पाककृती

खुसखुशीत कोंबडी

Primary tabs

आजचे जेवण
- दक्षिण अमेरिकन/ टेक्सास पद्धतीची खुसखुशीत कोंबडी
चांगले आंबट ताक , काली मिरी, मीठ यात थोडा मैदा + थोडे मक्याचे पीठ कालवावे आवरणासाठी पाहिजे असल्यास लसूण
- कोंबडी चे तुकडे ( त्वचेसकट) वरील आवरणात घोळवून घावी
- ओव्हन १८० अंश सेल्सियस ला तापवून चांगले खुसखुशीत होई पर्यंत हे तुकडे भाजून घयावे
- सोबतीला , पालक, रॉकेट अशी थोडी तुरट सलाड त्यात ग्रीक किंवा फ्रेंच ड्रेससिंग ( किंवा नुसते पांढरे व्हिनेगर किंवा लिंबाचा रस + मीठ + ऑलिव्ह तेल )
- वरती सार क्रीम ( आंबटसर लोणी )
आणि भारतीय वळण म्हणून त्याबरोबर आज कोमट अशी मस्त सोलकढी ...

निनाद

जबरीच दिसते आहे ही कोंबडी. सोलकढी ची कल्पना भारी आहे. फोटो मस्त!!

मीअपर्णा

केज्यन ((cajun)) फ्राइड चिकन सारखी दिसते. योग्य जागी रेसिपी पोहोचवण्यात येईल मग आम्हालाही मिळेल. मुलं हे प्रकार आवडीने खातात. आता त्यासाठी त्यांना बाहेर न्ह्यायला नको.

आभार. :)