Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

नवरात्र बेंगळुरूची - संपूर्ण

प
पॉइंट ब्लँक
Sun, 10/18/2020 - 11:58
💬 59 प्रतिसाद
बंगळुरूला व्हाईटफिल्डमध्ये देवीचं एक मंदिर  आहे -पिलेकाम्मा देवी मंदिर . दरवर्षी  नवरात्री मध्ये  ह्या मंदिरात पिलेकाम्मा (दुर्गा ) आणि चौडेश्वरी  ह्या दोन्ही देवींची  नऊ वेगवेगळ्या स्वरूपात पूजा केली जाते. नऊ दिवस ह्या नऊ स्वरुपाची आरास इथे प्रकाशित करण्याची इच्छा आहे. ( हाच धागा रोज एडिट करता येईल का? कि नवीन बनवावा लागेल रोज?) कोरोनाच्या घोळामुळे प्रत्यक्ष  सोहळा   आणि उत्साह तसा सीमितच आहे , पण ऑनलाईन साजरा  करायला तर कुठली मर्यादा/प्रतिबंध  नाही  :) मंदिरामधील  पिलेकाम्मा म्हणजे दुर्गेची मूर्ती जवळपास पाच फूट उंचीची आहे. तर चौडेश्वरीची मूर्ती एक फूट उंचीची आहे.  पिलेकाम्माची मूर्ती मोठी आणि गाभारा तुलनेने छोटा असल्यामुळे आरसाचा जास्त भर रंगसंगती आणि अलंकार ह्यावर राहतो.  आणि चौडेश्वरी मूर्तीची थोडी जास्त आरास करता येते.  विजयादशमी गेले नऊ दिवस विविध रुपे साकारुन आज दोन्ही देवी स्वरुपात परतल्या. दसर्‍यानिमित्त ह्या परीसरातील इतर मंदिरातील उत्सवमूर्ती देवीच्या स्वागतासाठी पिलेकाम्माच्या मंदिर परिसरात आणल्या गेल्या होत्या आणि एक छोटिसी पूजा सुद्धा पार पडली( त्या विषयी परत कधी तरी लिहिन. ) देवींचे स्वस्वरूप आणि ह्या मंदिरातील इतर मूर्ती आपण आज पाहू. पिलेकाम्मा देवी DSC_6605_01 DSC_6606_01 चौडेश्वरी देवी DSC_6712_01 DSC_6722_01 मुनेश्वर DSC_6720 साईबाबा DSC_6734 मोहक श्रीगणेश DSC_4048-hdr नागदेवता DSC_4002_00001 अजुन दोन मूर्त्या DSC_3968_00001 ज्या हातांनी देवीची हि सुंदर रुपे साकारली त्यांना आदरांजली वाहली नाही तर ह्या धाग्यासोबात न्याय होनार नाही. आपल्या संस्कृतीचा आणि परंपरेचा वारसा जपत, नऊ दिवस कल्पकतेची उदाहरणे ज्यांनी दाखवले ते मंदिराचे पुजारी. DSC_6733_00001 हा लेख रोज संपादित करण्याची सोय केल्या बद्दल संपादक मंडाळाचे विशेष आभार. सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा _/\_ नवमी आज देवीच्या फोटोकडे वळण्याआधी इकडच्या छान प्रथेबद्द्ल थोडसं-लिंबाचे दिवे. लिंबु अर्धा कापुन त्यातला रस काढुन राहिलेली साल उलटी केली की त्याचा वाटिसाखा आकार बनतो. मग त्यात तुपाची वात घालुन पणती बनते. असे छोटे छोटे दिवे बनवून ते एका थाळीमध्ये ठेवून मग स्त्रिया देवीला ओवाळतात.नंतर ते मंदिराच्या परिसरात ठेवले जातात. DSC_6508 आता आजच्या आरासाबद्द्ल. आपण परमेश्वराचं दर्शन घेतो ते सहसा अर्धच. जसं की देवीचं हे स्वरुप DSC_6514_01 किंवा देवाचं हे स्वरूप. DSC_6513_01 पण परमेश्वराचं पूर्णे स्वरुप बनतं पुरुष आणि प्रकृतीच्या मिलनाने आणि तेच स्वरुप पिलेकाम्मने धारण केले होते- अर्धनारीश्वर. स्री-पुरूष एकमेकांचे प्रतिस्पर्धी नसुन ते एकमेकांना पुर्णेता देणारे नैसार्गाचे घटक आहेत. मिलनातही ते स्वत:चं अस्तित्व टिकवुन ठेवु शकतात - हा संदेश देणारं हे स्वरुप. DSC_6505_01 अर्धनारीश्वरसाठी गाभार्‍याला आज हिमालयाचं स्वरुप देण्यात आलं होत. DSC_6504_01 DSC_6501_01 DSC_6500_02 चौडेश्वरी देवींची आज दश्भुजा दुर्गा-परमेश्वरी स्वरुपात आरास झाली. DSC_6527_01 DSC_6526_01 DSC_6524_01 DSC_6522_01 अष्टमी अष्टमी निमित्त चौडेश्वरीने महिशासूरमर्दिनी रुप साकरले तर ते पिलेकम्माने महाकाली रुप धारण केले. चौडेश्वरी आज सिंहारुढ आहे आणि तिच्या हातामध्ये त्रिशुल आहे. खाली एक कोहळा महिषासुर स्वरुपात ठेवला आहे. DSC_6476_01 DSC_6478_01 DSC_6471_01 DSC_6475_01 महाकाली स्वरुपात असलेल्या पिलेकाम्माच्या गळ्यात कवट्यांची माळ आहे ( म्हणुन ह्या स्वरुपाला बहुदा कपालिनी सुद्धा म्हणतात. ) तिच्या एका हातामध्ये रक्तबीजाचं कापलेलं धड आहे. तसचं तिच्या हातामध्ये त्रिशुल सुद्धा आहे. DSC_6482_01 DSC_6480_01 DSC_6491 DSC_6485_01 DSC_6496_01 सप्तमी सप्तमीनिमित्त पिलेकाम्मा आणि चौडेश्वरी दोघींची सरस्वती स्वरुपात पूजा झाली. पिलेकाम्माचा पोषाख आज भस्मापासुन बनला होता आणि तिने हातात वीणा धारण केली आहे. DSC_6432_02 DSC_6433_02 DSC_6434_02 DSC_6435_02 DSC_6437_02 DSC_6438_02_01 चौडेश्वरी आज शुभ्रवस्त्र, श्वेत पद्मावर , हातामध्ये वीणा अशा स्वरुपात आहे. शेजारी वह्या-पुस्तकांची आरास करण्यात आली आहे. हंसाची प्रतिमासुद्धा त्यात आहे. DSC_6439_02 DSC_6440_02 DSC_6442_02 DSC_6444_02 कमळाच्या पाकळीवर विसावलेले देवीचे चरण DSC_6445_01 हस्तमुद्रांचे काहि फोटो DSC_6446_01 DSC_6447_02 DSC_6448_01 DSC_6450_01 षष्ठी आज पिलेकाम्माची स्वरुपात तर चौडेश्वरीची हुआ करगा((द्रौपदि) स्वरुपात पूजा झाली. पिलेकाम्माचा पूर्ण पोषाख आज लोण्यापासुन बनला होता DSC_6420_01 DSC_6422_01 DSC_6424_01 हुआ करगा म्हणजे फुलांचा मुकट परिधान केलेली द्रौपदी असं आज चौडेश्वरी देवीचं साकारण्यात आलं होत. DSC_6426_01 DSC_6428_01 DSC_6429_01 DSC_6431_01 पंचमी आज पंचमीनिम्मित्त पिलेकाम्माची पंचवर्णा स्वरुपात तर चौडेश्वरीची हसी करगा(द्रौपदि) स्वरुपात पूजा झाली. पिलेकाम्माचा पोषाखामध्ये आज पाच रंगछटांचा समावेश होता DSC_6406_01 DSC_6403_01 DSC_6409_01 दक्षिण भारतामध्ये द्रौपदी ही एक प्रमुख देवी आहे. बंगलोरचा तिच्या नावाने केला जाणारे करगा उत्सव खुप प्रसिद्ध आहे. आज चौडेश्वरीची हसी करगा स्वरुपात पूजा झाली. (हसी हा शब्द कोवळी, नाजुक, कच्ची, हिरवी अशा अर्थाने वापरला जातो तर करगा म्हणजे मुकुट. कदाचित कळ्यांच्या मुकुट असा अर्थ असेल . जो शंकु सारख्या आकाराचा तिच्या हातामध्ये दिसतो तो, ऊद्या तोच मुकुट तिच्या डोक्यावार ठेवला जाईल) . तिच्या एक हातामध्ये खंजीर सुद्धा आहे आहे. DSC_6415_01 DSC_6416_01 DSC_6410_01 DSC_6418_01 चतुर्थि चौडेश्वरी आणि पिलेकाम्मा, दोघीही आज अन्नपुर्णा स्वरूपात होत्या. पंरंपरेनुसार भिक्षुक स्वरुपात आलेल्या महादेवाला अन्नदान देनारी देवी असे तिचे स्वरुप दाखवन्यात येते. अन्नपुर्णा ही सर्व जिवांच पोषण करनारी देवता आहे. चौडेश्वरीच्याआरासाची सुरुवात आज मंदिराच्या बाहेरुनच झाली. बाहेर छोटिशी भातशेती तयार केली होती आणि गाभार्‍याबाहेर भातकुटांची रास सुद्धा रचली होती . DSC_6388_02 देवीने आज लाल काठाचा पोपटी शालु परिधान केला आहे. तिच्या उजव्या हातमध्ये पळी आहे, डाव्या काखेमध्ये अक्षय पात्र आहे ज्यातुन सतत तांदळाचा प्रवाह वाहतो आहे. आणि डाव्या हातामध्ये अन्न आहे जे ती शेजारी स्थापित महादेवाला दान देनार आहे DSC_6382_01 DSC_6384_01 DSC_6387_01 DSC_6385_02 पिलेकाम्माचा संपुर्ण पोषाख आज लाल आणि पिवळ्या गुलाबांच्या फुलांनी बनवण्यात आला आहे. DSC_6389_01 DSC_6391_01 DSC_6394_01 DSC_6395_01 तृतिया चौडेश्वरी आणि पिलेकाम्मा, दोघींनी आज सम्रुद्धि आणि ऐश्वर्याची देवता असनार्‍या महालक्ष्मीचं स्वरुप धारण केलं. पिलेक्कामाचा गाभारा नोटांनी सजवला होता, तर तिचा पोषाख चमकीने बनवला होता. DSC_6371_01 DSC_6367_01 DSC_6372_01 चौडेश्वरीने आज निळा शालु परिधान केली असुन ती कमळाच्या फुलवार स्थानापन्न आहे . तिने अभय मुद्रा धारण केली असुन हातामधुन नाण्यांचा प्रवाह वाहतो आहे असा आभास निर्माण केला गेला आहे DSC_6362_02 DSC_6363_01 DSC_6377_01 द्वितिया: चौडेश्वरीची राजराजेश्वरी स्वरुपात तर पिलेकाम्माची ब्रह्मचारीणी स्वरुपात पूजा झाली. राजराजेश्वरी हि संपुर्ण विश्वावर सत्ता चालवणारी देवी आहे तर ब्रह्मचारीणी सर्व ऐश्वर्याचा त्याग करुन महादेवाला वर स्वरुपात प्राप्त करुन घेण्यासाठी खडतर तप करणारे सती स्वरुप आहे. दोन्हि पार्वतीचीच रुप. पण हा विरोधाभास आयुष्याचा अविभाज्य अंग असनार्‍या सम्रुद्धी आणि कष्ट किंवा अडचणी ह्या सत्याची जाणीव करुन देतो. कठिण आणि हलाकिच्या परिस्थिती मध्ये प्रामाणिकपणे हिंमत न हारता कष्ट करत रहाणे तर सम्रुद्धीच्या काळात विनम्र, न्यायप्रिय आणि क्षमाशील रहाणे हे शक्तीचा परिचय देणारे गुण्धर्म आहेत, कदाचित हेच देवीची ही दोन्हि रुपं आपल्याला सांगत असतील. ब्र्हमचारीणि स्वरुप खाऊच्या पानांच्या पोषाखाने साकरला गेलं आहे. DSC_6327_01 DSC_6328_01 DSC_6338_01 DSC_6342_01 राजराजेश्वरी स्वरुप , लालसर रंगाचा शालु आणि दागिन्यांनी साकारण्यात आले आहे. डोक्यवार महादेवाप्रमाणे चंद्रकोर तर मागिल दोन हातांमध्ये विष्णुप्रमाणे शंख व चक्र आहे. त्रिदवांच्या सर्व शक्ती तिच्याकडे आहेत हे दाखवून देतात. DSC_6331_01 DSC_6334_01 DSC_6335_01 DSC_6336_01 प्रतिपदा : काल दोन्ही देवींची  कामाक्षी स्वरूपात पूजा झाली.  महादेवाची  तपश्चर्या खंडित केल्यामुळे , क्रोधीत महादेव कामदेवाला भस्म करून टाकतात. पण त्यानंतर पर्वतीवर मोहित होऊन ते वैराग्य त्यागतात. देवीचे ते सवरूप म्हणजे कामाक्षी. हि इच्छाशक्ती, सृजन आणि  प्रीती ह्याची देवी मानली जाते.   आणि कामदेवाची सारी चिन्हे देवीकडे आहेत. जसेकी त्याचे वाहन पोपट, त्याचा उसाच्या खांडक्यापासून बनवलेला धनुष्य आणि फुलांचा बाण . तिच्याबद्दल अजून एक गोष्ट वाचनात आली-   भस्म झालेल्या कामदेवाच्या राखेपासून भांड नावाचा एक राक्षस बनतो.  त्याच्या मृत्यूसाठी इंद्रदेव यज्ञ करतात  आणि त्या यज्ञातून कामाक्षी प्रकट होते.  हि घटना कांची इथे झाली असे मानली जाते. कांचिच्या कामाक्षी  मंदिराशी जोडलेल्या अशा  अनेक गोष्टी प्रचलित आहेत .  आधी पाहूया पिलेकम्माची आरास.  देविचा पोशाख हळद आणि कुंकू ह्या दोन्हीच्या लेपाने बनवला आहे . अलंकारामध्ये पक्ष्याच्या आकाराचे दागिने  आहेत  DSC_6312_01 DSC_6313_01 DSC_6321_01 DSC_6318_01 तर चौडेश्वरीला हिरवा शालू नेसवाला आहे , हातावर तसेच खांदयावर पोपट  ठेवले आहेत.  DSC_6316_01 DSC_6324_01 DSC_6322_02 सर्वाना नवरात्रिच्या हार्दिक शुभेच्छा

प्रतिक्रिया द्या
37902 वाचन

💬 प्रतिसाद (59)
प
प्रसाद_१९८२ Sun, 10/18/2020 - 12:52 नवीन
देवीचे फोटो अगदी अप्रतिम आहेत. जय दुर्गा ! __/|\__ -- हाच धागा एडीट करण्याऐवजी नऊ दिवसाचे, नऊ धागे केलेत तर छान होईल.
  • Log in or register to post comments
प
पॉइंट ब्लँक Sun, 10/18/2020 - 14:54 नवीन
धन्यवाद. नऊ धागे खुप जास्त होतील बहुतेक. परत एखद्याला पुन्हा वाचयचा किंवा शेअर करयचा असेल तर त्यानाहि त्रास होइल. बघु कसं जमतय ते :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२
न
नूतन Sun, 10/18/2020 - 13:25 नवीन
फुलांनी सजवलेली देवी फारंच सुंदर!
  • Log in or register to post comments
प
पॉइंट ब्लँक Sun, 10/18/2020 - 14:58 नवीन
धन्यवाद , पुजारी मेकअप आर्टिस्ट सुद्धा असतात का असा प्रश्न बर्‍याच वेळा मनात येतो. सगळं कसं एकदम क्रियेटिव्ह आणि परफेक्ट असतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नूतन
च
चौथा कोनाडा Sun, 10/18/2020 - 14:35 नवीन
व्वा, खुप सुंदर ! देवीचे फोटो अप्रतिम ! जय पिलेकम्मा, जय चौडेश्वरीची माता !
... वाहन पोपट, त्याचा उसाच्या खांडक्यापासून बनवलेला धनुष्य आणि फुलांचा बाण .
अशी सजावट म्हणजे फळे, फुले, पाने, भाज्या रोपटी, हळद, कुंकू इ. विविध नैसर्गिक घटकांनी केलेली सजावट म्हणजे बंगळुरूची खासीयत आहे. ही सुंदरता खुप भारी वाटते बघायला ! मस्त हो पॉइंट ब्लँकजी ! रोज याच धाग्यावर असे फोटो पहायला आवडतील ! || नवरात्र हार्दिक शुभेच्छा ||
  • Log in or register to post comments
प
पॉइंट ब्लँक Sun, 10/18/2020 - 15:00 नवीन
हो नैसर्गिक घटकांनी केलेली सजावट बघायला खुप छान वाटते. >>रोज याच धाग्यावर असे फोटो पहायला आवडतील ! धागा एडिट करयचा पर्याय कुठे दिसला नाहि. कसा करतात ते सांगु शकाल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा
अ
अनिंद्य Sun, 10/18/2020 - 14:53 नवीन
दक्षिणेत फार कमी देवळात देवमूर्तीचे फोटो काढण्याची परवानगी असते. तुम्ही फार सुंदर फोटो काढले आहेत.
  • Log in or register to post comments
प
पॉइंट ब्लँक Sun, 10/18/2020 - 15:04 नवीन
एकदोन अपवाद वगळ्ता मला असा अनुभव नाहि आला. कधी कधी मंदिर ASI च्या ताब्यात असेल तर ते उगाच अड्काठि करतात. पण इतरत्र कुणि इतका त्रास नाहि दिला :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिंद्य
क
कंजूस Sun, 10/18/2020 - 14:54 नवीन
बऱ्याच ठिकाणी काढू देत नाहीत. खरं म्हणजे देऊळ जुने असेल तर आतली शिल्पकला टिपणे हा हेतू असतो पण क्याम्राच नेऊ देत नाहीत. बाकी फोटो मस्तच.
  • Log in or register to post comments
प
पॉइंट ब्लँक Sun, 10/18/2020 - 15:06 नवीन
मला सहसा असा अनुभव नाहि आला. फक्त ASI वाले कधी कधी अड्काठि करतात. पुजारी लोक नाहि करत. त्याना एकद विचारला कि झाल. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
प
पॉइंट ब्लँक Sun, 10/18/2020 - 15:06 नवीन
मला सहसा असा अनुभव नाहि आला. फक्त ASI वाले कधी कधी अड्काठि करतात. पुजारी लोक नाहि करत. त्याना एकद विचारला कि झाल. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
र
रोहित रामचंद्रय्या Sun, 10/18/2020 - 18:28 नवीन
बंगळूरु नाही ते 'बेंगळूरु' आहे
  • Log in or register to post comments
प
पॉइंट ब्लँक Mon, 10/19/2020 - 04:19 नवीन
खरच कि राव. चुक लक्षात आणुन दिल्याबद्दल धन्यवाद :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रोहित रामचंद्रय्या
ग
गोरगावलेकर Sun, 10/18/2020 - 18:37 नवीन
माझा अनुभव : दक्षिणेतील कन्याकुमारी मंदिर, सुचिंद्रम मंदिर, पद्मनाभस्वामी मंदिर यामध्ये कुठेही कॅमेरा वापरायला परवानगी मिळाली नाही.
  • Log in or register to post comments
प
पॉइंट ब्लँक Mon, 10/19/2020 - 04:22 नवीन
तुम्हि फारच मोठ्या लिग मधील मंदिराबद्दल बोलताय. काहि ठिकाणी कॅमेराच काय मोबाईल फोन सुद्धा मंदिरात नेता येत नाहि. असो, ह्या तीन्ही मंदिरांना भेट देन्याचा योग आला नाहि अजुन. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गोरगावलेकर
त
तुषार काळभोर Sun, 10/18/2020 - 18:45 नवीन
अतिशय सुरेख फोटो. पूर्ण नवरात्रीचे फोटो याच मूळ धाग्यात राहिल्यास हा धागा सदा संस्मरणीय होईल यात शंका नाही!
  • Log in or register to post comments
प
पॉइंट ब्लँक Mon, 10/19/2020 - 04:24 नवीन
धन्यवाद. तत्पर संपादक मंडळाने तशी सोय केली आहे. खुप आभारी आहे _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर
च
चौथा कोनाडा Sun, 10/18/2020 - 18:45 नवीन
जुनी मंदिरे, गर्दीची देवस्थाने इथं कॅमेराला मनाई असतेच. हे पिलेकाम्मा आणि चौडेश्वरी मंदिर नवे आणि कमी गर्दीचे असणार. बेंगळूरुत कॉलन्यात, नविन उपनगरात अशी मंदिरे असतात. एका वर्षी नृसिंह जयंती दरम्यान टिचर्स कॉलनी (बनशंकरी रोड) इथल्या छोटेखानी नृसिंह मंदिरात गेलो होतो, तेथे ही मुर्तीची सजावट अशी सुंदर असल्याचे आठवतेय.
  • Log in or register to post comments
प
पॉइंट ब्लँक Mon, 10/19/2020 - 04:59 नवीन
हो. पिलेकाम्मा आणि चौडेश्वरी मंदिर लहान आणि तुलनेने कमी गर्दिची आहेत. ग्रामदेवता आहेत दोन्हि तुब्रहल्लीच्या. पण कहि प्राचीन मंदिरांमध्ये पण खुप सुखद अनुभव आले आहेत फोटोग्राफी संदर्भात. त्यातील दोन तीन नमुद करेन इथे. १. एकदा सांगलीहुन बेंगलोरला येताना , डयव्हर्जन घेवून कुरुवट्टीला भेट दिली होती. जवळपास ७००-८०० वर्ष जुने मल्लिकार्जुन मंदिर आहे . जवळ्पास दोन अडिच तास फोटोग्राफी केली त्या मंदिरात. तिथे एक भला मोठा नंदि सुद्धा आहे. मी जेव्हा त्या नंदिचे फोटो काढले तेव्हा त्या पुजार्‍याने ते बघायला मागितले. फोटो बघितल्यावर त्याने मला सांगितले -"तु आज इथेच रहा. उदया सकाळी जेव्हा पुजा उतरवली जाईल तेव्हा नुसत्या नंदिचा एक फोटो काढुन दे. तुझ्या जेवणाची आणि राहण्याची सोय आमच्या घरी करु " पण मला दुसर्या दिवशी जॉब जॉईन करायच असल्यामुळे ते शक्य झालं नाही. तरीही त्याने त्याचा फोन नंबर दिला आणि रहायचा प्लॅन करुन परत ये असं सांगितल. २. दुसरा अनुभव अवनी शारादा पिठाचा आहे. हे खुप प्राचीन पीठ आहे. आणि त्यांच्या बरर्‍याच शाखा सुद्धा आहेत कर्नाटकामध्ये. तिथे आधि मुल देवतेची फोटो काढायला पुजार्‍याने परवानगी नव्हती दिली. पण बाकि फोटो काढु दिले. मी फोटो काढत असताना त्याने मंदिराची माहिती दिली बरेच. मग आम्हि दोघांनी बसुन कॅमेरामधल्या फोटोची एक उजळनी केली. त्यानंतर काय मनात आले त्याच्या माहिती नाहि. मला स्वत:हुन देवीचे फोटो काढायला सांगितले. त्यांनंतर स्वतःच कार्ड दिल. आणि दसर्याला उत्सव असतो तेव्हा ये परत फोटो काढायला अस आमंत्रण सुद्धा दिल. ३. बेंगलोर मध्ये व्हाईट्फिल्ड मध्ये बर्‍याच मंदिरात मी नियमित जातो तिथे एक-दोनदा फोटो काढल्यावर, ते पुजारी जर विशेष पूजा असेल तर स्वतःहुन आधी सांगतात की ह्या दिवशी खास कार्यक्रम आहे आणि कॅमेरा घेवून ये तु :) दहा वर्षांपूर्वी जेव्हा डिएसलारचा सुळ्सुळाट नव्हता तेव्हा तर अजुन मज्जा होती. बर्‍याच मंदिरात मला - "तु कुठल्या वर्तमान पत्राचा रिपोर्टर आहेस आणि आमच्या मंंदिर कुठल्या चॅनेल वर झळ्कनार" असं विचारला जायच. पण मी रिपोर्टर नाही हे ऐकुन हिरमुसायचे बिचारे. असो सांगायला खुप आठवणी आहेत , पण धागा भरकटेल उगाच. मंदिरामध्ये गेल्यावर पुजर्‍याना विनम्रपने विचारल आणि त्यांच्या प्रश्नांची "फोटो का काढतोय ?" ह्याची समाधानकारक उत्तर त्याना दिल की ते सहसा मनाई नाहि करत. मोडकी तोड्की का होईना पन कन्नडा बोलता येते ही जमेची बाजु आहे. बर्‍याच पूजार्‍याना हिंदी -ईंग्रजी नीट बोलता नाही येत इथे. चार गप्पा मारता आल्या पाहिजेत त्यंच्याशी. आमच्या मित्र मात्र "तुझ्याकडे डिएसलार आहे म्हणुन तुला उगाच भाव मिळतो" असा टोमणा आवर्जुन मारतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा
च
चौथा कोनाडा Fri, 10/23/2020 - 14:05 नवीन
+१ व्वा, छानच अनुभव !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पॉइंट ब्लँक
क
कंजूस Mon, 10/19/2020 - 01:30 नवीन
मूर्तीची पुजा होत असणाऱ्या मंदिरात फोटो काढण्याला मनाई असते. हे पिल्लेकाम्मा पिल्ले नावाच्या ( बिल्डरचे ?) किंवा दुसऱ्या कुणाच्या मालकीचे खासगी मंदिर हौसेने बांधलेले असेल. ASI कडे ताबा असणाऱ्या मूर्तींची पुजा स्थानीक करत नसतात. किंवा कुणी जेमतेव दिवा लावतो हार घालतो पण ग्रामदेवता नसते.
  • Log in or register to post comments
प
पॉइंट ब्लँक Mon, 10/19/2020 - 05:15 नवीन
>> ASI कडे ताबा असणाऱ्या मूर्तींची पुजा स्थानीक करत नसतात. किंवा कुणी जेमतेव दिवा लावतो हार घालतो पण ग्रामदेवता नसते. हे तितकस बरोबर नाही आहे. बेंगलोर जवळ नंदि हिल्स च्या पायथ्याशी भोगानंदिश्वरा नावचं मोठ मंदिर आहे. नंदिग्रामची ग्रामदेवता आहे ती. हजार वर्षे जुनं हे मंदिर ASI च्या ताब्यात आहे. पन तिथे रोज पूजा होते , इतकच नव्हे तर अन्नछत्र सुद्धा चालत. तशी परिस्थिती हेमावाती सुद्धा आहे. बाकि बेंगलोरजवळ असनारी तळ्कडू, नुंजनगड , होसुर चंद्रचौडेश्वर मंदिर, सोमपल्ले अशी अनेक मंदिर ASI च्या देखरेखि खाली आहेत. तिथे रोज पूजा चालते आणि खुप सारे लोक दर्शनाला येतात. तुम्ही ज्या मंदिराबद्दल बोलताय तिथे पूजा न होण्याची वेगळी कारण आहे. उदा- सोमनाथपुरा, कदंबलुर, कोरांग्नाथर ह्या मंदिरांमध्ये पूजा नाहि होत, कारण तिथल्या मुळ देवता खंडित झाल्या आहेत किंवा मंदिरांचा विटाळ झाला आहे. >>हे पिल्लेकाम्मा पिल्ले नावाच्या ( बिल्डरचे ?) किंवा दुसऱ्या कुणाच्या मालकीचे खासगी मंदिर हौसेने बांधलेले असेल. शक्यता कमी वाटतिये कारण इथले स्थानिक लोक दरवर्षी जत्रा भरवतात इथे. ग्रामदेवता आहे ही तुब्रहल्ली ची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
ज
जुइ Mon, 10/19/2020 - 01:53 नवीन
देवीचे फोटो अतिशय सुंदर आहेत!
  • Log in or register to post comments
प
पॉइंट ब्लँक Mon, 10/19/2020 - 05:17 नवीन
धन्यवाद _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जुइ
G
Gk Mon, 10/19/2020 - 03:56 नवीन
छान
  • Log in or register to post comments
प
पॉइंट ब्लँक Mon, 10/19/2020 - 13:06 नवीन
धन्यवाद _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Gk
श
शा वि कु Mon, 10/19/2020 - 04:48 नवीन
भारी आहेत फोटो !
  • Log in or register to post comments
प
पॉइंट ब्लँक Mon, 10/19/2020 - 05:17 नवीन
धन्यवाद _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शा वि कु
प
प्रचेतस Mon, 10/19/2020 - 05:39 नवीन
वा...! फोटो एकदम सुरेख आलेत.
  • Log in or register to post comments
प
पॉइंट ब्लँक Mon, 10/19/2020 - 13:07 नवीन
धन्यवाद _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
च
चांदणे संदीप Mon, 10/19/2020 - 08:15 नवीन
सर्वच फोटो आवडले. सं - दी - प
  • Log in or register to post comments
प
पॉइंट ब्लँक Mon, 10/19/2020 - 13:07 नवीन
धन्यवाद _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप
च
चौथा कोनाडा Fri, 10/23/2020 - 14:03 नवीन
द्वितिया: तृतिया. चतुर्थी, पंचमी सर्वच प्रचि अप्रतिम ! नविन माहिती वाचायला मिळालई ! आणि षष्ठीचे फोटो, अर्थातच सुंदर !
पिलेकाम्माचा पूर्ण पोषाख आज लोण्यापासुन बनला होता
ही लोण्याची कला भारी असते ! खरंच, कला-संस्कृती मंदिरसंस्थेच्या आश्रयाने वर्धित होते !
  • Log in or register to post comments
प
पॉइंट ब्लँक Fri, 10/23/2020 - 18:16 नवीन
>>खरंच, कला-संस्कृती मंदिरसंस्थेच्या आश्रयाने वर्धित होते ! ह्या विचाराशी पूर्णतः सहमत. कित्येक लहान सहान मंदिरांकडुन कलेला आश्रय दिला जातो आणि ती लोकांसमोर आणली जाते. देवाची पूजा अर्चना ह्यातुन संस्कृती तर दर्शन तर होतच रहातं. शिवाय सणासुदिला अशा मंदिरांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा आयोजित केले जातात- उदा. भरतनाट्यम, किंवा गायनाचा कार्यक्रम. एक विशेष गोष्ट म्हणजे, इथल्या एका बालाजी मंदिरात बर्‍याच वेळा शनिवारी भजन किर्तनाचा कार्यक्रम असतो, त्यात विठोबाची मराठी भक्ती गीते सुध्दा गायली जातात. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा
त
तुषार काळभोर Sat, 10/24/2020 - 02:35 नवीन
दिवसेंदिवस सजावट जास्त सुंदर होतेय.
  • Log in or register to post comments
प
पॉइंट ब्लँक Sat, 10/24/2020 - 06:48 नवीन
हो, रोज काहि ना काही नवीन बघायला मिळतय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 10/24/2020 - 05:10 नवीन
नवीन माहिती आणि भारी फोटो. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
पॉइंट ब्लँक Sat, 10/24/2020 - 06:49 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
त
तुषार काळभोर Sat, 10/24/2020 - 11:19 नवीन
एकदम कल्पक आणि सर्जनशील थीम्/विषय आणि अतिशय साजेशी सजावट! ** ही सर्व माहिती तुम्ही कशी मिळवता? म्हणजे आधीच हे सर्व माहिती आहे (पोपट म्हणून कामाक्षी, नोटांची सजावट असताना लक्ष्मी, नंतर अन्नपूर्णा इत्यादी) की कोणी सांगतं तिथं?
  • Log in or register to post comments
प
पॉइंट ब्लँक Sat, 10/24/2020 - 12:39 नवीन
रोज मंदिरात फोटो काढताना पूजार्‍यांकडुन बरीच माहिती मिळते. ते रोज सांगतात कुठल्या स्वरुपाची पूजा आहे. पूजेमध्ये पैसे ठेवले की ती लक्ष्मी असते आणि वीणा म्हणजे सरस्वती ह्या गोष्टी आपल्याला लहानपनापसुन माहिती असतात कारण आपण त्या आपल्याकडे दिवाळीच्या पूजेमध्ये किंवा दसरर्‍याला मंदिरामध्ये नेहमी पहान्यात असतात. द्रौपदी, कामाक्षी किंवा अन्नपूर्णा ह्या देवतांचं आपल्याकडे प्रस्थ नाहीये. त्यामुळे आपल्याला जास्त माहिती नसतात त्यांच्या पूजेचे स्वरुप. पण जवळपास पंधरा वर्ष बेंगलोर मध्ये काढल्यावर आणि दक्षिण भारता बरीच भटकंती ( विशेषतः मंदिर) केल्यामुळे ह्या देवता थोड्या परिचयाच्या झाल्या आहेत. तसचं फेसबुकवर बरेच हेरिटे़ज किंवा कल्चर स्वरुपाचे ग्रुप आहेत जिथे बरीच माहिती वाचायला मिळते. थोडक्यात सांगायचं तर माझं ह्या विषयातलं क्नोलेज सेकंड हँड आहे. स्वतःहुन काही अभ्यास केला नाहिये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर
ग
गोरगावलेकर Sat, 10/24/2020 - 17:38 नवीन
सर्व फोटोही खूपच आकर्षक आहेत. तसेच नवीन माहितीही मिळते आहे.
  • Log in or register to post comments
प
पॉइंट ब्लँक Sun, 10/25/2020 - 09:33 नवीन
धन्यवाद -_/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गोरगावलेकर
च
चौथा कोनाडा Sun, 10/25/2020 - 16:18 नवीन
व्वा, अष्टमी निमित्त देवीचे महिषासुर रमर्दिनी रुप अप्रतिम ! मालिका पाहायला मजा आली. अभिनव कल्पना होती ! देवींची माहिती आणि वेगवेगळी सुंदर रूपे व अप्रतिम सजावट बघायला मिळाली. पुढेचमागे अशीच मालिका वाचायला पाहायला आवडेल. पॉइंट ब्लँक साहेब, 🙏
  • Log in or register to post comments
प
पॉइंट ब्लँक Sun, 10/25/2020 - 17:02 नवीन
इकडे दसरा उद्या आहे. अजुन दोन surprise शिल्लक आहेत :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा
च
चौथा कोनाडा Wed, 10/28/2020 - 05:42 नवीन
👌 नवमी आणि विजयादशमीचे फोटो देखील अप्रतिम ! 🙏 पॉइंट ब्लँक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पॉइंट ब्लँक
प
पॉइंट ब्लँक Wed, 10/28/2020 - 15:07 नवीन
धन्यवाद _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा
त
तुषार काळभोर Mon, 10/26/2020 - 15:14 नवीन
ज्यांनी आरास केली त्यांची आणि तुमची पण. खूप कल्पकतेने फोटो दिलेत. म्हणजे केवळ आधी अर्धी देवी, नंतर अर्धा महादेव, हेच नाही. हिमालयाची आरास दाखवताना हळू हळू बाहेर येणं हे सुद्धा.. तुमच्याकडून अजून खूप काही पाहायला आवडेल.
  • Log in or register to post comments
प
पॉइंट ब्लँक Mon, 10/26/2020 - 19:49 नवीन
सतत प्रोस्ताहान दिल्याबद्दल आभारी. पूजारी मंडळींचे कष्ट खुप जास्त आहेत आणि त्यांची कल्पकता सुद्धा. ऱोज जवळपास सहा तास लागतात त्यांना पूजेच्या तयारीसाठि. त्यांच कौतुक करावं तितक कमीच आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर
त
तुषार काळभोर Mon, 10/26/2020 - 15:14 नवीन
सर्व फोटो एकाच लेखात घेतल्याचे सार्थक झाले.
  • Log in or register to post comments
प
पॉइंट ब्लँक Mon, 10/26/2020 - 19:51 नवीन
संपादक मंडळाचे विशेष आभार रोज धागा संपादित करण्याची तदतुद करुन दिल्याबद्दल _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा