकता? ( यात आपल्याला माहिती असेल कि जास्तीत जास्त नफा किंवा तोटा हा आधीच माहिती असतो याउलट नेकेड ऑप्शन विकता तेव्हा फायदा आणि तोटा किती होईल हे सांगता येत नाही)
- निफ्टी वरील ऑप्शन हे निफ्टी इंडेक्स च्या स्पॉट किमती वर असतात कि निफ्टी च्या फुचर वर बेतलेले असतात ? हे विचारायचा कारण असं कि जर हे ऑप्शन निफ्टी फुचर वर असतील तर "कवर्ड कॉल करता येते ,नेकेड करण्यापेक्षा ) "बेतलेले" म्हणजे ऑप्शन चे अंडरलायिंग काय असते?
मला माहिती असलेले अमेरिकेतील उद्धरण देतो त्या अनुषंगाने भारतात कसे ते सांगाल का
इंडेक्स = एस अँड पी ५०० ( वरचे ५०० शेअर ) = हि निफ्टी प्रमाणे फक्त एक आकडा आहे
इंडेक्स = एसपी बिग कॉन्ट्रॅक्ट = SP , FUTURE PRICE गुणिले $२५०
इंडेक्स फघूर्स = ई मिनी ES = $५० गुणिले फुचर ची किंमत
इंडेक्स फघूर्स = ई माइक्रो MES = $५ गुणिले फुचर ची किंमत
मोठे ऑप्शन = SP INDEX वर बेतलेलं कॅश सेट्ललेड $२५० गुणिले
मिनी ऑप्शन = ES वर बेतलेलं सेटल होतात ES मध्ये
माइक्रो ऑप्शन = MES वर बेतलेलं सेटल होतात ई MES मध्ये
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Wed, 08/26/2020 - 13:52
नवीन
नाही एकदा नेकेड ऑप्शन सेल करून हात पोळले होते तेव्हापासून नेकेड ऑप्शन सेल करायची हिंमत होत नाही. हात पोळले होते तेव्हाही माझा व्ह्यू चुकीचा नव्हता आणि एक्सपायरीच्या दिवशी मी कॉल विकला होता तिथपर्यंत किंमत गेली नव्हती पण मधे मूव्ह आली त्यामुळे पोझिशन लॉसमध्ये दिसायला लागली. त्यामुळे शेक-आऊट व्हायला झाले आणि लॉस बुक करून बाहेर पडलो.
मी ऑप्शनचा क्रेडिट स्प्रेड करतो. म्हणजे ११३०० चा पुट विकला असेल तर त्याखालचा ११२०० चा पुट विकत घेतो. मुळात व्ह्यू असा की गुरूवारपर्यंत ११३०० पर्यंत किंमत पडणार नाही. तरीही खालचा पुट विकत घ्यायचा प्रोटेक्शन म्हणून आणि मार्जिन कमी करायला.
अंडरलाईंग निफ्टी इंडेक्सच असतो. कव्हर्ड कॉल करायचा असेल तर निफ्टी फ्युचर्समध्ये लाँग पोझिशन बरोबर करताच येते. स्पॉट आणि फ्युचर्सच्या किंमतीत थोडा फरक असतोच पण इन जनरल निफ्टी इंडेक्स एकने वाढला/कमी झाला तर फ्युचर्सपण जवळपास एकनेच वाढतो/कमी होतो.
- Log in or register to post comments
च
चौकस२१२
गुरुवार, 08/27/2020 - 01:18
नवीन
' कव्हर्ड कॉल करायचा असेल तर निफ्टी फ्युचर्समध्ये लाँग पोझिशन बरोबर करताच येते'
हे जरी खरे असले तरी निफ्टी ऑपशन्स जर निफ्टी इंडेक्स ( आकडा) यावर बेतलेले असतील तर मग हे कॉल विकणे " कवर्ड" कसे समजले जाते? एक्सचेंज किंवा ब्रोकर क्रॉस मार्जिन करतो का? तसे नसेल करत तर दोन्ही साठी तुम्हाला वेगवेगळे मार्जिन दयावे लागेल ?
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
गुरुवार, 08/27/2020 - 04:57
नवीन
निफ्टी वर गेला तर निफ्टी फ्युचर्स पण वर जाणार आणि कॉलची किंमत पण वर जाणार. त्यामुळे कॉलमध्ये शॉर्ट पोझिशन असेल तर कॉलवर तोटा होईल पण निफ्टी फ्युचर्स वर गेल्याने त्या पोझिशनवर फायदा होईल. त्यामुळे असे कॉल विकणे हे कव्हर्ड असते.
हो. मार्जिनमध्ये फायदा मिळतो. दोन्हीकडे मार्जिन द्यावे लागत नाही. https://zerodha.com/margin-calculator/SPAN/ वर झिरोधा मार्जिन कॅल्क्युलेटर बघता येईल. त्यावरून कळेल की निफ्टीचे सप्टेंबर फ्युचर्स लाँग करायला आज १,४८,२०१ मार्जिन आहे तर ११५०० चा कॉल शॉर्ट करायला १,४२,४१६ इतके मार्जिन आहे. पण दोन्ही पोझिशन एकत्र केल्या तर १,६५,५२६ इतके मार्जिन आहे म्हणजे सव्वा लाख रूपये मार्जिन वाचते.
- Log in or register to post comments
च
चौकस२१२
गुरुवार, 08/27/2020 - 06:01
नवीन
निफ्टी वर गेला तर निफ्टी फ्युचर्स पण वर जाणार
हो ते तर साहजिक aahe , पण मुळात इंडेक्स ऑप्शन डिलिव्हरी वाले करून त्याचे मूळ जर इंडेक्स फुचुर ठेवले तर हा प्रश्न उदभवला नसता ( जसे एस अँड पी ५०० वरील ऑप्शन हे डिलिव्हरी वाले आहेत आणि त्याचाही मूळ हे एस अँड पी ५०० फुचर आहेत . इंडेक्स एकदा नव्हे ( जरी एस अँड पी ५०० फुचर हे मुळात एस अँड पी ५०० इंडेक्स वर बेतलेले असले तरी ) उगाचच नवीन माणसाचा गोंधळ वाढतो !
बर हे क्रॉस मार्जिन ब्रोकर मर्जी वर अवलंबून असते कि मुळात एक्स्चेंज ने सोय केली आहे ?
अजून एक प्रश्न होता इंडेक्स मध्ये लॉट साईझ हि काय भानगड ?
जर निफ्टी ११,५०० ला असेल तर त्याची दर्शनी किंमत ( फुल कॉन्ट्रॅक्ट किंमत ) कशी काढायची? ११,५०० गुणिले ७५रू ?
१ निफ्टी फुचार म्हणजे एकूण किती रुपयांचा वयहार ?
१ पॉईंट मध्ये किती टिक असतात?
- जसे १ इ मिनी एस अँड पी फुचर म्हणजे ३००० ( सध्याची फुचर ची किंमत धरा ) गुणिले $५० प्रति पॉईंट = $१५०,०००
आणि १ पॉईंट मध्ये ४ टिक असतात ($१२.५०प्रति टिक गुणिले ४ = $५०)
३०००-३००१ आणि याचं मध्ये ३०००/ ३०००.२५/ ३०००.५०/ ३०००.७५ / 3001अशी मोजणी
क्षमा करा मी खूप प्रश्न विचारले.. कारण जेव्हा जेव्हा मी भारतात ब्रोकर ला प्रश्न विचारले तेव्हा तेव्हा एक तर ते घाईत असतात किंवा काहीतरी तिसरेच सांगतात किंवा पहिला प्रश्न विचारत तुम्हला अकॉउंट उघडायचे आहे? अरे बाबा मी आधी प्रॉडक्ट कन्स्ट्रेट समजून घेईन मग बघीन उघडायचे कि नाही ते
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
गुरुवार, 08/27/2020 - 07:01
नवीन
मी अमेरिकन मार्केटमध्ये कधी ट्रेड केलेच नाही त्यामुळे माझा गोंधळ होत नाही :) भारतातल्या मार्केटमध्येच इतकी अमर्याद संधी आहे की बाहेर कुठे ट्रेड करायची गरजच पडू नये. काही ब्रोकर्स भारतात बसून अमेरिकन मार्केटमध्ये ट्रेड करायची संधी देतात पण फक्त इक्विटीमध्ये ट्रेड करता येत डेरिव्हेटिव्हमध्ये नाही. आणि एका मर्यादेपेक्षा जास्त ट्रेडिंग झाले तर आर.बी.आय फोरेक्स डिपार्टमेंटकडून चौकशीचे झेंगट मागे लागते असे एकांकडून ऐकले आहे. खखोदेजा.
भारतात पहिल्यापासून असेच आहे. गेल्या तीनचार वर्षांपासून निफ्टी आणि बँकनिफ्टीची विकली ऑप्शन एक्सपायरी (दर गुरूवारी) असते पण फ्युचर्स मात्र मंथली एक्सपायरी (दर महिन्याच्या शेवटच्या गुरूवारी) असतात. निदान निफ्टी आणि बँकनिफ्टी ऑप्शनसाठी फ्युचर्स हा अंडरलाईंग ठेवला तर चार गुरूवारच्या ऑप्शनसाठी एकच अंडरलाईंग असेल. अर्थात तसे करण्यात अडचण काही नसावी पण तसे केले जात नाही हे पण तितकेच खरे.
जो फ्युचर्सचा लॉट साईझ तोच ऑप्शनचाही. निफ्टीसाठी तो ७५ आणि बँकनिफ्टीसाठी २५ आहे. म्हणजे निफ्टीच्या लाँग फ्युचर्स पोझिशनवर निफ्टी एकने वर गेला तर ७५ रूपये नफा होतो. तर रिलायन्सवर तो ५०० (खरं तर ५०५) आहे. म्हणजे रिलायन्स एक रूपयाने वर गेला तर फ्युचर्सच्या लाँग पोझिशनवर ५०५ रूपये नफा होतो आणि एक रूपयाने खाली गेला तर ५०५ रूपये तोटा होतो.
सध्या निफ्टी ११६०० च्या आसपास आहे. एक फ्युचर्सचा लॉट म्हणजे ७५ रूपये याचा अर्थ एक लॉट ११६०० गुणिले ७५ बरोबर ८ लाख ७० हजार इतका व्यवहार. फ्युचर्स हे लिव्हरेज्ड प्रॉडक्ट असल्याने सगळे ८ लाख ७० हजार एवढे मार्जिन ठेवावे लागत नाही तर त्याच्या १७-१८% म्हणजे जवळपास दीड लाख इतके मार्जिन ठेवावे लागते. मार्केटवाल्यांच्या भाषेत दीड लाख भरून ८ लाख ७० हजाराचा माल उचलता येतो :)
भारतात टिक साईझ ५ पैसे इतका असतो.
- Log in or register to post comments