Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मी पाहिलेला एक चांगला मराठी चित्रपट

र
रोहित रामचंद्रय्या
Wed, 11/11/2020 - 11:36
💬 94 प्रतिसाद
नमस्कार मित्रानो. डिस्क्लेमरः मी कन्नड भाषिक असून मराठी लिहिणे शिकण्याचा प्रयत्न करीत आहे. चूक झाला तर क्रुपया करेक्ट करा. मी जेव्हा ठाण्यात होता (म्हण्जे २००६ मध्ये) मी मराठी भाषेचा एक ऐतिहासिक चित्रपट पाहिलो. त्याचा नाव होता 'संत तुकाराम'. १९३६ मध्ये निर्माण झालेला चित्रपट. हा चित्रपटात मला आवडलेला गोष्टि खाली लिस्ट करतो. १. हे ऐतिहासिक चित्रपट असूनही, ह्या चित्रपटात, अतिनैज नटन आहे. २. हा चित्रपट मला महाराष्ट्रीय संस्कृतिचा झांकी दिला. दिस इस आल अय आम एबल टु रैट इन मराठी नव. धन्यवाद

प्रतिक्रिया द्या
47928 वाचन

💬 प्रतिसाद (94)
ट
टवाळ कार्टा Wed, 11/11/2020 - 15:39 नवीन
इथे लिहित रहा
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Wed, 11/11/2020 - 15:48 नवीन
अतिनैज नटन
म्हणजे काय?
  • Log in or register to post comments
र
रोहित रामचंद्रय्या Wed, 11/11/2020 - 15:50 नवीन
सहज - ड्रामाटिक नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
व
विजुभाऊ Wed, 11/11/2020 - 15:55 नवीन
कोणत्या भाषेत?
  • Log in or register to post comments
र
रोहित रामचंद्रय्या Wed, 11/11/2020 - 15:57 नवीन
संस्कृत पद आहे अति - जास्त नैज - सहज
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
र
रोहित रामचंद्रय्या Wed, 11/11/2020 - 16:02 नवीन
मराठीत काय म्हणायचं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
व
विजुभाऊ Wed, 11/11/2020 - 16:09 नवीन
नैसर्गीक अभिनय सहज अभिनय
  • Log in or register to post comments
र
रोहित रामचंद्रय्या Wed, 11/11/2020 - 16:13 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
स
संजय क्षीरसागर Wed, 11/11/2020 - 16:21 नवीन
आणि मग इथे पोस्ट करा. हा मराठी शिकवणीचा वर्ग नव्हे.
  • Log in or register to post comments
र
रोहित रामचंद्रय्या Wed, 11/11/2020 - 16:52 नवीन
सर, इकडे बेंगळूरु मध्ये मला मराठी बोलणारे मित्र नाही आहे. म्हणून इकडे लिहून, मराठी शिकण्याचा प्रयत्न करीत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
ट
टवाळ कार्टा Wed, 11/11/2020 - 17:50 नवीन
वरच्या टाईपच्या प्रतिसादांकडे लक्ष नका देउ...हवे ते आणि हवे तितके लिहा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रोहित रामचंद्रय्या
स
संजय क्षीरसागर Wed, 11/11/2020 - 18:27 नवीन
घरकामाला, त्यानं तुम्ही पटकन शिकाल. तुमच्या वयाची असेल तर अनेक विषय (भाषेतले) पण कवर होतील. भाषा शिकणं तीन स्टेजेसमधे असतं : बोलणं, वाचणं आणि लिहिणं. तुम्ही नेमकी शेवटची पायरी सुरुवातीला चढायला बघतायं. ते एकदम राँगे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रोहित रामचंद्रय्या
ट
टवाळ कार्टा Wed, 11/11/2020 - 23:14 नवीन
"त्या पेक्षा मराठी बाई ठेवा घरकामाला, त्यानं तुम्ही पटकन शिकाल. तुमच्या वयाची असेल तर अनेक विषय (भाषेतले) पण कवर होतील." "डॉक्टरला काय कळते...मी सगळी औषधे कंपौंडरकडून घेतो" - इति संजय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
ट
टवाळ कार्टा Wed, 11/11/2020 - 23:16 नवीन
=)) अशी स्मायली टाकायची राहिली...ते सासं जरा वरचा प्रतिसाद "उप्दते" करून देतील का :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
स
संजय क्षीरसागर गुरुवार, 11/12/2020 - 04:07 नवीन
वायफळ प्रतिसाद देण्यापेक्षा आता नेमक्या मुद्यावर बोला : १. मराठी तुम्ही कशी शिकलात ? भाषा कायम बोलूनच शिकली जाते, वाचनानं ती समृद्घ होते आणि शेवटी लेखनातून प्रकट होते (अर्थात लेखक / कवि आणि प्रतिभा हा संपूर्णपणे वेगळा विषय आहे ) त्यामुळे आपण ही मराठी घरात जन्मून, ती भाषा ऐकून, डायरेक्ट बोलायला सुरुवात केली. का तुम्ही जन्मल्यावर यज्ञ, क्षत्रिय असे शब्द लिहून सुरुवात केलीत ? २. आपल्याला इंग्रजी सफाईदार येत नाही कारण अत्यंत मूर्खासारखी आपण भाषेच्या व्याकरणापासून सुरुवात केली. त्यामुळे बोलतांना कायम चुकायची भीती. आणि धडा घोकून परिक्षेत लिहायता लागलो. बोलण्याचा सराव नाही त्यामुळे भाषेचा सहवास नाही आणि आता चारचौघात इंग्रजी बोलायचं तर लाज वाटते ! ३. भाषा हा सहवास आणि बोलणं यातून शिकायचा विषय आहे हे कायम लक्षात ठेवा. तुम्हाला गुजराथी शिकायची असेल तर गुजराथी मित्र -मैत्रिणी करुन पाहा, केवळ एक / दोन महिन्यात तुम्ही गुजराथी बोलायला लागाल . मग इंटरेस्ट डिवेलप होऊन वाचायला लागाल आणि शेवटी लिहू शकाल (वाचल्यामुळे) माझ्या प्रतिसादातला विनोदाचा भाग सोडा पण मेथड इक्झॅक्टली तीच आहे. आता बोला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
आ
आंबट चिंच गुरुवार, 11/12/2020 - 04:34 नवीन
१६ आणे बरोबर संक्षी साहेब आपले. आपल्याला कितीही शिकवले तरी हिंदी वा इतर देशी भाषेच्या काय किंवा इंग्रजी वा इतर कोणतीही परदेशी भाषा काय या जिथपर्यंत बोलता येत नाहीत तिथ पर्यंत समजत नाहीत. त्या दाक्षिणात्य भाषातर लिखित स्वरुपात आंडुगुंडु सगळ्या एकच वाटतात मग काय कप्पाळ लिहणार? तेच लहान बाळाची ती मातृभाषा असल्याने त्याला चटकन बोलता येते आणि व्याकरणा सहित तो ती बरोबर बोलतो आणि मग ६ वर्षाचा झाल्यावर पाटीवर गमभन शिकायला शाळेत जातो. जावु द्या तुमची अनुभवाची शिदोरी इतरांना काय आकलन होणार? फक्त तुम्ही बाई ठेवा असं सांगण्या एवजी घरगडी एव्हढंच कशाला शेजारी पाजारी अथवा मित्र अथवा नेटकरी यांच्याकडुन शिका असं म्हणायला पाहिजे होतं. म्हणजे टक्याचा गैर समज झाला नसता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर गुरुवार, 11/12/2020 - 04:57 नवीन
जीवनात हास्य-विनोद नसेल तर काय मजा आहे ? लोक विनोदही सिरियसली घेऊन उच्छाद मांडतात त्याला माझा इलाज नाही ! बाई ठेवणे हा सर्वसमावेशक उद्देश आहे आणि लेखकाला मित्र मंडळी नाहीत त्यामुळे तो पर्याय नुसत्या कल्पनेत सुद्धा किती रंजक वाटतो ते पाहा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंबट चिंच
उ
उपयोजक गुरुवार, 11/12/2020 - 06:25 नवीन
हा तुमचा भ्रम आहे. आमच्या मराठी शिकायच्या WhatsApp समुहात एक तेलुगू मुलगा आहे.तो WhatsApp रेकॉर्डिंगमधून कधीच शिकत नाही.त्याला फक्त रोजच्या बोलण्यातील वाक्ये बनवता येतील इतपत व्याकरण शिकवलं.आता बर्‍यापैकी संवाद साधतो तो देवनागरीतून लिहून मराठीमधे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर गुरुवार, 11/12/2020 - 09:06 नवीन
शिकालात का ? तुम्ही लहान होता तेंव्हा पालकांनी तुमच्या व्याकरणाच्या चुका दुरुस्त केल्या, का जे काही तोडकं, मोडकं बोलत होतात त्याचं कौतुक केलं ? आता याच न्यायानं तुम्ही तुमच्या पोस्टचा सफाईदार इंग्रजी अनुवाद इथे देऊ शकाल का ? नाही तर तुमच्या मराठी शिष्याला इथे लिहायला सांगा म्हणजे सगळं स्पष्ट होईल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपयोजक
उ
उपयोजक गुरुवार, 11/12/2020 - 14:28 नवीन
माणसे बोलतात ती कोणतीही भाषा आपल्याला दोन प्रकारे अवगत होते.दोन्हीपैकी अमुक एक मार्ग श्रेष्ठ नि दुसरा कनिष्ठ असे काही नाही.तुमच्या सोयीनुसार मार्ग निवडावा. मार्ग १. ती भाषा बोलणारे लोक सतत तुमच्याभोवती त्या भाषेतून बोलत असणे.आपल्याला आपली मातृभाषा याच मार्गे येते.मराठी लोकांना हिंदी बर्‍यापैकी किंवा चांगल्याप्रकारे सहज बोलता येण्यात हिंदी सिनेमे आणि टिव्हीवरच्या हिंदी मालिका/रिऍलिटी शोज यांचा सिंहाचा वाटा आहे. पण यामार्गे भाषा येण्यासाठी बराच कालावधी(काही वर्षे) जातो. कारण बोलणारे लोक तुम्हाला दरवेळी शब्दांचे अर्थ नि त्यांची वळणं, त्यांचे उपयोग , व्याकरण उलगडून सांगत बसत नाहीत.या मार्गाने भाषा शिकणे हे शक्य तितक्या लहान वयात होणे चांगले.कारण लहान मुलांकडे रिकामा वेळ भरपूर असतो, कुतूहल भरपूर असते.प्रौढ वयातल्या लोकांचे व्याप जास्त असतात.त्यामुळे शिकलेले झपाट्याने विसरणे सहज शक्य असते.या मार्गाने शिकायला फार वेळ लागत असला तरी स्मरणावर ताण कमी येतो.कारण ती भाषा सहज बोलणारे लोक स्वत:च सतत तुमच्या कानावर ती भाषा अादळवत असतात. आपोआप भडीमार करत असतात.तुम्हाला भाषा निवांतपणे शिकणे चालत असेल आणि स्मरणशक्तीलाही फार ताण द्यायचा नसेल तर हा मार्ग वापरावा. मार्ग २. त्या भाषेतील सर्व प्रकारची म्हणजे होकारार्थी, नकारार्थी, प्रश्नार्थक अशी बाराही काळातली वाक्ये बनवता येण्यासाठी आवश्यक इतपत व्याकरण चोखपणे शिकणे.मोठ्या व्यक्तींची आकलनक्षमता जास्त असते.त्यामुळे प्रौढ व्यक्तीला हा मार्ग सोपा जातो.या मार्गाने भाषा शिकण्यास कालावधी कमी लागतो.वाक्ये बनवण्यात यश लवकर मिळत असल्याने शिकणार्‍याचा हुरुप वाढतो.तुमच्याकडे वेळ कमी असेल पण तुमची स्मरणशक्ती चांगली असेल तर हा मार्ग वापरा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर गुरुवार, 11/12/2020 - 14:59 नवीन
मराठीत अशी १र वाक्य देता येतील का ? जी शिकली की कामचलाऊ मराठी बोलता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपयोजक
उ
उपयोजक गुरुवार, 11/12/2020 - 15:15 नवीन
https://www.mpscworld.com/kal-v-tyache-prakar/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर गुरुवार, 11/12/2020 - 15:25 नवीन
बघतो आणि कळवतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपयोजक
स
संजय क्षीरसागर गुरुवार, 11/12/2020 - 18:56 नवीन
प्रतिसाद खाली दिला आहे, वाचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
म
महासंग्राम Fri, 11/13/2020 - 05:20 नवीन
वाक्य क्रमांक १ : जेवण झालं का ? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
उ
उपयोजक गुरुवार, 11/12/2020 - 06:18 नवीन
नेम धरुन -----> ;)))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
उ
उपयोजक गुरुवार, 11/12/2020 - 06:16 नवीन
रांगण्याशी संबंधित आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
क
कानडाऊ योगेशु गुरुवार, 11/12/2020 - 19:25 नवीन
भाषा शिकणं तीन स्टेजेसमधे असतं : बोलणं, वाचणं आणि लिहिणं. तुम्ही नेमकी शेवटची पायरी सुरुवातीला चढायला बघतायं. ते एकदम राँगे.
हे नेहेमीच शक्य होते असे नाही.मी बेंगलोरमध्ये असताना सर्वप्रथम कानडी वाचायला शिकलो.(दुकानाच्या पाट्या वाचायचो) आणि आता बर्यापैकी वाचता येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Fri, 11/13/2020 - 11:38 नवीन
ಕನ್ನಡ ಅಕ್ಷರಮಾಲೆ काय घंटा वाचणार हे ? मी स्वतः इंग्रजी वाचून शिकलो कारण स्क्रीप्ट माहिती होती आणि अनेकांच्या बाबतीत अशीच शक्यता आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु
र
रोहित रामचंद्रय्या Sat, 11/14/2020 - 07:44 नवीन
Image removed. संजयजी माझ्याकडे हे दोन पुस्तक आहेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
र
रोहित रामचंद्रय्या Sat, 11/14/2020 - 07:53 नवीन
संजयजी माझ्याकडे, दोन इंग्रेजी पुस्तक 'Marathi Pravesh ( An easy book to learn Marathi) Part 1 and 2 by B V Keluskar' आहेत. धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
र
रोहित रामचंद्रय्या Sat, 11/14/2020 - 08:00 नवीन
देवनागरी स्क्रिप्ट वापर केले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रोहित रामचंद्रय्या
स
संजय क्षीरसागर Sat, 11/14/2020 - 09:01 नवीन
त्या पुस्तकाचं वाचन करुन शिकलेलं कुणाशी तरी बोलायचा सराव करा. शिकलेलं बोलत गेलं तरच भाषेचा आत्मविश्वास वाढतो. एकदा बोलता यायला लागल्यावर लिहिणं फारसं अवघड नाही. थोडंफार शुद्ध लेखन इकडे-तिकडे होईल पण वाचतांना तुम्ही लक्षपूर्वक वाचलं असेल तर लिहितांना ते शब्द डोळ्यासमोर येतात. शिवाय शुद्धलेखनामुळे उच्चारण योग्य होतं. आता मी तुम्हाला शेवटच्या पायरीपासून सुरुवात करु नका असं का म्हणालो ते कळलं असेल, आणि इथे काही सदस्यांनी किती छपरी प्रतिसाद दिलेत आणि कुणाला नेमकं किती कळतंय हे सुद्धा तुमच्या लक्षात आलं असेलच. शुभेच्छा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रोहित रामचंद्रय्या
र
रोहित रामचंद्रय्या Sat, 11/14/2020 - 09:50 नवीन
धन्यवाद केदारजी. 'उपयोजक'जी के वाट्साप ग्रूप जाइन हुआ हू. वहा शुद्धलेखन सीख रहा हू. I hope to find some Marathi friends here as well.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
र
रोहित रामचंद्रय्या Sat, 11/14/2020 - 09:52 नवीन
*धन्यवाद संजयजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रोहित रामचंद्रय्या
स
संजय क्षीरसागर Sat, 11/14/2020 - 10:18 नवीन
बोलण्याच्या सरावातून ते आपोआप येईल आणि तुम्हाला बेस्ट मराठी शिकायचं असेल तर माझे या संकेतस्थळावरचे प्रतिसाद वाचत राहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रोहित रामचंद्रय्या
र
रोहित रामचंद्रय्या Sun, 11/15/2020 - 07:32 नवीन

👍

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
ट
टवाळ कार्टा Sun, 11/15/2020 - 12:59 नवीन
तुम्हाला बेस्ट मराठी शिकायचं असेल तर माझे या संकेतस्थळावरचे प्रतिसाद वाचत राहा. असा कॉन्फिडन्स हवा....बाकी वरचा प्रतिसादच बेस्ट नाहीये (कदाचित पहिलाच "नॉन-बेस्ट प्रतिसाद पडला असेल) वरच्या वाक्यात "प्रतिसाद" ऐवजी "लेख आणि प्रतिसाद" असा बदल सुचवतो नाहीतर तुमचे लेख बेस्ट नसतात असाही अर्थ निघू शकतो (मराठी भाषा वळवावी तशी वळते हो)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Sun, 11/15/2020 - 15:24 नवीन
त्यामुळे मुद्दा कसा पकडतात, तर्कसंगत कसं लिहावं याचं प्रॅक्टीकल ट्रेनींग लेखकाला मिळेल. शिवाय प्रतिसादात सर्वस्वी नवा अप्रोच असतो त्यामुळे मराठीत विचार करायची सवय लागेल. एकदा इंटरेस्ट निर्माण झाला की लेख/ कथा/ कविता ते आपसूक वाचतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
स
संगणकनंद Sun, 11/15/2020 - 17:11 नवीन
तुम्हाला बेस्ट मराठी शिकायचं असेल तर माझे या संकेतस्थळावरचे प्रतिसाद वाचत राहा.
"आणि एक दिवस हाकलपट्टी करुन घ्या" हे लिहायचं राहीलं सर्वज्ञजी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
अ
अर्धवटराव गुरुवार, 11/12/2020 - 20:12 नवीन
=)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
उ
उपयोजक गुरुवार, 11/12/2020 - 06:20 नवीन
आमचा मराठी लिहायला वाचायला बोलायला शिकण्याचा मोफत WhatsApp समूह आहे.तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुमचा WhatsApp नं व्यनि करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रोहित रामचंद्रय्या
र
रोहित रामचंद्रय्या गुरुवार, 11/12/2020 - 09:38 नवीन
सर, माजा नंबर 8971168096 आहे. कृपया ग्रूप मध्ये Add करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपयोजक
च
चित्रगुप्त Wed, 11/11/2020 - 16:32 नवीन
मी कन्नड भाषिक असून मराठी लिहिणे शिकण्याचा प्रयत्न करीत आहे.
अतिशय आनंदाची गोष्ट आहे. अवश्य शिका आणि लिहीत रहा. मुख्य म्हणजे तुम्ही कानडी असल्यामुळे पुणेरी, खानदेशी, विदर्भी वगैरे मराठीपेक्षा एका वेगळ्या प्रकारच्या मराठीशी वाचकांचा परिचय होईल. कर्नाटकातील मराठी मंडळे, तिथली संस्कृती, निसर्ग, कानडी लेखकांचा परिचय वगैरेवर अवश्य लिहावे.
  • Log in or register to post comments
र
रोहित रामचंद्रय्या Wed, 11/11/2020 - 16:35 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त
श
शा वि कु Wed, 11/11/2020 - 16:35 नवीन
तुमचे मिशन भारी आहे. लिहीत राहा. मराठी पुस्तके वाचा, उपयोग होईल.
  • Log in or register to post comments
र
रोहित रामचंद्रय्या Wed, 11/11/2020 - 16:40 नवीन
मी जि ए कुलकर्णि, गो नि दा, तेंडुलकर यांचे पुस्तक वाचलो. महिन्यात एक मराठी चित्रपट नक्कीच पाहतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शा वि कु
श
शा वि कु Wed, 11/11/2020 - 16:47 नवीन
पुस्तके तुम्हाला कशी वाटली हे ऐकणे फार रोचक वाटेल. त्यावर वाटले तर नक्की लिहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रोहित रामचंद्रय्या
क
कपिलमुनी गुरुवार, 11/12/2020 - 10:29 नवीन
दु आय दी हाय का काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रोहित रामचंद्रय्या
र
रोहित रामचंद्रय्या गुरुवार, 11/12/2020 - 11:38 नवीन
G A Kulkarni
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा