Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

रोमान्स विथ मुझिक

स
संजय क्षीरसागर
Sun, 10/25/2020 - 18:35
💬 89 प्रतिसाद
गाणं हा शांतता आणि ध्वनी यातला प्रणय आहे. शांतता ही स्त्री प्रकृती आहे आणि ध्वनी पुरुष आहे. तुम्ही जीवनात गाणं आणलंत तर हा रोमान्स अविरत चालू शकतो. आशा भोसले म्हणते की गाणं ही फक्त शब्दाचा ध्वनी करण्याची कला आहे. जनमानसात एक दृढ गैरसमज आहे की गाणं ही अवघड कला आहे आणि मुख्य म्हणजे आपल्या आवजात गोडवा नाही. या लेखाचं प्रयोजन असं की कोणतंही शास्त्रीय संगीत किंवा गाण्याचं फॉर्मल ट्रेनिंग न घेता, तुम्ही सुद्धा सुरेख गाऊ शकता. तुमच्याकडे एकमेव गोष्ट हवी ती म्हणजे रोमँटीक मूड ! हा रोमँटीक मूड तुमच्या जीवनाचा सगळा रंगच बदलून टाकतो. आवजातला गोडवा, ताल-सुराचं ज्ञान, शब्दांवर टाकायचं नेमकं वजन तुम्हाला यथावकाश आपसूक जमायला लागतात. १. अँड्रॉइड तानपुरा हे फ्री अ‍ॅप प्ले स्टोअरवरुन मोबाईलवर डाऊनलोड करा. त्यातला तानपुरा काळी एक किंवा तुम्हाला आ हा शब्द स्वरासारखा सहज उच्चारता येईल त्या स्केलला सेट करा. नाऊ यू आर ऑल सेट ! २. तुम्हाला फक्त ही सात व्यंजनं तानपुर्‍यात सेट केलेल्या ध्वनीशी जुळवायची आहेत : > अ, > आ, > ए, > औ, > इ (ई), > उ (ऊ), > अं कोणत्याही शांतवेळी हेडफोन लावा, सेट केलेला तानपुरा चालू करा आणि ही व्यंजनं स्वरासारखी म्हणून तानपुर्‍याच्या ध्वनीशी जुळवत म्हणा. तानपुर्‍याचा ध्वनी आणि तुमचं उच्चारण यांचा रेझोनन्स मॅच करत जा. आ नी सुरुवात करा. डोळे बंद ठेवा म्हणजे अवधान एकाग्र होईल आणि तुम्हाला रेझोनन्सचा नेमका फिल येईल. पहिला स्वर जुळता क्षणी तुम्हाला कमालीचा आनंद होईल. गाणं म्हणजे फक्त उच्चारणाला किती जोर लावायचा याचं भान आहे. या भानाचा नेमका अंदाज नसल्यानं आपला स्वर बेसूर होतो इतकाच काय तो सुरांचा फंडा आहे. वर सांगितलेली सर्व व्यंजनं शांतपणे तानपुर्‍याच्या ध्वनीच्या रेझोनन्सशी जुळवत म्हणत रहा. हा अत्यंत बेसिक रियाज़ आहे. त्यानं तुम्हाला उच्चारणाला लावायच्या जोराचं नेमकं भान येईल. एकदा हे जमलं की तुमची निम्मी तयारी झाली. ३. आता तुमच्या आवडीचं कोणतंही एक (आणि फक्त एकच) गाणं घ्या. सुरुवातीला एकच गाणं सिलेक्ट करणं आगत्याचं आहे कारण मनाची धरसोड वृत्ती प्रचंड आहे. हे जमत नाही की ते असं करत मनाच्या मागे गेलात तर सगळा प्रोजेक्टच फेल होईल. त्या गाण्याची लिरिक्स गीतमंजूषा या साइट वरुन डाऊनलोड करा; म्हणजे लिरिक्सचा सरळ स्क्रीन शॉट घ्या. गाण्यावर प्रेम याचा अर्थ गाण्याच्या शब्दांनी तुम्हाला मोह घातला आहे. तुम्हाला गाण्याची लिरिक्स पाठ आहेत आणि चाल तुम्हाला पक्की माहिती आहे. तुमची चाल इतकी पक्की आहे की लिरिक्सचा स्क्रीन शॉट समोर असेल तर तुम्ही ते गाणं सरळ चालीत म्हणू शकाल. गाणं तालात हुकण्याची फक्त दोनच कारणं आहेत. एक, लिरिक्स पाठ नसणं आणि दोन, चाल पक्की नसणं. यापरता तालात चूक होण्याचं तिसरं कारण जगात नाही. ४. आता तुम्हाला फक्त गाण्याच्या शब्दांचे स्वर करायचे आहेत की यू आर ऑलमोस्ट डन ! ते काम विशेष अवघड नाही, कसं ते पाहा: आया है मुझे फिर याद वो जालीम हे गाण्याचे शब्द आहेत. आता प्रत्येक शब्दाच्या शेवटच्या अक्षराच्या उच्चारणात (किवा एखादं अक्षर चालीत लांबवलं असेल तर त्या अक्षराच्या उच्चारणात) वरच्या पैकी कोणतं तरी एक व्यंजन आहे, तेवढं शोधलं की त्या शब्दाचा स्वर होतो; असा : आया (आ आ आ) है (ऐ) मुझे.. (ऐ ऐ ऐ) फिर (अ) या...(आ,आ,आ) द( अ) वो (ओ) जा(आ)लिम(अं) एकदा तुम्हाला ही शब्दाचा स्वर करायची कॢप्ती जमली की तुमच्या आवजातला गोडवा तुम्हाला जाणवायला लागेल. हे काम तुम्हाल सगळ्या गाण्यातल्या तीन प्रकारच्या अक्षरांवर करायचं आहे : अ) शब्दातलं शेवटचं अक्षर ब) चालीत लांबवलेलं अक्षर क) चालीत ठहराव असलेलं अक्षर आता तुम्ही ठेक्यात गायला तयार झालात ! ५. स्म्यूल सोशल सिंगींग अ‍ॅप प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड करा. हे अत्यंत उत्तम कराओके अ‍ॅप, १५० रुपयात वर्षभरासाठी उपलब्ध आहे (केवळ करोनामुळे !) आता रिदमचा एकमेव फंडा आहे, इअर फोन्स चढवल्यावर ठेका तुम्हाला मेंदूच्या बरोबर मधे (म्हणजे नाकाच्या इग्झॅक्ट मागे) ऐकू यायला हवा. आणि तो संपूर्ण गाण्यात तिथून हालता कामा नये. आता इअर फोन लावा, तुमचं आवडतं गाणं स्म्यूलवर सुरु करा आणि फक्त एकच प्रॅक्टीस करा, ठेका बरोबर मेंदूच्या मध्यभागी ऐकू यायला हवा. जोपर्यंत ठेका सेंटर होत नाही तोपर्यंत गाणं अजिबात म्हणू नका. एकदा ठेका सेंटर झाला की गाणं तुमच्या आतून आपोआप सुरु होईल ! डोळे बंद करुन ठेका ऐकत गाणं म्हणा. लिरिक्स समोर डिस्प्ले होतीलच पण त्यांचा फक्त अंदाज़ घेऊन, पुन्हा तालाबरोबर चाल जुळवा कारण लिरिक्स तुम्हाला पाठ आहेत आणि चाल तुम्हाला माहिती आहे. तिथं पॉज, रिज्युम (असाल तिथून पुन्हा सुरुवात) आणि रिस्टार्ट (पुन्हा पहिल्यापासून) अशा तीन्ही सोयी आहेत. गाणं संपल्यावर ते पब्लिक करुन (ते तिथे तुमच्याच चॅनेलवर रहातं, कुणी काही ऐकत-बिकत नाही); सेव करा. साधारण आठ-दहा दिवसात तुमच्या जीवनात सांगितिक रोमान्स सुरु होईल आणि ....... मग तो तुमची जन्मभर संगत करेल. ___________________________________________ लेखात सांगितलेलं गाणं तुमच्यासाठी इथे डेमो म्हणून अपलोड केलंय :
Sanjay Kshirsagar · ver:1

प्रतिक्रिया द्या
49521 वाचन

💬 प्रतिसाद (89)
ज
ज्ञानोबाचे पैजार Sun, 10/25/2020 - 19:14 नवीन
गीतगायन तुम्ही म्हणता तेवढे सोपे नाही हे तुम्हीच इथे क्लिप डकवून सिद्ध केलेत, कॉपी करण्या साठी सुद्धा लिहिता वाचता यावेच लागते, गाण्याचे पण तसेच आहे, लोक आयुष्य खर्च करतात, तेव्हा एखादा कोणी भीमसेन होतो, कोणीही उठून गाणे म्हणू शकत नाही, त्यामुळे गाता येत नसेल तर ऐकण्याचा आनंद घ्यावा, त्यातही भारी मजा आहे, आमच्या सोसायटीच्या चेअरमानलाही वाटते की पुढच्या निवडणुकीत नरेंद्र मोदीं ना आपण हरवू शकतो, हा बाथरूम सिंगिंग वेगळे, त्यातही आनंद असतोच, पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Sun, 10/25/2020 - 19:49 नवीन
व्यक्तीच्या आयुष्यात कोणत्याही छंदाची कधीही सुरुवात का होऊ शकत नाही या मानसिकतेचं उत्तम उदाहरण आहे. धावायचं म्हटलं की डायरेक्ट युसेन बोल्टशी तुलना करायची आणि हातपाय गाळून बसायचं असा प्रकार होतो. बाथरुम सिंगींग आणि कराओके सिंगींगमधे कमालीचा फरक आहे कराओके सिंगींग मधली मजा त्यात नाही. पण गाण्यासाठी आपल्याला जन्म घालवावा लागेल अशी धरणा करुन घेतली की बाथरुममधेही गायची लाज वाटेल. तुमच्या प्रतिसादामुळे ज्यांना थोडं फार तरी गायची इच्छा आहे असे लोक हतोत्साह होऊ नयेत म्हणून प्रतिसाद दिला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
च
चिगो Tue, 10/27/2020 - 12:34 नवीन
प्रयत्न चांगला आहे संक्षीचा गाण्याचा, पण म्हणून उगाच 'सारेगमपधनीसा' ऐवजी 'अ'ची बाराखडी देऊन आपण काहीतरी नवीन विचार देतोय असा आव आणलाय. बाकी गाणं गाण्यासाठी फक्त गाण्यांवर प्रेम हवं आणि स्वतःच्या सुखाला/ आनंदाला गौण मानण्याची वृत्ती नसावी. उगाच 'परफेक्शन'च्या शंकेने दबून जायचीपण गरज नाहीये.आवाजाच्या प्रतीपेक्षा/ गोडव्यापेक्षा (इथे मला बहुतेकांना आवडणारा किनरा स्वर अभिप्रेत आहे) सुरा-स्वरांवरच्या प्रेमाची आणि त्याचा आनंद घेण्याची गरज आहे. संक्षी, माझं प्रामाणिक मत द्यायचं झाल्यास, तुम्ही लेखात लिहीलेला भाव तुमच्या गाण्यात जाणवत नाहीये. तुम्ही सानुनासिक गायचा प्रयत्न करताय, असं मला वाटलं (तुमचा आवाज तसा नसेल तर).. मुळ गायकाने मोकळ्या गळ्याने गायलेलं एखादं गाणं ('पुकारता चला हुं मैं' पासून 'मन भरया' पर्यंत कुठलंही चालेल) ह्या प्लॅटफॉर्मवर टाका, मग ह्यावर जास्त बोलता येईल. स्वच्छंदपणे गात रहा, ह्याच शुभेच्छा.. मन की बातां : च्यायला.. मनमोकळेपणाने गावं, ह्यावरपण लेख यायला लागावेत ह्यापरतं दु:ख नाही. काय चाललंय जगात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
स
संजय क्षीरसागर Tue, 10/27/2020 - 15:31 नवीन
थोडे गैरसमज दूर करतो : १.
उगाच 'सारेगमपधनीसा' ऐवजी 'अ'ची बाराखडी देऊन आपण काहीतरी नवीन विचार देतोय असा आव आणलाय .
अजिबात नाही ! दिलेल्या व्यंजनांचा सरगमशी काहीएक संबंध नाही. सरगम असेंडींग आणि डिसेंडींग आहे. पोस्टमधे दिलेलं ऐकेक व्यंजन फार विचार करुन निवडलेलं आहे आणि गाण्यातला एकही शब्द (एंड नोट, विस्तार, ठहरावं) या पलिकडे जाऊ शकत नाही. तुम्ही तो सराव केल्यावर तुमच्या लक्षात येईल. २.
तुम्ही सानुनासिक गायचा प्रयत्न करताय, असं मला वाटलं (तुमचा आवाज तसा नसेल तर).. मुळ गायकाने मोकळ्या गळ्याने गायलेलं एखादं गाणं ('पुकारता चला हुं मैं' पासून 'मन भरया' पर्यंत कुठलंही चालेल) ह्या प्लॅटफॉर्मवर टाका, मग ह्यावर जास्त बोलता येईल.
गेली काही वर्ष नेझल पॉलीपमुळे एक नॉस्ट्रील ऑलमोस्ट बंद आहे. पॉलीपची आणखी एक भानगड म्हणजे तोंडानी ब्रिदींग होत असल्यानं घसा ड्राय होत जातो. अशा स्थितीत गाणं म्हणणं तर सोडा साधा गाण्याचा विचार सुद्धा मनात येत नाही. सर्जरी करायची नाही यावर ठाम असल्यानं उपायानां यश यायला थोडा अवधी लागेल; पण लक्षणीय प्रगती आहे. यथावकाश जसा नेझल पॅसेज मोकळा होईल आणि घसा नॉर्मलला येईल तसा आवाज मोकळा होईल. ३.
स्वच्छंदपणे गात रहा, ह्याच शुभेच्छा..
मनःपूर्वक धन्यवाद ! आणि तुम्हीही एखादं गाणं इथे टाकून, पोस्टचा हेतू सार्थक करल अशी आशा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो
च
चिगो Wed, 10/28/2020 - 11:37 नवीन
गेली काही वर्ष नेझल पॉलीपमुळे एक नॉस्ट्रील ऑलमोस्ट बंद आहे. पॉलीपची आणखी एक भानगड म्हणजे तोंडानी ब्रिदींग होत असल्यानं घसा ड्राय होत जातो. अशा स्थितीत गाणं म्हणणं तर सोडा साधा गाण्याचा विचार सुद्धा मनात येत नाही. सर्जरी करायची नाही यावर ठाम असल्यानं उपायानां यश यायला थोडा अवधी लागेल; पण लक्षणीय प्रगती आहे. यथावकाश जसा नेझल पॅसेज मोकळा होईल आणि घसा नॉर्मलला येईल तसा आवाज मोकळा होईल.
सॉरी, ह्याबद्दल अर्थातच कल्पना नव्हती. तुमचा नेझल पॅसेज आणि गळा लवकरात लवकर बरा आणि मोकळा व्हावा, ही सदिच्छा..
आणि तुम्हीही एखादं गाणं इथे टाकून, पोस्टचा हेतू सार्थक करल अशी आशा.
बघूयात.. जनरली मला सोशल मिडीयावर (त्यात मिपापण आलं) कलाकारी करायला आवडत नाही. कधी कट्ट्यावर किंवा इतर ठिकाणी भेटलो, तर बघूयात..
दिलेल्या व्यंजनांचा सरगमशी काहीएक संबंध नाही. सरगम असेंडींग आणि डिसेंडींग आहे. पोस्टमधे दिलेलं ऐकेक व्यंजन फार विचार करुन निवडलेलं आहे आणि गाण्यातला एकही शब्द (एंड नोट, विस्तार, ठहरावं) या पलिकडे जाऊ शकत नाही.
उच्चारुन बघितलं थोडं जोरात, पण अजून पटत नाहीये. प्रयत्न करतो पटत का ते बघण्याचा.. एनी वे, माझा ठहराव आणि आरोह-अवरोहबद्दल फार इश्यु नसल्याने काही खास प्रॉब्लेम नाहीये. जनरली ऐकलेल्या गाण्याबरहुकूम गाण्याचा प्रयत्न करतो. स्वांतसुखाय गात असल्याने इतरांचे कान किटले, तर तो त्यांचा प्रश्न आहे, माझा नाही.. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Wed, 10/28/2020 - 12:24 नवीन
१.
उच्चारुन बघितलं थोडं जोरात, पण अजून पटत नाहीये. प्रयत्न करतो पटत का ते बघण्याचा.. एनी वे, माझा ठहराव आणि आरोह-अवरोहबद्दल फार इश्यु नसल्याने काही खास प्रॉब्लेम नाहीये
सरगममधे अलंकार, पलटे हा हमखास येणारा प्रकार पोस्टमधे दिलेल्या मेथडमधे नाही, त्यामुळे ती सोपी आहे. नक्की ट्राय करा, तुमचा तुम्हाला गाण्यातला फरक जाणवेल. २.
जनरली मला सोशल मिडीयावर (त्यात मिपापण आलं) कलाकारी करायला आवडत नाही. कधी कट्ट्यावर किंवा इतर ठिकाणी भेटलो, तर बघूयात..
सोशल मेडीया हा वर्च्युअल कट्टाच आहे. इथे गाणी टाकणं आणि लेख टाकणं काय किंवा कट्ट्यावर त्या गोष्टी प्रत्यक्षात करणं काय एकच. आनंद शेअर करण्यासाठी हा उत्तम फोरम आहे. बघा विचार करुन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो
स
संजय क्षीरसागर Sat, 10/31/2020 - 18:48 नवीन
Sanjay Kshirsagar · ver:1 पुकारता चला हूं मैं ..... यातलं तिसरं कडवं मूळ गाण्यात नाहीये. गाणं अशासाठी अपलोड केलंय की स्म्यूलच्या भन्नाट कराओके क्वालिटीची तुम्हाला कल्पना यावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
म
मराठी_माणूस Sun, 11/01/2020 - 05:58 नवीन
तिसरं कडवं कुठे मिळाले ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Sun, 11/01/2020 - 06:54 नवीन
पण कधीही ऐकलं नसल्यानं गातांना मजा आली. कळस म्हणतात तसं नाही याची ही प्रचिती ! गाणं मेंदूत अजिबात चालू नसलं तरंच तुम्ही ते आपलंसं करुन, तुमचं गाणं म्हणून गाऊ शकता. या कडव्याला प्रिसिडन्स नव्हता त्यामुळे ते स्वतःच्या स्टाईलनी (अर्थात, चालीचं भान ठेवून) म्हणायची संधी मिळाली. थोडक्यात काय तर, तुमची लिरिक्स पाठ हवीत, चाल पक्की हवी... आणि ठेका मेंदूत सेंटर केला की गाणं सुरु ! मग ती तुमची तीन मिनीटांची एक छोटीशी मैफिल होते. गाणारा आणि ऐकणारा समरुप होतो, तिथे कुणीही उरत नाही, फक्त गाणं सुरु रहातं याला सीमलेस सिंगींग म्हणतात, स्वरांचा एक सलग प्रवाह; माझ्या गाण्यात तुम्हाला तो अनुभव येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस
म
मराठी_माणूस Sun, 11/01/2020 - 07:09 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
च
चिगो Tue, 11/03/2020 - 09:08 नवीन
फर्माईश पुर्ण केल्याबद्दल धन्यवाद, संक्षी..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Tue, 11/03/2020 - 13:22 नवीन
या मूडमधे पूर्ण उतरलात तर आख्खं गाणं तुम्ही स्वतःच्या रोमॅंटिसिजमची अभिव्यक्ती करु शकता. मग ते सर्वस्वी तुमचं गाणं होतं. यातली २ कडवी लिहून झालीत, शेवटचं झाली की एकवीन. तो नशा पण काही और आहे ! पुकारता चला हूँ मैं मैं कहाँ हूँ इक तेरी ही चाह है दिल नही है बस तेरा खयाल है, जरा तू दे दे अपना हाथ हाथमें, कहेगी जिंदगीके रंग भी कमाल है I १ I ये फुल है के हुस्न तेरा हर तरफ, हवा है ये की पहुंची तूही रुह तक, ये इश्क क्या नशा है पी के देखले, न मैं रहूँ न तू रहे, ना कोई फासले I
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो
स
सोत्रि Mon, 10/26/2020 - 00:54 नवीन
फक्त एकच प्रॅक्टीस करा, ठेका बरोबर मेंदूच्या मध्यभागी ऐकू यायला हवा.
ही आयडीया फारच भारी आणि उपयोगी आहे. &#128077 - (बाथरूम सिंगर) सोकाजी
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Mon, 10/26/2020 - 05:51 नवीन
ज्ञापैंच्या मार्गानं जायचं तर उभा जन्म ताल शिकण्यातच जाईल. इन फॅक्ट जगातले कित्येक सुरेल आवाज केवळ तालाची समज नाही म्हणून बाद झालेत. ताल हा खरं तर विक्षेप आहे. तो सतत गायकाचं लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न करतो आणि एकदा तालाकडे लक्ष गेलं की सूर हुकतो ! तालाला बंदिस्त करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे तो मेंदूत सेंटर करणं ! मग तो कोणताही ताल असू दे. हा इतका अफलातून उपाय आहे की बोलता सोय नाही. यानं दोन्ही साधतं, (१) विक्षेप करणारा तालंच तुम्हाला सेंटर्ड करतो आणि (२) तुम्हाला नेमकं कोणत्या शब्दावर किती वजन टाकायचं ते कळतं. तालाशी रोमान्स करायच्या फक्त दोनच पद्धती आहेत : ऑफ बीट आणि ऑन बीट. ऑफ बीट म्हणजे शब्द बीट पूर्वी किंवा नंतर येतो आणि ऑन बीट म्हणजे प्रत्येक शब्द बीटवर येतो. जसा तुमचा ताल सेंटर करण्याचा सराव वाढत जाईल तशी ही कला पण तुम्हाला अवगत होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि
B
Bhakti Mon, 10/26/2020 - 04:55 नवीन
छान सुरमयी माहिती आहे.
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Mon, 10/26/2020 - 06:17 नवीन
लोकांच्या जीवनात गाणं यावं अशी माझी कामना आहे ! आपण गाऊ शकत नाही याचं एकमेव कारण म्हणजे आपला आवाज आपल्याला आवडत नाही. जर तुमचं गाणं ऐकायला तुम्हीच राजी नसाल तर तुमच्या जीवनात संगीत केवळ ऐकण्यापुरतं मर्यादित राहिल. तुम्ही कधीही स्वतःचं गाणं म्हणू शकणार नाही. हा मानवी मनाचा एक मोठा पॅरडॉक्स आहे. जे कुणी महान गायक होऊन गेले किंवा आहेत त्यांना फक्त एकच गोष्ट साधली की त्यांनी स्वतःचं गाणं ऐकायला सुरुवात केली ! इतर कुणीही असता तरी पोस्टवर आलेल्या पहिल्याच प्रतिसादानं तो इतका खचला असता की त्यानं प्रशासनाला ही पोस्टच निस्सरित करायला सांगितली असती आणि त्याच्या जीवनातलं गाणं कायमचं संपलं असतं ! पण पोस्ट इतकी नामी आहे की ती प्रत्येकाला स्वतःचं गाणं ऐकायचा मोह पाडेल आणि पोस्टमधे शब्दप्रधान गायकीचे सर्व पैलू इतक्या खुमारीनं साधलेत की तुम्हीही गायला लागाल आणि आनंदाचं एक अनंत आकाश तुम्हाला खुलं होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Bhakti
म
मराठी_माणूस Mon, 10/26/2020 - 05:29 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Mon, 10/26/2020 - 07:06 नवीन
तशी ही पोस्ट बहरत जाईल. आपणही गाऊन पाहू असा मोह प्रत्येकाला व्हावा यासाठी ही पोस्ट आहे. गाणं किती सोपं आणि सहज आहे हे सांगण्याचा हा एक दिलकश प्रयत्न आहे. तो यशस्वी झाला तर धागा अनेकांची गाणे इथे पोस्ट होऊन धागा उत्तरोत्तर बहरत जाईल. तुम्हीही प्रयत्न करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस
म
मराठी_माणूस Mon, 10/26/2020 - 07:22 नवीन
मी बर्‍याच दिवसापासुन हे करत आहे. खुप आनंद मिळतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Mon, 10/26/2020 - 07:58 नवीन
कोणतं अ‍ॅप वापरता ? तुमच्या आवडत्या गाण्यांची लिस्ट द्याल का ? तुम्ही ऑलरेडी गात आहात तर ही पोस्ट तुमचं गाणं आणखी असरदार बनवेल. तुमचा अनुभव नक्की लिहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस
म
मराठी_माणूस Mon, 10/26/2020 - 09:38 नवीन
काही karaoke Tracks मेमरी कार्ड वर कॉपी केलेले आहेत. ते ऑफीस ला जातांना (चार चाकी मधे) म्हणत जायचो. एकतर आपण एकटेच असल्यामुळे संकोच वाटायचे काहीच कारण नव्हते. काचा बंद असल्यामुळे बाहेर आवाज जायचा नाही. रेकॉर्ड मात्र कधीच केले नाही. ९०% गाणी तलतची आहेत. ती गाणी फार आवडतात. त्या गाण्यांनी , शांततेचा अनुभव येतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Mon, 10/26/2020 - 10:12 नवीन
तुम्हाला इंटर-अ‍ॅक्टीव प्लॅटफॉर्म मिळतो. तुम्ही ड्युएट्स सुद्धा गाऊ शकता. मिनी ऑपेरा ब्राऊजरमधे स्म्यूलची लिंक पेस्ट केली की तुमचं गाणं तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड होतं. आपली गाणी ऐकायची मजा काही औरच आहे, त्यानं गाणं सुधारत जातं. बघा प्रयत्न करुन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस
अ
अमर विश्वास Mon, 10/26/2020 - 06:19 नवीन
तुमचा लेख आणि प्रतिसाद दोन्ही वाचले मुळात बाथरूम सिंगर व्हायला सुरांची जाण नाही तर सर्व बंधन झुगारून बिनधास्त गायची वृत्ती लागते :) बाकी सुरांचे (आणि तालाचे) ज्ञान (ज्ञान म्हणणं चुकीचं आहे ... ओळख) होण्यासाठी हार्मोनियम (पेटी किंवा सिन्थसायझरही चालेल) शिकावे ... त्यामुळे तानसेन नाही तरी कानसेन नक्की बनता येईल
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Mon, 10/26/2020 - 06:46 नवीन
आनंद झाला की पहिली गोष्ट काय होत असेल तर व्यक्ती गुणगुणायला लागते ! मानसशास्त्राचा कमालीचा अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलंय की या तीन स्टेप्स आहेत : १. आनंदाचा अर्थ आपण स्वतःशी कनेक्ट झालोत. २. गुणगुणायला लागणं याचा अर्थ असा की काही क्षण का होईना, मनाची अविरत बडबड थांबून त्याचं ध्वनीत रुपांतरण झालं आहे. ३. आनंद हरवण्याचं एकमेव कारण म्हणजे तुम्ही गाणं गुणगुणत असतांना मनानं तुम्हाला पुन्हा सांगितलं की `अबे छपरी, लई झालं आता कामाला लाग ' ! तुम्ही पुन्हा मनाशी राजी झालात आणि स्वतःचं गाणं ऐकण्याची संधी गमावलीत ! सुरेख गाणी ऐकत रहा पण नुसते कानसेन होऊ नका. पॅसिविटी तुम्हाला परावलंबी करते. आपण रफी होऊ शकणार नाही याचं कारण रफी ग्रेट होता एवढंच नाही, तर त्यानं स्वतःच्या गाण्यावर प्रेम केलं. तुम्हीही स्वतःचं गाणं ऐकायला सुरुवात करा. आपण रफी होऊ शकत नाही या विचाराला फाटा मारा. मग तुमच्या लक्षात येईल की 'अरे, आपण सुद्धा गाण्यात एखादी वेगळी जागा घेऊ शकतो. आपल्या बरोबर गायला लता किंवा आशा असूच शकत नाही पण सोशल सिंगींग अ‍ॅपवर आपल्याला इन्वाइट पाठवणारी गायिका सुद्धा सुरेल आहेच की आणि तिच्या सुरात सूर मिसळून आपणही त्या आनंदात रमून जाऊ शकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमर विश्वास
अ
अमर विश्वास Mon, 10/26/2020 - 07:08 नवीन
स्वतःचे गाणे ऐकायची एकही संधी गमावत नाही ... आवडलेली गाणी / कविता बिनधास्त गातो ... झेपेल त्या सुरात आणि जमेल त्या चालीवर ... विशेषतः लॉन्ग ड्राईव्ह करत असताना (आणि एकटा असेल तर) रफी / किशोर च्या बरोबरीने जोरदार गातो रफी कशाला काहीवेळा तर जसराजजी आणि रशीद खानलाही सोडत नाही बाकी कानसेन होण्यातही मजा आहे ... रात्री शांततेत यमन सारखा एखादा ख्याल (भीमसेनजींचे "ऐरी आली पियाबिन" किंवा अजॉयजींचे "किनारे किनारे दारिया कश्ती बांधोरे" ) ऐकताना कानसेन असल्याचे सार्थक होते ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Mon, 10/26/2020 - 07:39 नवीन
शास्त्रीय गायन हा अत्यंत वेगळा विषय आहे आणि ते गायला शक्यतो गुरु हवा. भीमसेन, जसराज, रशीद खान , (माझी अत्यंत आवडती ) मालिनी राजूरकर, कमालीचं मिस्टीकल गाणारे कुमार गंधर्व हे आपण फक्त ऐकू शकतो. शब्दप्रधान गायकी हा सामान्यांच्या जीवनात गाणं यावं यासाठी झालेला एक सुरेल प्रयत्न आहे. भीमसेनसारखा यमन आपण मैफिल जमवून गाऊ शकणार नाही पण इतना है तुमसे प्यार मुझे मेरे राजदां ही यमनमधली सुरेख ट्यून एखाद्या रिसॉर्टच्या कराओकेवर, खुल्या आकाशाखाली एखाद्या सुरेल तरुणी बरोबर गात, तीन मिनीटांची का होईना आपणही मैफिल जमवू शकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमर विश्वास
स
सोत्रि Mon, 10/26/2020 - 11:14 नवीन
तंतोतंत! हेच म्हणतो. &#128077 -(कानसेन) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
उ
उपयोजक Mon, 10/26/2020 - 13:38 नवीन
मानसशास्त्राचा कमालीचा अभ्यास केल्यानंतर याबद्दल अधिक जाणून घ्यायला आवडेल.म्हणजे अभ्यास काही विशिष्ट हेतूने? कोणती शाखा? सामान्यांचे मानसशास्त्र , शैक्षणिक मानसशास्त्र ,अौद्योगिक मानसशास्त्र ???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Mon, 10/26/2020 - 14:27 नवीन
याचा सखोल अभ्यास अध्यात्मिक साधनेसाठी केला. मनाचे तीन पैलू आहेत : दृक, वाक आणि श्राव्य. पैकी वाक आणि श्राव्य हे संगीताच्या दृष्टीनं महत्त्वाचे आहेत. हे दोन पैलू एकसंध झाले तर शब्दांचा स्वर होतो. थोडक्यात, मनाची अविरत चाललेली बडबड ध्वनीत रुपांतरित होते. यापलिकडे संगीतशास्त्रात कधीही अभ्यास न केला जाणारा एक फॅक्टर आहे तो म्हणजे शांतता ! कारण सर्व संगीत हा स्वराभ्यास आहे; स्वर बेसूर होईल पण शांततेला काहीही होत नाही. या शांततेच्या कॅनवासवर संगीताचं गाणं उमटतं. ही शांतता म्हणजे खुद्द आपण आहोत. या शांततेचं भान स्वर गहिरा करत नेतं. एनी वे, तो विषय सध्या बाजूला ठेऊ. या समग्र अभ्यासानं शब्दाचा स्वर कसा करावा याची शक्कल कळली आणि ती अनुभव-सिद्ध पद्धत इथे सोपी करुन इथे लिहिली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपयोजक
र
राजाभाउ Mon, 10/26/2020 - 07:09 नवीन
मस्त संक्षी , नक्की करुन बघीन. आपल ताल, सुर आणि चालीत गायलेले गाण आपणच ऐकणे यासारखी मज्जा नाही. पण हे जमत नाही तर काय करावे हा आयुष्यभर छळणारा प्रश्न (या साठी गाण शिकायला जाव येव्हडी तयारी सध्या नाही). पण हे भारी वाटतय करुन पाहीन. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Mon, 10/26/2020 - 07:27 नवीन
जरुर गा ! काहीही अडचण वाटली तर इथे विचारा किंवा व्यनि करा. सुरुवातीला ऑन बीट असणारं एखादं सोपं आणि तुमच्या आवडीचं गाणं घ्या, उदा, ऐ दिल है मुश्कील जीना यहां. एकदा ठेक्यात गायला लागलात की तुम्ही सुरु झालाच म्हणून समजा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजाभाउ
व
वीणा३ Tue, 10/27/2020 - 01:12 नवीन
जब वी मेट नावाच्या चित्रपटात एक करीना कपुरची व्यक्तिरेखा एकदा म्हणते "मै मेरी फेव्हरेट हूं ". मला तो ऍटिट्यूड अतिशय आवडतो, माणसाने स्वतःवर खुश रहावं, दुनिया गेली तेल लावत. हा ऍटिट्यूड तुमच्या या पोस्ट मध्ये मस्तपैकी दिसून येतोय. लगे रहो !!! अशीच भरपूर गाणी गात रहा.
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Tue, 10/27/2020 - 09:44 नवीन
माणसाने स्वतःवर खुश रहावं, दुनिया गेली तेल लावत. हा ऍटिट्यूड तुमच्या या पोस्ट मध्ये मस्तपैकी दिसून येतोय. लगे रहो !!! अशीच भरपूर गाणी गात रहा.
क्या बात है ! आनंद म्हणजे स्वतःच्या कंपनीत खुश असणं ! ओशो म्हणतात, सिद्ध किसीके विपक्षमे नही है, वो बस अपने पक्षमे आ गया है | पोस्टमधे सांगितलेला सराव तुम्हीही करा. आनंदात रहाण्याची आयडीया तुम्हाला कळली आहे. मी तर इथे एकसोएक गाणी अपलोड करीनच पण स्म्यूलवर आलात की नक्की कळवा... एखादं ड्युएट तुमच्याबरोबरही गायला मजा येईल. ऑल द बेस्ट !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वीणा३
श
शेखरमोघे Tue, 10/27/2020 - 03:26 नवीन
लिखाण आणि प्रतिसादात व्यक्त केलेली सन्गीतप्रसाराची तळमळ दोन्हीही आवडले.
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Tue, 10/27/2020 - 09:53 नवीन
जगातला हिंसाचार संपवायचा असेल तर लोकांना संगीताचा मोह पडणं हा सर्वोत्तम मार्ग आहे. गाणारा दिवसेंदिवस तरल होत जातो, त्याची सौंदर्य दृष्टी कमालीची वाढायला लागते. मनाच्या अविरत बडबडीतून मुक्त झाल्यानं तो आनंदी होत जातो. गाणं तुम्हाला स्वतःशी कनेक्ट करतं. ती कला सर्वांना साधावी यासाठी हा प्रयत्न आहे. करा ट्राय !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शेखरमोघे
J
Jayant Naik Tue, 10/27/2020 - 09:41 नवीन
गाणे आवडते पण आवाज नाही अश्या बाथरूम सिंगेर्स साठी मस्त . कोणतीही कला अगदी मोजके लोक सोडले तर हे कष्टसाध्य च असते. तुझे प्रयत्न स्तुत्य .
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Tue, 10/27/2020 - 10:17 नवीन
गोडवा हा म्हणणं आणि ऐकणं बॅलन्स झालं की आपसूक येतो. उच्चारण आणि श्रवण यांचा मध्यबिंदू म्हणजे गोडवा. आपल्या आवाजात गोडवा नाही असं वाटतं कारण आपण आपलं गाणं ऐकायला तयार नसतो. पोस्टवरचा पहिलाच प्रतिसाद हे या मानवी मनात खोलवर रुजलेल्या इन्फिरिऑरिटी काँप्लेक्सचं प्रातिनिधिक उदाहरण आहे. मग त्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे लोक फक्त श्रवणभक्ती करतात. कितीही आनंद झाला आणि चुकून जरी गुणगुणायचं म्हटलं की डायरेक्ट भीमसेन आणि रफीच आठवतात आणि आपला आवज कंठातच अडकतो. अर्थात, ज्याला शास्त्रीय गायन आणि शब्दप्रधान गायकी यातला फरकच कळत नाही त्याच्या आकलनाची किंमत शून्य आहे. आज करोडो लोक कराओकेवर गातात आणि संगीताचा आनंद घेतात. यथावकाश सूर-लय-ताल त्यांच्या जीवनात प्रवेश करेलच. ज्यांना आवड असेल ते शास्त्रीय संगीतही शिकतील आणि आपल्याबरोबर इतरांचंही जगणं मजेचं करतील. अर्थात, त्यांच्या प्रवासात अशा मानसिकतेचे लोक भेटले तर त्यांना फुल फाटा दाखवून त्यांनी आपलं गाणं हरवू देऊ नये हे नक्की !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Jayant Naik
श
शा वि कु Tue, 10/27/2020 - 13:23 नवीन
तुमची लस्ट फॉर लाईफ एकदम जबरी आहे. बरेच शिकण्यासारखे आहे.
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर गुरुवार, 10/29/2020 - 11:25 नवीन
एक कोरा कॅनवास आहे. तुम्ही तो जितका रंगवाल तितकं ते रंगत जाईल. इथे जे नकारात्मक प्रतिसाद आलेत (किंवा येतील) त्यांचा अर्थ इतकाच की अशा मानसिकतेचा जगण्यातला सगळा रस संपला आहे. संदीपच्या फार सुरेख ओळी आहेत : आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो... कळून येता जगण्याची या इवलीशी त्रिज्या उडून जाती अत्तरापरी जगण्याच्या मौजा दारी नाही फिरकत कुठला नवा छंद-चाळा राखण करीत बसतो येथे सदैव कंटाळा,.... कंटाळ्याचा देखील आता कंटाळा येतो ! आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो... अशा लोकांच्या जीवनात ना कुठला छंद ना काही रस, ते फक्त तोच दिवस रोजरोज जगत जातात. तुम्ही त्यांच्या सहवासात थोड्याच वेळात एकदम बोअर व्हाल. त्यांच्या जगण्याचा आवाकाच इतका मर्यादित असतो की ते स्वतःलाच कंटाळलेले असतात. (इथल्या त्यांच्या पोस्टस बघून ही तुम्हाला त्यांचा आवाका कळेल). मग कुणी एखादा नवा उपक्रम सांगितला किंवा करण्यासाठी कुणाला प्रोत्साहित करतांना दिसला की यांचा इन्फिरिऑरिटी काँप्लेक्स ज्याम उफाळून येतो, कारण यांना स्वतःला, आपल्या आयुष्यात आता काहीही नवं घडू शकणार नाही याची ठाम खात्री असते. असे लोक कधी भेटले तर त्यांना फुल इग्नोर मारुन तुमचे छंद जपा. तुमचं आयुष्यही वृक्षासारखं बहरत जाईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शा वि कु
G
Gk Tue, 10/27/2020 - 13:26 नवीन
छान
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Tue, 10/27/2020 - 13:51 नवीन
चांगला आहे लेख. विषेशतः गाणी म्हणण्याची इच्छा असूनही आपल्याला काही येत नाही, आपण शिकलेलो नाही, आता वय झाले, वेळ निघून गेली आहे वगैरे विचारांनी हतोत्साहित झालेल्यांसाठी उपयोगी ठरावा. माझे एक परिचित (तसे ते शास्त्रीय संगीताचे थोडेबहुत जाणकारही आहेत आणि त्यांची स्वतः पेटी वाजवत गायलेली भजने वगैरे मला आवडायची सुद्धा) आता साठीत आल्यावर स्टारमेकर का कुठल्यातरी अ‍ॅपवर रोज सिनेमातली गाणी म्हणून मला पाठवत असतात, आणि मी ते लाईक, फॉरवर्ड वगैरे करावे असेही लिहीतात. त्यांची गाणी ऐकताना मूळ मुकेश वगैरेंच्या गाण्याशी कळत नकळत तुलना होत असल्याने मला काही ते गायन आवडत नाही. आता तर मी ते ऐकणे सोडून दिले आहे. यातून एक शिकायला मिळते ते असे की भले स्वतःला कितीही चांगले वाटत असले तरी ते इतरांना पाठवणे (अपवाद अशा लोकांचा, ज्यांना आपण काहीही केले तरी त्याचे कौतुकच वाटते अशी प्रेमाची माणसे - अर्थात तशी कुणी आपल्या जीवनात (उरली-) असली तरच-) आणि आपणहून लाईक वगैरे करायला सांगणे, या भानगडीत अजिबात पडले न पाहिजे. असले उद्योग स्वतःपुरते, स्वान्तःसुखाय ठेवणेच बरे.
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Tue, 10/27/2020 - 17:52 नवीन
पासून पुढचे ज्ञानेश्वरांचे पैजार यांच्या प्रतिसादातल्या विचारांशी समान वाटला.कदाचित मी चुकीचाही असेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त
स
संजय क्षीरसागर गुरुवार, 10/29/2020 - 11:35 नवीन
पण इथे कुणी व्यनि करुन पोस्ट लाईक करायला सांगितलेली नाही. जे विधायक प्रतिसाद आलेत ते सगळे उत्सफूर्त आहेत. शिवाय माझं गाणं ऐका यासाठी ही पोस्ट नसून, तुम्ही गाणं म्हणा हा पोस्टचा उद्देश आहे. त्यामुळे उपहास करण्याच्या नादात प्रतिसादातला तो भाग पार हुकला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपयोजक
उ
उपयोजक Tue, 10/27/2020 - 17:53 नवीन
पासून पुढचे ज्ञानोबाचे पैजार यांच्या प्रतिसादातल्या विचारांशी समान वाटला.कदाचित मी चुकीचाही असेन. असे वाचावे।
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त
उ
उपयोजक Tue, 10/27/2020 - 18:26 नवीन
पुरुष गायकच हौशी गायक म्हणून का असतात? पौंगडावस्था ते पस्तिशी या गटातले पुरुष का कमी असतात? हे कदाचित जुन्या गोलमालमधे रामप्रसाद शर्मा म्हणतो तसं "जवानी तो काम करने के लिए होती है। खेल कुद इत्यादी के लिए तो पुरी जिंदगी पडी है।" काही असतं का?
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Tue, 10/27/2020 - 18:55 नवीन
निरुपयोगी आहे. आयुष्य कायम या क्षणात साठलेलं आहे. जर तुम्हाला गाणं म्हणायचं असेल तर त्यासाठी आता काही तरी करावं लागेल, मग तुमचं वय काहीही असो ! ४५ नंतर तर आपल्याला आता काही जमणार नाही, फक्त आलेला दिवस ढकलायचा आणि भविष्याची स्वप्न बघायची (मुलाकडे / मुलीकडे अमेरिकेला जाऊ, नातवंड झालं की मजा येईल, व्यावसायात असाल तर : आणखी जोरात हँडल फिरवू म्हणजे पुढची सोय होईल) या पलिकडे कुणी फारसा विचार करणारे दिसत नाहीत. पण एकदा वर्तमान छंद जोपासायची एकमेव संधी आहे हे लक्षात आलं की आयुष्याचे रंग बदलायला लागतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपयोजक
उ
उपयोजक Wed, 10/28/2020 - 06:23 नवीन
तुम्हाला गाणी गाण्याचा छंद तुम्हाला तुमच्या वयाच्या कितव्या वर्षी लागला? (खरं खरं सांगा हं! पुछता है भारत! ; ) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Wed, 10/28/2020 - 06:37 नवीन
तुमच्या वयाच्या कितव्या वर्षी लागला ?
एखाद्या मुलीशी नज़रभेट झाल्यावर अंगावर रोमांच उठायला लागले तेंव्हा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपयोजक
क
कळस Tue, 10/27/2020 - 19:52 नवीन
छान विषयाला छेडले आहे! गाण्यात माणूस स्वतःशी जोडला जाऊन ध्यानमग्न होतो, यात शंकाच नाही.. गेल्या वर्षभरापासून मी स्टारमकेर या अँप वर अनेक जणांसोबत गाणी म्हणतोय, अनेक जणांची गाणी ऐकतोय. मुळात थोडीफार शास्त्रीय संगीताची जाण असल्याने आणि अनेक हौशी गायकांची गाणी पार्टी रूम मध्ये जवळुन ऐकल्यानंतर काही गोष्टी ज्या मला जाणवल्या त्या अशा- १.जे गाणे आपल्याला म्हणायचे आहे ते इतक्या वेळा ऎकायला हवे की त्यातील शब्द न शब्द, चाल, ठेका,आवाज , लायकरी , त्यातल्या छोट्याशा हरकती मेंदूत एकदम ठसल्या पाहिजेत. आपण ज्यावेळी गाणे म्हणतो तेव्हा खरंतर मूळ गाणं आपल्या मेंदूत आपण प्ले करत असतो आणि त्याबर हुकूम म्हणायचा प्रयत्न करतो.तेव्हा मूळ गाण्याची रेकॉर्डिंग मेंदूत फिट्ट पाहिजे. २. दुसरे असे की lyrics बऱ्यापैकी पाठ हवे, ओझरत्या नजरेने पाहूनही लिहिलेले lyrics समजायला हवेत. Lyrics वर लक्ष ठेवून वाचून गायला लागल्यास सूर डळमळीत होतो. ३.प्रत्येकाचे गायनाचे आकलन वेगळे असते. उदा.रफीचे "एहसान तेरा होगा मुझपर" ह्यातील प्रत्येक शब्दाचे उच्चारण, हलकेच घेतलेल्या हरकती, भाव हे अनेक जणांच्या लक्षातच येत नाही. मुळ गाण्याचे रेकॉर्डिंगच जर मेंदूत व्यवस्थित नसेल तर गाणे नीट गाता येणार नाही. अशा वेळी स्वतः गायलेले गाणे त्यामुळे चांगले नसले तरी स्वतःला ऐकतांना उत्तम वाटते, कारण स्वतःच्या मेंदूतील मूळ गाण्याचे रेकॉर्डिंगच मुळात अस्पष्ट,सदोष आहे आणि आपण त्याच्याशीच आपले गाणे ताडून पाहतो. ४.आपल्याला कोणते गाणे आवडते यापेक्षा कोणते गाणे(वा कोणत्या गायकचे गाणे) आपण विनाप्रयास गुणगुणू शकतो तेच सुरुवातीला गाण्यासाठी निवडायला हवे.सुरुवातीलाच एखादे खूप आवडते पण अवघड गाणे गायचा प्रयत्न करताना लोक दिसतात आणि मग जमले नाही की नाउमेद होतात. ५.प्रत्येकाचा आवाज अद्भुत आणि अद्वितीय आहे यात शंका नाही.परंतु कोणतीही कला ही साध्य करण्यासाठी मुळात ती काही प्रमाणात अंगी असेल तरच ती अभ्यासाने बहरू शकते.सगळ्या गोष्टी फक्त त्यामागचे शास्त्र वा टेक्निक शिकल्याने येत नाहीत. ६. सगळ्यात महत्वाचे म्हणजे गाणे गाताना स्वतःला त्यात झोकून देणे, एकरूप होऊन गाणे...म्हणजे मग गाण्यात भाव प्रकटतो..इतर गोष्टी ताल सूर लय मग थोड्याशा बिघडल्या तरी गौण ठरतात कारण गाण्याचा एकंदरीत इफेक्ट चांगला होतो. माझ्या मते चांगला कानसेन होणे हे चांगला गायक होण्याची मूलभूत पायरी आहे.
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Wed, 10/28/2020 - 04:31 नवीन
मुद्दा ५ सोडुन बाकी सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कळस
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा