Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

काडीमोड घेताना दुसरा नवरा व कुटुंबाची निवड

म
माईसाहेब कुरसूंदीकर
Mon, 11/23/2020 - 13:39
🗣 36 प्रतिसाद
आमची प्रेरणा- http://www.misalpav.com/node/47886 सध्या नवीन नवरा शोधत आहे. स्थळे पाहत आहे. एकाने होकार दिला आहे. त्यानंतर सध्याच्या नवर्याला नारळ दिला. सध्या सामानाची बांधाबांध करत आहे . माझ्या आजपर्यंतच्या वैवाहिक जीवनात अगोदर होकार देऊन स्थळे शोधायचा प्रकार केला नाही ; पण भरपूर बायका असे करताना दिसल्या. कमी कालावधीत नववधू सेटल होईल अशा मुलीला पुरूष प्राधान्य देतात असे ऐकून आहे . लवकरात लवक्र लग्न करणे हा जास्त दागिने मिळवण्यचा ही एक मार्ग आहे असे ऐकले आहे पण प्रत्यक्षात असा अनुभव नाही. आता डेटिंगसाठी भरपूर कॉल्स येतात. जेंव्हा नवर्याशी काडीमोड घेत आहे असे सांगते, तेंव्हा लोक “दुसरा कुणी तयार झाला आहे का”? असे विचारतात . होकारार्थी उत्तर दिल्यावर डेट अरेंज करतात. सतत कॉल करत राहतात पण पत्रिका जमली आहे की नाही ते सांगत नाहीत, पुनः पुनः कॉल करत राहतात . तर अशा परिस्थितीत नेमके होणार्या नवर्याला काय सांगावे ? नविन स्थळ येत आहे की नाही? एका मुलाच्या मामीने मला तुम्ही हे अन एथीकल करत आहात असे वाटत नाही का तुम्हाला असे म्हणाली . त्यावेळी मला काय सांगावे हे खरेच कळत नव्हते. समजा, नवीन स्थळ आकर्षक वाटलेच तर होणार्या नवर्याच्या लोकाना काय सांगावे ? हे हातळताना सगळा गोंधळ होतो आहे. याबाबतीत मला मदत हवी आहे . शिवाय वराची निवड कोणत्या निकषावर करावी ? आर्थिक हा मुद्दा आहेच पण आतापर्यंत २ बी एच के , एमएनसी वैगेरे फुगा मी पाहिला आणि चुटकीसरशी फुटला पण . शिवाय लहान कुटुंबातील भरपूर काम , धुणी भांडी,गॅस गेला तर चुलीवर जेवण ह्यातुन नवर्याने सोडण्याची भीती हे ही अनुभवून झालेय . पूर्वी सतत नवरे बदललेले नाहीत पण बराच अनुभव गाठीशी आहे. नवरेही दागिने किती देणार ह्यापेक्षा तुम्हला माहेरून किती मिळाले ह्यावर आग्रही असतात तर नक्की कोणती भूमिका घ्यावी ?
वर्गीकरण
फालतू चर्चा

प्रतिक्रिया द्या
16028 वाचन

💬 प्रतिसाद (36)
उ
उपयोजक Mon, 11/23/2020 - 14:08 नवीन
अजून येऊ द्या! ;))))
  • Log in or register to post comments
ज
जेडी Mon, 11/23/2020 - 14:18 नवीन
इथूनपूढे मिसळपाववर काहीच लिहायचे नाही हे आता नक्की झाले , अर्थात त्यामुळे खूप नुकसान होणार नाहीच पण गट तट पाडून इथे कसा कंपू आहे हे सिद्ध केल्याबद्दल धन्यवाद
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Mon, 11/23/2020 - 15:22 नवीन
जे डी भाऊ एन्जॉय करा हो. एखाद्या लेखाचे विडंबन येणे हे मिपाच्या हॉल ऑफ फेम मधे एन्ट्री मधे मिळाल्या सारखे आहे. लेख कविता यांचे विडंबन हे मिपावर हे चालतेच. त्यामुळे तर मिपा जिवंत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेडी
ज
जेडी Mon, 11/23/2020 - 15:53 नवीन
ताई आहे... असो....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
म
माईसाहेब कुरसूंदीकर Mon, 11/23/2020 - 16:27 नवीन
जेडे,अग केवळ मनोरंजन म्हणून ते आहे. कंपू वगैरे काहीही नाही. लिहित रहा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेडी
च
चौथा कोनाडा Fri, 11/27/2020 - 13:10 नवीन
जेडीताई, एकाद्या धाग्याचे विडंबन होणे हा मिपाचा विशेष पुरस्कार समजला जातो ! मिपाचा असा विशेष पुरस्कार मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन & आणी पुढील वाटचालीस हसतहसत शुभेच्छा ! 😆
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेडी
ब
बाप्पू Mon, 11/23/2020 - 14:22 नवीन
Lol.. मस्त विडंबन.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Mon, 11/23/2020 - 15:10 नवीन
कोणता नवरा किती ग्रॅच्युईटी देतो, पेन्शन काय मिळेल याची कम्पॅरिझन त्या त्या कंपनीच्या एच आर सोबत डिस्कस करत रहा. प्रोफेशनल एथिक्स ठेवायलाच हवेत
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Mon, 11/23/2020 - 16:51 नवीन
आयला जाम हसलो.. जेडीताई वाईट वाटून घेऊ नका.. प्रत्येक वेळेस विडंबन म्हणजे खिल्ली नसते.. खिळाडूपणाने घ्या असे सुचवेन. इथले प्रतिसाद बघा, त्यातला एकही प्रतिसाद जर तुमची खिल्ली उडवणारा आला तर जरूर परत न लिहायचा विचार करा.. नाहीतर विडंबनाचा आनंद घ्या!
  • Log in or register to post comments
ग
गवि Mon, 11/23/2020 - 17:04 नवीन
+१ अगदी एखादा आलाही खिल्ली उडवणारा, तरी लिहीत राहा. आणि विडंबनाची केवळ मजा घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
श
श्रीरंग_जोशी Mon, 11/23/2020 - 21:36 नवीन
असे फर्मास विडंबन 'एक अरसे बाद' वाचायला मिळाले. जेडीतै - विडंबनासाठी तुमचा धागा कच्चा माल म्हणून वापरला जाणे हे एक निमित्त असते. विडंबनाची प्रेरणा विडंबकाच्या आत खोलवर दडलेली असते. मिपावर बागडण्याचा मनसोक्त आनंद मिळवायचा असेल तर 'विडंबकाचा आयडी असावा ऑनलाइन' हे ब्रीदवाक्य जाणून असावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
म
माहितगार Tue, 11/24/2020 - 11:56 नवीन
जेडीतै - विडंबनासाठी तुमचा धागा कच्चा माल म्हणून वापरला जाणे हे एक निमित्त असते. विडंबनाची प्रेरणा विडंबकाच्या आत खोलवर दडलेली असते.
अगदी सहमत, विडंबनाची प्रेरणा म्हणण्यापेक्षा अभिव्यक्तीची प्रेरणा किंवा लेखन विषय आधीच कुठेतरी डोक्यात घोळून गेलेला असतो. काही कारणाने लगेच लेखन झालेले नसते किंवा फॉर्मॅट मिळालेला नसतो. एखादे लेखन समोर येते तेव्हा मागचे घोळलेले विचार त्याच फॉर्मॅटला वापरून लिहिता येईल हे लक्षात येते तेव्हा विडंबनाचा जन्म होतो. बाकी माई कदाचित वैचारीक राजकीय कंपुत असतीलही पण त्यांच्या राजकीय वैचारीक कंपुपणाचा या विडबंनाशी संबंध नाही. काही असलेच तर लेखनास स्त्रीवादी कंपुत्वाची अल्पशी लागण झालेली असू शकते पण तेवढे चालायचेच. त्यामुळे यावेळी गटतट बाजूस पडून खुमासदार विडंबनासाठी माईंचे सार्वत्रिक अभिनंदन होणार यात शंका नाही, (तुर्तास राजकीय गट बाजूस ठेऊन) आम्हीही माईंच्या लेखनाचे अभिनंदन करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
च
चलत मुसाफिर Mon, 11/23/2020 - 17:25 नवीन
कोणत्याही नवऱ्याला होकार देण्याअगोदर त्याच्या याआधीच्या बायकांशी चर्चा जरूर करा.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Mon, 11/23/2020 - 19:28 नवीन
हेच लिहायला आलेलो नोकरी असो किंवा छोकरी....अनुभव फार महत्वाचा असतो =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चलत मुसाफिर
व
विजुभाऊ Tue, 11/24/2020 - 03:33 नवीन
हो ना. Lessons learned हे सर्वात महत्वाचे क्रायटेरिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Mon, 11/23/2020 - 19:29 नवीन
आयला....माईंचा षटकार थेट स्टेडियमच्या बाहेर...ख्या ख्या ख्या
  • Log in or register to post comments
स
साहना Tue, 11/24/2020 - 03:56 नवीन
माईसाहेबाना साष्टांग दंडवत ! इथे कदाचित बायको म्हणून राहण्यापेक्षा ष्टेपणी म्हणून राहण्याचे सुद्धा काही फायदे तोटे असतील तर तेही पाहावेत म्हणे !
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Tue, 11/24/2020 - 04:58 नवीन
माईसाहेब, राजकीय चर्चांमधून थोडा वेळ काढून असे फर्मास विडंबन लिहून विरंगुळ्याचे चार क्षण आम्हाला मिळवून दिल्याबद्दल तुमचे आणि तुम्हाला त्यासाठी प्रेरित करणाऱ्या जेडी ताईंचे मनःपूर्वक आभार 🙏 जेडी ताईं वरती अनेक मान्यवरांनी लिहिल्याप्रमाणे एक विनोद म्हणूनच ह्या विडंबनाकडे पहा आणि आनंद घ्या अशी तुम्हाला आग्रहाची विनंती! आणि माईसाहेब तुम्हीपण तुमच्या प्रतिभेला न्याय देत खुमासदार लेखन करत रहा असा तुम्हाला विनंतीवजा आग्रह!
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Tue, 11/24/2020 - 06:57 नवीन
+१ अगदी हेच लिहिणार होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्मीनेटर
य
योगी९०० Tue, 11/24/2020 - 05:05 नवीन
बर्‍याच दिवसांनी गंमत आली. माईंना (पहिल्यांदाच) दंडवत...!! बाकी नानांची काळजी वाटते. त्यांच्याशी जाता जाता भांडू नका. परतीचा मार्ग मोकळा ठेवा.
  • Log in or register to post comments
B
Bhakti Tue, 11/24/2020 - 06:48 नवीन
मला माझ्या 'अशाच 'काडीमोड घेतलेल्या नवर्‍याची आठवण आली..सध्या नवराच नको..हा हा!!
  • Log in or register to post comments
क
कंजूस Tue, 11/24/2020 - 09:44 नवीन
'असं अमचे हे म्हणतात' असं हल्ली येत नाही ते का समजलं.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Tue, 11/24/2020 - 12:25 नवीन
या भलत्याच माडर्न माईसाहेब निघाल्या. "आमच्या यांचे असे मत आहे " या पालुपदावरुन आमचा असा समज झाला होता की माइसाहेबांची आणि "यांची" साताजन्माची गाठ मारली गेली आहे, अगदी सरकारी नोकरी सारखी. पण कसचे काय? आज आमच्या डोळ्यासमोरील अजून एक आदर्श उन्मळून पडला. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
म
माहितगार Tue, 11/24/2020 - 13:19 नवीन
:))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
य
योगी९०० Wed, 11/25/2020 - 05:28 नवीन
मस्त प्रतिसाद... हहपुवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
न
निनाद Wed, 11/25/2020 - 06:06 नवीन
आज आमच्या डोळ्यासमोरील अजून एक आदर्श उन्मळून पडला. लेखच नाही तर प्रतिसाद पण भारी... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
त
ताजे प्रेत Tue, 11/24/2020 - 18:27 नवीन
अशीच आमची माई असती तर आम्ही ही आंचरट झालो असतो भीषण हसलो
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Tue, 11/24/2020 - 19:27 नवीन
आहात ते कमी आहे का? तुमच्या चुरचुरू बोलणाऱ्या जिभेला डाग द्यायला पाहिजे!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ताजे प्रेत
न
निनाद Wed, 11/25/2020 - 06:06 नवीन
सही आहे हा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ताजे प्रेत
व
विजुभाऊ Wed, 11/25/2020 - 03:28 नवीन
डाग अच्छे होते है---- माई एक्सेल
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Wed, 11/25/2020 - 05:00 नवीन
नवरा बदलून मिळेल अशी बिझनेस आयडिया लोकांच्या डोक्यात येवू शकते आणि तशी वेबसाईट भविष्यात चालू झाली तर आश्चर्य वाटून घेवू नका.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Wed, 11/25/2020 - 12:00 नवीन
हब्बीजान.कॉम
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188
स
साहना Wed, 11/25/2020 - 23:07 नवीन
हलाला कि काय म्हणतात ते हेच प्रकरण आहे. !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188
श
शा वि कु गुरुवार, 11/26/2020 - 03:28 नवीन
आजिबात आश्चर्य वाटून नाही घेणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188
अ
अनिरुद्ध.वैद्य गुरुवार, 11/26/2020 - 03:41 नवीन
खुमासदार!! (प्रेरणेपेक्षा विडंबनावर जास्त प्रतिसाद आल्याने विडंबन कमालीचे यशस्वी)
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा गुरुवार, 11/26/2020 - 04:47 नवीन
ए माई तुझे हे विडंबन पाहून तू नवर्याला सोडण्याचा आणभाव घेतलेला दिसतोय ! फर्मास विडंबन व प्रतिसाद तर एक्सो एक भारी ! मस्त !
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा