पाककृती

पालक चकली (फोटो-विडिओ सोबत)

Primary tabs

काही दिवसापूर्वी माझ्या सौच्या पणजीआजीने दिलेल्या कृतीने हि चकली करून पहिली. मुलाला खूप आवडली. या वेळी पुन्हा करताना व्हिडीओ केला.
इकडे भाजणी सहसा मिळत नाही म्हणून यावेळी पीठं आणि मसाला भाजून पीठ तयार केलं. छान झाली.

जिन्नस:

  • पालक - ८-१० पानं
  • तांदूळ पीठ - २ कप
  • बेसन - पाव कप
  • उडीद डाळ पीठ - पाव कप
  • मूग डाळ पीठ - पाव कप
  • मैदा - १ कप
  • दालचिनी - १-२ काड्या
  • काळी मिरी - १/२ टीस्पून
  • जिरं - १ टीस्पून
  • धणे - १/२ टेबलस्पून
  • हिंग - पाव टीस्पून
  • ओवा - १ टीस्पून
  • तीळ - १ टेबलस्पून
  • दही - २ टेबलस्पून
  • तूप - ३ टेबलस्पून
  • चवीनुसार मीठ
  • तळण्यासाठी तेल

पाककृती:
पालकाची पानं स्वच्छ धुवून कोरडी करून घ्या.
एका पॅनमध्ये तांदूळ पीठ २ मिनिटं मंद आचेवर परतून एखाद्या ताटात/परातीत काढा.
पॅनमध्ये बेसन, उडीद डाळ पीठ, मूग डाळ पीठ एकत्रित ४ ते ५ मिनिटं मंद आचेवर परता आणि तांदूळ पिठात एकत्र करून थंड होऊ द्या.
पीठं पूर्ण थंड झाली की त्यात मैदा घालून छान एकत्र करून घ्या.
पॅनमध्ये दालचिनी, मिरी, जिरं आणि धणे २ ते ३ मिनिटं मंद आचेवर भाजून घ्या आणि पूर्ण थंड झाला की ग्राइंडर मध्ये घालून बारीक वाटून घ्या.
वाटलेला १ टेबलस्पून मसाला, हिंग, तिखट, पिठीसाखर, ओवा, तीळ आणि मीठ पिठात घालून, एकत्र करा. (मी इथे मसाला मिक्सरला वाटला जावा म्हणून थोडा जास्त केलाय. उरलेला मसाला इतर भाजी/आमटीत वापरता येऊ शकतो)
एखाद्या पळीमध्ये तुपाचा मोहन करून पिठात घाला आणि मिश्रण एकत्र करा.
पालक बारीक चिरून पीठात घाला.
पीठात दही घालून पीठ कालवा.
थोडे थोडे पाणी घालून पीठ मळून थोडा वेळ ठेवून द्या.
चकली पात्रात पीठ घालण्या आधी पीठाला तेलाचा हात लावून पीठ मळा.
चकली पात्रात पीठ घालून चकल्या पाडा आणि गरम तेलात गोल्डन ब्राऊन टाळून काढा.

निनाद

केलेली छान चकली! अगदी भाजणीसुद्धा!! मस्त

गोंधळी

दिवाळीच्या फराळामधला चकली हा पदार्थ जास्त आवडतो. व्हिडिओ ही भारी आहे.

मी_देव

हो हो.. माझा सुद्धा.. आमच्याकडे सर्रास केला जाणारा स्नॅक.. खूप आभार!

पियुशा

जबरदस्त रेसिपी न व्हिडिओ तर फारच छान शूट केलाय कुठल software waprly?

अनिंद्य

टेस्ट भी हेल्थ भी’ चकली रेसिपी आवडली. अगदी from the scratch म्हणतात तशी.

व्हिडिओ तर फारच उत्तम !

मी_देव

सर्वांना मनापासून धन्यवाद.. खूप मेहनत होती, ती अशा प्रतिक्रिया वाचल्या कि फळाला आली वाटतं.. :)

चकल्या मस्त आणि चित्रफित खूपच छान..
मी वेगळ्या पध्दतीने चकल्या करते , आता ह्या दिवाळीला अशा प्रकारे करून पाहिन.
स्वाती