Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

२. एका क्षणात विदेहत्व : इन्फिरिऑरिटी काँप्लेक्स !

स
संजय क्षीरसागर
गुरुवार, 11/19/2020 - 13:10
💬 61 प्रतिसाद
एकतर तुम्ही स्वतःला व्यक्ती समजता किंवा सिद्ध ! जगात यापरता तिसरा पर्याय नाही. इन फॅक्ट, जर तुम्ही स्वतःला सिद्ध मानत नसाल तर स्वतःला व्यक्ती मानण्याखेरीज इतर कोणताही पर्याय उपलब्ध नाही. यत्र-तत्र-सर्वत्र सिद्धत्वंच सारे विश्व व्यापून आहे त्यामुळे इथे बाय-डिफॉल्ट, प्रत्येक जण सिद्धच आहे पण एखादं-दुसराच स्वतःच्या सिद्धत्वाची घोषणा करतो हा जगातला सर्वात मोठा विस्मय आहे. पण खरी मजा तर पुढे आहे, जर असा सिद्ध इतरांना सांगायला लागला की व्यक्तिमत्त्व ही जगणं सोयीचं व्हावं म्हणून असलेली सामाजिक सोय आहे आणि ते सुद्धा बाय-डिफॉल्ट, सिद्धच आहेत तर ते सगळे मिळून त्याच्यावर तुटून पडतात ! कारण त्यांची अशी पक्की धरणा असते की सिद्धत्व ही पारलौकिक घटना आहे आणि शतकानुशतकात, कोट्यवधी लोकात, एखादाच सिद्ध असतो ! अर्थात, त्यांचा उद्वेगही सकारण असतो कारण पूर्वीच्या सिद्धांच्या पश्चात, त्यांच्या भक्तांनी आणि अनुयायांनी, सिद्धांच्याबाबतीत अशा काही स्टोर्‍या लावलेल्या असतात की बोलता सोय नाही ! उदाहरणार्थ, सिद्धांना त्यांचा ग्रंथ लिहायचा होता पण त्यांचा स्टेनो डेड झाला होता; मग यांनी त्याच्या बॉडीला हाक मारून सांगितलं की रायटिंग कंप्लीट केल्याशिवाय तू एक्झिट मारू शकत नाहीस !आणि आश्चर्य म्हणजे तो डेड फेलो उठला आणि त्यानं पहिले ग्रंथ कंप्लीट केला ! आता हा डबल ट्रबल होतो ! डेड मॅन उठला याला पुरावा काय ? तर त्या ग्रंथात स्टार्टींगलाच भक्तांनी, सिद्धाच्या पश्चात घुसवलेली ही स्टोरी ! एकतर सिद्धाला विचारायची सोय नाही आणि डेड मॅन तर ऑलरेडी डेड होताच म्हणजे वादाला जागाच नाही ! नंतर पुन्हा एखादा सिद्ध लोकांना सांगतो की सत्य सर्व चराचर अंतर्बाह्य व्यापून आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा सिद्धच आहात; तर भक्त त्याला विचारतात तू डेड मॅनला उठवू शकतोस का? खल्लास ! म्हणजे कशाचा काही संबंध नाही पण पब्लिक विजयोन्माद साजरा करायला मोकळी. तो सिद्ध सांगतो की ज्या सिद्धाचा तुम्ही दाखला देताय त्यानं सुद्धा त्या ग्रंथात अ-मृताचा उद्घोष केला आहे, मृत्यू शरीराचा होतो, तुम्ही सत्य आहात, तुम्हाला मृत्यू नाही. पण पब्लिकला वाटतं की अमृत हे एक ड्रिंक आहे जे प्यायलं की देह अमर होतो ! ग्रंथात नेमकं तेच सांगितलं असूनही पब्लिक तो मेन कंटेंट धुडकावून स्टोरी फोरग्राउंडला आणते आणि परस्पर ठरवून टाकते की हा स्वतःला सिद्ध समजतो म्हणजे काय ? हा अहंकारी आहे ! आता ही त्याचूपणाची हद्द होते, खरं तर व्यक्तिमत्त्व हाच अहंकार आहे आणि सिद्धत्व म्हणजे व्यक्तित्वाच्या भासाचा निरास आहे, पण पब्लिक ऐकेल तर शपथ ! या पब्लिक मेंटॅलिटीमागे असलेलं एकमेव कारण म्हणजे इन्फिरिऑरिटी कॉम्प्लेक्स ! २. व्यक्तिमत्त्व ही सामाजिक उपयोगिता आणि जगणं सोपं व्हावं यासाठी केलेली सोय आहे. जर कुणी विचारलं की तुमचं नांव काय ? आणि प्रत्येक जण `माझं नांव सत्य' म्हणायला लागला तर समाज व्यवस्था कोलमडेल. यावर उपाय म्हणून व्यक्तिमत्त्वाचा फंडा शोधला गेलाय. पण वास्तविकात तुम्ही स्वतःला जे संबोधता (नांव-वडीलांच नांव-आडनाव) तसं कुणीही या जगात अस्तित्वात नाही, नव्हतं आणि नसेल. थोडक्यात, ज्या नांवानं तुम्ही स्वतःला संबोधता तसं कुणी, देह जन्मण्यापूर्वीही नव्हतं, सध्याही नाही आणि देहापश्चात तर नाहीच नाही. सध्या तुम्हाला तुम्ही जी व्यक्ती आहात असं वाटतंय ती केवळ तुमची आणि समाजानं तुमच्यावर लादलेली मान्यता आहे. त्यात सोय नक्कीच आहे पण वास्तविकात तुम्ही सत्य आहात. अर्थात, तुमच्या मान्यतेनं तुमच्या स्वरूपात कणमात्र फरक पडत नसला तरी एक गोष्ट हमखास घडते : तुम्हाला इन्फिरिऑरिटी कॉम्प्लेक्स येतो ! कारण व्यक्तिमत्त्व हाच इन्फिरिऑरिटी कॉम्प्लेक्स आहे. जोपर्यंत आपण सत्य आहोत हे तुम्हाला मान्य होत नाही तोपर्यंत या कॉम्प्लेक्सापासून सुटका नाही, मग तुम्ही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असा की फुटपाथावरचे भिकारी, त्यानं काहीएक फरक पडत नाही. पाश्चिमात्य देशातल्या व्यक्ती काँन्फिडंट वाटतात पण तो त्यांच्या संगोपनाचा भाग आहे. तिथे असं शिकवलं जातं की तुम्ही यूनिक आहात आणि हे बाळकडू त्यांना इतकं जबरदस्त पाजलं जातं की ते स्वतःला इतरांशी कंपेअर करत नाहीत त्यामुळे त्यांच्या मनात सहसा कॉम्प्लेक्सच येत नाही. यामुळे जगणं नक्कीच सुसह्य होतं पण व्यक्तिमत्त्वाचा युनिकनेस म्हणजे स्वरूप नव्हे आणि (इंग्रजीतला) काँन्फिडन्स म्हणजे आत्मविश्वास नाही. मी आत्मा आहे हा विश्वास म्हणजे काँन्फिडन्स ! परिणामी पाश्चात्त्य सुद्धा, स्वतःला यूनिक समजण्याच्या भानगडीत, स्वतःला 'एक यूनिक व्यक्तिमत्त्वच' समजतात; सिद्ध समजत नाहीत. या उलट आपल्याकडे आपले पालक, गुरुजन, नातेवाईक (आणि काही खास मित्रमंडळी) आपल्याला असं शिकवतात की जोपर्यंत तू यूनिक होत नाहीस तोपर्यंत तू बावळट आहेस ! म्हणजे बाय-डिफॉल्ट तू बावळटच आहेस, तुझा युनिकनेस तुला सिद्ध करायचा आहे. यामुळे आपल्याकडे जगणं इतकं अवघड होतं की लोक फक्त, मी बावळट नाही हे दुनियेला दाखवण्यात आयुष्य खर्ची घालतात. आणि आपण बावळट दिसू नये म्हणून कोणताही नवा आयाम शोधण्याचं साहस करत नाहीत. अर्थात, स्वतःला बावळट समजणं काय की यूनिक होणं काय की स्वतःला यूनिक समजणं काय ते सगळे व्यक्तिमत्त्वाचेच प्रकार आहेत आणि व्यक्तिमत्त्व हाच अहंकार आहे आणि तोच तुम्हाला तुम्ही सत्य आहात हा उलगडा होऊ देत नाही. थोडक्यात, जोपर्यंत तुम्ही स्वतःला सिद्ध मानत नाही तोपर्यंत तुमचं जगणं व्यक्तिमत्त्वाच्याच दायर्‍यात राहतं आणि व्यक्तिमत्त्व हेच अहंकाराचं दुसरं नांव आहे. अध्यात्मात अहंकार म्हणजे स्वतःला कुणी तरी विशेष समजणं असा एक पारंपरिक आणि दृढ गैरसमज आहे आणि अहंकार गेला की सत्योपबलब्धी होईल असं ठासून सांगितलं गेलं आहे. त्यामुळे सर्व आध्यात्मिक आणि (गैर-आध्यात्मिक) मंडळींना असं वाटतं की आपण छपरी आहोत आणि `तो' (म्हणजे देव, ग्रेट आहे) असं समजलं (किंवा किमान इतरांना तसं दर्शवलं), तर यथावकाश आपल्याला सत्याचा उलगडा होईल ! पण या भ्रमात त्यांच्यातला ठामपणा संपून जाण्याशिवाय इतर काहीही होत नाही. कारण सिद्धत्व ही वस्तुस्थिती आहे आणि व्यक्तिमत्त्व हा प्रत्येकाचा व्यक्तीगत भ्रम आहे. स्वतःला व्यक्ती समजणं, तसंच जगणं आणि वावरणं हे स्वतःला आकारबद्ध करणं आहे. आणि तोच नेमका अहंकार (अहं-आकार) आहे. जोपर्यंत व्यक्तिमत्त्वाचा भ्रम आहे तोपर्यंत इन्फिरिऑरिटी कॉम्प्लेक्स आहे; कारण काँन्फिडन्स म्हणजे आत्मविश्वास नाही आणि इन्फिरिऑरिटी कॉम्प्लेक्स म्हणजे काँन्फिडन्सचा अभाव नाही. त्या दोन्ही मानसिकता व्यक्तिमत्त्वाच्याच दायर्‍यात आहेत. जर सत्यच सर्व व्यापून आहे तर मी त्यावेगळा असूच शकत नाही ही खात्री म्हणजे आत्मविश्वास आणि ती खात्री होता क्षणी तुमचं व्यक्तिमत्त्व बहारदार होतं, ते आपसूक यूनिक होतं ! कोणतीही शारीरिक, मानसिक, आर्थिक किंवा सामाजिक उणीव तुमच्यात काहीही कॉम्प्लेक्स निर्माण करू शकत नाही. तुम्ही जाणता की आपण मुळात सिद्ध आहोत, बाय-डिफॉल्ट सिद्ध आहोत आणि व्यक्तिमत्त्व ही वापरायची चीज आहे, ती आपल्याला कधीही घेरू शकत नाही. ____________________________________________________ पहिल्या लेखात सांगितलेली ध्यानसाधना तुम्हाला प्रथम निर्विचारतेकडे नेईल. जशी शांतता सघन होत जाईल तसा व्यक्तिमत्त्वाचा निरास होत जाईल. व्यक्तिमत्त्व हे विचार, धारणा आणि भावनांचा इंटीग्रेटेड परिणाम आहे. व्यक्तिमत्त्वाचा निरास तुम्हाला सर्वप्रकारच्या इन्फिरिऑरिटी काँप्लेक्समधून मुक्त करेल !

प्रतिक्रिया द्या
34223 वाचन

💬 प्रतिसाद (61)
स
संजय क्षीरसागर Mon, 11/30/2020 - 11:00 नवीन
१.
आपल्याला भंपक मेगाबायटी प्रतिसाद द्यायला भरपूर वेळ आहे असे दिसते.
याचा अर्थ तुमच्या अतीव्यस्त जीवनात, तुम्ही इथे येऊन (काहीही अभ्यास नसलेल्या विषयावर वाट्टेल ते प्रतिसाद देऊन) आम्हाला उपकृत करता असा होतो का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Mon, 11/30/2020 - 14:01 नवीन
ह ह पु वा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
ड
डॅनी ओशन Mon, 11/30/2020 - 15:30 नवीन
डाक्टर खरे सायबांची आमच्या डोक्यात फोटू 'साहा फूट ऊंच गोरापान मानुस, चेरा लालबुंद झाला आसून खटखटाखट इरोधकांना हानुन काढणारे पर्तीसाद टायप करत हाएत' असा हुता. त्यात "हासुन हासुन पुरे वाट" हे बशेना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ग
गामा पैलवान Wed, 12/02/2020 - 16:52 नवीन
संजय क्षीरसागर, निर्बुद्ध आणि भंपक धारणातून तुम्ही बाहेर पडाल (उदा. तरंगती शिळा डोक्यावर घेऊन एकाग्रता साधणं !) 'तरंगती शिळा डोक्यावर घेऊन एकाग्रता साधणं' या प्रकारची कोणतीही साधना अस्तित्वात नाही. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा गुरुवार, 12/03/2020 - 05:48 नवीन
गा पै हा लेख वाचा.. तुमच्या सगळ्या प्रश्नांचि उत्तरे मिळतील. http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-interesting-mind-story-dr-pallavi-mohadikar-kasande-marathi-article-4484
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान गुरुवार, 12/03/2020 - 15:02 नवीन
दुव्याबद्दल धन्यवाद, आनन्दा! वरवर चाळला तेव्हा लेख पटला. पण काये की नाथांची बदनामी होत असेल तर ती थांबवावीशी वाटते. तितकाच माझा सहभाग आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
आ
आनन्दा गुरुवार, 12/03/2020 - 15:29 नवीन
सम्पूर्ण सहमत. "देव देश धर्म गुरु यान्चे जर चारित्र्यहनन होत असेल तर यथाशक्ती ( किंवा सर्वशक्तीनिशी) प्रतिवाद केलाच पाहिजे", असे शास्त्रवचन आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
क
कोहंसोहं१० गुरुवार, 12/03/2020 - 02:08 नवीन
ध्यानपद्धतींबद्दल बोलायचे झाल्यास ज्यांचा अध्यात्माचा अभ्यास आहे त्यांना संक्षींनी सांगितले त्यात काहीच विशेष वाटणार नाही. अश्या हजारो पद्धती सापडतील ज्या २-४ क्षणापुरत्या विदेहत्वचा अनुभव देतील. काश्मिरी शैवीजम पंथामध्ये शिवाने पार्वतीला अश्या १०८ ध्यानपद्धती सांगितल्या आहेत. त्यातली कोणतीही एक अवलंबली तरी काही क्षणापुरता का होईना विचार थांबायचा अनुभव येईल. लोकेषणा आणि वित्तेषणा - अध्यात्मिक वाटचालीतील दोन मोठे अडसर. नेहमीप्रमाणे संक्षींच्या मीच सर्वज्ञ, बरोबर आणि बाकी सगळे चुकीचे हा गर्विष्ठपणा या लेखातही दिसला. जोपर्यंत हे अडसर दूर होत नाहीत तोपर्यंत संक्षी बद्धच आहेत, मुक्त नाहीत हे सांगणे फार कठीण नाही. बाकी अध्यात्मात खरीच प्रगती करायची असेल तर उगाच अमक्या तमक्याने सांगितलेल्या नवीन मार्गाचा वापर करण्याऐवजी अध्यात्मिक ग्रंथ आणि मुक्त ज्ञानी गुरु (महाराष्टरातील संत तसेच योगानंद, विवेकानंद, रामकृष्ण परमहंस, आदी शंकराचार्य, रमण महर्षी वगैरे) यांनी सांगितलेल्या मार्गावर चालणे पुरेसे आहे.
  • Log in or register to post comments
उ
उन्मेष दिक्षीत Tue, 01/04/2022 - 12:31 नवीन
ट्रुथ इज नॉट अगेन्स्ट एनिबडी तर, प्रतिसादाचा उद्देश गडे मुर्दे उखाडना नसून, वेरिफिकेशन आहे ! कोणताही सायंटिस्ट जेव्हा त्याला 'आकळलेली' गोष्ट थिअरी स्वरुपात मांडतो, तेव्हा त्याचे वेरिफिकेशन व्हायला लागते. इथे शून्यता ही वास्तविकता संक्षींनी मांडली होती आणि वेरिफाय कशी होऊ शकेल हे ही सांगीतले होते, विथ हिज मेथड ऑफ मेडिटेशन. उद्देश, निर्विचारतेतून (ऑलरेडी असणारी वास्तविकता (शून्यता) कळणे. 'कोणाच्याही आत कुणीही नाही'. मी साधना एकदाच केली होती आणि त्या आधी बराच अभ्यास केला असल्याने, परत नवीन मेडीटेशन करावे वाटेना. तर मी या साधनेतून शुन्याप्रत पोहोचलो नाही ! पण आता मी सांगू शकतो की संक्षींची मेथड शुन्याचा 'कुणाच्याही आत कुणीही नाही' उलगडा घडवू शकते कारण इट इज अ फॅक्ट आणि मेंटल अ‍ॅक्टीविटीचे थांबणे ते घडवू शकते. कारण जाणीव 'कुणाची वैयक्तिक' नाही आणि स्वतःला व्यक्ती समजल्यामुळे आपण (बॉडी) च्या आत कन्फाईन्ड आहोत आणि मरणार असं वाटत होतं.. वास्तविकात देअर इज नो सच कन्फाईन्मेन्ट ! नाऊ चा उलगडा बॅकट्रॅक करताना अचानक झाल्यामुळे मीच नाऊ झालो आणि मन कह्यात येणे म्हणजे काय ते कळले ! आणि त्यानंतर चक्क ऑनलाइन ऑफिस मीटींग मधे असताना मला हा खरंच अफलातून असा उलगडा झाला ! बाकी, कुछ नही बदला, बदलता !
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Tue, 01/04/2022 - 13:35 नवीन
संक्षींचा णवीण औतार. वेल्कम ब्याक सरजी.
  • Log in or register to post comments
उ
उन्मेष दिक्षीत Tue, 01/04/2022 - 15:38 नवीन
"पचनसंस्थेतील वायूनिर्मिती" जोरात चालू आहे नवीन प्रतिसाद मधे, डेथ आहे कि नाही कुणाला पडलंय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा