कास पठार आणि महाबळेश्वर

कास पठार आणि महाबळेश्वर चालू झाले आहे का ?कोणी माहिती देऊ शकेल का?

तीन दिवसांपूर्वी ओळखीच्यातील तीन जण गेले होते कारने. एकाचे कंपनीचे काम होते आणि कंपनीने रूम बुक करून दिली होती.

कास पुष्प पठार बंद आहे. लांबून बघता येते.
त्याच्या पुढे १ कि मी अंतरावर कास तलाव आहे. अतिशय उत्तम ठिकाण आहे. इथे जाऊ शकता.

रीसोर्ट चालु आहेत का सर? स्वत:च्या गाडीने जाणार आहे चालु आसेल तर थिक नाहितर निघलो पुधे तपोळा जाव म्हण्तोय

आम्ही जाऊन आलोय कालच . बऱ्यापैकी पर्यटक ही होते. पठार फुलायला सुरवात झालीय. धुकं , ढगांची दुलई आणि ऊन नसल्याने छान हिरवेगार वातावरण होते काल. पुढे कास तलाव बघून पुढे 10 किमीवर शिवसागर जलाशय आहे. बोटिंग 7 महिने बंद होतं. काल आमच्यसमोरच बोटी उघडल्या मग पुढे संगम आणि जुनी बामणोली इथे बोटीने गेलो अर्धा तास लागला, पाण्यातून 12 किमी होते. तिथे भुयारात महादेवाचं मंदिर होतं. गार, शांत, प्रसन्न . कोयना , कांदाटी, सोळशी नद्यांचा संगम .