Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

#ALAN WALKER #MUSIC

B
Bhakti
Tue, 09/15/2020 - 15:08
💬 14 प्रतिसाद
#ALAN WALKER #MUSIC Alan walker चे on my way आणि इतर गाण्यांची “World of Walker triology” mini film च आहे,त्याबद्दल इथे थोडे लिहिते आहे,साधारण २०१५ -१६ पासून टप्प्या टप्प्याने याची वेगवेगळी गाणी youtubeवर प्रदर्शित होत राहिली आहेत.२०२० मध्ये या गाण्यांच्या मालिकेचा शेवट झाला आहे. Faded (2015) and Sky नावाच्या गाण्याने या seriesची सुरुवात होते . ..कथा अशी आहे की, १. Tired या गाण्यात दाखविले आहे की, Alan walker हि संस्कृती प्राकृतिक आपदेमुळे नष्ट झाली असते.तेव्हा Walker black team (अनुयायी) हे नष्ट होतात. २. नंतर काही वर्षांनी AW संस्कृतीचे अवशेष असलेले Time capsule पुन्हा सापडते हे All Falls Down ह्या गाण्यात दाखविले आहे. ३. Darkside गाण्यात Walker black team आणि Walker white team पुन्हा भेटतात आणि Walker संस्कृतीचे dron शोधतात. ४.Alone या गाण्यात जगभरातील all walkers अनुयायी पुन्हा जॉईन/एकत्र होतात हे दाखविले आहे. ५.मग येते on my way हे सर्वात लोकप्रिय गाणे.यामध्ये मालिकेतील नायिकेचा प्रवास लुप्त झालेल्या संस्कृती शोधाचा plot दाखविला आहे.गाण्यासाठी Sabrina Carpenter चा आवाज चारचांद आहे. ६.Alone Part 2 गाण्यामध्ये गोष्टपुढे सरकते नायिकेला AW संस्कृतीच्या च्या खुणा एका cave मध्ये सापडतात. ७.या मिनिफिल्म मधले शेवटचे गाणे आहे Heading home …last part of triology हे तर अप्रतिमच गाण आहे.यामध्ये नायिकेला तिच्या गतजन्माची वा time travel ची गोष्ट अभ्यासादरम्यान डोळ्यासमोर तराळते.पूर्वी तिने पाहिलेले उल्कापाताचे भाकीत यात दाखविले आहे.मग या संस्कृतीचे मुख्य गुरु व इतर अनुयायी त्यांच्या रहस्यमय गोष्टीं असलेल्या capsule चे दफन करतात आणि सर्व walkers एकत्रित एका विहिरीत उडी मारून जगाचा निरोप घेतात. या गाण्यातील उत्कृष्ट line आहे “ nobody sees me now I’m a one man show …I will do this on my own…..Guess I’m heading home now.” अशा प्रकारे alan walker आणी इतर कलाकारांच्या कलाविष्काराची सुंदर गाणी आहेत. टीप:हे सर्व मी माझ्या आकलनानुसार लिहिले आहे.तरी यामध्ये सुधारणा सुचवू शकता. धन्यवाद. -भक्ती

प्रतिक्रिया द्या
7458 वाचन

💬 प्रतिसाद (14)
द
दुर्गविहारी गुरुवार, 09/17/2020 - 15:23 नवीन
काहीतरी वेगळंच समजलं. ऐकायचा प्रयत्न करतो धन्यवाद !
  • Log in or register to post comments
B
Bhakti गुरुवार, 09/17/2020 - 15:57 नवीन
एकदम भारीये!! आणि कोणतं जास्त आवडलं ते सांगा नक्की!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दुर्गविहारी
B
Bhakti गुरुवार, 09/17/2020 - 15:56 नवीन
  • Log in or register to post comments
B
Bhakti गुरुवार, 09/17/2020 - 15:56 नवीन
  • Log in or register to post comments
आ
आंबट चिंच गुरुवार, 09/17/2020 - 17:20 नवीन
तुम्ही क्रमवार अशा लिंक तर द्या त्या गाण्याच्या मग आम्ही पण ऐकतो.
  • Log in or register to post comments
B
Bhakti Fri, 09/18/2020 - 09:56 नवीन
नक्की
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंबट चिंच
श
शा वि कु गुरुवार, 09/17/2020 - 17:23 नवीन
फेडेड ऐकलंय. गाणं छान आहे, पण एका मित्राची कॉलर ट्यून आहे, आणि तो लौकर फोन उचलत नाही. त्यामुळे गाण्याची ऍलर्जी झाली आहे :) बाकीची ऐकतो.
  • Log in or register to post comments
B
Bhakti Fri, 09/18/2020 - 09:56 नवीन
सगळे जण पहिले हेच गाणं ऐकतात ..हा हा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शा वि कु
ड
डीप डाईव्हर गुरुवार, 09/17/2020 - 20:54 नवीन
>>>हे सर्व मी माझ्या आकलनानुसार लिहिले आहे.तरी यामध्ये सुधारणा सुचवू शकता.>>> भक्ती ताई youtube वर यांची बरीच गाणी दिसत आहेत. जर लेखात त्या त्या video चा दुवा किंवा video च embed केले असते तर बघणे सोयीचे झाले असते. आत्ताच पहिला Tired या गाण्याचा video पहिला चित्रण आवडले पण गाणे पकाऊ वाटले. बाकीचे video नंतर बघतो.
  • Log in or register to post comments
B
Bhakti Fri, 09/18/2020 - 09:55 नवीन
ओके:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डीप डाईव्हर
B
Bhakti Fri, 09/18/2020 - 09:54 नवीन
अरे वाह! आपण दिलेल्या प्रतिक्रियांसाठी खुप खुप धन्यवाद!! मी खूप शोधाशोध करून हे लिहल होत.एका ठिकाणी द्यायचा होता लेख!पण तिकडे अप्रुव्ह नाही केलं.. म्हणाले कळलं नाही..तेच तर मला सांगायचं होतं की अलेन वाकरचा हा मास्टरपीस आहे.मराठीत या विषयावर कुठच वाचायला मिळालं नाही.तेव्हा ही गोष्ट मराठीतून सोप्या भाषेत सांगावी. त्याच्या गाण्यांचे behind scene पण पहा.. चित्रीकरण अप्रतिम आहे.https://youtu.be/DmOzgcX3OGo हा एक नमुना..
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 09/18/2020 - 16:11 नवीन
#ALAN WALKER हे नाव वाचताच मला Faded आठवले ! बाकी मिनी फिल्म बद्धल ठावूक नव्हते, वेळ मिळताच पाहण्याचा प्रयत्न करावा म्हणतो.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- बन जा तू मेरी रानी तेनु महल दवा दूंगा बन मेरी महबूबा मैं तेनु ताज पवा दूंगा... :- तुम्हारी सुलू
  • Log in or register to post comments
B
Bhakti Mon, 05/03/2021 - 18:53 नवीन
अलेनची पंखा असूनही हा व्हिडिओ मला फार उशिरा मिळाला. बरेच गोष्टी स्पष्ट केल्या आहेत.
  • Log in or register to post comments
B
Bhakti Mon, 05/03/2021 - 18:58 नवीन
नवीन सिरीज आली आहे.फेक स्माईल सुंदर गाणं.अलेनने एक सिनेमाचं बनवावा.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा