Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मावळतीला

P
Pratham
Tue, 09/29/2020 - 08:24
💬 7 प्रतिसाद
दिवस मावळतीकडे झुकताना सावल्या अदृश्य होऊ लागतात.मनात एक हुरहूर लागून राहते.ती हुरहूर आपल्याला नेमक्या शब्दांत व्यक्त करता येत नाही,हवीहवीशी तरीही नकोशी.एक वेगळीच भावना असते ती.चार भिंतीमध्ये बसून राहिले तर मन उदासीन होते तेच जर मोकळ्या हवेत गेले तर एकदम शांत वाटते,अस्तित्वाची जाणीव होते.सूर्य मावळतानाचे दृश्य खूप सुखद वाटते.सूर्य हळूहळू कलत असतो,आकाशात तांबड्या-केशरी रंगाची उधळण असते.एखाद्या तळ्या किनारी मावळतीचे दृश्य भलतेच सुंदर दिसते.पाण्यावर सूर्याचे प्रतिबिंब पडलेले असते,आकाश लाल रंगात न्हाहून गेलेले असते,पक्षी दिवसभर अन्नासाठी भटकून परतताना दिसतात.झुंडीने ते एका संथ लयीत उडत असतात.पाण्याचा एकसारखा मधुर आवाज येत असतो.आकृत्या हळूहळू धूसर होऊ लागतात.चंद्र सूर्याच्या अदृश्य होण्याची वाट बघत असतो.रातकिड्यांचा आवाज येतो.वाऱ्याची एक झुळूक अंगाला शिरशिरी देऊन जाते.मोठे प्रसन्न व विलोभनीय दृश्य असते ते.

प्रतिक्रिया द्या
4115 वाचन

💬 प्रतिसाद (7)
क
कंजूस गुरुवार, 10/01/2020 - 09:19 नवीन
छान.
  • Log in or register to post comments
P
Pratham Wed, 10/14/2020 - 19:47 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 10/01/2020 - 15:38 नवीन
छान लिहिलं आहे. अजून लिहिते राहा. शुभेच्छा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
P
Pratham Wed, 10/14/2020 - 19:47 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
च
चौथा कोनाडा Tue, 10/06/2020 - 13:46 नवीन
सुरेख लिहिलं आहे. जास्त लिहायला हवं होतं असं वाटतं ! (कुठल्या तरी पुस्तकातील परिच्छेद वाटतोय) पुलेशु !
  • Log in or register to post comments
P
Pratham Wed, 10/14/2020 - 19:49 नवीन
धन्यवाद,असे लेखन मी मारुती चितमपल्ली व व्यंकटेश माडगूळकर यांच्या पुस्तकांतून वाचले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा
P
Pratham Wed, 10/14/2020 - 05:06 नवीन
वाचल्याबद्दल धन्यवाद
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा